BUY PROJECT PDF Click Here!

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प | Naisargik sansadhane tyanche vyavsthapn v sanvardhan project pdf

पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी pdf डाउनलोड पर्यावरण प्रकल्प प्रस्तावना पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती पर्यावरण प्रकल्प pdf Environmental projects 11th 12th
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन

 

1) प्रकल्प कार्यपद्धती 
2) प्रकल्प प्रस्तावना 
3) विषयची निवड 
4) विशेलेषण , निरीक्षणे , निष्कर्ष 

5)विषयाचे महत्व 

    इत्यादी मुद्द्यांनी परिपूर्ण असणारा पर्यावरण प्रकल्प आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

        नमस्कार मित्रांनो Educationalमराठी या शैक्षणिक  माहितीच्या वेबसाईटवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आज आपण ‘नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प’ या विषयावरील प्रकल्पाची माहिती घेणार आहोत. प्रकल्पाची प्रस्तावना , विषयाचे महत्व, निरीक्षणे, विश्लेषण, निष्कर्ष, संदर्भ या सर्व मुद्द्यांचा समावेश असलेल्या प्रकल्पाची माहिती आम्ही उपलब्ध करून दिली आहे.


११ वी १२वी पर्यावरण विषयाच्या प्रकल्पासाठी तसेच इतर इयत्तांचा प्रकल्प करताना देखील या माहितीचा विद्यार्थी उपयोग करू शकतात.

११वी,१२वी प्रकल्प ‘नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन  


नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प  | Naisargik sansadhane tyanche vyavsthapn v sanvardhan project pdf

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प  | Naisargik sansadhane tyanche vyavsthapn v sanvardhan project 




प्रकल्प प्रस्तावना


        माणसाची प्रत्येक गरज ही निसर्गामुळेच पूर्ण होते. निसर्गातूनच मिळणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंचा आणि सेवांचा उपयोग करून माणूस आपल्या गरज भागवत असतो. पाणी , माती, हवा, खनिजे आणि कोळसा इत्यादी. अजैविक संसाधने आहेत तर जंगले, वने, पिके, वन्यजीव आणि वन्यप्राणी इत्यादी जैविक संसाधनांची उदाहरणे आहेत. संसाधने म्हणजे काय तर जीवना जगण्यासाठी लागणारी किंवा वापरली जाणारी कोणतीही सामग्री म्हणजे संसाधन होय.


        मानवाच्या वाढत्या गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी होत असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमाप वापर यांमुळे आज पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे साठे दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. हे जर असेच चालू राहिले तर येणाऱ्या भविष्यामध्ये नैसर्गिक संसाधनाची माणसाला कमतरता भासू लागेल.


        जर या समस्येपासून माणसाला वाचायचे असेल तर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य पद्धतीने वर्गीकरण व व्यवस्थापन करणे गर्जेहे आहे. प्रत्येकामध्ये नैसर्गिक संसाधनाच्या काटकसरीने वापरावर भर दिला पाहिजे.


‘नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन’ या प्रकल्पाच्या माध्यमातून मी नैसर्गिक संसाधने म्हणजे काय ? ती कोणती आहेत व त्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

अनुक्रमणिका

 

अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

नैसर्गिक संसाधने संकल्पना

५)

नैसर्गिक संसाधने आणि त्यांचे संवर्धन

 

पाणी संसाधन

 

वन संसाधन

 

अन्न संसाधन

 

जमीन संसाधन

 

खनिज संसाधन

६)

नैसर्गिक संसाधानाचे संवर्धन करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवरील उपाय-योजना

७)

निरीक्षणे

८)

विश्लेषण

९)

निष्कर्ष

१०)

संदर्भ





























१.विषयाचे महत्व


        अगदी छोट्याश्या मुंगीपासून ते अगदी मोठ्या गरुडापर्यंत प्रत्येकजण या धरतीचा समतोल सांभाळतो. पण सर्वात बुद्धिमान असणारा माणूस मात्र दिवसेंदिवस या पर्यावरणाचा समतोल बिघडवत चालला आहे.


        वाढत्या लोकसंख्येला सुखसुविधा पुरवता याव्यात तसेच अन्न-धान्याची गरज भागवता यावी यासाठी मोठ्या प्रमाणवर नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो. या नैसर्गिक संसाधनांचे पृथ्वीवर साठे मर्यादित स्वरूपाचे आहेत. जर हे साठे नष्ट झाले तर मानवासमोर फार मोठे संकट उभे राहील.


        भविष्यातील या संकटापासून वाचायचे असल्यास माणसाला आत्तापासूनच त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. समजतील प्रत्येक नागरिकामध्ये नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धना बाबत व व्यवस्थापना बाबत जागृती होणे गरजेचे आहे. म्हणून नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन हा प्रकल्प विषय खूप महत्वाचा आहे.

 

 

२.प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

 

  • नैसर्गिक संसाधने संकल्पना जाणून घेणे.
  • नैसर्गिक संसाधनाच्या विविध प्रकारांबाबत याबाबत अधिक माहिती मिळविणे.
  • नैसर्गिक संसाधनाच्या ऱ्हासाची कारणे जाणून घेणे.
  • नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनाचे विविध उपाय जाणून घेणे.
  • नैसर्गिक संसाधने व त्यांचे संवर्धन याबाबत अधिक माहिती इतरांना मिळवून देणे.

 

 

3.प्रकल्प कार्यपद्धती


        ‘नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन हा प्रकल्प करीत असताना मी सर्वेक्षण, मुलाखत आणि संसोधन या कार्यपद्धतिचा वापर माहिती मिळविण्यासाठी केला. प्रकल्पाबाबत माहिती मिळवताना हा प्रकल्प करण्याआधी हा प्रकल्प करणे का गरजेचे आहे. त्याचे महत्व काय आहे. इत्यादी माहिती मिळवली. हा प्रकल्प करीत असताना नैसर्गिक संसाधनाची भूतकाळातील स्थिती तसेच वर्तमान आणि भविष्यातील त्याची स्थिती काय असेल यांवर आधारित मुद्द्यांचा वापर केला आहे. प्रकल्पाच्या विषयाला अनुसरून योग्य त्या मुद्द्यांच्या आधारे हा प्रकल्प तयार केला आहे.


        या प्रकल्पाची माहिती संकलित कार्नायची सुरुवात मी माझ्या आजूबाजूच्या परिसराचे सर्वेक्षण करून केली. परिसरातील नैसर्गिक संसाधनांचे कोणते स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय आहे. नैसर्गिक संसाधानाचे संवर्धन होण्यासाठी  कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत के नाहीत याबाबत सविस्तर माहिती मिळवली.


        नैसर्गिक संसाधनांची भूतकाळातील स्थिती कशी होती आणि आत्ता वर्तमान काळात कशी आहे हे जाणून घेण्यासाठी मी मुलाखत या कार्यपद्धतीचा अवलंब केला. परिसरातील मोठ्या माणसाच्या मुलाखती घेऊन अधिक माहिती संकलित केली. यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा होत असेलेला ऱ्हास. हा मुद्दा प्रामुख्याने दिसून आला . मुलाखातियाच्या माध्यमातून अधिकाची माहिती तर एकत्र झालीच पण त्याच बरोबर या मुलाखतींमधून नवनव्या मुद्यांची निर्मिती झाली. या मुद्द्यांच्या मदतीने प्रकल्पांची पुढील माहिती संकलित करण्यास मदत झाली.


        तयार केलेल्या मुद्यांबाबत अधिक सविस्तर माहिती मिळविण्यासाठी मी आंतरजालावरील ( इंटरनेट ) वर उपलब्ध असलेया शैक्षणिक संकेतस्थळांचा ( वेबसाईट ) चा वापर केला. त्याचप्रमाणे विविध पर्यावरणविषयक पुस्तकांची मदत घेऊन प्रकल्पाच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती मिळवली . मिळविलेल्या महितीची मिद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली. सदर माहिती प्रकल्पामध्ये पुढे नमूद केली आहे आणि संकलित माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीकाष्ण विश्लेषण आणि निष्कर्ष इत्यादींची नोंद केली.

 

 

4.नैसर्गिक संसाधने संकल्पना



        जी सामग्री माणसाला जीवन जगण्यासाठी लागते किंवा वापरली जाते ही सामग्री म्हणजेच संसाधन होय.

 

नैसर्गिक संसाधनाची व्याख्या:

    प्राणी, प्राण्यांचे समूह किंवा परिसंस्‍था यांचे जीवनकार्य सुरळीत चालण्यासाठी लागणारी  ऊर्जा किंवा पदार्थ/वस्‍तू म्हणजेच निसर्गिक संसाधने होय.

 

नैसर्गिक संसाधनांचे दोन प्रमुख प्रकार पडतात

१) पुनर्नवीकरणीय

२) अपुनर्नवीकरणीय

 

१)  पुनर्नवीकरणीय( पुनर्नवीकरणीय करता येणारी ) संसाधने :


        पुनर्नवीकरणीय संसाधने ही निसर्गामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये पुन्हा पुन्हा निर्माण होतात. ही प्राणी व वनस्‍पतींची संसाधने पुनरूत्‍पादनामुळे आणि साध्या पदार्थांचा उपयोग करून वाढतात.

उदा.: - जैवभूरासायनिक चक्रे आणि प्रकाशसंश्लेषण यांचा उपयोग करून वनस्पतींची पुन्हा निर्मिती होते.

 

२)अपुर्ननवीकरण (पुर्ननवीकरण न करता येणारी) संसाधने:


        अपुर्ननवीकरण या प्रकारची संसाधने निसर्ग थोड्या काळात निर्माण निर्माण होत नाहीती तसेच या प्रकारची संसाधने निसर्गात अगदी मर्यादित प्रमाणातच उपलब्ध असतात. आहेत आणि यात वाढ होत नाही.

उदा.: कोळसा, नैसर्गिक वायू, खनिजे आणि पेट्रोलिअम.

 

 

5.नैसर्गिक संसाधने आणि त्यांचे संवर्धन

 


नैसर्गिक संसाधन पाणी:


        पाणी नसेल तर या पृथ्वीवर जीवन अशक्य आहे. गोडे पाणी हा पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. आणि जर हा स्त्रोत नसेल तर त्याशिवाय वनस्पती किंवा प्राणी पृथ्वीवर जिवंत राहू शकत नाहीत. माणसाला पिण्यासाठी पाणी गरजेचे आहेच शिवाय  शेतीसाठी, उद्योग चालविण्यासाठी आणि जलविद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज आहे. पाणी हे पृथ्‍वीवरील अत्‍यावश्यक नैसर्गिक संसाधन आहे. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या गोड्या पाण्यावरच सर्व प्राणी व वनस्‍पतींचे जीवन अवलंबून आहे. पृथ्‍वीचा ९७% भूभाग पाण्याने व्यापला आहे. बहुतांश सर्व प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या शरीरामध्ये ६०-६५% इतके पाणी असते.

 

पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास :


    औद्योगिक प्रगती आणि मोठ्या प्रमाणवर झालेली लोकसंख्या वाढ  यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या प्रमाणात आणि गुणवत्तेत मोठ्या प्रमाणवर घट होणे म्हणजे पाण्याचा ऱ्हास होय. उपलब्ध असलेल्या पाण्याचा दर्जा दिवसेंदिवस वाईट होत चालला आहे.

 

पाण्याच्या गुणवत्‍तेत घट होण्याची कारणे :

 

१. वाढत्या लोकसंख्येची पाण्याची अधिकाधिक गरज पूर्ण करण्यासाठी पृष्ठभागावरील भूजलाचा अतिरिक्त वापर झाला आहे.

२. घरगुती व शहरातील वापरामुळे निर्माण झालेले सांडपाणी, गोड्या पाण्याच्या नैसर्गिक जलाशयात मिसळल्यामुळे माणूस व प्राण्यांना वापरण्यायोग्य राहत नाही.

३. कारखान्यांनी प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलस्त्रोताच्या पृष्ठभागावरून पाझरल्‍यामुळे व झिरपून भूजलात मिसळल्यामुळे भूजल स्त्रोत प्रदुषित होतात.

४. शेतामधून खते, रसायने व कीटकनाशके मिश्रित सांडपाणी नैसर्गिक जलाशयात मिसळल्यामुळेनैसर्गिक जलस्त्रोतांचा दर्जाचा ऱ्हास होत आहे.

५. मनुष्याकडून होणाऱ्या वाढत्या वापरामुळे भूजलाची पातळी खालावली आहे. किनारपट्टीवर समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्याच्या विहिरींमध्ये जाते व पाण्याची क्षारता वाढत


जलसंवर्धन व व्यस्थापन


  • जीवसृष्टीचे अस्तित्व आपल्याला टिकवून ठेवायचे असेल तर पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन आवश्यक आहे. पुढील पद्धतीने पाण्याचे संवर्धन करता येईल.
  • पाणलोट क्षेत्रात वनस्पतींची लागवड केल्यास माती पाण्याला घट्ट धरून ठेवेल आणि खोलवर पाणी झिरपून भूजल तयार होण्यास मदत होईल.
  • शेतीला पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी छोटे बंधारे व तलावांचे बांधकाम करणे.
  • घरातून वा कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी हे प्रक्रिया करूनच नंतर ज्लस्त्रोतात सोडले पाहिजे.
  • गोड्या पाण्याचे रासायनिक व औष्णिक प्रदूषण रोखण्यासाठी औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
  • आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा कमी आणि गरजेनुसार वापर करणे आवश्यक आहे.
  • पावसाचे पाणी साठवून व भूजलाचे पुनर्भरण करून पावसाच्या पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे.
  • शेतीसाठी ठिंबक सिंचन व तुषार सिंचन यांचा वापर करावा.

 

वन संसाधन

        वन/जंगल म्‍हणजे घनदाट वाढलेले वृक्ष आणि इतर वनस्‍पती यांनी मोठ्या परिसरामध्ये व्यापलेला भू भाग होय. वन संसाधन हा पृथ्‍वीवरील महत्‍त्‍वाचा नैसर्गिक स्‍त्रोत आहे. पृथ्‍वीचा हिरवा शेला असलेली ही वने माणसाला जगण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू देतात. शिवाय अनेक प्रकारच्या जीवनावश्यक असलेल्या पर्यावरणीय सेवा देखील पुरवतात.

 

वनसंसाधनाच्या ऱ्हासाची कारणे:


  • स्थलांतरित शेती: ३०० दशलक्ष लोक स्थलांतरीत शेती करणारे आहेत असे अनुमान काढले जाते. हे लोक शेती करण्यासाठी राब पद्धतीचा वापर करतात. आणि या प्रकारच्या शेतीसाठी ५ लाख हेक्टर पेक्षा ही जास्त वनांची कत्तल करतात. यामुळे मोठ्या प्रमाणवर वनसंसाधनाचा ऱ्हास होतो.
  • जळावू लाकडाची आवश्यकता
  • गरिबी वाढत चालल्याने जळाऊ लाकडांच्या मागणीत मोठ्या प्रमाणवर वाढ झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणवर जंगल तोड केली जात आहे.
  • औद्योगिक वापरासाठी कच्चा माल
  • जंगलातील मिळणाऱ्या लाकडापासून तसेच इतर सामाग्रीपासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवता येतात. या वस्तूंच्या मागणीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलांवर ताण पडत आहे.
  • विकास प्रकल्प
  • धरणे, खाणकाम, शहरीकरण, जलविद्युत प्रकल्प अशा प्रकारच्या विविध विकास कामांसाठी मोठ मोठी जंगले उध्वस्त केली जात आहेत.
  • अन्नाची वाढती गरज
  • वाढत जाणाऱ्या लोक्संखेची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी, शेतीसाठी, घरांची गरज भागवण्यासाठी जंगले भुईसपाट केली जात आहेत. आणि तेथे मोठ्या प्रमाणवर शेती केली जात आहे.

अन्न संसाधन ऱ्हासाची कारणे


  • मातीच्या सुपिकतेत घट
  • वनजमीन, गवताळ प्रदेश, दलदलीचे प्रदेश इत्यादींचे
  • शेतजमिनीत रूपांतर केल्यामुळे परिस्थितीकींचा ऱ्हास.
  • मत्‍स्य उत्‍पादनात घट होणे.
  • आदिवासी जमातीत अन्नधान्य समस्या आजही गंभीर आहे.
  •  रासायनिक खतांच्या वापरामुळे काही सूक्ष्म पोषक द्रव्यांचा असमतोल झाला

 

वन संवर्धन व व्यवस्थापन


  • आवश्यक असल्यासच जंगलतोड करावी.
  • उर्जा निर्मिती साठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.
  • विविध वस्तूंची निर्मिती करत असताना ती वस्तू पुन्हा वापरता येईल या पद्धतीने बनवावी.
  • विकास प्रकल्प करत असताना कमीत कमी कशी नैसर्गिक साधन संपत्तीची हानी होईल याकडे लक्ष द्यावे.

 

अन्न संसाधन


    जगामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणि अन्न म्हणून खाण्यायोग्य आहेत, मात्र त्यातील काहीच प्रकार मानवाच्या अन्नामध्ये वापरले जातात. आज आपल्या अन्न मिळते ते शेती, पशुसंवर्धन, आणि मासेमारी या उद्योगांतून. परंतु कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे.

 

अन्नधान्य व्यवस्थापन व संवर्धन :


  • वर्षाला सुमारे १८ दशलक्ष लॉक जगामध्ये उपासमारी आणि कुपोषणाने मृत्युमुखी पडतात. या समस्येवर मात करण्यासाठी पौष्टिक अन्नाचे संवर्धन व पुरवठा केला पाहिजे.
  • अन्नधान्याचे सर्वांमध्ये समान वाटप करणे गरजेचे आहे.
  • अन्न धान्याची नासाडी टाळणे आवश्यक आहे.
  • पर्यायी अन्न धन्य संसाधनांनचा वापर करणे आवश्यक आहे.

 

जमीन एक नैसर्गिक संसाधन

 

        जमीन ही एक बहुमुल्‍य नैसर्गिक संसाधन असून त्यापासून मानवाला अन्नधान्य, धागे, औषधे लाकूड आणि इतर आवश्यक जैविक साहित्य मिळते. संसाधनाची पुननिर्मिती ही जमिनीमध्ये होते लोक त्यावर अवलंबून असतात. जमिनीचा जर आपण काळजीपूर्वक वापर केला तर  तो पुन:निर्मितीक्षम स्त्रोत होऊ शकतो.

 

जमिनीचा ऱ्हास होण्याची करणे :


  • मोठ्या प्रमाणवर जंगलतोड झाल्यामुळे जमीन नापीक होऊन तिचे पडीक जमिनीमध्ये रूपांतरण होते.
  • अति प्रमाणात केलेल्या सिंचनामुळे पाणथळ जमीन होऊन पिके उगवत नाहीत.
  • रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन विषारी बनून नापीक होते.
  • शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे शेतजमीन तसेच वनजमिनीचा ऱ्हास होतो.
  • शेत जामिनाचा अति वापर केला तर शेतजमीन धोक्यात येते.

जमिनीचे संवर्धन :


        जमिनीचे संवर्धन ही एक नैसर्गिक जमिनीचे संरक्षण आणि विकासती जमिनीला तिच्या नैसर्गिक स्थितीमध्ये रुपांतरीत करण्याची एक प्रक्रिया आहे. काही जमिनीत किरकोळ कमतरता असते तर एखादी जमिनी पूर्णपणे नापीक झालेली असते. जमिनीच्या संवर्धन करण्याच्या तंत्रामध्ये संवर्धन, पुनर्स्थापन, पुनउपचार व शमन इत्यादी तंत्रे समाविष्ट आहेत.


संवर्धन

    माणसाने फक्त नैसर्गिक संसाधन म्हणून जमिनीचे जतन न करता ती मुल स्वरुपात ठेवण्याचा प्रयात करावा त्यामुळे येणाऱ्या वर्षात जमिनीचे संवर्धन होण्यास मदत होईल.

पुनर्स्थापन

    जमिनीचे संवर्धन करण्यासाठी पुनर्स्थापन या तंत्रामध्ये परिसंस्था व समूहांना त्यांच्या मुल नैसर्गिक स्थितीमध्ये पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया समाविष्ट असते.

 

खनिजे नैसर्गिक संसाधने.


        खनिज पदार्थ हे निसर्गात आढळणारे रासायनिक पदार्थ आहेत. या पदार्थांना वैशिष्ट्यपूर्ण स्वतःचे असे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म असतात. खनिज संसाधने देशाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावतात. भारताला या खनिज संपत्तीचे वरदानच लाभले आहे.

 

खनिज संसाधनाचा ऱ्हास:


        औद्योगिकीकरण व विकासासाठी खनिज संसाधने मोठ्या प्रमाणवर आवश्यक असतात. त्यामुळे त्यांच्या खपात वाढ झाली असून खपाच्या या दराने खनिजे पुढील ५०-१०० वर्षात संपून जातील.

 

खनिजांचे संवर्धन :

  • खनिज संसाधनांचा खप वेगाने वाढतो आहे.
  • त्‍यामुळे लोखंड, तांबे, जस्‍त, ल्‍युमिनियम, शिसे इत्‍यादी
  • धातूंच्या भंगाराचा पुनर्वापर होण्यास प्रोत्‍साहन दिले पाहिजे.

 

 

6.नैसर्गिक संसाधानाचे संवर्धन करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवरील उपाय-योजना

 

        जंगले, पाणी, माती, अन्न आणि खनिजे व उर्जा ही सर्व नैसर्गिक संसाधने आहेत. आपल्या देशाच्या विकासामध्ये या नैसर्गिक संसाधनाचा फार मोठा वाट आहे. आपण व्यक्तिगत पातळीवर काही उपाय योजना करून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करू शकतो. यासाठी खालील गोष्टी करू शकतो.


पाण्याचे जतन कराः

  • दात घासताना, दाढी करताना, कपडे/भांडी धुताना अंघोळ करत असताना पाण्याचा नळ चालू ठेवू नका.
  • कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये आवश्यक तेवढेच पाणी भरा.
  • कपडे धुतलेले साबणाचे पाणी बागेसाठी किंवा इतर ठिकाणी पुन्हा वापरा.
  • सकाळी किंवा संध्याकाळी बाष्‍पीभवनाचा वेग कमी असतो त्यामुळे  बाग व हिरवळ (लॉन) यांना सकाळी व संध्याकाळी पाणी घाला.
  • पावसाचे पाणी धरून ठेवणारी प्रणाली बसवा.

 

ऊर्जा जतन कराः

  • दिवे, पंखे व इतर उपकरणे वापर नसताना बंद करा.
  • शक्‍य होईल तेवढा नैसर्गिक प्रकाश, म्‍हणजे सूर्यप्रकाश वापरा.
  • धुतलेले कपडे ड्रायर ऐवजी उन्हामध्ये वाळवा.
  • घर बांधत असताना सूर्यप्रकाश घरात येईल अशी रचना करा. यामुळे घर उबदार राहील व उजेडही मिळेल.
  • सायकलचा वापर करा किंवा चालत जा. वाहनांचा वापर शक्‍यतो कमी करा.

 

जमिनीचे रक्षण करा.

  • तुमच्या बागेत निरनिराळी शोभेची झाडे, औषधी वनस्‍पती आणि वृक्ष लावा.
  • मोकळ्या जागेत गवत लावा. त्‍याची मुळे माती धरून ठेवतील व जमिनीची धूप थांबवतील.
  • स्‍वयंपाकघरातील कचऱ्याचे खत करा व ते बागेत वापरा.
  • झाडांना पाणी घालताना जोरदार फवारा मारून नका, त्‍याने माती वाहून जाते.
  • शक्‍य असेल तर ठिबक सिंचन पद्धत वापरा. चांगल्‍या सवयी लावून घ्‍या.

 

7.प्रकल्प निरीक्षणे


नैसर्गिक संसाधने


  • पाणी संसाधन
  • वन संसाधन
  • अन्न संसाधन
  • जमीन संसाधन
  • खनिज संसाधन

पृथ्वीवरील पाणी या संसाधनाची विविध स्त्रोतामधील विभागणी.

 

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प  | Naisargik sansadhane tyanche vyavsthapn v sanvardhan project pdf

 
 

8.प्रकल्प विश्लेषण

 

        किमान ऊर्जेचा वापर किमान पर्यावरणीय आघात करून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठीच्या आपल्या धोरणांचा विचार करण्याची वेळ आली आहे, हे नक्की.


        संसाधनांचा शाश्वत वापर होण्यासाठी मदत व सुधारणा करण्यासाठी बऱ्याच पद्धती आहेत. काही त्यापैकी एकदम छोट्या आहेत. उदा. आपण घराबाहेर जाताना लाईटस् बंद करणे, तसेच काही मोठ्या पद्धती सुद्धा आहेत. उदा. आपण घरामध्ये किंवा आपल्या महाविद्यालयात किती प्रमाणात नैसर्गिक ऊर्जेचा वापर केला याचा हिशोब ठेवणे. या छोट्या-मोठ्या पद्धतीने आपण पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करू शकतो.


        घरातील गरज नसलेल्‍या वस्‍तून टाकता आपण संवर्धनासाठी योगदान देऊ शकतो. ज्या वस्तू परत वापरता येतील, पुनर्प्रक्रिया करता येतील किंवा दुरूस्त करता येतील त्या न फेकता त्यांचा वापर करावा. प्रत्येकाने चालणे, सायकल चालवणेकिंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करणे आणि पर्यावरणाला घातक वस्‍तू किंवा घातक वेष्‍टण यांचा वापर न करणेया गोष्टींचा कटाक्षाने वापर केल्यास प्रत्येकजण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

 

9.प्रकल्प निष्कर्ष


  • नैसर्गिक संसाधने संकल्पना जाणून घेतली.
  • नैसर्गिक संसाधनाच्या विविध प्रकारांबाबत याबाबत अधिक माहिती मिळविणे शक्य झाले.
  • नैसर्गिक संसाधनाच्या ऱ्हासाची कारणे जाणून घेतली.
  • नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनासाठी कोण कोणते उपाय करता येतील याबाबत माहिती घेतली.
  • नैसर्गिक संसाधने व त्यांचे संवर्धन व व्यवस्थापन याबाबत अधिक माहिती मिळाली.

 

10.प्रकल्प संदर्भ

 



  • पर्यावरण पुस्तिका.



 

 प्रकल्पाची माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा

 

पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी pdf डाउनलोड
पर्यावरण प्रकल्प प्रस्तावना
पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती
पर्यावरण प्रकल्प pdf
Environmental projects 11th 12th information in Marathi
Free pdf file download
Paryavarn prakalp karyapadhati
Paryavarn prakalp pdf
Free pdf file download

 

महत्वाचे :

या प्रकल्पाची फ्री pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील Subscribe to Unlock लिंक वर क्लिक करा. subcribe करा आणि back button press करा.

📂

वरील pdf फाईल चा पासवर्ड मिळविण्यासाठी खालील   video लिंक वर क्लिक करा . video मध्ये तुम्हांला १० character आणि  number असेलेला पासवर्ड मिळेल.

 

 


 

THANK YOU


1 comment

  1. Very nice 💥
    Thankuuu 💫
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.