BUY PROJECT PDF Click Here!

अरण्याचा पर्यावरणीय अभ्यास प्रकल्प ११वी १२वी | Aranyacha paryavarniy abhyas prakalp 11th 12th

पर्यावरण प्रकल्प विषयाची निवड पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf पर्यावरण प्रकल्प मराठी Paryavarn prakalp Marathi 12th
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

अरण्याचा पर्यावरणीय अभ्यास प्रकल्प 


पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती | पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf | पर्यावरण प्रकल्प मराठी | Paryavarn prakalp Marathi 12th | Paryavarn prakalp pdf |Paryavarn prakalp karypadhati

        ११वी , १२ वी पर्यावरण प्रकल्प आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले. आहेत. या प्रकल्पांमध्ये नवीन अभ्यास क्रमानुसार प्रकल्प प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दिष्ट्ये, प्रकल्प विषयाचे महत्व, प्रकल्प कार्यपद्धती, विश्लेषण, निरीक्षणे, निष्कर्ष, अहवाल लेखन, इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.


पर्यावरण प्रकल्प विषयाची निवड पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf पर्यावरण प्रकल्प मराठी Paryavarn prakalp Marathi 12th Paryavarn prakalp pdf Paryavarn prakalp karypadhati Paryavarn prakalp in Marathi pdf download


प्रकल्प प्रस्तावना


                    आपण ज्या भागात राहतो , त्या भागाच्या नैसर्गिक इतिहास पडताळून पहिला तर आपल्या आजूबाजूचा परिसर हा मुख्यत्वे वन , नदी, डोंगर, वाळवंट किंवा या सर्व घटकांचे एकत्रित स्वरूप असा होता . आपण मानवाने बदल केलेल्या गाव , शहर किंवा महानगरांच्या भूपट्ट्यामध्ये राहतो . आपल्याला आपले अन्न सभोवतालच्या गावांमधून मिळते वही खेडी त्यासाठी वने , गवताळ प्रदेश , नद्या अशा नैसर्गिक स्त्रोतांवर अवलंबून असतात .

                        भारतीय संस्कृतीचा अभिमानाने उल्लेख करणाऱ्या भारतीयांनी आपल्या पूर्वजांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणले नसल्याची जाणीव होते . म्हणूनच पर्यावरणाचा समतोल ढासळत चालल्याचे दिसून येत आहे . आपल्या पूर्वजांनी निसर्ग रक्षणासाठी जे जे उपाय सांगितले आहेत तेजर का आपण अंमलात आणले तर तर आपल्या पर्यावरणाचे आपोआप रक्षण होईल .

                        अरण्य म्हणजे घनदाट वाढलेले वृक्ष आणि इतर वनस्पती यांनी मोठ्या परिसरामध्ये आच्छादलेली जमीन . अरण्य हा पृथ्वीवरील महत्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. पृथ्वीचा हिरवा शेला असलेली ही वने अनेक उपयोगी वस्तू तर देतातच , शिवाय आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक प्रकारच्या पर्यावरणीय सेवा ही पुरवतात.

                        अन्न , औषध , निवारा , लाकूड व इंधन यासाठी मानव वनांवरच अवलंबून असतो . वाढलेल्या शहरीकरणामुळे लाकूड , लगदा , खनिजे . इंधन लाकूड यांची मागणी वाढली आहे . मोठ्या प्रमाणावर होणारी लाकूडतोड , खाणकाम , रस्ते व जंगलतोड हे बनाना असलेले मोठे धोके आहेत.

                        आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून अरण्याचा पर्यावरणीय अभ्यास करून त्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत .

 

अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

अरण्याचे उपयोग

५)

अरण्याला असलेले धोके

६)

अरण्याच्या ऱ्हासाची मुख्य कारणे

७)

जंगल तोडीचे मुख्य परिणाम

८)

निरीक्षणे

९)

विश्लेषण

१०)

निष्कर्ष

११)

संदर्भ

१२)

प्रकल्पाचा अहवाल


विषयाचे महत्व


                माणसांची संख्या अविरत वावत चालली आहे.त्याचबरोबर मानवनिर्मित कचरा उद्योग धंदे , कारखाने , मानवी वस्ती , शहरांचा विस्तार त्याचबरोबर हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंत पसरलेले पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणवर होत असेलेली जंगलतोड यांमुळे आज अरण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

                दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणवर अरण्याचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे . मानवाच्या बहुतांश गरजा या अरण्यातूनच पूर्ण होतात . औषधे , अन्न , वस्त्र , उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल इत्यादी गोष्टी या अरण्यातूनच मानवाला उपलब्ध होतात . परंतु माणसाच्या हव्यासापोटी या अरण्याची संख्या आता कमी होत चालली आहे. त्यामुळे तेथील प्राण्यांचा आणि पक्षांचा अधिवास संपुष्टात येत चालला आहे .

                अन्न , ओषध , निवारा , लाकूड व इंधन यासाठी मानव वनांवरच अवलंबून असतो . वाढलेल्या शहरीकरणामुळे लाकूड , लगदा , खनिजे , इंधन लाकूड यांची मागणी वाढली आहे . मोठ्या प्रमाणावर होणारी लाकूडतोड , खाणकाम , रस्ते व जंगलतोड हे यनांना असलेले मोठे धोके आहेत . म्हणून या अरण्याचा अभ्यास अभ्यास करून त्याचे फायदे , त्यांचे कमी होण्याची कारणे यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे .

 

प्रकल्पाची उदिष्टे


·       अरण्याचे विविध उपयोग जाणून घेणे .

·       अरण्याच्या न्हासाची कारणांचा अभ्यास करणे .

·       अरण्याला कोणते कोणते धोके निर्माण झाले आहेत याचा अभ्यास करणे .

·       अरण्याच्या घटत चाललेल्या क्षेत्रामुळे कोण कोणत्या पर्यावरणीय समस्या आज निर्माण झाल्या आहेत त्यांचा अभ्यास करणे .

·       अरण्यात आढळणाऱ्या प्राण्याची व पक्षांची माहिती जाणून घेणे.

·       अरण्याचे पर्यावरणीय महत्व समजावून घेणे.

 

प्रकल्प कार्यपद्धती


                    अरण्याचा पर्यावरणीय अभ्यास हा प्रकल्प करीत असताना मी क्षेत्रभेट , मुलाखत आणि प्रश्नावली या अभ्यास पद्धतीचा अवलंब केला . प्रकल्पाच्या विषयानुसार जवळच असलेल्या परिसरातील अरण्याचा अभ्यास करणे हा या क्षेत्रभेटीचा मूळ उद्देश होता. या अरण्यात सापडणाऱ्या प्राणी आणि पक्षी यांचा अभ्यास करणे . अरण्याला भेडसावत असणाऱ्या समस्या जाणून घेणे . अरण्याची या पूर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यांचा सविस्तर अभ्यास करणे . या मुद्यांच्या आधारावर प्रकल्पाची माहिती मिळवण्यात आली .

                        अरण्याच्या ठिकाणी वस्ती असलेल्या लोकांना प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले आणि तेथील अरण्याच्या समस्या , पूर्वोचो स्थिती व आत्ताची स्थिती , अरण्यात आढळणारे प्राणी आणि पक्षी यांची माहिती स्थानिकांच्या मुलाखतीद्वारे मिळवलो आणि त्या माहितीचे संकलन केले .

                        तयार केलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून महत्वाचा मुद्दा निदर्शनास आला तो अरण्याचा होत असलेला हास . प्रश्नावली व मुलाखतीद्वारे मिळवलेल्या मुद्यांच्या आधारे सविस्तर माहिती मिळविण्यात आली व तिचा समावेश पुढे प्रकल्पात तयार केलेल्या मुद्द्याबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता पायो यासाठी मी आंतरजालावर ( इंटरनेटवर ) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा पसाईटचा वापर केला . त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले . संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे . सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली .

 

वनांचे उपयोग


१.व्यावसायिक उपयोग

                        वने आपल्याला अनेक वस्तू पुरवतात , ज्यामध्ये लाकूड , जळाऊ लाकूड , लगधासाठी ( कागदाच्या ) लाकूड , फळे , कंदमुळे , रेझीन , तेले , रबर , फायबर , लेस , बांबू , केन , चारा , ओषधे या व अशा अनेक वस्तू आहेत . वनातून कापलेल्या लाकडापैकी निम्मे लाकूड घरगुती जळण म्हणजे स्वयंपाक , पाणी तापवणे यासाठी दरवर्षी वापरले जाते . लाकूड हे प्लायवूड , हार्डवूड , पार्टिकल बोर्ड व चिप बोर्ड अशा घरबांधणीच्या सामानासाठी वापरले जाते आणि काही प्रमाणात लाकडाचा लगदा बनवून कागद तयार करण्यासाठी वापरतात . बऱ्याच जंगलांचा उपयोग खाणकाम , शेती . कुरणक्षेत्र , पर्यटन , मनोरंजनासाठी व धरणे बांधण्यासाठी केला जातो .

 

२. पर्यावरणीय उपयोग :

अ ) ऑक्सिजनची निर्मिती - झाडे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करतात जो पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे . वनांना पृथ्वीची फुफ्फुसे म्हणतात.

आ) पृथ्वीचे तापमान कमी करणे – हरितगृह वायुंपैकी मुख्य कार्बनडायऑक्साईड हा आहे. वनातील झाडे त्यांच्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी कच्चा माल म्हणून हा वायू शोषून घेतात. अशा प्रकारे वने ही कार्यनडायऑक्साईड चा वापर करतात व कार्बनडायऑक्साईडमुळे होणारी जागतिक तापमान वाढ कमी करण्यास मदत करतात . झाडे त्यांच्या प्रकाश संश्लेषणासाठी कार्वनडायऑक्साईड हा वायू शोषून घेतात . झाडांच्याया शोषणाच्या क्षमतेमुळे पृथ्वीचे तापमान कमी होण्यास मदत होते .

इ) वन्यजीवांचा अधिवास - लाखो प्राण्यांचे आणि वनस्पतींचे जंगल हे घर असते . विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पतींचे अस्तित्व या ठिकाणी आढळते .

ई ) जलचक्राचे नियमन - जंगलातील झाडांची मुळे व त्यांच्या आजूबाजूची माती हे एखाद्या मोठ्या स्पंजाप्रमाणे काम करतात . ही मुळे पावसाचे पाणी शोषून घेतात . जमिनीच्या पृष्ठभागावरून खळाळत वाहत जाणाच्या पाण्याचा वेग कमी करून त्याला जमिनीत झिरपायला मदत करतात . हे जमिनीत शोषलेले पाणी हळूहळू सोडून झऱ्यांना पुरवतात , उष्ण कटिबंधातील जंगलात वरच्या थरातला सुमारे ५०-८० % ओलावा हा झाडांच्या बाष्पोत्सर्जनातून ( त्यांनी टाकलेल्या बाष्पातून ) येतो .

उ) मृदेचे संवर्धन - वनांतील झाडांची मुळे मातीच्या कणांना घट्ट धरून ठेवतात . यामुळे मातीची / जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध करतात . वनातील झाडे वान्याला अडवण्याचे काम हो करतात .

ऊ ) प्रदुषणाचे नियंत्रण- वनातील झाडे  कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून प्राणवायू सोडतात . यामुळे हवा शुद्ध व स्वच्छ राहते . तसेच झाडे ध्वनी शोषून घेऊन आवाज रोधक मणून काम करतात . अशा प्रकारे हवा व ध्वनीचे प्रदूषण रोखण्यास झाडे मदत करतात.


अरण्याला असलेले धोके


वनाचे अतिशोषण : 

                    अन्न , औषध , निवारा , लाकूड व इंधन यासाठी मानव वनांवरच अवलंबून असतो . वाढलेल्या शहरीकरणामुळे लाकूड , लगदा , खनिजे, इंधन लाकूड यांची मागणी वाढली आहे . मोठ्या प्रमाणावर होणारी लाकूडतोड , खाणकाम , रस्ते वजंगलतोड हे वनांना असलेले मोठे धोके आहेत . आपल्या अर्थव्यवस्थेत स्थानिक वनांचा मोठाच वाटा आहे . कोळसा व जळाऊ लाकडाचा अतिवापर यामुळे जंगलांचे नुकसान होते . शहराची वाद शेतीच्या क्षेत्राची वाद व मोठ्या जागेचा कारखान्यांसाठी वापर केल्यामुळे जमिनीवर ताण येतो व जमिनीवरील वनाचे आच्छादन कमी होते . अतिप्रमाणात चराई व वारंवार लागणारे वणवे यामुळे आपल्या वनांचे शोषण होत आहे .

 

जंगलतोड : 

                        माणसाच्या वाढत जाणान्या गरजा भागवता येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते . मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते . जंगले तोडून त्या ठिकाणी मोठ मोठी  नगरे वसवण्यात आली आहेत .

 

 

अरण्याच्या हासाची मुख्य कारणे


१. स्थलांतरित शेती : 

                    असे अनुमान आहे की , ३०० दशलक्ष लोक स्थलांतरित शेती करणारे आहेत . हे लोक ' राय ' पद्धतीने शेती करतात . आणि यासाठी दरवर्षी ५ लाय हेक्टर पेक्षाही जास्त जंगले तोडतात . भारतात राब ' पद्धत ईशान्य भारत आणि काही प्रमाणात आंध्र प्रदेश , बिहार , मध्य प्रदेश आणि पश्चिम घाट या ठिकाणी आहे . जवळजवळ निम्मी जंगलतोड या पद्धतीमुळे होते .

२.जळाऊ लाकडाची आवश्यकता:  

                गरीबांची लोकसंख्या वाढल्यामुळे जळाऊ लाकडांच्या मागणीत वाढ झाली आहे .

३. ओद्योगिक वापरासाठी कच्चा माल : 

                    जंगलातील लाकडापासून अनेक वस्तु बनतात , वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या ( बॉक्सेस ) , फर्निचर , प्लायवूड , काड्या पेट्या , कागद उद्योगासाठी लगदा इत्यादी सर्व बनवण्यासाठी जंगलातील लाकूड लागते . या वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे जंगलांवर ताण पडत आहे .

४. विकास प्रकल्प : 

                    जलविद्युत प्रकल्प , धरणे , रस्तेबांधणी , खाणकाम , शहरीकरण ( घर ) आणि कारखाने अशा निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी जंगले वने उद्ध्वस्त केली जात आहत .

५. अन्नाची वाढती गरज : 

                    वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरण पूर्ण करण्यासाठी , शेतीसाठी , घरांची गरज भागविण्यासाठी जंगले सपाट केली गेली व तेथे मोठया प्रमाणात शेती करण्यात आली .

६. अतिप्रमाणात चराई : 

                    जेथे मोठ्या प्रमाणात वृक्षराजी होती ती जागा चराऊ कुरणांनी घेतली . गुराढोरांनी अति प्रमाणात चराई केल्यामुळेया जंगलांचेनुकसान झाले .

 

जंगलतोडीचे मुख्य परिणाम


१. जंगलातील अनेक प्रजातीचा नैसर्गिक निवारा / अधिवास नष्ट झाल्यामुळे त्या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येते .

२. जंगले तोडल्यामुळे तेथील प्राणी व वनस्पती यांची जैव विविधता नष्ट झाली व अनुवंशिक विविधता नाहीशी झाली .

३. जलचक्राचे नियंत्रण हे जंगलामुळेच होते व त्यामुळे पावसावरही त्याचा विपरीत परिणाम होतो .

४. जमिनीची धूप होणे , तसेच जमिनीची सुपिकता कमी होण्याची समस्या वाढली वाढली

५. डोंगराळ भागामध्ये जंगलतोडीचा परिणाम म्हणून दरडी कोसळतात .

६. जंगले तोडल्यामुळे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले व त्यामुळे पृथ्वोचे तापमान वाढले .

 

निरीक्षणे


अरण्याच्या रहासाची मुख्य कारणे

  • स्थलांतरित शेती जळाऊ लाकडाची आवश्यकता .
  • औद्योगिक वापरासाठी कच्चा माल .
  • विकास प्रकल्प .
  • अन्नाची वाढती गरज
  • अतिप्रमाणात चराई

 

+ अरण्याला असलेले धोके

वनांचे अतिशोषण

जंगलतोड 


वनांचे उपयोग

१ . व्यावसायिक उपयोग

२ . पर्यावरणीय उपयोग


 विश्लेषण


अरण्याचे घटत चाललेले क्षेत्र 

पर्यावरण प्रकल्प १२ वी विषय pdf पर्यावरण प्रकल्प विषयाची निवड पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf पर्यावरण प्रकल्प मराठी Paryavarn prakalp Marathi 12th Paryavarn prakalp pdf Paryavarn prakalp karypadhati Paryavarn prakalp in Marathi pdf download


निष्कर्ष


  • अरण्याचे विविध उपयोग जाणून जाणून घेऊन माहितीचे संकलन करण्यात आले .
  • अरण्याच्या हासाची कारणांचा अभ्यास केला .
  • अरण्याला कोणते कोणते धोके निर्माण झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती मिळवली.
  • अरण्याच्या घटत चाललेल्या क्षेत्रामुळे कोण कोणत्या पर्यावरणीय समस्या आज निर्माण झाल्या आहेत यावाबत अधिक माहिती संकलित केली .
  • अरण्यात आढळणान्या प्राण्याची व पक्षांची माहिती जाणून घेतली .
  •  अरण्याचे पर्यावरणीय महत्त्व समजावून घेण्यास मदत झाली .

 

संदर्भ


www.educationalmarathi.com

www.mazaabhyas.com

पर्यावरण पुस्तिका

 

प्रकल्प अहवाल

 

                        अरण्य म्हणजे घनदाट वाढलेले वृक्ष आणि इतर वनस्पती यांनी मोठ्या परिसरामध्ये आच्छादलेली जमीन . अरण्य हा पृथ्वीवरील महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे . आज पर्यावरणाचा समतोल ढासळत चालल्याचे दिसून येत आहे . जर आपण पर्यावरणाचे नियम पाळले आपल्या पर्यावरणाचे आपोआप रक्षण होईल .

                        मी शैक्षणिक वर्ष २०१ ९ -२० मध्ये पर्यावरण या विषयाचा प्रकल्प करण्यासाठी ‘अरण्याच्या पर्यावरणीय अभ्यास ' या विषयाची निवड केली . या विषयाबाबत माहिती मिळवण्यासाठी मी इंटरनेट वर उपलब्ध माहितीवरून तसेच क्षेत्रभेट , मुलाखत या कार्यपद्धतीचा अवलंब केला . हा प्रकल्प करत असताना अरण्याचे मानवाला होत असलेले फायदे . अरण्याच्या क्षेत्रात होत असलेली घट , अरण्याचे क्षेत्र कमी झाल्याने पर्यावरणावर होणारे घातक परिणाम इत्यादी मुद्द्यांचा या प्रकल्पामध्ये समावेश केला .

                        प्रकल्पाच्या विषयानुसार अरण्याचा अभ्यास करताना अरण्याच्या होत असलेल्या हासाची पुढील कारणे निदर्शनास आली . स्थलांतरित शेतो , जळाऊ लाकडाची आवश्यकता ओद्योगिक वापरासाठी कच्चा माल , विकास प्रकल्प , अन्नाची वाढती गरज , अतिप्रमाणात चराई इ . मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जंगलतोडीमुळे अरण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

                        मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाच्या निरीक्षणाची नोंद केली. तसेच निष्कर्ष काढण्यात आला. अशा प्रकारे पर्यावरण विषयाचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.


पर्यावरण प्रकल्प १२ वी विषय pdf पर्यावरण प्रकल्प विषयाची निवड पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf पर्यावरण प्रकल्प मराठी Paryavarn prakalp Marathi 12th Paryavarn prakalp pdf Paryavarn prakalp karypadhati Paryavarn prakalp in Marathi pdf download




प्रकल्पाची pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

DOWNLOAD


मित्रांनो pdf फाईल कशी डाउनलोड करायची याची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

pdf फाईल कशी डाउनलोड करावी 



अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇

११ वी १२वी प्रकल्प विषय यादी 📁



प्रकल्प विषयची निवड 
प्रकल्प pdf फाईल डाउनलोड 
११ वी १२वी प्रकल्प विषयांची यादी 



११वी , १२वी पर्यावरण प्रकल्प विषयांची यादी 




प्रकल्प विषयांची यादी

आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

पाण्याचे स्थानिक स्त्रोत प्रदूषणाची करणे व प्रतिबंधात्मक उपाय प्रकल्प

येथे क्लिक करा.

टाकाउ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

सौरउर्जा वापर काळाची गरज प्रकल्प

येथे क्लिक करा.

पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबाबत माहिती प्रकल्प

येथे क्लिक करा.

परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व प्रकल्प

येथे क्लिक करा.

प्लास्टिक पुनर्चक्रीकर्ण प्रक्रिया प्रकल्प

येथे क्लिक करा.

सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती प्रकल्प .

येथे क्लिक करा.

क्षेत्रभेट प्रकल्प

येथे क्लिक करा.

१०

दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प

येथे क्लिक करा.

११
 

स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम प्रकल्प

येथे क्लिक करा.

१२

रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम प्रकल्प

येथे क्लिक करा.

१३

घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

१४

लोकसंख्या वाढ ग्रामीण व शहरी प्रकल्प

येथे क्लिक करा.

१५

पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत झालेली घट प्रकल्प

येथे क्लिक करा.

१६

जलप्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा  प्रकल्प

येथे क्लिक करा.

१७

औद्योगिक प्रदूषण प्रकल्प

येथे क्लिक करा.

१८

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प

येथे क्लिक करा.

१९

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प

येथे क्लिक करा.



पर्यावरण प्रकल्प १२ वी विषय pdf

पर्यावरण प्रकल्प विषयाची निवड
पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती
पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf
पर्यावरण प्रकल्प मराठी
Paryavarn prakalp Marathi 12th
Paryavarn prakalp pdf
Paryavarn prakalp karypadhati
Paryavarn prakalp in Marathi pdf download 

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.