माझा आवडता शिक्षक मराठी निबंध
मराठी निबंध ५वी, ८ वी, ९वी | माझा आवडता शिक्षक निबंध मराठी | मराठी निबंध माझा आवडता शिक्षक | माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | मराठी निबंध pdf फाईल डाउनलोड | माझा आवडता शिक्षक निबंध इन मराठी | माझा आवडता शिक्षक निंबंध दाखवा
आमच्या शाळेत खूप शिक्षक आहेत. मी माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांचा आदर करतो. पण आम्हाला शिकवणारे श्री. पवार सर माझे आवडते शिक्षक आहेत.
![]() |
माझा आवडता शिक्षक मराठी निबंध |
पवार सरांचे वय ४५ वर्षांच्या
आसपास आहे. ते मध्यम उंचीचे, सावळे आणि स्वस्थ व्यक्ती आहेत. त्यांचे केस कुरळे
आहेत. पवार सर पांढरा शर्ट आणि काळी विजार असा पोशाख परिधान करतात. ते खूप प्रेमळ
आहेत. त्यांची वाणी मधुर आहे. ते विद्यार्थ्यांवर लगेच रागवत नाहीती. पण जेव्हा आम्ही
शाळेत शिस्तीच्या नियमांचे पालन करीत नाही तेव्हा मात्र ते आमच्यावर रागावतात.
पवार सर खूप विद्वान व्यकी
आहेत. मराठी आणि इतिहास हे त्यांचे मुख्य विषय आहेत. पण इतर विषयांवर देखील
त्यांचे चांगलेच वर्चस्व आहे. ते लागसेच विषय अगदी व्यवस्थितपणे समजून शिकवतात.
एखाद्या धड्यातला मुद्दा समजावत असताना ते विविध उदाहरणे देऊन समजावतात. छोट्या
छोट्या गोष्टींच्या माध्यमातून ते पाठ्यपुस्तकांतील कठीण मुद्दे सुद्धा अगदी सोपे
करून सांगतात. आणि त्या विषयाला रोचक बनवतात. जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी
आहेत. त्यांच्यावर ते विशेष लक्ष देतात. त्यामुळेच आमच्या वर्गातील सगळी मले त्यांच्या
तासिकेची वाट बघत असतात.
Maza aavadata shikshak nibandh in Marathi Maza aavadata shikshak yavar nibandh Maza aavadata shikshak var nibandh Marathi My favourite teacher essay in Marathi language
पवार सर अभ्यासासोबतच आमच्या
शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये ही आवडीने सहभाग दर्शवितात. ते बुद्धिबळ
खूप चांगल्याप्रकारे खेळतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेतील विद्यार्थी
आत्तापर्यंत अनेक स्पर्धा जिंकले आहेत. पवार सर नाटक, वाद-विवाद, निबंध, वक्तृत्व
यांसारख्या स्पर्धांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन
करतात. आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांचा
मोलाचा वाटा असतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दरवर्षी पवार सर करत असतात.
पवार सर सर्वांशी प्रेमाने
वागत. त्यांच्या चेहरा नेहमी हसरा असतो. ते कायम इतरांच्या मदतीसाठी तत्पर असतात.
ते शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची आवर्जून मदत करतात.
प्रेमळ आणि मनमिळावू स्वभाव आणि
प्रत्येक कामामधील त्यांचे कष्ट आणि कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, या
सर्वांमुळे पवार सर आमच्या शाळेचे आदर्श शिक्षक आणि माझे आवडते शिक्षक आहेत.
विद्यार्थी मित्रांनो हा निबंध
लिहिती असताना खालील मुद्यांना अनुसरून निबंधाचे लेखन करा.
तुमच्या मित्र मैत्रीणींसोबत
देखील हा निबंध शेअर करा.
[मुद्दे:
आवडत्या शिक्षकांचा उल्लेख
व्यक्तिमत्व
विद्वत्ता आणि शिकवण्याची पद्धत
शाळेतील इतर कार्यक्रमांमध्ये
देखील सहभाग
विद्यार्थ्यांशी व्यवहार
आदर्श शिक्षक
शेवट.]
अजून निबंध पाहण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.👇