श्रावणातला पाऊस मराठी निबंध | Shravanatala paus marathi nibandh

श्रावणातील पाऊस मराठी निबंध श्रावणातला पाऊस मराठी निबंध Shravanatala paus mrathi nibandh
Admin

श्रावणातला पाऊस मराठी निबंध 

श्रावणातील पाऊस मराठी निबंध / श्रावणातला पाऊस मराठी निबंध / Shravanatala paus mrathi nibandh

                    पाऊस म्हटला की आठवते ते निसर्गाचे हिरवेगार रूप. या दिवसांत धरती जणू हिरवा गार शालू लपेटून सजते. असा हा पाऊस माझा जिवाभावाचा सखाच बनला आहे. या पावसाचे मला अनेक रूपांत दर्शन झाले आहे.


                पावसाचे दिवस होते. आभाळ काळ्या ढगांनी भरून गेले होते. उभ्या दुपारी सगळीकडे अंधारून आले होते. गरगर बरे जोरदार वाहू लागले.. आणि काही क्षणांत पावसाच्या जोरदार सरींचा वर्षाव सुरूर झाला. नजर जाईल तिथपर्यंत पाऊसच पाऊस होता. रस्त्यावर, शेतात, डोंगरावर पाण्याचे लोट च्या लोट वाहत होते. या पावसाच्या सरींमध्ये आजूबाजूची मुळे सुद्धा मनसोक्त नाचत होती. जणू पावसाची आणि त्या मुलांची गट्टी जमली होतो.


                पावसाचे हे रूप देखील मला खूप आवडते . पण मला सर्वात प्रिय आहे तो श्रावणातला पाऊस . माझ्या मनाला मोहून टाकतो तो श्रावणातलाच पाऊस. श्रावणातल्या पावसाची काही गोष्टच वेगळी आहे. येतो तो सुद्धा अलवारपणे रिमझिमत साऱ्या सृष्टीला अलवार स्पर्श करीत ! दोन- चार सरी रिमझीमल्या न रिमझिमल्या तोच अदृश्य देखील होतात. क्षणात उन पसरते आणि क्षणात पाऊस चालू होतो. उन पाऊस हे जणू  पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. उन्हात पडणाऱ्या पावसाचे थेंब हे स्वर्गातून जणू मोत्यांचा वर्षावच धरतीवर होत असल्याचा भास होतो. आणि अशा वेळी डोंगराच्या आडून एक सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशात तरळू लागते.


                आषाढ महिन्यातला पाऊस फारच दांडगट असतो. खर तर, पाऊस आला की, माणसाच्या मनात चैतन्य लहारू लागते. त्याचे मन मृदुल बनते. ‘बरस बरस तू मेघा रिमझिम | आज यायचे माझे प्रियतम |’ अशी मृदुल भावना मनात जागी होते न होते तोच धुवाधार पाऊस  येऊन ही मृदुलता झोडपून काढतो.


                    मानवी भावभावनांच्या मनात असणारा मृदृलपणा, कोमलपणा श्रावणातला पाऊस हळव्या मानाने जपतो. श्रावणातला पाऊस ज्या कलात्मकतेने निसर्गाला जे अप्रतिम रूप बहाल करतो तसे रमणीय, देखणे रूप इतर कोणत्याही महिन्यातला पाऊस निसर्गाला बहाल करीत नाही. झाडे, वेली टवटवीत बनतात आणि आनंदाने डोलत असतात. धरती जणू रंगीबेरंगी नक्षी असलेल्या हिरवा शालूच लपेटून घेते. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवळच पाहायला मिळते. हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहायला मिळतात. श्रावणातले उन सुद्धा हळुवार स्पर्श घेऊन येते. जणू काही विश्वातील संपूर्ण कोमलता, मृदुलाता आणि सौंदर्य या श्रावणातल्या पावसालाच लाभले आहे.


                असा हा श्रावणातला पाऊस मला खूप खूप प्रिय आहे.

 

निबंध  लिहिताना खालील मुद्यांचा अवश्य वापर करा.

[मुद्दे:

प्रास्ताविक

आषाढातला पाऊस

श्रावणातला पाऊस

अलवारपणा, मुलायमपण यांचे दर्शन घडवणारा

जीवनातील सर्व कोमलता श्रावणातील पावसाकडे; म्हणूनच निसर्गाची, सौर्दर्याची विविध लेणी श्रावणातील पावसाचे अद्भुत दर्शन

शेवट]

 

श्रावणातील पाऊस मराठी निबंध
श्रावणातला पाऊस मराठी निबंध
Shravanatala paus mrathi nibandh

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.