BUY PROJECT PDF Click Here!

युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प Fc pdf | Yuvkanmadhil Vadhati Gunhegari Project pdf | Fc Project Topic

युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प Fc pdf Yuvkanmadhil Vadhati Gunhegari Project pdf Fc Project Topic Fc project topic fybcom sem 1 evs projet topic
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

Yuvkanmadhil Vadhati Gunhegari Project Pdf | Fc Project Topic for Fy, Sy, Ty | युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प 

  • पर्यावरण प्रकल pdf 
  • युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प प्रस्तावना
  • युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प उद्दिष्टे
  • युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प कार्यपद्धती
  • युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प निष्कर्ष



युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प निष्कर्ष  युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प प्रस्तावना  युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प कार्य उद्दिष्टे  युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प कार्यपद्धती  पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी  युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प प्रकल्प उद्दिष्ट्ये


 प्रकल्प प्रस्तावना


युवा अवस्था ही आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची अवस्था. सळसळते रक्त, आकाशाला गवसणी घालण्याची तयारी, मोठमोठी स्वप्ने पाहणे आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासठी वाटेल ते करायची तयारी असणे ही तारुण्याची लक्षणे होत. ज्या लोकांनी आयुष्यात मोठ मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट घेतले, ती माणसे जगात महान ठरली आहेत. आयुष्याला आकार देण्याच्या याच काळात आज युवक गुन्हेगारीकडे अग्रेसर होताना दिसत आहेत.

युवकांमधील गुन्हेगारीचा विषय गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक चर्चेचा विषय ठरत आहे. ‘युवकांमधील वाढती गुन्हेगारी’ या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्या मागील कारणे आणि या गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी उपाययोजना यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

युवकांमधील वाढती गुन्हेगारी ही व्यापार, कायदा, तंत्रज्ञान आणि विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये वाढताना दिसत आहे. युवकांमध्ये वाढत चालेल्या गुन्हेगारीमागील कारणांचा शोध घेणे, त्यांचा समाजावर होणारा परिणाम आणि गुन्हेगारी रोखण्याचे विविध मार्ग  इत्यादी. घटकांबाबत सविस्तर  माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून घेणार आहोत.


प्रकल्प अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

पान नं.

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

२)

विषयाचे महत्व

 

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

 

४)

निरीक्षणे

 

५)

निष्कर्ष

 

६)

संदर्भ

 

 

 

 

 

 

 

 

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी 

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये



1.    भारताची एकता आणि अखंडता राखण्यात योगदान देणे.

2.    समाजातील सदस्यांमधील सर्व संभाव्य समस्या जाणून घेणे.

3.    युवकांमधील वाढत्या गुन्हेगारीची कारणे जाणून घेणे.

4.    वाढत्या गुन्हेगारीचा समाजावर होणाऱ्या परिणामाबाबत सविस्तर महीती मिळवणे

5.    युवकांमधील वाढती गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजनांबाबत माहिती मिळवून त्या  माहितीचे संकलन करणे.

6.    युवकांमधील वाढती गुन्हेगारी या विषयाबाबत अधिक माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.


Environmental project in Marathi project for college students | Evs project topics Marathi languages

प्रकल्प विषयाचे महत्व

 

अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की तरुणवर्ग हा झटपट श्रीमंत होण्यासाठी गैर मार्गाचा अवलंब करत आहे. भ्रष्टाचाराचे वाढते प्रमाण आणि ठराविक श्रीमंत युवकांच्या हाती असणारा बक्कळ पैसा तसेच  त्या पैशाची केली जाणारी उधळपट्टी आणि नैतिकतेचा ऱ्हास यांसारख्या कारणांमुळे कमी कष्टात आणि कमी वेळात खूप पैसा मिळवता यावा यासाठी युवक / तरुणवर्ग गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळत आहे. या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये मद्यपान विक्री, खुण , चोरी, घोटाळे, स्मगलिंग इत्यादी. मध्ये तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. राष्ट्रीय गुन्हेगार नोंदणी संघटनेच्या (NCRB) अहवालानुसार एकूण गुन्हेगारांपैकी सुमारे ४४% गुन्हेगार हे १० ते ३० वर्षे या वयोगटातील आहे. गुन्हेगारीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवकांचा समावेश असणे हे आपल्या देशाच्या हिताचे नक्कीच नाही.

युवकांमधील ही वाढती गुन्हेगारी वेळीच थांबविणे गरजेचे आहे. जर ही वाढती गुन्हेगारी थांबवली गेली नाही तर येणाऱ्या काळात राष्ट्राला गुन्हेगारीसारख्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल यात काही शंका  नाही. युवकांमधील ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. युवकांमधील गुन्हेगारीला रोखण्यासाठी आपण प्रथम तरुणांच्या गुन्हेगारीची कारणे शोधणे आवश्यक आहे.

        युवकांमधील वाढत्या गुन्हेगारीमागील करणे, त्याचे समाजावर होणारे परिणाम आणि गुन्हेगारी निवारणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. ही सविस्तर माहिती युवकांमधील वाढती गुन्हेगारी या प्रकल्प विषयाच्या माध्यमातून दिली आहे. म्हणून हा प्रकल्प विषय खूप महत्वपूर्ण आहे.

 

Evs project prastavana in Marathi | Fc project fybcom, fyBa format Marathi


प्रकल्प कार्यपद्धती

 

‘युवकांमधील वाढती गुन्हेगारी’ हा प्रकल्प करीत असताना प्रकल्पाची माहिती संकलित करण्याच्या सुरुवातील युवकांमधील वाढती गुन्हेगारी या विषयाबाबत महत्वाचे मुद्दे एकत्र केले आणि तयार झालेल्या मुद्द्यांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. या प्रकल्पाची माहिती मिविण्यासाठी मी पुस्तके, तसेच इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे या प्रकल्पाची माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन केले. मिळवलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी करता यावी यासाठी मुद्दे तयार करण्यात आले.

तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.



प्रकल्प निरीक्षणे

 

१] युवकांमधील गुन्हेगारी वाढण्यामागील कारणे.

·       बेरोजगारी

·       गरिबी

·       व्यसनाधिनता

·       सुलभरित्या पैसे मिळविणे

·       सायबर गुन्हे

·       मानसिक संतुलन

·       विशिष्ट व्यक्तिमत्व 

·       कौटुंबिक संरचना

·       सामुदायिक वातावरणाशी संबंधित गुन्ह्यांची प्रमुख कारणे आहेत


२] युवकांमधील गुन्हेगारी कमी करण्यावर उपाययोजना


·       भ्रष्टाचार दूर करणे.

·       कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना बळकट करणे.

·       चोरीच्या मालाच्या बाजारपेठांना लक्ष्य करणे.

·       शिक्षणासाठी युवा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन .

·       तांत्रिकदृष्ट्या प्रगत सुरक्षा साधनांचा वापर.

·       धोकादायक औषधांची उपलब्धता कमी करणे.

·       रोजगाराच्या संधीची तरतूद करणे.

·       मानसिक आरोग्य .

·       गरिबी आणि विषमता कमी करणे.


३] देशातील काही राज्यांमधील प्रती दशलक्ष लोकसंख्येमागील गुन्हेगारीची प्रकरणे.


Evs project in Marathi pdf download   Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi  information Environmental project topics for college students pdf



प्रकल्प विश्लेषण

 

युवकांमधील वाढत्या गुन्हेगारीची कारणे.

 

                गुन्ह्याचे कोणतेही एक मूळ कारण नाही. गुन्हा हा प्रामुख्याने अनेक प्रतिकूल सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक परिणामांचा पाया आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वप्रथम गुन्हेगारीमागील कारणे माहिती असणे आवश्यक आहेत.

युवकांमधील वाढत्या गुन्हेगारीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.


१)बेरोजगारी :

जागतिकीकरण झाल्यामुळे रोजगार निर्मिर्तीमध्ये रोजगार निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली. रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध असल्यामुळे बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. प्रत्येक युवकाच्या खांद्यावर त्याचे घर चालवण्याची जबाबदारी असते परंतु रोजगाराच्या संधी अभावी  तो बेरोजगार होतो. आणि जेव्हा त्याच्यासमोर उदरनिर्वाह करण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही तेव्हा काहीही करून पैसे कमविण्यासाठी तो युवक मागे-पुढे पाहत नाही , तो गुन्हेगारी कृत्यांमध्ये समाविष्ट होऊन गुन्हेगारीच्या मार्गावर चालू शकतो. त्यामुळे देशात कायद्याचे पालन होत नाही.

 

२) गरिबी :

गरिबीमुळे तसेच आर्थिक संकटामुळे व्यक्ती गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होण्यास अग्रसर होते.गरिबीमुळे शालेय शिक्षण न झालेले युवक शिक्षणाच्या अभावामुळे गुन्हेगारीकडे वळू शकतो. शहरांमध्ये असणारी गारीबी हे गुन्हेगारीचे मूळ कारण आहे. वाढत्या महागाईच्या काळात गरीब लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनावश्यक गरजा भागविणे कठीण जाते. त्यामुळे गरीब लोक गुन्हेगारीकडे अग्रसर होतात. मग ते चोरी, पाकीटमार, स्मगलिंग यांसारखे गुन्हे पैसे मिविण्यासाठी करण्यास तयार होतात.

 

३) व्यसनाधिनता :

गेल्या काही वर्षांत मद्यपानाची युवकांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. तर काही युवक रोजगार मिळत नाही म्हणून , आपले घर सांभाळता येत नाही याचे टेन्शन घेऊन मद्यपान करू लागतात. मद्यपानाच्या आहारी गेल्याने मानसिक संतुलन विघडते आणि गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागते.


४) सुलभरित्या पैसे मिळविणे : 

            सध्याचे युवक कमी वेळात आणि कमी कष्ट करून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या मागे धावताना दिसतात. गैर कामे करण्यात जास्त पैसे मिळत असल्याने , कमी वेळात जास्त पैसे मिविण्यासाठी ते खून करणे, एखाद्याला पळवून नेणे यांसारखी कामे करण्यासाठी प्रवृत्त होतात. यातूनच गुन्हेगारी वाढण्यास सुरुवात होते.


५)सायबर गुन्हे: 

            तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. इंटरनेटच्या वापरात सायबर अपराधांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयुक्त माहिती सहज प्राप्त होते. हाच इंटरनेटचा सर्वात मोठा फायदा आणि तोटा देखील आहे. ऑनलाईन माहिती मिळवून त्या माहितीचा गैरफायदा करणाऱ्या सुशिक्षित तरुणांची संख्या देखील मोठ्या प्रमाणवर आहे.


६) मानसिक संतुलन:

                काही युवकांचे मानसिक संतुलन बिघडलेले असते. त्यामुळे ते गुन्हा करण्यास प्रवृत्त होतात. यातूनच गुन्हेगारी वाढते.


७) विशिष्ट व्यक्तिमत्व : 

                    समाजामध्ये अनेक युवकांचे व्यक्तिमत्व हे विशिष्ट प्रकारचे असते. म्हणजेच काय तणाव असणारे , उदासीन आणि गुन्हे करण्यास सहज प्रवृत्त होणारे अशा प्रकारची वर्तणूक असणारे युवक निसर्गटाच उदासीन व दुखीः असतात ते नेहमी नकारात्मक विचार करतात. त्यामुळे ते लुटमार, चोरी यांसारखे गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त होतात.


८) कौटुंबिक संरचना: 

                    काही तरुण त्यांच्या कौटुंबिक संरचनेमुळे गुन्हेगारीकडे वळतात.या तरुणांमध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतात.

·       पालकांचा गुन्ह्यामध्ये समावेश असणे.

·       मुलांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष किंवा मुलांशी कठोरपणे वागणे.

·       कुटुंबातील सदस्यांमध्ये आदर आणि जबाबदारीचा अभाव

·       कौटुंबिक हिंसाचार

·       मुले आणि पालक यांच्यातील संवादाचा अभाव.


९)सामुदायिक वातावरणाशी संबंधित गुन्ह्यांची प्रमुख कारणे आहेत:

·       समाजात असणारा एकसंधतेचा अभाव

·       उच्च लोकसंख्येची उलाढाल (मुलांची संख्या).

·       कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमध्ये होणारा भ्रष्टाचार.

·       कमकुवत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था.

 

 

वाढत्या गुन्हेगारीचे समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम


                   गुन्हेगारीचे समाज आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात. गुन्हेगारी,   समाजात व्यक्तींमध्ये अविश्वास, भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करते. वाढत्या गुन्हेगारीमुळे सामाजिक एकात्मतेला तडा जातो. तसेच गुन्ह्यांमुळेपीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर परिणाम होउ शकतात , ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आघात होऊ शकतात.

                    गुन्हेगारीचा अर्थव्यवस्थेवर भारी परिणाम होतो. गुन्हेगारीमुळे  आरोग्यसेवा खर्च वाढतो, उत्पादकता कमी होते आणि कायद्याची अंमलबजावणी आणि गुन्हेगारी न्याय प्रणालीशी संबंधित खर्च अधिक होतो. याव्यतिरिक्त, गुन्हेगारी गुंतवणुकीला अडथळा आणते, आर्थिक वाढीस अडथळा आणते आणि देशाच्या प्रतिष्ठेला कलंकित करते, ज्याचा परिणाम  पर्यटन आणि थेट परदेशी गुंतवणुकीवर होतो. म्हणून, सुरक्षित समाज आणि उत्तम अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुन्हेगारीवर उपाय करणे मआवश्यक आहे.



युवकांतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना


१) भ्रष्टाचार दूर करणे:

                    गुन्हे नियंत्रण अधिकारी करत असलेले भ्रष्टाचार हे गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण आहे. युवकांना कायदे तोडताना भीती वाटत नाही कारण त्यांना माहित असते की जर ते पकडले गेले तर काही रु. दिल्यावर ते जागेवर सुटतील. गुन्हे नियंत्रण अधिकाऱ्यामधील भ्रष्टाचार संपुष्टात आल्यास , युवकांकडून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये घडणारे कायद्याचे उल्लंघन  ६० ते ६५ टक्क्यांनी कमी होईल.


२) कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना बळकट करणे:

                        ज्या भागात जास्त प्रमाणात गुन्हे घडून येतात अशा भागांमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी. पोलिसांची संख्या वाढवल्यास गुन्हेगारांवरील नियंत्रण वाढण्यास मदत होईल. बहुतांश गुन्हेगार हे मुक्तपणे गुन्हे करत असतात कारण त्यांना माहिती असते की ते गुन्हे करत असलेल्या भागामध्ये त्यांना पकडण्यासाठी कोणी नाही. जर पोलिसांनी  २०-३० गुन्हेगारांना अटक करून त्यांना योग्य ती शिक्षा  झाल्यास इतर गुन्हेगार बेकायदेशीर कृत्ये करणे काही प्रमाणावर टाळतील.

 

३)  चोरीच्या मालाच्या बाजारपेठांना लक्ष्य करणे:

                        कोणत्याही सामानाची चोरी ही साधारणपणे त्या सामानाची विक्री करून त्यापासून पैसे मिळविण्यासाठी केली जाते. या चोरी केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी विशिष्ट बाजारपेठ आहेत. विशेषतः लॅपटॉप ,मोबाईल, घड्याळे आणि इतर घरगुती वस्तू  इत्यादींची या बाजारपेठांमध्ये विक्री केली जाते. हे बाजार बंद केल्यास चोरी किंवा लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या घट होईल. ज्या विक्रेत्यांकडे वस्तू खरेदी केल्याची कायदेशीर पावती आहे अशा विक्रेत्यांना सामान पावत्या दाखवून विक्रीयोग्य केले जाऊ शकते.

 

४)   शिक्षणासाठी युवा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन :

                          आजच्या आधुनिक जगात आजही असे लोक आहेत त्यांना शिक्षणाचे महत्व ओळखता येत नाही. युवा जागरुकता कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाची गरज आहे महत्व तरुणाई ला पटवून देता येईल. उच्च शिक्षण घेल्याने युवकांना नोकरी मिळवणे शक्य होईल आणि त्यामुळे त्यांची गुन्हेगारी मार्गावर अग्रेसर होण्याची शक्यता कमी होईल.

 

५)  तांत्रिकदृष्ट्या प्रगत सुरक्षा साधनांचा वापर :

                            कारसारख्या वाहनांच्या होणाऱ्या चोऱ्यांना आधुनिक ट्रॅकर्स चा वापर करून पकडले जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेत वापरले जाणारे फ्रिक्वेन्सी ट्रॅकिंग जे GPS पेक्षा प्रभावी प्रणाली आहे.

 

६)  धोकादायक औषधांची उपलब्धता कमी करणे :

                            धोकादायक औषधांच्या उपलब्धतेला आळा घालणे आवश्यक आहे जेणेकरून कमी लोकांना ते मिळू शकेल. ड्रग माफियांची टार्गेट करण्याची गरज आहे, जेणेकरुन विद्यमान ड्रग्ज व्यसनी बरे होऊ शकतील आणि इतरांना ड्रग्ज च्या आहारी जाण्यापासून वाचवता येईल.

 

७)  रोजगाराच्या संधीची तरतूद करणे :

                                रोजगाराच्या संधीमध्ये वाढ केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास खूप मदत होईल. जे लघुउद्योग अडचणीत आहेत अशा उद्योगांना चालना दिल्यास रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल. छोट्या उद्योगांना प्रोत्साहन दिल्याने देशांतर्गत उत्पादन तर वाढेलच शिवाय उत्पन्नामध्ये देखील वाढ होईल. युवक उत्पादक कामामध्ये व्यस्त झाल्याने गुन्हेगारी काही प्रमाणवर कमी होईल.

 

८)   गरिबी आणि विषमता कमी करणे:

                        गरिबी आणि आर्थिक विषमता कशा प्रकारे कमी केली जाऊ शकते यावर उपाययोजना केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.


९)    मानसिक आरोग्य :

                    युवकांनी आपल्या मानसिक आरोग्याची योग्य ती मानसिक काळजी घेतली पाहिजे. उत्तम मानसिक स्वस्थ हे तणावाच्या परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी सहाय्यक ठरते.

 

प्रकल्प  निष्कर्ष

 

                        युवकांमधील वाढती गुन्हेगारीची समस्येबाबत आपल्याला सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीचे समाजावर कसे घातक परिणाम होतात तसेच वाढत्या गुन्हेगारीला सामोरे जाताना कोण कोणत्या उपाय योजना केल्या म्हणजे युवकांमधील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल याबबत देखील संपूर्ण माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळविणे शक्य झाले.

 

 

संदर्भ


Ø www.educationalmarathi.com

Ø पायाभूत अभ्यास पुस्तक (Shet Publication)

Ø www.jetir.org (November 2018, Volume 5, Issue 11)

Ø Hindustantimes


विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

युवकांमधील वाढती गुन्हेगारी प्रकल्प.pdf प्रकल्प 8.4 MB .pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.