Flood Disaster Project in Marathi | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प :
या लेखातून आपण ‘पूर
नैसर्गिक आपत्ती’ या पर्यावरण विषयक प्रकल्पाची माहिती घेणार आहोत. सदर
माहिती शालेय तसेच महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प करताना उपयुक्त ठरेल. महापूर नैसर्गिक
आपत्ती या प्रकल्पाची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे देण्यात आली आहे.
१) प्रकल्प प्रस्तावना. २) प्रकल्प उद्दिष्ट्ये ३) प्रकल्प विषयाचे महत्व ४)
कार्यपद्धती/अभ्यासपद्धती ५) महापूर नैसर्गिक
आपत्ती प्रकल्प निरीक्षणे ६) प्रकल्प विश्लेषण ७) पूर नैसर्गिक आपत्ती निष्कर्ष ८)संदर्भ.
प्रकल्प प्रस्तावना :
मागील
काही वर्षांचा अभ्यास केला, तर आपल्याला असे दिसून येते की
वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणावर पूर येणे, वादळे, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये
वाढ झाली आहे. आपत्तीच्या काळात अचानक येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यावर मात करण्यासाठी या काळात योग्य ते
निर्णय अगदी जलदपणे घेणे आवश्यक असते.
दिवसेंदिवस वाढत जाणारे उद्योगधंदे, वृक्षतोड यांमुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे
आपल्याला दरवर्षी कोणत्यातरी एका नवीन आपत्तीचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आणि
मानवनिर्मित असे आपत्तींचे दोन प्रकार पडतात.
गेल्या काही वर्षांत आपल्या देशात नैसर्गिक
आपत्तीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यावरणात घडत असलेले बदल आणि त्यामुळे
निर्माण होणाऱ्या नवनवीन नैसर्गिक आपत्ती याबाबत सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
अलीकडच्या
काळात भारतात महापूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. या प्रकल्पाच्या
माध्यमातून पूर या नैसर्गिक आपत्तची माहती , पूर आपत्ती येण्यास
कारणीभूत घटक कोणते आहेत, या आपत्तींचे समाजावर कोणते अनिष्ट
परिणाम घडून येतात, तसेच आपत्तीच्या काळात कोणती काळजी घेतली
गेली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून घेणार आहोत.
प्रकल्प अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
पान नं. |
१) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
|
२) |
विषयाचे महत्व |
|
३) |
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती |
|
४) |
निरीक्षणे |
|
६) |
विश्लेषण |
|
८) |
निष्कर्ष |
|
९) |
संदर्भ |
|
प्रकल्प विषयाचे महत्व :
महापूर आपत्ती
म्हणजे काय ? नैसर्गिक
आपत्ती म्हणजे काय ? याबाबत अधिक माहिती जाणून घेणे हे दिवसेंदिवस खूप महत्वाचे ठरत चालले आहे.
आज आपल्या देशाला दरवर्षी एका नवीन नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.
त्यापैकी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर त्रासदायक ठरणारी आपत्ती म्हणजे
महापूर आपत्ती होय.
पूर ही
नैसर्गिक आपत्ती कोणतीही पूर्वसूचना न मिळतातच उद्भवते. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर
जीवित व वित्तहानी होते. महापुराच्या परिस्थितीचा मोठ्या धैर्याने सामना करणे
आवश्यक असते. महापुराची आपत्ती उद्भवली तर
या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी, तसेच या आपत्तीचा समान करण्यासाठी
आपल्याला महापूर या आपत्तीबाबत अधिक माहिती असणे आवश्यक आहे.
महापूर म्हणजे काय? महापूर का येतो? पूर स्थिती निर्माण होण्या आधी ,
पूर स्थितीत तसेच पूर परिस्थितीनंतर कोणती काळजी घ्यावी ? याविषयी सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे . म्हणून मी ‘ महापूर’ या नैसर्गिक आपत्तीबाबत सर्व माहिती सर्वांना
एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने या प्रकल्प विषयाची निवड केली आहे.
प्रकल्प उद्दिष्ट्ये
1. आपत्ती म्हणजे काय ? आपत्तीची संकल्पना जाणून घेणे.
2. महापूर आपत्ती म्हणजे काय ? महापूर आपत्तीची संकल्पना जाणून घेणे.
3. महापूर आपत्तीच्या काळात कोणती काळजी घ्यावी
याबबत सविस्तर माहिती करून घेणे.
4. महापूर आपत्ती येण्यामागील कार्नानाचा अभ्यास
करणे.
5. महापूर आपत्तीचे समाजावर कोणते परिणाम होतात
याबाबत सविस्तर माहिती मिळविणे.
6. नैसर्गिक आपत्तींबाबत सर्वांना सविस्तर
माहिती करून देणे.
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती
‘महापूर
नैसर्गिक आपत्ती’ या विषयाचा अभ्यास करता असताना मी सर्वेक्षण आणि संशोधन या कार्य
पद्धतीचा उपयोग प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी केला. प्रकल्प विषयाची माहिती
मिळवत असतना सदर विषयावरील प्रकल्प करणे का गरजेचे आहे ? सदर विषयाचे पर्यावरणीय तसेच सामाजिक महत्व काय आहे याबाबत माहिती जाणून
घेतली . या विषयाबाबत अधिक माहिती मिळवत असताना भारतात गेल्या काही वर्षांत
आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास केला.
या प्रकल्प विषयाबाबत माहिती संकलित करतना
मी इंटरनेट वर उपलब्ध असलेले ई-पेपर , तसेच पर्यावरण पुस्तके
यांचा वापर प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यासाठी व माहिती मिळविण्यासाठी केला.
तयार केलेल्या
प्रकल्प मुद्द्यांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या
माहितीचा वापर केला. इंटरनेट च्या माध्यमातून या प्रकल्पाबाबत अधिक माहिती संकलित
करणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती
प्रकाल्पाध्ये समाविष्ट केली.या माहितीच्या आधारावरून प्रकल्प निष्कर्ष नमूद
केला.
प्रकल्प निरीक्षणे.
१) पुरामुळे मृत्यू
२) जीवघेणा पूर
३) नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या एकूण मृत्युंमध्ये पुरामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या.
प्रकल्प विश्लेषण
१)आपत्ती म्हणजे काय?
अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा
समाजाची मोठ्या प्रमाणत जीवित, आर्थिक व
सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात.
२)महापूर :
महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक
आपत्ती आहे . अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणत जमा होणारे पाणी नदी पात्रा
बाहेर जाते, तेव्हा पुराचे संकट ओढवते. बेसुमार
पाऊस झाला, की मोठ्या शहरांतील पाण्याचा निचरा करणारी
व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी
रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरांतही शिरते.
पूर हे एकूण तीन प्रकारांत विभागले गेले आहेत.
1. अचानक आलेला पूर
2. नदीला आलेला पूर
3. शहरी भागांत येणारे पूर
१. अचानक आलेला पूर
ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे अशा ठिकाणी अचानक पूर
येण्याच्या घटना घडतात. जेव्हा डोंगराळ भागातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये
अडथळा निर्माण होतो. आणि जेव्हा हा अडथळा दूर होतो तेव्हा पूरपरिस्थिती निर्माण
होते. किंवा एखाद्या वरच्या भागात अतिवृष्टी झाली असल्यास डोंगर उतारावरील भागात
अचानक पूर परिस्थिती निर्माण होते.
२. नदीचे पूर
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर सर्व पाणी एकत्र
झाल्याने नदीला पूर येतो. तसेच नदीच्या अपुऱ्या क्षेत्रामुळे अचानक पाण्याचा
प्रवाह वाढल्याने पाणी नदी प्रवाहाबाहेर पडते त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण
होते. नदीच्या किनाऱ्यावरील गाळ, मुख्य आणि
उपनद्यांमधील अचानक वाढलेली पाण्याची पातळी, किनाऱ्याची धूप,
नदीच्या पात्रात असणारा गाळ इत्यादी बाबींबर नदीच्या पुराची तीव्रता
अवलंबून असते.
३. शहरी भागांत येणारे पूर
शहरांमध्ये दाट लोकवस्ती असते. अचानक उद्भवलेल्या
पूरस्थितीमुळे शहरांमध्ये असुरक्षित लोकवस्तीत राहणारे लोक बळी पडतात . कधी कधी तर
मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी देखील होते. शहरांमध्ये पूर परिस्थिती नंतर
रोगांचे संक्रमण उपजीविकेची हानी होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
महापूर नैसर्गिक आपत्ती प्रकल्प | Pur Naisargik Aapatti| Flood Disaster Project in Marathi
पूर येण्याची कारणे
१) नैसर्गिक कारणे
1. नद्या नाल्यांच्या परिसरात
झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परस्थिती निर्माण होते.
2. बर्फाचे डोंगर वितळल्यामुळे
पूरपरिस्थिती निर्माण होते.
२) मानव निर्मित कारणे.
1. शहरीकरण, कारखाने, रस्ते, खाणकाम यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड
केल्यामुळे नदी नाल्यांच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होऊन
नदीपात्रात माती साचून नदीपात्र उथळ बनते. त्यामुळे पाणी नदीपात्राबाहेर येते.
2. भूकंप तसेच अन्य कारणांमुळे
धरणे फुटून पूरस्थिती निर्माण होते.
3. नदीपात्रात केलेले आक्रमण, आणि नदी पात्रात टाकला जाणारा कचरा यांमुळे नदीपात्र उथळ बनून पाणी नदीपात्राबाहेर येते.
पूराचे परिणाम
Ø पूराचे वाईट परिणाम
Ø पूराचे चांगले परिणाम
पूर येण्यापूर्वी घ्यायची काळजी
पूर आल्यानंतर घ्यायची काळजी
प्रकल्प निष्कर्ष
1. आपत्ती म्हणजे काय ? आपत्तीची संकल्पना जाणून घेतली.
2. महापूर आपत्ती म्हणजे काय ? महापूर आपत्तीबाबत अधिक माहिती संकलित केली.
3. महापूर आपत्तीच्या काळात कोणती काळजी घ्यावी याबबत सविस्तर माहिती मिळविली.
4. महापूर आपत्ती येण्यामागील कारणांचा अभ्यास केला.
5. महापूर आपत्तीचे समाजावर कोणते परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन केले.
प्रकल्प निष्कर्ष
· पर्यावरण पुस्तक PDF
Project पर्यावरण प्रकल्प 11वी विषय | पयार्वरण प्रकल्प विषय | Environment Project In Marathi
विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा. PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.