Manav Nirmit Aapatti Prakalp | पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी
मानव निर्मित आपत्ती पर्यावरण प्रकल्प | मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय? | मानव निर्मित आपत्ती कोणत्या ?
प्रकल्प प्रस्तावना
गेल्या
काही वर्षांपासून मानव निर्मित आपत्तींमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस मानव
निर्मित आपत्तींचे स्वरूप गंभीर होताना दिसत आहे. आज मानवाने तंत्रज्ञानामध्ये
विकास करून अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामुळे जगभरात सुधारणा होत आहेत, परंतु
दुसऱ्या बाजूला विविध समस्या जगाला भेडसावू लागल्या आहेत. मानवाने स्वतःच्या
कृतीतूनच विविध आपत्तींचे संकट ओढवून घेतले आहे.
या
मानव निर्मित आपत्तींचा परिणाम पर्यावरणावर, समाजावर आणि आर्थिक व्यवस्थेवर होतो.
त्यामुळे मानवनिर्मित आपत्ती या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे.
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
पान नं. |
१) |
प्रकल्पाची
उद्दिष्टे |
|
२) |
विषयाचे महत्व |
|
३) |
प्रकल्प
कार्यपद्धती / अभ्यासपद्धती |
|
४) |
निरीक्षणे |
|
६) |
विश्लेषण |
|
८) |
निष्कर्ष |
|
९) |
संदर्भ |
|
१०) |
अहवाल |
|
प्रकल उद्दिष्ट्ये
१) मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय? याबाबत सविस्तर माहिती मिळवणे.
२) आपत्तीची संकल्पना या प्रकल्पाच्या माध्यमातून जाणून घेणे .
३) मानव निर्मित आपत्तींचे विविध प्रकार जाणून घेणे.
४) मानव निर्मित आपत्तींची कारणे कोणती आहेत याबाबत माहिती मिळवणे.
५) मानव निर्मित आपत्तींवर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांबाबत माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून जाणून घेणे.
६) मानव निर्मित आपत्ती या विषयावरील माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून देणे.
EVS Project
Manav Nirmit Aapatti
मानव निर्मित
आपत्ती पर्यावरण प्रकल्प
जलसुरक्षा
प्रकल्प मराठी माहिती
जलसुरक्षा
कार्यपुस्तिका उपक्रम प्रकल्प नोंदवही
प्रकल्प विषयाचे महत्व
मानव
निर्मित आपत्ती या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण याच्या
अभ्यासामुळे आपण भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या मानवनिर्मित आपत्तींना कशा प्रकारे
प्रतिबंधित करू शकतो तसेच एखादी मानव निर्मित आपत्ती उद्भवली तर त्या आपत्तीमुळे
होणाऱ्या परिणामांचा कशा प्रकारे सामना करू शकतो. या बाबींबाबत आधीच माहिती करून
घेल्याने भविष्यातील उद्भवणाऱ्या आपत्तींचा सामना करू शकतो.
मानवी
हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे आपत्ती उद्भवण्याचे प्रमाण
वाढत आहे. या मानव निर्मित आपत्तींचा पर्यावरणावर तसेच समाजावर नकारात्मक परिणाम
घडून येतो. त्यामुळे त्यांचे आपण त्यांचे पूर्वानुमान करून योग्य उपाययोजना आखू
शकतो.
या
व्यतिरिक्त या मानव निर्मित आपत्तींचा अभ्यास केल्यामुळे संबंधित संस्थांना या
आपत्तींचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखता येतात. आपत्तींच्या परिणामस्वरूप
होणारे मानवी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या
धोरणांची आखणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच, समाजात पर्यावरणीय जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने देखील हा प्रकल्प
अत्यंत महत्वाचा आहे.
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती :
मानव निर्मित आपत्ती माहिती या विषयाचा
अभ्यास करता असताना मी सर्वेक्षण आणि संशोधन या कार्य पद्धतीचा उपयोग प्रकल्पाची
माहिती मिळविण्यासाठी केला. प्रकल्प विषयाची माहिती मिळवत असतना सदर विषयावरील
प्रकल्प करणे का गरजेचे आहे ? सदर विषयाचे पर्यावरणीय तसेच सामाजिक महत्व काय आहे
याबाबत माहिती जाणून घेतली . या विषयाबाबत अधिक माहिती मिळवत असताना मानव निर्मित
आपत्ती म्हणजे काय , मानव निर्मित आपत्ती निर्माण होण्यामागील कारणे, मानव निर्मित
आपत्ती निवारणासाठी उपाय योजना इत्यादी गोष्टींचा विचार करून प्रकल्प लेखनासाठी
मुद्दे तयार करण्यात आले.
तयार केलेल्या प्रकल्प मुद्द्यांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर केला. इंटरनेट च्या माध्यमातून या प्रकल्पाबाबत अधिक माहिती संकलित करणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकाल्पाध्ये समाविष्ट केली.या माहितीच्या आधारावरून प्रकल्प निष्कर्ष नमूद केला.
Manmade disaster in Marathi
Manmade disaster information in Marathi
Manmade disaster project in Marathi
निरीक्षणे
मानव निर्मित आपत्तीचे प्रकार
१)औद्योगिक
अपघात
. रासायनिक गळती
· स्फोट
· आग
२) स्ट्रक्चरल
बिघाड
. धरण फुटणे
. इमारत कोसळणे
. पूल पडणे
३) दहशतवादी
हल्ले
· २६/११ मुंबई हल्ला
. लंडन बॉम्बस्फोट
· पॅरिस हल्ले
४) वाहतूक
अपघात
· वाहनांची धडक
· जहाजाचे तुकडे
. विमान क्रॅश
५) पर्यावरण
प्रदूषण
. हरितगृह वायू
. तेल गळती
· प्लास्टिक मोडतोड
६)तेल
गळती
. एक्सॉन वाल्डेझ तेल गळती
. डीपवॉटर होरायझन तेल गळती
नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती यांमधील फरक.
नैसर्गिक आपत्ती |
मानव निर्मित आपत्ती |
१) प्राकृतिक कारणांमुळे घडणाऱ्या: या आपत्ती नैसर्गिक घटना किंवा प्रक्रियांच्या
परिणामस्वरूप होतात, जसे की भूकंप, त्सुनामी,
वादळ, इ. |
१) मानवी हस्तक्षेपामुळे घडून
येणाऱ्या आपत्ती : या आपत्ती मानवाच्या हस्तक्षेपामुळे निर्माण
होतात,
जसे की युद्ध, औद्योगिक अपघात, रासायनिक गळती, इ. |
२) न टाळता येणाऱ्या : नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे नियंत्रित किंवा रोखता
येत नाहीत, परंतु त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी योजना आखता
येतात. |
२) टाळता येणाऱ्या: योग्य नियोजन, सुरक्षिततेच्या
उपाययोजना आणि जबाबदारीचे वर्तन यांमुळे मानव निर्मित आपत्ती टाळता येऊ शकतात. |
३) वेळेच्या मर्यादेवर परिणाम: नैसर्गिक आपत्तींचे परिणाम काही वेळेकरता मोठ्या
प्रमाणावर असू शकतात, जसे की भूकंपानंतरच्या धक्के किंवा
चक्रीवादळाचे परिणाम. |
३) मर्यादित वेळेत परिणाम: या आपत्तींचा प्रभाव काही काळापुरता मर्यादित असू
शकतो,
जसे की प्रदूषण किंवा इमारत दुर्घटना. |
४) पुनर्वसन कठीण असू शकते: प्रभावित भागाचे पुनर्स्थापन करणे अवघड असते, कारण याचा प्रभाव व्यापक आणि अनियंत्रित असतो. |
४) सोपे पुनर्वसन असू शकते: आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या भागाची
पुनर्स्थापना सामान्यतः सोपी असते कारण ती नियंत्रित करता येऊ शकते. |
५) नैसर्गिक प्रक्रियांमुळे
होणाऱ्या: या आपत्ती पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांमुळे निर्माण
होतात,
ज्यावर मानवाचे नियंत्रण नसते. |
५) माणसांच्या चुकीमुळे होणाऱ्या: मानव निर्मित आपत्ती या माणसांच्या चुकीच्या
निर्णयांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे उद्भवतात. |
विश्लेषण
मानव
निर्मित आपत्ती म्हणजे काय?
1) आपत्ती
संकल्पना
“
अचानक अपघातात किंवा अशी एखादी नैसर्गिक घटना की जिच्यामुळे मोठ्या प्रमाणवर हानी
किंवा जीवित व वित्तहानी होते”
2) मानव
निर्मित आपत्ती
मानव
निर्मित आपत्ती म्हणजे अशा आपत्ती ज्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवाच्या
कृतीमुळे निर्माण होतात. यामध्ये विकास प्रकल्प, शस्त्रास्त्रांची निर्मिती, उद्योगधंदे, पर्यावरणीय तोडफोड, आणि ऊर्जा स्रोतांच्या अनियंत्रित वापर यांसारख्या बाबींचा समावेश होतो. मानव
निर्मित आपत्तींमुळे नैसर्गिक संसाधनांचे अत्यधिक शोषण होते परिणामी जैवविविधतेवर
ताण येतो आणि अखेरीस या गोष्टींमुळे समाजाला आणि पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी
पोहोचवतात.
उदा.
भारतातील भोपाल येथे१९८४ साली घडलेली वायू दुर्घटना ही जगातील सर्वात मोठ्या मानव
निर्मित आपत्तींमध्ये गणली जाते.
३) मानव निर्मित आपत्तींचे प्रकार
मानव निर्मित
आपत्तींचे अनेक प्रकार पडतात त्यांपैकी काही
महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:
1.
औद्योगिक आपत्ती:
औद्योगिक
आपत्तींमध्ये उद्योगधंद्यांमधील अपघात किंवा विषारी रसायनांची गळती यांसारख्या
आपत्तींचा समावेश होतो.
उदा. भोपाल
वायू दुर्घटना, चेर्नोबिल आण्विक दुर्घटना.
2.
पर्यावरणीय आपत्ती:
पर्यावरणीय
आपत्तींमध्ये मानवाच्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे निसर्गाची हानी होऊन निर्माण होणाऱ्या
आपत्ती.
उदा. जंगलतोड, प्रदूषण, हवामानबदल.
3.
संगणकीय आपत्ती (सायबर क्राइम्स):
संगणकीय
आपत्ती या मध्ये संगणक नेटवर्कवर हल्ले करून माहितीची चोरी करणे, तसेच तांत्रिक यंत्रणांमध्ये अडथळा आणून आर्थिक नुकसान करणे इत्यादी
बाबींचा समावेश होतो.
उदा.
रॅन्समवेअर हल्ले.
4. युद्धजन्य
आपत्ती:
युद्ध, दहशतवाद, आणि त्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे आणि
बॉम्ब्समुळे होणारी हानी इत्यादींचा समावेश युद्धजन्य आपत्तींमध्ये होतो.
उदा. हिरोशिमा
आणि नागासाकीवर पडलेली अणुबॉम्ब.
5.
आर्थिक आपत्ती:
मोठ्या
प्रमाणावर झालेल्या आर्थिक संकटामुळे होणारे प्रभाव.
उदा. जागतिक
आर्थिक मंदी (2008).
6.
परमाणु आपत्ती:
आण्विक
विद्युत केंद्रांमध्ये घडलेल्या दुर्घटनांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती.
उदा. फुकुशिमा
आण्विक दुर्घटना.
5) मानव निर्मित आपत्तीचे कारणे
मानव
निर्मित आपत्ती निर्माण होण्यामध्ये विविध कारणे असतात, या कारणांचा समाजातील
विविध घटकांशी संबंध असतो. त्यापैकी मानव
निर्मित आपत्तींची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1.
औद्योगिक आणि तांत्रिक अनियंत्रण:
मोठमोठ्या
उद्योगांमध्ये आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये योग्य त्या सुरक्षेच्या नियमांचे पालन
न करणे हे अपघातांना कारणीभूत ठरते. रासायन निर्मिती उद्योग, अणुउद्योग आणि इतर मोठ्या प्रकल्पांमध्ये सुरक्षितता व्यवस्थेकडे दुर्लक्ष
होत असेल तर मोठ्या आपत्ती घडून येतात.
2.
पर्यावरणीय शोषण:
मानवी
हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, जमिनीचा ऱ्हास,
जलाशयांचे होणारे प्रदूषण, हवामान बदल
यासारख्या विविध समस्या निर्माण होतात. यामुळे निसर्गातील संतुलन बिघडते आणि याचा
जैवविविधतेवर परिणाम होऊन जैवविविधता कमी होते.
3.
अनियंत्रित नागरीकरण आणि शहरीकरण:
मोठ्या
प्रमाणात होणारे शहरीकरण, झपाट्याने वाढणारी कॉक्रीटची जंगले,
पर्यावरणाचा विचार न करता केल्या जाणाऱ्या विकास योजनांमुळे मानवी
जीवनावर आणि पर्यावरणावर विपरित परिणाम घडून येतो.
4.
युद्ध आणि दहशतवाद:
दहशदवादी
संघटनांकडून केले जाणारे दहशतवादी हल्ले, शस्त्रास्त्रांचा वापर
आणि युद्धजन्य परिस्थिती यांमुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते. याचा थेट परिणाम
मानवाच्या जीवनावर, अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक शांततेवर
होतो.
5. उर्जेचा
अनियंत्रित वापर:
मोठ्या
प्रमाणावर निर्माण होणारी उर्जेची गरज भागवण्यासाठी उर्जा उत्पादनासाठी जीवाश्म
इंधनांचा अतिवापर होतो, ज्यामुळे प्रदूषण वाढत होते आणि ग्लोबल
वॉर्मिंगसारख्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
6) मानव निर्मित आपत्तींना सामोरे जाण्यासाठी तसेच त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना अंमलात आणू शकतो:
1. नियमित
सुरक्षा तपासणी:
मोठ्या
औद्योगिक कंपन्यांमध्ये आणि तांत्रिक प्रकल्पांमध्ये वेळोवेळी योग्य सुरक्षा
तपासणी करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आपत्ती निवारण
योजनांची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
2.
पर्यावरणीय संरक्षण:
पर्यावरणाचे
संतुलन राखण्यासाठी पर्यावरण विषयक कायदे
कठोरपणे लागू करणे आणि जैवविविधता संरक्षण कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. उपलब्ध
असलेल्या ऊर्जा स्त्रोतांचा संतुलित वापर करणे, पुनर्वापर
तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि हरित ऊर्जेचा प्रचार करणे हेही महत्त्वाचे आहे.
3. युद्धविरहित
धोरणे:
जागतिक
शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी युद्धविरहित धोरणांचा अवलंब करणे आणि
आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादविरोधी उपाययोजना करणे आवश्यक आहे. शस्त्रास्त्र
निर्मितीवर नियंत्रण ठेवणे, आणि शांतता वार्ता यांचाद्वारे संघर्ष सोडविण्यावर
भर देणे आवश्यक आहे.
4. साक्षरता
आणि जागरूकता:
समाजामध्ये
तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सुरक्षेशी संबंधित जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन, शाश्वत विकास आणि तांत्रिक सुरक्षितता याबाबत शिक्षण देणे आवश्यक आहे.
5. आपत्ती
व्यवस्थापन योजना:
प्रत्येक देशात आपत्ती व्यवस्थापनासाठी एक प्रभावी धोरण आखणे, आपत्ती-निवारण संस्था स्थापन करणे, तसेच आपत्तीच्या वेळी मदत मिळण्यासाठी जागतिक पातळीवरील सहकार्य आवश्यक आहे.
निष्कर्ष
मानव निर्मित आपत्तींचा आपल्या पर्यावरणावर तसेच समाजावर अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. मानव निर्मित आपत्तींचा अभ्यास करून आपण या आपत्तींच्या संभाव्य परिणामांना रोखण्यासाठी उपाययोजना करू शकतो. सुरक्षिततेच्या उपाय योजना , पर्यावरण संरक्षण, जागतिक शांतता आणि शाश्वत विकास हे मानव निर्मित आपत्त्ती कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे, या विषयाची सखोल माहिती सर्वांना असणे आणि त्यावर उपाययोजना आखणे अत्यावश्यक आहे.
1.
मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय?
याबाबत सविस्तर माहिती मिळवली.
2.
आपत्तीची संकल्पना या प्रकल्पाच्या
माध्यमातून जाणून घेणे शक्य झाले.
3.
मानव निर्मित आपत्तींची कारणे कोणती
आहेत याबाबत माहिती मिळवणे शक्य झाले.
4.
मानव निर्मित आपत्तींवर मात करण्यासाठी
करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांबाबत माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून जाणून घेणे
शक्य झाले.
प्रकल्प संदर्भ
१) www.educationalmrathi.com (Educationalमराठी)
२) पाठ्यपुस्तके महराष्ट्र राज्य
मानव निर्मित
आपत्ती पर्यावरण प्रकल्प
मानव निर्मित आपत्ती
म्हणजे काय
मानव निर्मित आपत्ती
कोणत्या
Manmade
disaster in Marathi
Manmade disaster
information in Marathi
Manmade disaster
project in Marathi
विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा
VIEWPDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.
PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा
DOWNLOADनवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.
PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.