कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write kalpanatmak nibadh.

कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write kalpanatmak nibadh.
Admin

 

कल्पनात्मक निबंध


कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write kalpanatmak nibadh.


            मित्रांनो Educationalमराठी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कल्पनात्मक निबंध म्हणजे कायत्याचा परिचय करून घेणार आहोत. या प्रकारच्या निबंधांचे परीक्षेमध्ये लेखन कसे करावे ? तसेच या निबंध प्रकारामध्ये कोणते-कोणते निबंध येतात याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

(सदर माहिती हि १०वी, ११वी, १२वी, यांच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे.)


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


👉कल्पनात्मक निबंध म्हणजे काय ..?


परिचय:

            जे प्रत्यक्ष अस्तित्वात येऊच शकत नाही. एखादी गोष्ट अस्तित्वात आली तर किंवा जी गोष्ट कधी घडू शकत नाही ते घडले. या प्रकारे कल्पना करून कल्पनेतील परिस्थिती मध्ये झालेले बदल आणि त्या बदलांचे वर्णन ज्या निबंधामध्ये केलेले असते. तो निबंध म्हणजेच कल्पनात्मक निबंध होय. 'माणसाला पंख फटाले तर?' 'माणूस अमर झाला तर..?' मला अदृश्य होता आले तर? 'या प्रकारचे निबंध हे कल्पनात्मक निबंध होत. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला आपल्या अवतीभोवतीवतीची परिस्थती बदलायला हवी असे आपल्याला मनोमन वाटते परंतु ती परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नसते. अशा वेळेला आपण , मला जर या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठीची अधिकारपदे मिळालाय तर अशी कल्पना करतो. आणि आपण परिस्थिती कशपराकारे हाताळू, कोण-कोणते बदल घडून आणू हे सांगतो. 'मी प्रधानमंत्री झालो तर...... ' ,'मी मुख्याध्यापक झालो तर....'' अशी कल्पना करून लिहिलेले निबंध हे कल्पनात्मक निबंध होत.


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


👉निबंधाचे लेखन कसे करावे ?


            आजच्या या आधुनिक जगामध्ये वावरत असताना. रोजच्या जीवनव्यवहारात काही वासरू तसेच गोष्टींच्या आपण फारच आहारी गेलो  परिस्थितीमध्ये जर त्या वस्तू उपलब्ध नसल्यास काय घडेल, याचे वर्णन कल्पनात्मक निबंदाच्या प्रकारामध्ये आपल्याला करता येईल. परंतु याच वेळी त्या वस्तूची खरोखरच किती प्रमाणावर गरज आहे, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये किती कृत्रिमता व सुखसोई निर्माण झाल्या आहेत हे ही निबंधामध्ये लिहिणे गरजेचे आहे.


लक्षात ठेवा :

कल्पनात्मक निबंध लिहिण्याच्या प्रमुख पायऱ्या खालीलप्रमाणेआहेत.


  • कल्पनात्मक निबंधाची सुरवात एखाद्या दैनंदिन प्रसंगातून करता येते.
  • वास्तवातून आपण आपल्या कल्पनेच्या जगामध्ये प्रवेश कसा केला हे सुरुवातीला सांगितले जाते.
  • त्यांनतर. कोण ते बदल घडून येतात किंवा आपण कोण कोणते बदल घडवून आणतो हे सांगावे.
  • या बदलांचे परिणाम कोणते दिसून येतात, हे कथन केले जाते.

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


👉या निबंध प्रकारामध्ये येणारे निबंध.


    1. स्वप्ने नसती तर...

    2. मला पंख असते तर...

    3. परीक्षा नसत्या तर...

    4. रंग नसते तर...

    5. मी प्रधानमंत्री झालो तर...

    6. मी आमदार झालो तर...

    7. भूक नसतीच तर...

    8. समुद्र आटला तर...

    9. सूर्य उगवलाच नाही तर...

    10. माणूस हसणे विसरला तर...


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 

  • वर्णनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?याबाबत आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला comment करून जरूर कळवा.

  • subscribe करा जेणेकरून तुम्हाला या  page वरील माहिती लगेच उपलब्ध होईल.

  • आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर  contact form  च्या मदतीने आम्हाला जरूर कळवा.

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.