Marathi bhashechi kaifiyat | मराठी भाषेची कैफियत (आत्मकथनात्मक निबंध)

Marathi bhashechi kaifiyat | मराठी भाषेची कैफियत (आत्मकथनात्मक निबंध). niband pdf file free download .
Admin

 

मराठी भाषेची कैफियत 


Marathi bhashechi kaifiyat | मराठी भाषेची कैफियत (आत्मकथनात्मक निबंध)

 Marathi bhashechi kaifiyat | मराठी भाषेची कैफियत (आत्मकथनात्मक निबंध)

➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

"माझ्या मराठी भाषक लेकरांनो ,

तुम्हाला माझे लक्ष लक्ष आशीर्वाद"


            मी मराठी भाषा, तुमची मातृभाषा. म्हणजे आईच. तुम्हाला 'प्रेमपूर्वक आशीर्वाद' म्हणू  की तुम्ही आत्ता परकेच  बनला आहात म्हणून 'स.न.वि.वि.' असे म्हणू ? एखाद्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाला अडगळीच्या खोलीमध्ये ढकलून द्यावे तसंच  तुम्ही माझ्यासोबत केले आहे. मी काय करू ? तुम्हाला  कोपरापासून हात जोडून नमस्कार करू का ?

सैनिकाची आत्मकथा

            मला काही कळेनासे झाले आहे. माझे  मन बैचेन झाले आहे. निराशेने ग्रासले आहे. त्या दिवशी घडलेल्या घटनेने तर माझ्यावर दुःखाचा डोंगर  कोसळला . संतापाचा स्फोट झाला, कारण एका शाळेमध्ये मराठी भाषेत बोलल्याबद्दल शिक्षकांनी एक-दोन नव्हे तर तब्बल अठ्ठावीस मुलांना छडीने मारले ! ते ही शरीरावर वळ उठेपर्यंत ! ही एखादी अतिप्राचीन किंवा काल्पनिक घटना नाही. तर ही घटना आहे अगदी काल-परवाची;  बुधवार दिनांक ९ जुलै २०१४ रोजी घडलेली. पुणे या विद्येच्या माहेरघरातली !



            अरे, काय चालवले आहे हे ? काय करताय ? कुठे  चालला आहेत ? याचे  पुढच्या पिढीवर काय परिणाम होणार आहेत आणि पुढे कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे, हे ठाऊक आहे का तुम्हाला ?


            तुमचे माझ्यावर असणारे प्रेम दिवसेंदिवस कमी होताना मला दिसत आहे. इतकेच नाही. तर तुम्हाला आज माझी लाज वाटू लागली आहे.  मुलाला जशी स्वतःच्या अशिक्षित आईला शाळेत घेऊन जायला लाज वाटते, तशी तुम्हाला आज माझी लाज वाटते. तुम्हाला इंग्रजीत बोलता येणे गौरवास्पद वाटते. मराठीत बोलणे तुम्हाला मागासलेपणाचे वाटते. दरवाजावर नावाची पाटी लावायची झाली तरीसुद्धा इंग्रजीत लावता. तुमची सहीसुद्धा तुम्ही इंग्रजीतच करता.

शेतकऱ्याची आत्मकथा.

            तुम्ही इंग्रजीच्या मागे इतके वेडे झाला आहात  की तुम्ही कोणतेच व्यवहार मराठीमध्ये करत नाही. शास्त्राची व शासनाची भाषा मराठी राहिलेली नाही. जर आपण मराठीचा वापरच करत नसाल तर . माझा विकास तरी कसा होणार ? आज संगणकात वाटेल त्या भाषेमध्ये काम करू शकत असताना तरीही तेथे तुम्ही इंग्रजीचाच वापर करता साहजिकच जिथे-जिथे संगणक वापरले  जाताततिथे मराठी हद्दपार होत आहे. जीवनाच्या प्रत्येक  क्षेत्रामध्ये संगणक महत्वाचा झाल्याने, जवळ जवळ सर्वच क्षेत्रांतुन मराठी लुप्त  होत चालली आहे. कोणी मराठीचा आग्रह  धरलाच,तर मराठी विकसित नाही, असा आक्षेप घेतला जातो. म्हणजे तुम्ही वापर करीत नाही म्हणून  विकास नाही आणि विकास नाही म्हणून माझा वापर नाही. आजकाल सर्वजण इंग्रजी माध्यमाच्या शाळांसमोर रांगा लावताहेत. मराठी शाळा ओस पडताहेत.मग मी जगणार कशी.


            ही परिस्थिती किती भयानक आहे. हे कोणाच्याही लक्षातच येतच नाही . आजकाल भाषेसोबाबत संस्कृतीही नष्ट होत चालली आहे. कारण थोड्या प्रमाणावरच माणसे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकतील. मराठी माणसे मात्र इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या घरात कायमचे दुय्यम नागरिकत्व भोगावे लागणार आहे.


पृथ्वीचे मनोगत (आत्मकथनात्मक निबंध)


            आज परिस्थिती हाताबाहेर गेलेलीच आहे. पण माझ्या बाळांनो, माझा अंत होण्याच्या आधी काहीतरी उपाय शोधला पाहिजे .  तुम्हाला जर माझा विकास करायचा असेल तर मराठीतूनच शिक्षण घेतले पाहिजे. मराठीत मोठ्या प्रमाणावर लेखन-वाचन केले पाहिजे. मराठी ग्रंथ आपण विकत घेऊन त्यांचे वाचन केले पाहिजे. सर्व क्षेत्रांमधील  ज्ञानविचार माझ्या माध्यमातूनच प्रकट केले पाहीजेत. मराठी ज्ञानभाषा बनली पाहिजे. परंतु माझा विकास होण्यासाठी आधी मराठी माणसांचा विकास होणे गरजेचे आहे. मराठी माणसाने विकासासाठी धडपडले पाहिजे, तरच मी मराठी भाषा जिवंत राहीन.

 

आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? 

➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

            मराठी भाषा आपले मनोगत व्यक्त करीत आहे. - मराठीचा अपमान करणारा प्रसंग - दुःख आणि संताप - मराठीला कमी लेखणे - सर्व व्यवहार इंग्रजीमाध्यमातून - मराठी लुप्त होत जाणे - मराठीचा विकास नाही - विकासासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मराठीचा वापर आवश्यक .]

 

➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

 

  • मराठी भाषेची आत्मकथा.
  • Marathi bhasheche manogat in Marathi
  • Marathi bhashechi aatmakatha
  • Marathi bhasha manogat

➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

  • Nibandh pdf file downlod free 

 

या निबंधाची Pdf file downlod  करण्यासाठी खालील link वर click  करा. 




➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • मराठी भाषा आपली कैफियत कशा प्रकारे व्यक्त करेल तुम्हांला काय वाटते ?आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.


➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.