BUY PROJECT PDF Click Here!

Prutwiche manogat | पृथ्वीचे मनोगत (आत्मकथनात्मक निबंध)

Prutwiche manogat | पृथ्वीचे मनोगत (आत्मकथनात्मक निबंध) marathi niabandh pdf file free download click here
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

पृथ्वीचे मनोगत 


Prutwiche manogat | पृथ्वीचे मनोगत (आत्मकथनात्मक निबंध)

 Prutwiche manogat | पृथ्वीचे मनोगत (आत्मकथनात्मक निबंध)

 🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏


          सायंकाळच्या वेळेला घराबाहेर फिरण्यासाठी पडलो. फिरता-फिरता जवळच्या तळ्याजवळ जाऊन बसलो. पाण्यातील छोट्या माश्यांना  पाहत होतो. अचानक तळ्यातील पाण्यावर काही अक्षरे तरंगू लागली आणि त्यांची वाक्य बानू लागली. सुरुवातीचे वाक्य  होते . हे माझ्या प्रिय मानवा या पृथ्वीचे तुला खूप खूप आशीर्वाद आणि पुढे पत्राप्रमाणे मजकूर पाण्यावर तरंगू लागला . हे पत्र दुसरे तिसरे कोणी नाही तर पृथ्वीनेच मानवासाठी पत्र लिहिले होते. ती त्या पत्रातून पुढे बोलू लागली.


            काही दिवसांपाऊसन मला तुझ्याशी बोलावसं वाटत होत. मनातलं सगळं सांगून मन मोकळं करावं. काही महत्वाच्या दोन- चार गोष्टी तुला सांगाव्यात. त्या गोष्टींमधील काही गोष्टी तू समजून घेतल्यास आणि तुझ्या आचरणात आणल्यास , तर संपूर्ण मानवजातीचा फायदा होईल. इतकाच नाही, तर माझ्या अंगाखांद्यावर वावरणाऱ्या संपूर्ण सजीव सृष्टीलाही चांगले दिवस येतील.

सैनिकाची आत्मकथा

            माझा जन्म होऊन ५०० कोटी वर्षे उलटून गेली आहेत. माझा जन्म नक्की कोणत्या दिवशी झाला, ती तारीख कोणती होती मला नेमकं किती वर्षे झाली हे तुला सांगता येन तस कठीणच आहे. तुम्हा माणसांचे आयुष्य लहान आहे. जे तुम्हाला सहज मोजता येत त्यामुळेच तुम्ही तारखा लक्षात ठेऊन तुम्ही तुमचे आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस साजरे करता. माझे  तसे नाही. अब्जावधी वर्षांच्या आयुष्यामध्ये तारखा लक्षात कशा ठेवणार ? त्यामुळे माझे वय नेमके किती वर्षांचे आहे हे मी सांगू शकत नाही. बहुतेक ५०० कोटी वर्ष होऊन गेली असावीत आणि अजून कित्येक कोटी वर्ष मी जगेन .  मी कदाचित एवढ्या मोठया आयुष्यामध्ये आत्तापर्यंत अब्जावधी उन्हाळे- पावसाळे पहिले आहेत. अब्जावधी उत्पात मी माझ्यावर झेलले आहेत. किती संहार डोळ्यांदेखत पहिले आहेत ! त्याचबरोबर नंदनवनेही मी पहिली आहेत येथे !


            आणि बरं का मानवा , मला एका गोष्टीचा खूप आनंद होते. अभिमान वाटतो. या विश्वामध्ये माझ्यासारखे अनेक ग्रह आहेत, त्यांना कोणीही, कधीही, मोजू शकत नाही. त्यापैकी अब्जावधी ग्रह मी अवकाशामध्ये भ्रमण करताना पाहिले आहेत . या अब्जावधी ग्रहांपैकी एका ही  ग्रहावर माझ्यावर असणाऱ्या सजीव सृष्टीप्रमाणे सृष्टी असल्याचे माझ्या निदर्शनास आले नाही. विश्वाच्या मी पाहिलेल्या तुकड्यामध्ये तरी सजीव सृष्टीला खेळणारी मी एकटीच ! खरंच मी  खूप भाग्यवान आहे !


               आत्तापर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट  तुला सांगणे कठीणच आहे. सुमारे ५०० कोटी वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. जन्माच्या वेळी तप्त वायूच्या गोळ्याचे माझे स्वरूप होते. हळू-हळू हे वायू थंड होत गेले. आणि मला भरीव आकार प्राप्त होत गेला. कालांतराने येथे पाणी निर्माण झाले. पाणी उपलब्ध असल्याने येथे सजीव सृष्टी निर्माण होऊ लागली. एका मागून दुसरा , दुसऱ्यामागून तिसरा याप्रमाणे सजीव निर्माण होऊ लागले हे सर्व होत असताना सर्व सजीव एकमेकांची घट्ट बांधले जात होते. या सर्वांतूनच सजीवांची एक  या साखळीच तयार झाली. कालांतराने निर्जीव वस्तूही या साखळीला जोडल्या गेल्या. हे सर्व इतके घट्टपणे साखळीमध्ये विणले गेलं आहे की, या साखळीतील एक जरी घटक नष्ट झाला , तरीही त्याचा परिणाम दुसऱ्याच्या जीवनावर होणार. फक्त कल्पना करून बघ. आज माझ्याजवळ असणारी ही वनस्पतीसृष्टी अचानक नष्ट झाली तर काय होईल ? त्या वेळी शाकाहारी प्राणी भुकेने तडफडून मारतील. हे शाकाहारी प्राणी अनेक मांसाहारी प्राण्यांचे अन्न आहेत. म्हणजे शाकाहारी प्राणी संकटात आले तर त्यांच्याबरोबर मांसाहारी प्राणीसुद्धा संकटात येतील. मग अशी वेळ येऊन ठेपेल की, हे सर्व प्राणीच एकमेकांना मारून खाऊ लागतील आणि अवघी प्राणिसृष्टी नष्ट होईल.

शेतकऱ्याची आत्मकथा.

               हे सर्व मी पत्रातून तुझ्याशी बोलत आहे, यामागचे कारण माहित आहे का ? आज माणसानेच स्वतःवर सर्वनाशाची वेळ आणली आहे. बुद्धीच्या जोरावर माणसाने रोगराईवर मात केली . आपले आयुष्य वाढवलं त्यामुळे मृत्यूचं प्रमाण कमी झालं. साहजिकच लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. वाढत्या लोकसंख्येला  सोइ-सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठा प्रमाणावर जंगलतोड केली गेली. वनस्पतीच नष्ट केल्याने त्यांच्यावर अवलंबून असणारे प्राणीसुद्धा नष्ट होऊ लागले आहेत. त्याचे गंभीर परिणाम सर्व सजीवांना भोगावे लागत आहेत . अधून मधून सैरभैर झालेले प्राणी मानवी वस्तीत घुसून धुमाकूळ घालत आहेत. यामुळे माणसांच्या आणि जंगलीप्राण्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. माणसाच्या कृत्यांमुळे आज पर्यावणाचा समतोल ढासळत चालला आहे.


             त्यामुळे अनेक जीव आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तसेच काही सूक्ष्म जीव नव्याने निर्माण होत आहेत. या सूक्ष्मजीवांमुळे नवनवे आजार , रोग पसरत आहेत त्यावर उपाय सापडत नसल्याने माणसांचा बळी जात आहे. ही  फार धोक्याची घंटा आहे.


            मानवाची हाव प्रचंड आहे. प्राण्यांचे  पक्षांचे तसे नाही. वाघाचे पोट भरलेले असेल, तर तो अगदी शेजारी पहुडलेल्या हरणाकडे ढुंकूनही पाहत नाही. माणूस आपले पोट भरल्यानंतरही आणखी अन्न  गोळा करायच्या मागे लागतो. उद्यासाठी, परवासाठी  आणि  पुढल्या पिढ्यांसाठी  सुद्धा निसर्गाला ओरबाडत राहतो.

आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? 

            आधुनिक जगाच्या दिशेने वाटचाल करत असताना माणसाने प्रदूषण निर्माण केले आहे . निसर्गावर अनन्वित अत्याचार केले आहेत. सुमारे २०० लाख वर्षांपूर्वी  माझ्यावर अस्तित्वात आलेला मानव आज स्वतःच्या विनाशाकडे वेगाने वाटचाल करत निघाला आहे. माणसाने स्वतःला आवर नाही घातला तर सर्वत्र फक्त विनाशच दिसेल.


            हे माझ्या प्रिय मानवा , माझ्या भावना, माझे विचार लक्षात घेशील का ? मी आज पर्यंत निर्माण केलेले सजीवांचे हे नंदनवन टिकवायला मदत कारहसील का ?


🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा 👇


[मुद्दे :

        पृथ्वीने पत्राच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली - मानवाला विचार करण्याचे आवाहन - पृथ्वीचा जन्म , वय इत्यादी.  - पृथ्वीला स्वतःकडे असणाऱ्या सजीव सृष्टीचा अभिमान - पृथ्वीच्या निर्मितीपासून आजवरचा इतिहास - जीव साखळीचे महत्व - माणसाची बुद्धी, हव्यास व नवीन जीवनशैलीची ओढ - विनाशाकडे अग्रसर - पुनर्विचाराची गरज .]


🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 


  • पृथ्वीची आत्मकथा 
  • पृथ्वीचे मनोगत 
  • पृथ्वीचे मनोगत मराठी मध्ये 
  • पृथ्वीचे मनोगत माहीती
  • Pruthwichi aatmakatha 
  • Pruthwiche manogat in marathi


🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏


  • Nibandh pdf file downlod free 

 

या निबंधाची Pdf file downlod  करण्यासाठी खालील link वर click  करा. 



🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • तुमित्रांनो तुम्हाला काय वाटते, पृथ्वी आपले मनोगत कशा प्रकारे व्यक्त करेल ? आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.



🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏


धन्यवाद.






Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.