महागाई एक समस्या | Mahagai ek samasya (वैचारिक निबंध )

महागाई एक समस्या | Mahagai ek samasya
Admin

 

महागाई एक समस्या



महागाई एक समस्या | Mahagai ek samasya

महागाई एक समस्या | Mahagai ek samasya 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


            आपल्या जीवनाला अनेक समस्यांनी घेरले आहे. येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन समस्या घेऊन उदयास येतो. आणि आपल्याला त्या समस्यांचा थोड्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. पण काही समस्या अश्या असतात ज्या आपल्याला सोडून जाण्याचे नावच घेत नाहीत. महागाई ही त्यापैकी एक समस्या आहे, जी कायम आपले विक्राळ रूप धारण करत चालली आहे.


            महागाईचा अर्थ आहे – जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सतत होणारी वाढ. अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन या मानवाच्या आवश्यक गरजा आहेत. जर सामान्य माणसाच्या गरजांची पूर्तता अगदी सहजपणे होत असेल तर महागाईचा प्रश्नच उभा राहत नाही. परंतु विविध कारणांमुळे बाजारातील वस्तूंच्या किंमती वाढत जातात. जेव्हा या किमती सामान्य माणसाच्या हाताबाहेर वाढू लागतात, तेव्हा त्या परिस्थितीला ‘महागाई’ चे नाव दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून महागाईने लोकांचे जगणे मुश्कील केले आहे.


            दुष्काळ, महापूर, बर्फवृष्टी, यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते; त्यामुळे अन्न-धान्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासते. या कमतरतेमुळे बाजारामध्ये तांदूळ, कडधान्ये, फळे आणि भाज्या यांच्या किंमती वाढू लागतात. उत्पादनाची विक्री वाढल्यावर उत्पादित वस्तूच्या किमती वाढू लागतात. कोळसा, पेट्रोल, डीझेल इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाई वाढते. युद्ध, हरताळ, दंगे यांच्या कारणाने बाजारामध्ये वस्तूंचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि वस्तूंच्या किमती वाढू लागतात. जेव्हा वाढत्या लोकसंखेला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होत नाही, तेव्हा महागाई वाढू लागते. भ्रष्टाचार, साठवणूक या कारणांनीसुद्धा वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होते.


            अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य जनतेसाठी आपला उदरनिर्वाह करणे कठीण होऊन जाते. मध्यमवर्गातील समस्या अधिकच वाढतात. जीवतोडून काम करूनही गरीब जनतेला पोटभर अन्न मिळत नाही. गरीब घरातील मुला-मुलींना आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते. सामान्य घरातील मुलांना योग्य पोषण आहार न मिळाल्याने त्यांचा योग्य विकास होत नाही. लग्नाचे वय झालेल्या मुलींचे लग्न वेळेवर होत नाही. मध्यम वर्गातील लोक कर्जाच्या ओझ्याखाली पार दबून जातात. चोऱ्या,भ्रष्टाचार, तस्करी, गुंडगिरी यांसारख्या सामाजिक विकारांचे मुख्य कारण महागाई हेच आहे.


            महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेले उपाय सफल होत नाहीत. सरकारचे प्रयत्न सुद्धा अपुरे पडतात. जर सरकार, व्यापारी आणि जनतेने समजुतीने आपला व्यवहार केला तर वाढत्या महागाईवर अंकुश लावला जाऊ शकेल. वस्तूंच्या उत्पादनावर आणि त्यांच्या तुटवड्यावर सरकारने लक्ष ठेवावे, व्यापाऱ्यांनी भ्रस्ताचारापासून स्वतःला वाचवावे आणि उरलेल्या जनतेने साधेपणाचे जीवन अंगिकारले तर वाढत्या महागाईला रोखले जाऊ शकते.

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

प्रस्तावना

महागाईचा अर्थ आणि स्वरूप

महागाईची कारणे

महागाईचे दुष्परिणाम

महागाईला नियंत्रणात आणण्याचे उपाय

शेवट]

 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 महागाई एक समस्या निबंध

महागाईचा वणवा निबंध

महागाईचा भस्मासुर निबंध

Mahagai ek samashya

Mahagaicha vanava

Mahagaicha bhasmasur

Vadhati mahagai nibandh Marathi


 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

  

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • महागाई खरंच एक समस्या आहे का तुमचे विचार आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


धन्यवाद

1 comment

  1. Unknown
    Unknown
    Great work....can you provide essay on the topic करोनाचा विळखा
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.