मला अदृश्य होता आले तर... | Mala adrushya hota aale tar... (कल्पनात्मक निबंध.)

मला अदृश्य होता आले तर... | Mala adrushya hota aale tar... (कल्पनात्मक निबंध.) If i am invisibal essay in marathi
Admin

 
मला अदृश्य होता आले तर...


मला अदृश्य होता आले तर... | Mala adrushya hota aale tar... (कल्पनात्मक निबंध.)
 

मला अदृश्य होता आले तर... | Mala adrushya hota aale tar..

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


            आपल्या महाराष्ट्राला काही तरी झाले आहे! डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या अत्यंत सज्जन आणि समाजाच्या उद्धारासाठी आपले जीवन वाहून घेतलेल्या माणसाचा खून होतो आणि दीड वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरीही मारेकरी काही सापडत नाहीत! नुसते सापडतच नाहीत असे नाही; तर त्यांचे धागेदोरे सुद्धा शोधून सापडत नाहीत. फार मोठे कटकारस्थान रचून त्यांना संपवले गेले आहे, असे वाटत राहिले. त्यातच पुन्हा डॉ. गोविंद पानसरे यांचा त्याच पद्धतीने कोल्ह्पुरात खून झाला. . त्यांचेही मारेकरी सापडेनासे झाले आहेत. सगळेजण रहस्यमयरित्या गप्प होते. श्रद्धेचा बाजार मांडून गोर्गारीबना फसवणारे, अंधश्रद्धेचा फायदा उठवून बुवाबाजी करणाऱ्या असल्या सैतानांविरुद्ध लढणाऱ्या पुरोगामी विचारांच्या महान कार्यकर्त्यांना या तऱ्हेने संपवण्यात आले आहे.


            या संबंधीचा बातम्या पाहून पाहून व वाचून वाचून माझा संताप वाढला. वाटले आपणच मारेकऱ्यांचा शोध घ्यायचा पण कसा? मला तर तिथे जवळपास फिरकायला सुद्धा मिळणार नाही. म्हणून कोणालाही न समजता तिथे मला मला जायला हवे. तेव्हा माझ्या मनात आले- खरंच, मला अदृश्य होता आले, तर किती बरे होईल! मी या खुनांचा तपास त्वरेने लावीन.


            मला अदृश्य होण्याची शक्ती सापडली, तर मी अदृश्य स्वरुपात सर्व मिळालेल्या पुराव्यांचा आणि कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास करीन. सर्व संशयित लोकांची यादी करेन. या या गुन्ह्यांचा तपास करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची एक यादी तयार करेन. यानंतर मी गुंडांच्या टोळ्यांमधून गुप्तपणे फिरेन. त्यांच्या बोलण्यातून मुख्य मारेकार्यापर्यंत पोहोचेन. त्यातून मला काही पुरावे सापडतील. आरोपीला एकटा असताना त्याला गाठेन. मी अदृश्य अवस्थेत त्याला काही चमत्कार करून घाबरवीन. भुताच्या भीतीपोटी तो त्याने केलेला गुन्हा स्वतःच्या तोंडून भडाभडा सांगेल. हीच भीती दाखून मी संबंधित सर्वांनाच टीव्ही कॅमेऱ्यासमोर सर्व गोष्टी उघड करण्यास सांगेन. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया होऊन त्यांना योग्य ती शिक्षा होईल.


            अलीकडच्या काही न्यायालयीन निवाड्यांमुळे हे सिद्ध झाले आहे की, काही भ्रष्ट राजकारणी व भ्रष्ट मंत्री यांच्यामुळेच खरे तर सर्व भ्रष्टाचार सुरु झाला आहे. त्यांच्याविषयी तर माझ्या मनामध्ये प्रचंड संताप आहे. मी माझ्या शक्तीच्या मदतीने त्यांच्या घरी जाईन. त्यांच्या मालमत्तेची सर्व यादीच करून घेईन. यानंतर एकेकाला त्यांच्या घरी ते एकटे असतानाच भेटेन. त्यांना भीती दाखवून. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची कबुली त्यांचा तोंडून करून घेईन. प्रत्येकाला दम भरून सर्व संपत्ती शासनाच्या तिजोरीत भरायला भाग पाडेन. अशा प्रकारे सर्व भ्रष्टाचारी लोकांचा पर्दाफाश करेन.


            याच युक्तीने मी जलप्रदूषण व ध्वनिप्रदूषण नाहीसे करीन. पर्यावरणाचा नाश होऊ देणार नाही. तेथे लोकांना अटकाव करीन. खरे तर, माझ्या अदृश्य कर्तबगारीच्या प्रभावामुळे गैरवर्तणूक करण्य्लाच चाप बसेल आणि सर्च जण सुतासारखे सरळ वागू लागतील.


            मग मी पाकिस्तान बांगलादेशात जाऊन तेथील अतिरेक्यांचे सर्व अड्डे उध्वस्त करीन. एकाही अतिरेक्याला जिवंत ठेवणार नाही. या सर्व घटनांनी देशभरच नव्हे तर जगभर खळबळ माजेल. अनेक देशांमध्ये गुंड आणि भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध आंदोलने उभारली जातील. जगभर चांगल्या प्रशासनाला सुरुवात होईल. गरिबांना सुखाने जगण्याची संधी मिळेल.


            मला, देशद्रोही समाजद्रोही लोकांचा खूप संताप येतो. या सगळ्यांना मी याच पद्धतीने धडा शिकवेन. गुंडांना तर मी संपवूनच टाकेन. यानंतर मी शिधावाटप कार्यालये, अन्य शासकीय कार्यालये व महानगरपालिकेची कार्यालये यांतील भ्रष्टाचाराच्या मागे लागेन. सर्वप्रथम सगळ्यांनाच कारभार प्रामाणिकपणे करायला लावीन.आणि साऱ्या जगाला सुधारण्यास मदत करीन.

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

अदृश्य होण्याची कल्पना सुचण्याच प्रसंग

मोठ मोठ्या समाजसुधारकांच्या हत्यांचे प्रसंग

भ्रष्टाचारी लोक

भ्रष्ट राजकारणी व भ्रष्ट मंत्री

अतिरेकी

समाजकंटक

या सर्वांविरुद्ध मोहीम राबविणे

भ्रष्टाचाऱ्यांची सर्व संपत्ती जप्त करणे

सर्वत्र लोकाभिमुख कारभार सुरु.]

 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

मला अदृश्य होता आले तर मराठी निबंध

मला अदृश्य होता आले तर निबंध इन मराठी

मला अदृश्य होता आले तर

Mala adrushy hota aale tar Marathi nibandh

Mala adrushy hota aale tar nibandh in marahti

Mala adrushy hota aale tar

if I am invisibal essay in marathi 


 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • तुम्हाला जर अदृश्य होण्याची शक्ती मिळाली तर तुम्ही काय कराल तुमचे विचार आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.