मी आणि भूत | Mi aani bhut

मी आणि भूत | Mi aani bhut
Admin

 

मी आणि भूत


मी आणि भूत | Mi aani bhut


मी आणि भूत | Mi aani bhut 


〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


            प्रसंग तसा भयानकच होता. मी कोंकणात राहणाऱ्या माझ्या मामाच्या गावी आलो होतो. माझ्या मामाचे घर गावाच्या एका कोपऱ्यात आहे. एस.टी थांबते तेथून १५-२० मिनिटे चालत जावे लागते. डोंगरातली वळणदार वाट चढावी लागते. घराला चारही बाजुंनी मोठ मोठ्या झाडांनी वेढले आहे. घर तसे रानातच आहे. आजूबाजूला असणारी घरे एकमेकांपासून ५-७ मिनिटांच्या अंतरावर आहेत. तेथील परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. मामाचे घरच नाही तर संपूर्ण गावच मला खूप आवडले.


पण त्या दिवशीची ती रात्र माझ्यासाठी भयानक रात्र होती. त्या दिवशी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने घरातील सर्व माणसे बाजूच्या गावात गेली होती. मी थकलेलो असल्याने मी आग्रहाने घरातच थांबलो. सर्वजण सायंकाळी घरात येणारच होते. संध्याकाळपर्यंतचा वेळ आनादामध्ये लगेच निघून गेला. पण संध्याकाळ झाली तरी घरातले कोणीही परत आले नाहीत आणि माझा धीर सुटू लागला.


            रात्र सुरु झाली. तीही पुढे पुढे सरकू लागली. पण घरामध्ये कोणीच आले नाही. मी घरामध्ये एकटाच होतो. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. रातकिड्यांची किर्रकिर्र चालू होती. त्यातच दिवसभर शांत असलेल्या पावसाने सुद्धा चांगलाच वेग धरला होता. शेकडो कीटकांच्या आवाजांनी रान भरून गेले होते. त्यातच बेडकांचा आवाज. झाडांवर घराच्या छपरावर, जमिनीवर पावसाचे थेंब जोर-जोरात आपटत होते. मध्येच पंखांची फडफड करीत व चीत्कारल्यासारखा आवाज करत वटवाघळे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत होती. सोसाट्याचा वारा सुटला होता. दाराखिडक्यांचा आपटण्याचा आवाज होत होता. त्यातच अचानक सरपटण्याचा आवाज येई.


            आत्ता मात्र माझी पुरती घाबरगुंडी उडाली होती. घरातली माणसे अजून घरी परतत नव्हती. माझ्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. मी सारखा उठून दरवाजाकडे जाऊन कोणी येतंय का याची वाट पाहत होतो. हात पाय थरथर कापू लागले होते. सारखा पाणी पीत होतो. माझे हातपाय स्थिर नव्हते. साधी मोबाईलची बटणे दाबतानाही हात थरथरत होते. माझ्या रोमारोमात भीती दाटली होती. मनामध्ये विविध विचारांचा कल्लोळ उठला होता. माझे पाय थरथरू लागले. पण मी ते जमिनीवर घट्ट दाबून धरले होते.


            तितक्यातच चिखलामधून चालत येणाऱ्या पावलांचा आवाज आला, कोणीतरी येण्याचा भास झाला. मला आतोनात खूप आनंद झाला. कोणाच्या पावलांचा आवाज आला ते पाहण्यासाठी मी दरवाजाकडे धावलो. मला दरवाजा उघडण्याचा धीरच होत नव्हता. तेवढ्यातच पायांचा आवाज येण्याचा थांबला. मी कानोसा घेऊ लागलो. पण कोणतीही चाहूलच नव्हती. मग मात्र मी घाबरलो. कोण आले असणार? आवाज यायचा बंद का झाला? बाहेरून पाळत ठेवत असेल का? आता, अशा अवेळी? भूतबीत नसेल ना? असल्या शंकांनी माझा जीव खाली वर होऊ लागला. घरातली माणसे कधी एकदा घरी येतील असे झाले होते. फोन करायला घेतला तर पावसामुळे नेटवर्कच मिळत नव्हते.


            तेवढ्यात खिडकीकडे काहीतरी चमकताना दिसले. निरखून पहिले तर लाल रंगाचे डोळे आतमध्ये निरखून पाहत होते. कोण आहे? मी मोठ्याने ओरडून विचारले पण माझ्या तोंडातून आवाजच बाहेर पडेना. संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. थोड्याच वेळात ते चमकणारे डोळे खिडकीच्या काचेला बाहेरून चिकटले. अगदी कागद चिकटवतात तसे... आणि सरकत सरकत काचेवर फिरू लागले. माझी बोबडीच वळली. मी जीवाच्या आकांताने धावत सुटलो. कडी काढून धाडकन दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो. बाहेर पडता पडता पहिले तर... खिडकीच्या काचेतून एक हात आरपार येत होता आणि लांबच लांब होत होता.  मी मोठमोठ्याने ओरडत सुटलो होतो. तेवढ्याच पाय अडकून पडलो. तरीसुद्धा जीव वाचवण्यासाठी पळू लागलो. पण माझे पायाच उचलेनात. प्राणपणाने पळू लागलो पण मी जमिनीला पुरात जखडला होतो. मोठमोठ्याने ओरडत होतो. पण आवाजच बाहेर येत नव्हता...


            ...काही वेळानंतर मला जाणवू लागले. मी पांघरुणात गुरफटून मी मोठमोठ्याने ओरडत होतो. घरातले सगळेजण माझ्या भोवती जमले होते. मला जोरजोरात हलवून ओरडत होते. एव्हाना सगळ्यांना कळले होते की, मी स्वप्नात भूत पहिले होते!


            मग मामीने मला भुतांविषयी मला व्याख्यानच दिले. माझी समजूत काढली. भुताला आपल्यासारखा देह नसतो. त्यामुळे ते आपल्यासारखे वागूच शकत नाहीत. त्याला ऐकू येत नाही. ते आपल्याला स्पर्श करू शकत नाही. धरू शकणार नाही. आपणही भुताला काहीही करू शकणार नाही. ते आपल्याला दिसणारच नाही. किंबहुना आपण व भूत एकमेकांशी संपर्कच साधू शकणार नाही. खरे तर भूत अस्तित्वातच नाही. म्हणून ते आपल्याला दिसत सुद्धा नाहीत. भुताची भीती ही कल्पनेतली भीती आहे; भ्रमातून निर्माण झालेली भीती आहे. मामीचा विचार मला मनोमन पटला आहे. भूत अस्तित्वातच नाही, नाही, नसतेच!

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

मुख्य वस्तीपासून दूर जंगलात असलेले ठिकाण

मी एकटा

वातावरण साधारणपणे भीतीदायक

मी भीतीच्या भावनेने ग्रस्त

हालचालींवर भीतीची छाया

त्यामुळे काही भास

भूतदर्शनाचा उलगडा

वैज्ञानिक स्प्ष्टीकरण

शेवट]

 

 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

मी आणि भूत निबंध

मी आणि भूत मराठी निबंध

मी आणि भूत

Mi aani bhut Marathi nibandh

Mi aani bhut nibandh

Mi aani bhut

 

 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • तुम्ही आणि भूत यावर तुमचे किस्से आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.