मी सह्याद्री बोलतोय | Mi sahyadri boltoy

मी सह्याद्री बोलतोय | Mi sahyadri boltoy marathi nibandha mi shayadri bolat aahe.
Admin

 मी सह्याद्री बोलतोय

            

मी सह्याद्री बोलतोय | Mi sahyadri boltoy


मी सह्याद्री बोलतोय | Mi sahyadri boltoy 



➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


        हो खरंच, मी सह्याद्री बोलत आहे. तुम्ही मला महाराष्ट्राच्या अस्मितेचा परीचायक म्हणू शकता.


            हिमालय हा माझा मोठा भाऊ आहे. ज्या प्रकारे तो भारताच्या उत्तरेकडील सीमेची शान वाढवतो, त्याप्रकारे मी भारताच्या पश्चिमेकडील भागला सुशोभित करतो. अरबी समुद्रातील पाण्याच्या लाटा माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत असतात. त्यांचे बोलणे ऐकता-ऐकता किती युगे लोटली आणि अजून किती युगे लोटतील कोणीही सांगू शकत नाही. वेळ कुठे निघून जातो, काही समजतसुद्धा नाही.


            माझ्या काही मुली नद्यांच्या रुपामध्ये पूर्वदिशेला वाहत जातात आणि काही नद्या या पश्चिमेस वाहतात. ज्यांची नवे तुम्हाला माहित आहे, तरीही मी तुम्हाला सांगतो – इंद्रायणी, गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा आणि कावेरी. या आपल्या पित्याचा गौरव कधीही विसरत नाहीत. माझ्या मुली लाखों लोकांना जीवन देतात. यांच्या उगमस्थानावर तपस्वी लोकांनी तप केले आहेत. त्यांचे आशीर्वाद आजसुद्धा येथील वातावरणामध्ये अनुभवायला मिळू शकतात.


            निसर्गाच्या विविध छटांनी मी नटलेलो आहे. प्रत्येक वर्षातून कमीत कमी चार महिने ढग माझ्यावर मधुर पाण्याने माझा जणू अभिषेकच करतात. त्यांच्या पाण्यापासून नवीन जीवन मिळवणारी जंगले माझ्या अंगाखांद्यावर पसरलेली आहेत. ही जंगले विविध प्रकारच्या झाडा- झुडपांनी नटलेली आहेत. माझ्या विविध भागांमध्ये गावात आणि झाडांवर विविध प्रकारची फुले असतात. आयुर्वेदामध्ये या फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या मधाचे विविध उपयोग सांगितले गेले आहेत. इतकेच नाही तर काही भागामध्ये औषधीवनस्पती सुद्धा आढळतात. ज्यांचा तुम्हाला तुमच्या जीवनात खूप फायदा होतो.

            

            मी महाराष्ट्राच्या संकृतीचा पहारेदार आहे. सोपारा, घारापुरी, कान्हेरी, नाशिक, इत्यादी महाराष्ट्राच्या संकृतीची स्मारके आहेत. अजिंठ्याची भित्तीचित्रे आणि एलोराच्या शिल्पांनी तर साऱ्या जगाला मोहित केले आहे.


            मी महाराष्ट्राच्या इतिहासाचासुद्धा साक्षीदार आहे. मी पाहत असल्यापासून या ठिकाणी अनेक राज्ये उदयास आली आणि अस्त झाली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मी कसे काय विसरू? भारतमातेच्या स्वाभिमानाचा झेंडा त्यांनीच तर फडकवला होता. त्यांनी बनवलेले अनेक किल्ले आजही माझी शोभा वाढवत आहेत.


            मराठी, कन्नड यांसारख्या भाषा माझ्या आश्रयातच वाढल्या. यांच्या साहित्याला मीच सजवले आणि सावरले आहे.


            जेव्हा मला महाराष्ट्राचा गौरव म्हणून संबोधित केले जाते तेव्हा मी गर्वाचा अनुभव करतो.

 

➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

  • प्रस्तावना
  • अरबी समुद्राच्या लाटांशी गप्पा
  • माझ्या नद्या या माझ्या मुली
  • विविध उपयोगी वनस्पती
  • संकृती आणि इतिहासाचा गौरव. ]

 

 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • मी सह्याद्री बोलत आहे
  • मी सह्याद्री बोलतोय
  • मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध
  • मी सह्याद्री बोलत आहे निबंध
  • सह्याद्रीचे मनोगत मराठी निबंध
  • Mi sahyadri boalt aahe Marathi nibandh
  • Mi sahyadri boltoy
  • Sahyadriche manogat

 

 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • मी सह्याद्री बोलत आहे यावर तुमचे विचार आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

  ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


धन्यवाद


6 comments

  1. Unknown
    Unknown
    Very nice sir
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      धन्यवाद ....
      -Educationalमराठी
  2. Unknown
    Unknown
    धन्यवाद एजुकेशनल मराठी
    1. Omkar
      Omkar
      धन्यवाद...
  3. Unknown
    Unknown
    Thanks🙏
  4. Unknown
    Unknown
    Thank you very much ❤😘
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.