पक्षाची आत्मकथा | Pakshachi aatmakatha (आत्मकथनात्मक निबंध )

पक्षाची आत्मकथा | Pakshachi aatmakatha. eka pakshachi aatamakatha. पक्षाची आत्मकथा
Admin

 
पक्षाची आत्मकथा

पक्षाची आत्मकथा | Pakshachi aatmakatha (आत्मकथनात्मक निबंध )

पक्षाची आत्मकथा | Pakshachi aatmakatha 


            तुम्हाला आश्चर्य वाटेल की पिंजऱ्यामध्ये बंद असणारा एक पक्षी सुद्धा आपल्या जीवनाची कथा सांगण्यासाठी आतुर आहे! अरे मित्रा, मी कोणते निर्जीव खेळणे आहे का ? माझ्या शरीरामध्ये सुद्धा एक धडकणारे हृदय आहे. मी सुद्धा सुख आणि दु:ख अनुभव करू शकतो.

सैनिकाची आत्मकथा

            माझा जन्म एका घनदाट अरण्यात झाला होता. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची. तिने मला दाणे खायला आणि उडायला शिकवले. मी आकाशात घेतलेली पहिली झेप मला अजूनही आठवते. यानंतर मी आकाशात माझ्या मित्रांसोबत खूप दूर-दूरवर उडू लागलो. झाडाच्या बारीक फांद्यांवर बसून मी वाऱ्याबरोबर झोके घायचो. माझ्या आवाजाने शांत असलेले आकाश घुमत असे. किती सुखी आणि आनंदी जीवन होते माझे! त्या दिवसांची आठवण आली की माझ्या डोळ्यांमध्ये लगेच पाणावतात.


            एक दिवशी एक पारधी त्या जंगलामध्ये आला. त्याचे माझ्यावर लक्ष गेले आणि तो माझ्या सौंदर्यावर मोहित झाला. त्याने मला एका जाळ्यामध्ये पकडून एका पिंजऱ्यात कैद केले. मी खूप बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही. त्या निर्दयी माणसाच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. मी दोन-तीन दिवस काही खाल्ले नाही. तरीही त्या पारध्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने पिंजरा घेतला आणि बाजारात जाऊन मला विकले. त्या दिवसापासून मी या कैदेमध्ये माझे दु:खाने भरलेले जीवन जगत आहे.

 शेतकऱ्याची आत्मकथा.

                माझा मालक खूप प्रेमळ आहे. घरातील इतर लोक सुद्धा खूप लाड करतात माझे. ते मला सोरेने पिंजऱ्यामध्ये ठेवतात. मला खाण्यासाठी गोड फळे देतात. पण त्या फळांमध्ये जंगलामध्ये मिळणाऱ्या फळांसारखी गोडी नाही. सारखी मला माझ्या आईची आठवण येते. लहानपणीच्या मित्रांच्या आठवणीने मी सारखा निराश राहतो.  या घरातील लहान मुले माझ्यावर खूप प्रेम करतात. शाळेतून घरी आल्यावर ते सरळ माझ्याजवळच येतात. माझ्याबरोबर खेळतात. माझ्या तोंडातून ‘रामराम’ ‘नमस्कार’ यांसारखे शब्द ऐकून ते खूप खुश होतात. पण ही भोळी-भाभडी मुले माझ्या दुःखाची कल्पना कशी काय करू शकतील?


            माणूस पण किती निर्दयी आहे! त्याला पंख नाहीत, तरीही तो आकाशात उडत आहे, पण माणसाने मला एका पिंजऱ्यात बंद करून माझा उडण्याचा अधिकारच काढून घेतला आहे. आज जो तो आपले अधिकारांची मागणी करू लागला आहे. मला पुन्हा उडण्याचा अधिकार मिळेल का? की मला येथेच गुदमरून जीव गमवावा लागेल?


 आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? 


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

  • प्रस्तावना
  • लहानपणीचे सुखी आणि आनंदी जीवन
  • एका पिंजऱ्यामध्ये कैद
  • बाहेरून सुखी पण मनातून खूप दु:खी
  • शेवट ]




हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 

  • मी पक्षी बोलतोय
  • पक्षाचे मनोगत मराठी निबंध
  • पोपटाचे मनोगत मराठी निबंध
  • पक्षाची आत्मकथा निबंध
  • Pakshachi aatmakatha
  • Pakshache manogat Marathi nibandh
  • Poptache manogat Marathi nibandh

 



  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • पक्षाची आत्मकथा तुमचे विचार आम्हाला COMMENT द्वारे कळवा.




धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.