रंग नसते तर... | Rang naste tar...

रंग नसते तर... | Rang naste tar... रंग नसतील तर निबंध ३०० + शब्दांत. रंग नसते तर . rang nste tar essay in mrathi language
Admin

 

रंग नसते तर...



            चैत्र महिना आला आणि कोळीचे कुहूकुहू मधुर स्वर कानामध्ये गुंजन करू लागले. त्याच दिवसांमध्ये मोगरा, जाई-जुई , हिरवा चाफा, पिवळा चाफा यांसारख्या अनेक झाडांनी निसर्गाला विविध रंग बहाल करायला सुरुवात केली. आंब्याच्या हिरव्या-पोपटी कोवळ्या पानांतून हिरव्यागार कैऱ्या बाहेर डोकाऊ लागल्या. वातावरणामध्ये उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. त्यातच बहाव्याचा गुलाबी व पिवळा, पांगाऱ्याचा लालबुंद, गुल्मोहारचा पिवळा-लाल हे रंग रस्तोरस्ती फुलू लागले. म्हणूनच, याच काळामध्ये निसर्गाने माणसालाही रंगपंचमी खेळायला लावली.

मला पंख असते तर...

                नानाप्रकारच्या शेकडो छटांचा साज घेऊन विविध रंग आपल्या मनाला मोहून टाकतात आणि मनाला नवी उभारी देतात. बाहेर ऊन म्हणत असते की मी देहाची लाहीलाही करते; पण हे रंग त्या उन्हाच्या झळांनाही मनापर्यंत पोहोचूच देत नाही. निसर्गाने माणसाला रंगांचे केवढे वैभव प्रदान केले आहे! माणसाला केवढे समृद्ध केले आहे ! हे सर्व रंग नसते तर...? तर माणसाचे आयुष्य बेरंग झाले असते.


रंग नसते तर... | Rang naste tar...

रंग नसते तर... | Rang naste tar...


    
        रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण याच रंगांच्या दुनियेत वावरत असतो. थोडेसे थांबून पाहिलात तर विविध रंगांच्या हजारो छटा आपल्या कपड्यांवर नांदताना दिसतील. जर आपण आपले जेवणाचे ताट डोळ्यासमोर आणले तर रंगांच्या छटा ताटामध्ये पहुडलेले  दिसतील. मी भाजी बाजारात आईबरोबर जाणे कधी सोडतच नाही. मला बाजारात जायला आवडते. म्हणून बाजारात आनंदाने जातो. बाजारातील रंगांच्या विविध छटा मनाला मोहून टाकतात. हिरवा, लाल,पिवळा, पंधरा, केशरी, जांभळा वगैरे विविध रंग भाज्यांच्या विविध रूपाने तेथे विराजमान झालेले असतात. रंग नसतील तर आपले दैनंदिन जीवन रंगहीन होऊन जाईल.

स्वप्ने नसती तर... 

            ज्या ठिकाणी रंगांचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी सौदर्य असते. कवी-लेखक हे सौंदर्याचे पुजारी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून किंवा काव्यातून रंगांचे देव्हारेच रचतात. चित्रकार तर रंगांच्या दुनियेतच वावरत असतात. रंग नसते, तर सौंदर्याची दुनियाच नसती! रंगाची उधळण करणारे होळी, रंगपंचमी, दिवाळी, नवरात्र हे सणही नसते. कॉलेजमध्ये रंगांचा उत्सव मांडणारे साडी डे, रोझ-डे, यांसारखे उत्सवच नसते. रंगांच्या निर्मितीत गुंतलेले लाखो-कोट्यावधी लोक उपाशी राहिले असते.


            रंग नसते तर सगळे जग एकतर पांढरे असते किंवा काळे असते. कल्पना करा, तुम्ही जेवायला बसला आहात. काळ्या ताटात काळा भात, त्यावर काळे वरण, काळी चटणी, लोणचे, कोशिंबीर, पापड, मीठ हे सर्व काळेच. शेजारीच काळ्या रंगाच्या तांब्यात काळे पाणी! आपली शाळा काळीच असेल. वर्ग,वर्गातील बाके, फळा, खडू काळेच. मग काळ्या खडूने काळ्या फळ्यावर लिहिल्यावर काय दिसेल ?

परीक्षा नसत्या तर...

            आपल्या आजूबाजूच्या परिसरात पहिले, तर तेथील वृक्षवेली काळ्या; काळी जमीन; माती, दगड धोंडे काळेच, मोठे डोंगर काळेच, आभाळ काळेच. आत्ता प्रकाशाची कल्पना केली तर तोही काळाच असणार. बाप रे नको ती कल्पना ! समजा रात्री मिट्ट काळोख पडला आहे. म्हणून तुम्ही विजेरी  पेटवलीत त्यातून प्रकाश बाहेर पडला तो ही काळ्याच रंगाचा असेल मग आपल्याला अंधारात दिसणार कसे? काळ्या डोंगराआडून काळाच सूर्य वर येऊ लागला, तर हे दृश्य कसे दिसेल? सकाळचे सूर्योदयाचे वर्णन कसे करता येईल? काही दिसेल तरी का?


            रंग नसतील तर सारे जगच काळे असेल. प्रचंड काळोखात आपण उभे. पायाखाली विंचू, मुंग्या, झुरले,साप असले तरीही आपल्याला ते दिसणार नाहीत. शेजारी वाघ उभा असला तरी कळणार नाही. चालू लागलो तर पुढे पाणी आहे, खड्डा आहे की दरी आहे, हे कळणारच नाही. याशिवाय पिकवणार काय? खाणार काय? छे, छे ! रंग नसतील, तर जगणेच अशक्य होऊन जाईल. काळ्याऐवजी पांढऱ्या रंगाचा आपण विचार केला तरिही हेच भीषण वास्तव आपल्या डोळ्यांसमोर उभे राहील.

भूक नसतीच तर... 

            खरंच, रंग नसतील तर माणूस नसेल ही पृथ्वी नसेल. हे जगच नसेल. रंग हाच आपल्या जीवनाचा आधार आहे. पाणी म्हणजे जीवन; तसेच रंग म्हणजे जीवन!


 📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

निसर्गातील रंगांचे वैभव

रंग नसते तर... ही कल्पना

निसर्गातील रंगवैभव नसते

दैनंदिन जीवन रंगहीन बनले असते

कला,सन, उत्सव नष्ट झाले असते

एक तर काळा किंवा पंधराच रंगाचे अस्तिव असते

सारे जग काळे किंवा पांढरे

जीवनच अशक्य

रंग हा मानवी जीवनाचा आधार.]


📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 

  • रंग नसते तर
  • रंग नसते तर मराठी निबंध लेखन
  • रंग नसते तर निबंध
  • रंग नसते ते तर या विषयावर निंबंध
  • रंग नसते तर काय झालं असत
  • रंग नसते तर निबंध लेखन
  • Rang naste tar information in Marathi
  • Rang naste tar Marathi nibandh
  • Rang naste tar essay in marthi.

 

 📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

  

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • रंग नसते तर काय झाले असते ? तुमच्या कल्पना आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 

📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


धन्यवाद



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.