भूक नसतीच तर... | bhook nastich tar...

भूक नसतीच तर... | bhook nastich tar... bhook nasti tar essay in marathi.
Admin

 

भूक नसतीच तर...


            कोणतातरी सण होता. सार्वजनिक पूजा चालू होती. भटजी मोठ्याने पोथी वाचत होते. ‘अन्नासाठी दही दिशा | आम्हां फिरविशी जगदीशा||’ एव्हडेच चरण माझ्या कानावर पडले आणि त्यांनी मानला वेढून टाकले. खरोकःर या जगातील सगळ्यांची धडपड चालू असते. ती प्रामुख्याने पोट भरण्यासाठीच, पोटाची खळगी भरण्यासाठी. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की खरोखर माणसाला भूकच नसती तर... तर किती बरे झाले असते!

सर्व वर्तमानपत्रे बंदच झाली तर

            भुकेमुळे पोटाच्या मागे धावणारे जग पहिले की, वाटते – भूक नसतीच तर ? तर... तर काय घडले असते ? नुसतात विचार केला तरी कळेल ... संपूर्ण जगाचे रंगृप्च वेगळे बनले असते ! शेते पिकवावी लागली नसती ! धन्य निर्माण करायला लागले नसते ! आणि घरातील स्त्रियांना रांधा-वाढ उष्टी काढा ही कटकटीची कामे करावीच लागली नसती. पण मग यातून काय मिळाले असते ? मला वाटते, आळसाचे साम्राज्य वादळे असते. उद्योग केलाच पाहिजे, अह्सी काही आवश्यकता न राहिल्याने रिकामी मने, रिकामी डोकी नको त्या कामामध्ये गुंतली असती.


भूक नसतीच तर... | bhook nastich tar...

भूक नसतीच तर... | bhook nastich tar...



            भूक नसती तर, अनेक गुन्हे तसेच अत्याचार टाळू शकले असते. ही भूक भागवण्यासाठी भुकेला माणूस चोरी करतो. पोटाची भूक सख्या भावांमध्ये तेढ निर्माण करते. ही पोटाची भूक सहृदय माणसाला निर्दय बनवते. सुरांना असुर बनवते. मग मानवांतून दानव निर्माण होतात. ही भूकच असत्याला जन्म देते. अशी ही पोटाची भूक नसतीच तर बरे झाले असते!

मला पंख असते तर...

            या भूकेच्याधीन झालेला माणूस विकृत बनतो. म्हणूनच जो आपली भूक बाजूला ठेऊन इतर्न्च्या भुकेचा प्रथम विचार करोत. त्यालाच सुसंकृत मानले जाते. ‘जीवो जीवस्य जीवनम|’ मोठा माझा लहान माशाला गिळून टाकतो, कारण त्याची भूक!


            ही काळी बाजू बाजूला केली तर फायदे ही प्रकर्षाने आढलतात. केत्येक वेळा आपल्याला आढळते की, ही पोटाची खळगी भरण्यासाठी कलावंताना आपली आवडीची कामे बाजूला ठेऊन पोटासाठी इतर कामे करावी लागतात. भूक नसतीच तर शिल्पकार आपल्या कळला वाहून घेतील. लेखक,कवी आपल्याला हवे तसे मनसोक्त लेखन करीत राहतील. शास्त्रज्ञ आपल्या संशोदानाच्या कामात स्वतःला वाहून घेतील.

परीक्षा नसत्या तर...

            अशी ही भूक – पोटाची नकोच. पण मग शेतीक्षेत्रात प्रयोग कोण करणार ? तरारलेली शेते नेत्रानंद कसा देणार ? विविध पदर बनवले जाणार नाहीत. मग ‘मेजवानी’सारखे कार्यक्रम कसे होणार? मित्राने दिलेल्या परतीचा आनंद कसा मिळणार ? नको रे बाबा! ती कल्पना न केलेलीच बरी! म्हणून मी म्हणतो – भूक ही हवीच. मग रोज रोज जोरात ओरडता येईल-

शाळा सुटली,

पाटी फुटली,

आई, मला भूक लागली||


कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? 

 

 🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱

 

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

  • भूकेबद्दल जागोजागी येणारे उल्लेख
  • भूक नसती तर
  • धन्य पिकवण्याची
  • अन्न शिजवण्याची गरज नव्हती
  • माणूस जास्त आळशी झाला असता
  • रिकामे मन सैतानाचे घर झाले असते
  • आवडत्या कामांना वेळ देता आला असता
  • भुकेतून गुन्हेगारीचा जन्म
  • जीवो जीवस्य जीवनम
  • भुकेवर ताबा मिळविणे ही सुसंकृतता
  • भोजनाचा आनंद हरवणार.]

 

 🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

भूक लागलीच नसती तर
भूक नसतीच तर मराठी निबंध
Bhuk lagalich nasti tar
Bhuk nasti tar Marathi nibandh


🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱 

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • भूक नसती तर, तर काय झाले असते तुमच्या कल्पना आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 

🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱🍱


धन्यवाद


5 comments

  1. Unknown
    Unknown
    Nice information
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      धन्यवाद....
  2. Unknown
    Unknown
    online िश©ण काळाची गरज
    1. omkar pawar.
      omkar pawar.
      तुम्हाला हवा असलेला निबंध काही दिवसांतच आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईट वर उपलब्ध करून दिला जाईल.
      - Educationalमराठी
    2. Admin
      Admin
      तुम्हांला हवा असलेला निबंध २४ मार्च २०२१
      9 pm ला वेबसाईट वर उपलब्ध होईल.
      - Educationalमराठी
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.