रुग्णालयाचे आत्मवृत्त | Rugnalayache aatmavrutta

रुग्णालयाचे आत्मवृत्त | Rugnalayache aatmavrutta
Admin

 

रुग्णालयाचे आत्मवृत्त


रुग्णालयाचे आत्मवृत्त | Rugnalayache aatmavrutta

रुग्णालयाचे आत्मवृत्त | Rugnalayache aatmavrutta




🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥


        नुकतेच महापालिकेने अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय सर्वांच्या सेवेसाठी सुरु केले. सर्वसामान्य जनतेसाठी अशा प्रकारचे सुसज्ज रुगणालय उभारल्याने रुग्णसेवेत मोठी क्रांतीच झाली होती. याचा त्या रुग्णालयाला सुद्धा खूप आनंद झाला होता. म्हणून त्याने शहरातल्या पालिकेच्या व सरकारच्या रुग्णालयांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा विचार केला. पण रुग्णालये अशा तऱ्हेने एकत्र आळली असती, तर मात्र रुग्णांची मोठी गैरसोय झाली असती. शिवाय, सर्वाना एकत्र येण्याइतकी मोठ्या प्रमाणावर विस्तृत जागा उपलब्ध होणे देखील कठीणच होते. म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे रुग्णालयाचे स्नेहसंमेलन पार पडले. त्या वेळी त्या रुग्णालयाने व्यक्त केलेले हे त्याचे विचार.


    माझ्या सख्यांनो,

    तुम्हाला माझे शतशः अभिवादन!


        या प्रकारे सर्व रुग्णालये एकत्र येणे ही आजवरच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. अशा प्रकारे रुग्णालयांचे स्नेहसंमेलन या आधीच्या इतिहासात कधी घडले नाही आणि या पुढेही कधी घडेल असे वाटत नाही. आज आपण ते घडवून आणले, याचा मला खूप अभिमान आहे.


        मित्रांनो, आपल्याला लाभलेला वारसा फार प्राचीन आहे, हे ठावूक आहे का तुम्हाला? जवळजवळ सहा हजार वर्षांपूर्वीपर्यंतचे आपल्या पूर्वजांचे उल्लेख सापडतात. आत्ताच्या सारखी सुसज्ज नसतील; पण त्या काळी रुग्णालये होती. त्या काळात काही देवतांची मंदिरे हीच रुग्णालये होती आणि त्या मंदिरांमध्ये असलेले धर्मगुरू हेच त्या काळी डॉक्टर होते. पुढे इसवी सनापूर्वी बौद्धकाळात रुग्णालये असल्याचे उल्लेख सापडतात. सम्राट अशोकाने अठरा रुग्णालये बांधली होती. ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर रुग्णालयांना चांगले दिवस प्राप्त झाले. फ्लॉरेन्स नाइंटिंगेल, मदर तेरेसा, गाडगेमहाराज यांसारख्या थोर विभूतींमुळे रुग्णसेवेला ईश्वरभक्तीचे स्थान मिळाले. बाबा आमटे यांनी तर, असाध्य रोगाने ग्रस्त लोकांना सामान्य माणसाचे जीवन जगता येते, हे दाखवून दिले.


        ते रुग्णालय बोलताना थोडेसे थांबले. थोडेसे पाणी पिऊन घेतले आणि पुढे पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.


        मित्रांनो, रुग्णालय म्हटले की, मनाला काळवंडून टाकणारे वातावरण डोळ्यांसमोर येते. हताश, निराश झालेली विविध रोगांनी ग्रस्त अशी माणसे दिसू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर जगण्याची उमेदच दिसत नाही. ही मनाला विषण्ण करणारीच गोष्ट आहे.


        आणखी एक गोष्ट म्हणजे, श्रीमंतांसाठी पंचतारांकित सुविधा असलेली हॉस्पिटले आणि गरिबांसाठी साधी, रया गेलेली हॉस्पिटले, असेच चित्र सर्वत्र दिसते. गरीब-श्रीमंतांना होणारे दुःख वेगळे असते का? मग हे असे का?


           माझ्या प्रिय मित्रांनो हे चित्र आपण पालटले पाहिजे. आपण रुग्णांचे आश्रयस्थान आहोत आणि आशास्थानही आहोत. आपण म्हणजे रोगमुक्ती स्थळ होय. अआप्न वेदनांपासून मुक्ती देतो. वेदानामुक्तीनंतर सुंदर जीवनाचा मार्ग आपल्यामुळे सुकर बनतो. येथे आल्यानंतर निराश न वाटता, येथे आल्यामुळे आपला रोग, दुःख, आपल्या वेदना समूळ नष्ट होणार आहेत आणि आपल्याला आनंददायी व सुंदर जीवन लाभणार आहे, अशी आशा रुग्णांच्या मनात निर्माण झाली पाहिजे.


            तेव्हा माझ्या मित्रोंनो, आपण महान आहोत व महान कार्य करीत आहोत हे लक्षात घ्या. रुग्ण तर डॉक्टरांना देव मानतात. परिचारिका, वॉर्डबॉय , आया इत्यादी कर्मचार्यांच्या सहाय्याने या ठिकाणी रोग्मुक्तीचे कार्य पर पडते. मला या साऱ्यांचा आतोनात अभिमान वाटतो. या कर्मचाऱ्यांविना आपले अस्तित्व अशक्य आहे. तेव्हा आपण सर्व मिळून आपापले आवार स्वच्छ, नीटनेटके व प्रसन्न ठेऊ. औषधांच्या वासाऐवजी पुलंचा सुगंध दरवळू देऊ आणि रुग्णालये आनंदी व प्रसन्न बनवू.


🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

  • रुग्णालयाचा बोलण्याचा प्रसंग
  • रुग्णालयांच्या संमेलनाची अपूर्व घटना
  • रुग्णालयाचा इतिहास
  • रुग्णालयाचे निराशाजनक रूप
  • गरीब-श्रीमंतांसाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये फरक का?
  • रुग्णालय म्हणजे रोगमुक्ती स्थळ व वेदानामुक्ती स्थळ
  • कर्मचाऱ्यांचे सहकार्य
  • रुग्णालय आनंदी व प्रसन्न बनवण्याचा प्रयत्न ]

 🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • रुग्णालयाचे आत्मवृत्त
  • रुग्णालयाचे आत्मकथन
  • रुग्नालायची आत्मकथा
  • मी रुग्णालय बोलतेय
  • रुग्णालयाची व्यथा
  • Rugnalayache aatmavrutta
  • Rugnalayache aatmakathan
  • Rugnalaychi aatmakatha
  • Mi rugnalay boltey..
  • Rugnalayachi vyatha

 

 🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥


धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.