BUY PROJECT PDF Click Here!

माणसाला मृत्यू नसता तर... | Manasala mrutyu nasta tar

माणसाला मृत्यू नसता तर... | Manasala mrutyu nasta tar
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 माणसाला मृत्यू नसता तर...



माणसाला मृत्यू नसता तर... | Manasala mrutyu nasta tar

 माणसाला मृत्यू नसता तर... | Manasala mrutyu nasta tar



✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

          काय भीषण संकट होते ते! दूरदर्शनवर त्याची नुसती दृश्ये पाहूनही काळीज पिळवटून निघत होते. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे गावेच्या गावे पुराच्या पाण्याने वाहून जात होती. वाऱ्याची झुळूक यावी आणि पत्त्यांचे घर कोसळावे त्या प्रकारे इमारती आणि आणि घरे जमीनदोस्त होत होती. या आसमानी संकटाने हादरलेला तो सारा परिसर नंतर आरोळ्या, किंकाळ्या, रडणे, ओरडणे, विव्हळणे यांनी भरून गेला होता. मृतदेहांचा खच पडला होता. अनेकजण जखमी झाले होते. मृत्यूचे ते अक्षरशः थैमानच होते.


            खर पाहायला गेलो तर मृत्यू कधीही सुखकारक नसतोच. तो  येतो तेव्हा लोकांना शोकसागरात बुडवतो. माणसाला सर्वात जास्त कशाची भीती वाटत असेल, तर मृत्यूचीच ! अस हा दुखःदायक , वेदनादायक मृत्यू नसता म तर किती बरे झाले असते!


            मृत्यू नसता तर माणसाच्या मनातील ही भीतीच नष्ट झाली असती. तो धाडशी  बनला असता. त्याने नवनवीन शिखरे पादाक्रांत केली असती. समुद्याच्या थांग घेतला असता. माणूस जाऊ शकत नाही अशी हजारो ठिकाणे आजही या पृथ्वीवर आहेत. तेथे तेथे माणूस गेला असता. चंद्रावरही तो सहज वावरला असता. ज्ञानाचा केवढा मोठा खजिना माणसाने मिळवला असता. त्याने अनेक शोध लावले असते. सृष्टीचे अनेक गुपिते माणसाने उलगडली असती. या सर्व गोष्टींचा उपयोग माणसाच्या सुखासाठी झाला असता. आजपेक्षा ही शेकडो पटींनी जास्त प्रगती मानवाने स्वतःच्या जीवनात घडवून आणली असती.


            आज नवनवीन शोध लावत असताना, नवनवीन उपकरणे तयार करत असताना अनेक अडथळे निर्माण होत असतात, या शोधांच्या कार्यामध्ये अडथळे आल्यास पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या त्यांच्या संशोधनकार्यातून मार्गदर्शन घेतात. पण माणसाला मृत्यू नसता तर, तर त्या पूर्वजांना प्रत्यक्षपणे भेटता आले असते. त्याच्या अनुभवाचा फायदा झाला असता. अनेकदा महत्वाचे ज्ञान व कौशल्य व्यक्तीच्या मृत्यूनंतर नष्ट होतात. मृत्यू नसता तर असे ज्ञान व कौशल्य नष्टच झाले नसते.  ताजमहाल बांधणारे व अजिंठा-वेरूळ सारखी लेणी घडवणारे कलाकार आजही जिवंत असते आणि त्यांच्या कलेचा फायदा करून घेता आला असता. मृत्यू नसतं तर शिवाजी महाराजही हयात असते आणि ‘रयतेचे राज्य’ प्रत्यक्षात आले असते. ऐतीकासिक पुरुषं थोर नेते हेही हयात असते. त्यांचा चोर्म लुटारुं दरोडेखोर, लबाड्या करणारे भ्रष्टाचारी यांच्यावर वचक राहिला असता. कोणावरही अन्याय, अत्याचार झाला, तर अशा थोर मंडळींकडे मदतीसाठी जाता आले असते.


            या बाबतीमध्ये इतिहासकारांना फार मोठा फायदा झाला असता. त्यांना भूतकाळाचा शोध घेण्यासाठी जुनी कागदपत्रे, बखरी वाचत बसाव्या लागल्या नसत्या त्यांना हव्या त्या विषयावरची माहिती या प्राचीन व ऐतिहासिक काळातील व्यक्तींकडून सहज मिळाली असती. मग शिवरायांच्या जन्मताराखेवरून वादच उभा राहिला नसता,मृत्यू नसता तर कोणाही व्यक्तीच्या नावापुढे जन्म व मृत्यू अशी नोंदही झाली नसती.


            पण मरण नसले तरी वार्धक्य येणारच. मग या वार्धक्यातील व्यथा कशा टाळता येणार? आजही माणसाची वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे अतिवृधांची समाजातील संख्या वाढली आहे. मग त्यांच्या व्यथा, अडचणी वाढत जातात. अनेकांना गुढगेदुखी, अंधत्व, मधुमेह, हृदयविकार असे जीवघेणे विकार जडतात. ‘विस्मरण’ हा तर सर्वात जीवघेणा विकार. मग या सगळ्यांतून माणसांची सुटका कशी होणार? केवळ मरणानेच!


            माणसाला मृत्यू नसता तर- जगापुढे लोकसंख्येचा फार मोठा प्रश्न उभा राहिला असता! आजही आपल्या भारतात लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. त्यातून अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. घरांचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. कोट्यवधी लोक झोपड्यांत, गटारांच्या बाजूला, फुटपाथवर भयानक दारिद्रयात जीवन जगत आहेत. आरोग्याचे साधे साधे प्रश्न सुटत नाहीत. रोगराई अनेकदा थैमान घालते. सतत भांडणे, कुरबुरी, मारामाऱ्या, दंगे घडत आहेत. देशादेशांत भीषण परिस्थिती ओढवेल! माणसांना पृथ्वीवर उभे राहायला ही जागा उरणार नाही.. माणसे रोगराइच्या वरवंट्याखाली सापडतील. पण यांतून सुटका करणारा मृत्यू नसेल.


            आपण हा फ़्क़्त माणसांचा विचार करीत आहोत. इतर प्राण्यांचे काय? तेही आमार होतील. अफाट वाढतील. क्षुद्र रोगजंतूसुद्धा अमर होतील! तो माणसांचे किती हाल करतील! नुसती कल्पना करून पहा.


            मृत्यूमुळे पिकली पाने गळून पडतात. नाव्गात कोवळिकेला विकासासाठी वाव मिळतो. जुने जातात. त्या जागी नवीन येतात. निसर्ग हा समतोल साधत असतो. वरवर पाहता, अमरत्व फार मनोहर वाटते. पण लक्षात ठेवा, ते अत्यंत कडू आहे; नव्हे विषारी आहे.

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

  • हा विचार मनात येण्याचा प्रसंग
  • माणूस धाडसी बनला असता
  • प्रगती झाली असती
  • पूर्वज हयात असते
  • त्यांचे मार्गदर्शन, मदत मिळाली असती
  • इतिहासकारांना फायदा
  • वार्धक्यातील अडचणी अटळ
  • लोकसंख्यावाढीचे भयंकर परिणाम
  • मृत्यूमुळे निसर्गाचा समतोल
  • अमरत्व माणसाच्या दृष्टीने विषारीच ]

 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • माणसाला मृत्यू नसता तर...
  • मृत्यू नसता तर
  • Mansala mrutyu nasta tar
  • Mrutyu nasata tar....

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • माणसाला मृत्यू नसता तर....या कल्पनेबाबत तुम्हाला काय वाटते? आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.