बोलीभाषांचे वैभव | Bolibhashanche vaibhav

Admin

 

बोलीभाषांचे वैभव

बोलीभाषांचे वैभव | Bolibhashanche vaibhav

बोलीभाषांचे वैभव | Bolibhashanche vaibhav


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏



           भारतवर्षाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा. उत्तरेकडच्या भाषा आणि दक्षिणेकडच्या भाषांचे कूळ अगदी वेगळे आहे. त्यामुळे या  साम्य आढळत नाही. या भाषा आपापल्या ठिकाणी समृद्ध आहेत. प्रत्येक भाषा स्वयंपूर्ण आहे आणि त्या त्या भाषांत विपुल वाङ्मय निरन झालेले आहे. हे सर्व वैभव जपावे वाढवावे याच उदात्त हेतूने स्वातंत्र्योत्तर काळात ‘भाषावार प्रांतरचना’ स्वीकारण्यात आली. त्यामुळे आज भारताची राष्ट्रभाषा हिंदी असली त्रारीही, प्रत्येक राज्यभाषा वेगळी आहे. त्यामुळे त्या त्या भाषेचा विकास त्या त्या राज्यात होत असतो.


            असे म्हटले जाते की, दर बारा कोसांवर भाषा बदलते. भाषा बदलत नसते, तर बोलीभाषा बदलत असते. अशा शेकडो बोलीभाषा आपल्या देशात बोलल्या जातात. ते आपले-आपल्या भाषेचे वैभव आहे आणि आपण ते जपले पाहिजे. एक्सुरू भाषा सर्वत्र ऐकण्यापेक्षा या वेगळ्या बोलीभाषांचा वेगळेपणा फार आनंददायक असतो. आपल्या आवडत्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांतून अहिराणी ही खानदेशी बोलीभाषा आपल्याला कळते. आपण ज्या सणाला ‘पोळा’ म्हणून उल्लेखतो, त्या सणाला बहिनावाई ‘पोया’म्हणतात. वेगळी बोलीभाषा आली म्हणून या कवितेतील भावार्थ कुठेही खटकत नाही, टीची गोडी कमी होत नाही.


            कवी बा.भ.बोरकर यांनी मराठीत एकाहून एक सुंदर कविता लिहिल्या आहेत. त्याच बोरकरांनी त्यांच्या गोव्याच्या कोकणी बोलीतही सुंदर गीते रचली. स्वतः बा.भ. बोरकर या कोकणी बोलीतील गीते गात असत आणि स्वतःला व इतरांना मनमुराद आनंद देत असत.


            मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी बोलीमध्ये असणाऱ्या अनेक नाटकांचे सदरीकरण केले. मालवणी बोली येत नसलेल्या प्रेक्षकांना सुद्धा ती नाटके हसवत आणि आनंद देत. एकाच कोकणात कितीतरी वेगवेगळ्या बोली भाषा बोलल्या जातात. वर पश्चिम महाराष्ट्रात गेलात तर कोल्हापूरमध्ये बोलली जाणारी भाषा वेगळीच, सोलापुरातील वेगळी, नागपुरी मराठी वेगळी; इतकेच नाही, तर आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आदिवासीपाड्यांवर वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. या बोलीभाषांतून लिखित साहित्य नसेल, पण त्यांत मौखिक रचना विपुल आहेत. या सर्व भास्न्त खूप कथा, गोष्टी आणि कविता, गाणी रचली गेली आहेत. हा आपला फार मोठा अमोल ठेवा आहे. पिढ्यानपिढ्या हे मौखिक वाङ्मय आपण जपले आहे. आपण प्रयत्नपूर्वक बोलीभाशांतील हे वैभव मराठी सारस्वतांच्या नगरीत आणले पाहिजे, त्यामुळे आपली मायबोली मराठी समृद्ध होईल.


            अनेकजण प्रमाणभाषा श्रेष्ठ व बोलीभाषा कनिष्ठ असे मानतात. अगदी सामान्य माणसेही बोलीभाषेला अशुद्ध भाषा मानतात. हा दृष्टीकोन पूर्णपणे चुकीचा आहे. खरे तर सर्वच भाषा या बोलीच होत. होते काय की, जो समाजगट राजकीय सामाजिक व सांस्कृतिक दृष्टींनी वरचढ बनतो, त्याच्या भाषेला महत्व मिळते. इतर समाजगट त्याच्या भाषेचे अनुकरण करतात. त्या समाजगटाचे सामर्थ्य पाठीमागे असल्यामुळे समाजातील बहुतांश व्यवहार त्या भाषेत होऊ लागतात. बहुसंख्यांना जोडणारी ती भाषा बनते. म्हणूल तिला प्रमाणभाषा हे स्थान मिळते. परंतु अनेक समाजगट जेव्हा त्या भाषेत व्यवहार करू लागतात, तेव्हा भाषांच्या विविध छटा त्या भाषेत अवतरतात व त्या भाषेला समृद्ध करतात. म्हणून बोलीभाषेच्या वैभवाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. 


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

  • भारतातील भाषांची विविधता
  • ती जपण्यासाठी भाषावार प्रांतरचना
  • एकाच भाषेत अनेक बोली आहेत
  • बहिणाबाई यांच्या रचना अहिराणी बोलीत
  • बा.भ. यांच्या कोकणी बोलीतील कविता
  • मच्छिंद्र कांबळी यांची मालवणी बोलीतील नाटके
  • विविध बोलींतील कथा, कविता
  • अनमोल ठेवा
  • आदिवासीपाड्यांतील बोलीभाषा.]

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • बोलीभाषांचे वैभव
  • महाराष्ट्रातील बोलीभाषांचे वैभव
  • Bolibhashanche vaibhav
  • Maharashtratil bolibhashanche vaibhav
  • Bolibhasha


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏



  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा निबंध तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.