सावित्रीबाई फुले
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
➤जन्म: ३ जानेवारी १८३१
➤जन्मठिकाण: नायगाव, जि. सातारा.
➤कौटुंबिक पार्श्वभूमी:
➤वडील : खंडूजी नेवसे पाटील
➤विवाह:
- १८४० मध्ये सावित्रीबाई यांचा जन्म जोतिराव फुले यांच्याशी झाला.
➤शिक्षण:
- १८४१ मध्ये जोतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण देण्यास सुरुवात केली.
- अहमदनगर येथील फरार बाईंच्या व पुण्यात मिचेल बाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये सवित्रीबाईनी अध्यापनाचे शिक्षण घेतले.
➤ठळक कार्य:
- गोविंदराव फुले यांचा सवित्रीबाई यांच्या शिक्षणाला विरोध असल्याने त्यंनी सवित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले यांना घराबाहेर काढले.
- सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले यांनी ३ जुलै १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. या शाळेतूनच अध्यापनाचे काम सुरु केले. सवित्रीबाई पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या.
- मुलींची शाळा सुरु केल्यावर सनातन्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सवित्रीबाई अध्यापनाचे कार्य करीत असल्यामुळे त्यांना नानाप्रकारे त्रास झाला. पं तरीही तो त्रास शान करत त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरूच ठेवले.
- विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाहीकाना संघटीत करण्याचे काम दीनबंधू चे संपादक ना.म. लोखंडे यांनी केले, यामागे सवित्रीबाई फुले यांची प्रेरणा होती.
- जोतिराव फुले यांनी धनकवडी भागात व्हिक्टोरिया बालिकाश्रम सुरु केला. येथे स्वयंपाकाचे काम सवित्रीबाई स्वतः करत असत.
- सवित्रीबाई यांनी सत्यशोधक समाजातर्फे अन्नछत्र चालवण्याचे काम केले.
- सत्यशोधक समाजचे कामही जोतिरावांच्या बरोबरीने सवित्रीबाईनी पुढे नेले. सावित्रीबाईंची मैत्रीण बजूबाई ग्यानोबा निंबणकर यांची कन्या राधा व सीताराम अल्हाट यांचा सत्यशोधक पद्धतीने १८७३ मध्ये विवाह लावला. या विवाहाचा खर्च सवित्रीबाई फुले यांनी केला.
- जोतिराव आणि सवित्रीबाईफुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले.
- २८ नोव्हेंबर १८९० तोजी जोतिरावांचे निधन झाले. अंतयात्रेच्या वेळी टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळतो, म्हणून त्यांच्या पुतण्यांनी यशवंतला विरोध केला. त्यावेळी सवित्रीबाई यांनी धैर्याने पुढे येऊन स्वतः टीटवे धरले आणि स्वतः जोतीरावांनी अग्नी दिला.
- सत्यशोधक समाजाची परिषद १८९३ मध्ये सासवड येथे झाली. या परिषदेच्या सवित्रीबाई अध्यक्ष होत्या.
- ३ जानेवारी हा त्यांच्या जन्मदिवस महाराष्ट्र सरकार ‘बालिका दिन’ म्हणून साजरा करते.
- पुणे विद्यापीठाचा नामविस्तार ‘सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा करण्यात आला आहे.
➤सावित्रीबाई यांचे लेखन:
- काव्यफुले (कविता संग्रह) १८५४
- जोतिबांची भाषणे (संपादक) – सा. फुले १८५६
- सावित्रीबाईंची जोतिबांस पत्रे
- मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे (संपादित)
- बावनकशी सुबोध रत्नाकर (१८५२)
➤मृत्यू:
- इ.स. १८९६ च्या दुष्काळात त्यांनी दुष्काळग्रस्त लोकांना मदत केली होती.
- इ.स. १८९७ च्या प्लेगचा आजार त्यांना होऊन त्यांचे निधन झाले.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
- माहिती आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध किंवा माहिती हवी असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
धन्यवाद