BUY PROJECT PDF Click Here!

मी वर्ग बोलत आहे. | Mi varg bolat aahe.

मी वर्ग बोलत आहे.
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 मी वर्ग बोलत आहे.

        

मी वर्ग बोलत आहे. | Mi varg bolat aahe.

 मी वर्ग बोलत आहे. | Mi varg bolat aahe.


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


        मी आज खूप वर्षांनंतर गावात येत होतो. गावात येताच  सगळे बालपण झरझर माझ्या डोळ्यांसमोरून सरकत गेले. मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले रम्य क्षण माझ्या मनात बागडू लागले. मी जुन्या आठवणीतला एक – एक क्षण गोळा करू लागलो. आमची शाळा जवळ येताच मी थांबलो आणि डोळे भरून शाळा पाहू लागलो. मंद पावलांनी मी शाळेत शिरलो आणि आमच्या जुन्या वर्गात गेलो. मी वर्गात पाउल टाकताच हर्षाची उल्हासाची सळसळ माझ्या कानांना स्पर्शून गेली. मी चमकून पहिले तर मला वर्गात कोणीच दिसले नाही. मी महिन्याची सुट्टी चालू होती. मग आवाज? मी बारकाईने पहिले. सर्व वर्गच हर्षोतफुल चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होता. होय, हा वर्गाचाच आवाज होता तो काही क्षणातच वर्ग माझ्याशी बोलू लागला.


        काय रे, किती मोठा झालास तू. तुला पाहून खूप आनंद झाला. तुझ्या वेळचे दिवस जसेच्या तसे दिसू लागले बघ! माझ्या निर्मितीनंतर तुम्हीच माझ्यामध्ये बसून शिक्षण घेणारे पहिले विद्यार्थी होतात. माझे नवे-कोरे रूप पाहून तुम्हाला केवढा आनंद झाला होता ! तुम्ही हसत – खिदळत दरवाज्यातून आत आला होतात. मोक्याचीजागा पकडण्यासाठी केवढी धडपड चालली होती तुमची."


        मला अजूनही आठवतात ते दिवस! तुम्ही सकाळी लवकर येऊन माझी साफ-सफाई करायचात. माझा फळा स्वच्छ पुसून त्यावर सुंदर अक्षरांत वार, सुविचार आणि वर्गातील मुलांचा पट लिहायचात. तुमच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होत असे. दुपारची जेवणाची सुट्टी झाली की तुम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र बसून डबा खाता खाता गप्पागोष्टी करायचात तुअच्या सगळ्या गप्पा ऐकल्यात बर का मी! आता पण तुम्ही त्या मोठ्या शाळेत सार्वजन मिळून डबा खाता का रे ? तुमच्या सर्वआठवणी मी जपून ठेवल्या आहेत. शाळेत जेव्हा कोणत्या थोर व्यक्तीची जयंती साजरी केली जायची त्या दिवशी तुम्ही माझी सजावट करून माझे रूपच बदलून ताकायाचात. तुमच्या भाषणांतून थोर व्यक्तींचे विचार ऐकून मी धन्य व्हायचो.


        खरी मज्जा तर पि.टी. च्या तासाला यायची तुम्ही विविध खेळ खेळायचात कधी मैदानात तर कधीकधी आतमध्ये बसून बैठे खेळ चालायचे तुमचे . मैदानात खेळत असताना वर्गातील कोणालाही दुखापत झाली तरी तुम्ही सार्वजन मिळून त्याची काळजी घ्याचात. त्या वेळी तुमाच्यामधली एकजूट पाहून मी देखील प्रसन्न होऊन जायचो.


        तुमचे या शाळेतील प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आणि तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी दूर शहरातल्या शाळेमध्ये निघून गेलात. आजही आठवतो तो क्षण ज्या दिवशी माझा आणि या शाळेचा तुम्ही निरोप घेतलात. शाळेचा निरोप घेताना तुम्ही खूप रडला होतात. तुम्हाला निरोप देताना माझेही अश्रू अनावर झाले होते. पण हे एक ना एक दिवस होणारच होते. तुमचे पुढचे शिक्षण खूप महत्वाचे होते. तुम्ही गेल्यानंतर सारा परिसर सुन्न वाटत होता. तुमच्या त्या हसण्या-बागडण्याची मला खूप आठवण येत होती.


        तुमच्यानंतर अनेक विद्यार्थी येथे आले त्यांनी सुद्धा येथील प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी शहरातल्या शाळेमध्ये निघून गेले. कित्येक वर्षे लोटली हळूहळू या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. पूर्वी मी भरलेला असायचो आत्ता माझ्या निम्म्या भागात राहतील एवढेच विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतात. याचे कारण म्हणजे इंग्लिश मिडीअम च्या शाळा. आपल्या मुलाने इंग्रजीतून शिक्षण घ्यावे म्हणून पालकांचा हट्ट असतो. त्यासाठी ते हजारो रुपये सुद्धा खर्च करायला तयार असतात. परंतु मातृभाषेतून शिक्षण घेतले तरच विद्यार्थ्यांना ते चांगले आत्मसात करता येते. इंग्रजीतून शिकून मुलांच्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यांना अभ्यासाचे ओझे वाटू लागते आणि ते अभ्यास करायचा कंटाळा करतात. परिणामी परीक्षेत गुण कमी मिळतात. आपल्या मुलाचे कमी गुण पाहून पालक आपल्या मुलांना शिकवणीचे ज्यादा क्लास लावतात. शाळेचा अभ्यासम क्लास चा अभ्यास करता करता मुलं फार थकून जातात त्यांना खेळायला, मौज-मज्जा करायला वेळच मिळत नाही. पालकांना हे कधी कळणार.


        अरे बाळा, तुला एक विनंती करतो. तू आणि तुझ्या वर्गातले सर्व विद्यार्थी मिळून माझे एक काम करा. विद्यार्थांनी मातृभाषेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे. याचा प्रसार करा. मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा प्रसार करा. मातृभाषेतून शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे हे विद्यार्थांच्या पालकांना पटवून द्या. आणि विद्यार्थांचे उज्ज्वल भविष्य घडवायला मदत करा. जर अशाच प्रकारे मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत राहिली तर एक दिवस ही शाळा बंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग येथील मुलांना दूरवरच्या शाळेत शिक्षण घ्यायला जावे लागेल. मला ही शाळा पूर्वीसारखी मुलांनी भरालेली पहायची आहे. मला पुन्हा जुने दिवस अनुभवायचे आहेत. ही एक माझी इच्छा पूर्ण केलीस तर मी धन्य होईन.

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

प्रस्तावना

शाळेची भेट होण्याचा प्रसंग

शाळेच्या दर्शनाने बालपण जागे

वर्ग सुद्धा चैतन्यपूर्ण बनणे

वर्गाशी जोडलेले नाते

नेहमीच्या मित्रमैत्रिणी

एखादी आठवण

मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा कमी होत चाललेला कल ही खंत

एक इच्छा

समारोप.]

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 

  • वर्गाचे मनोगत
  • वर्गाचे आत्मवृत्त
  • मी वर्ग बोलतोय.....मराठी निबंध
  • Vargache manogat
  • Vargache aatmavrutt
  • Mi varg boltoy… marathi nibandh

 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

  ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.