एका वृद्ध नोकराची आत्मकथा | Ek vrudha nokarachi aatmakatha

एका वृद्ध नोकराची आत्मकथा एका नोकराची आत्मकथा नोकराची आत्मकथा मी नोकर बोलत आहे नोकराचे मनोगत Mi nokar bolat aahe Nokarache manogat Ek vrudha no
Admin

 

एका वृद्ध नोकराची आत्मकथा


एका वृद्ध नोकराची आत्मकथा | Ek vrudha nokarachi aatmakatha
एका वृद्ध नोकराची आत्मकथा | Ek vrudha nokarachi aatmakatha


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


        मी या घरातला खूप जुना नोकर आहे. मी माझ्या जीवनाची सुमारे ४० वर्षे या ठिकाणी काम करून व्यथित केली. आणि आज माझे म्हातारपण सुद्धा या ठिकाणीच व्यतीत होत आहे. चला तर मग आज मी तुम्हाला माझ्या जीवनाची जीवनकहाणी सांगतो. तुम्ही माझ्या या परिस्थितीवर दोन आसवे गाळली नाहीत तरी चालतील पण माझ्या जीवनाची ही जीवनकहाणी ऐकून घ्या.


        मी लहान असतानाच माझ्या आईचे निधन झाले. आई सोडून गेल्याने माझे वडील दारू पिऊन दारूच्या नशेत राहू लागले. त्यांच्या या दारुनेच माझ्या जीवनात विष कालवले होते. माझे वडील त्यांची काही कमाई दारूसाठी खर्च करायचे आणि उरलेले काही पैसे सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी खर्च होत असत. त्यामुळे मला लहान असल्यापासूनच नोकरी करणे भाग पडले होते. आयुष्यातील प्रत्येक वळणावर हालअपेष्टा सहन करून मी या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहे. मला काही कळलेच नाही की माझे बालपण कधी संपले आणि कधी माझे वय झाले. कायम कामाच्या ओझ्याखाली जगत होतो, परंतु या घरातील मालकिणीने मला इतके प्रेम दिले की जसे माझी आईच मला पुन्हा मिळाली.


        एके दिवशी घरात काम करणाऱ्या दुसऱ्या नोकराने मालकांच्या खिशातील पाचशे रुपये चोरले होते आणि त्या चोरीचा आळ माझ्यावर घेतला गेला होता. मालकांनी मला दम देऊन घराच्या बाहेर काढले. पण आमच्या मालकीणीला माझ्या प्रामाणिक पणावर पूर्णपणे विश्वास होता. त्यांनी खऱ्या चोराला शोधून काढले. आमच्या मालकांचा माझ्यावरचा संशय दूर झाला आणि त्यांनी मला सन्मानाने पुन्हा या घरात आणले. तेव्हापासून माझे जीवन या परिवारामध्ये इतके मिसळून गेले आहे की मी ही नोकरी सोडून दुसरीकडे जाऊच शकत नाही. इतके या घराशी माझे घट्ट नाते जोडले गेले आहे.


        मी खूप वर्षांपासून या घरातील सारे काम करत आलो आहे. मी जेवण बनवतो, या घरातील लहान मुलांना भरवतो. वेळ आल्यावर चप्पल साफ करणे किंवा लहान मुलांचा मैला साफ करण्यासाठी सुद्धा मी कधी नाही नाही म्हणत. समोर पडेल ते काम मी करतो. घरातील मोठ्या साहेबांच्या लहान मुलीच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य  पाहून मी माझे सारे दुखः विसरून जातो. आत्ता माझ्या शरीरामध्ये पहिल्यासारखी ताकत राहिली नाही, तरीही मी माझी सारी कामे आनंदाने पार पाडतो. माझ्या कामाने माझे मालक संतुष्ट आहेत. कधी माझ्या हातून काही चुकून चूक घडली तर ते मला काही बोलत नाहीत. माझी चूक समजावून सांगतात.


        खरंच, मी प्रामाणिकपणे या घराची सेवा केली आहे. या परिवारामध्ये मी अनेक उन्हाळे पावसाळे बघितले. जेव्हा मोठे मालक आणि मालकीण बद्रीनाथ च्या यात्रेला जात असताना त्यांचा अपघात झाला होता. तेव्हा देखील मी त्यांची खूप सेवा केली होती.


        आज आमच्या छोट्या मालकांमुळे आमच्या घरात लक्ष्मीने प्रवेश केला आहे. आज त्यांच्या कृपेमुळे माझा मोठा मुलगा कॉलेज चे शिक्षण घेत आहे. मला माझ्या जीवनाबाबत काहीही तक्रार नाही. बस, पण एकच इच्छा आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मालकांची सेवा करत राहावे. त्यांच्या सेवेतच माझ्या जीवनाची जवानी संपली आहे आणि हे माझ्या आयुष्याचे शेवटचे क्षण सुद्धा त्यंच्याच सेवेमध्ये सार्थक व्हावेत.


 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:                                                  

प्रस्तावना

बालपण आणि नोकरी

एक विशेष प्रसंग

मालकांची सेवा

जीवनातील काही अनुभव

शेवटचे जीवन

समारोप.]

 


 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

  • एका वृद्ध नोकराची आत्मकथा
  • एका नोकराची आत्मकथा
  • नोकराची आत्मकथा
  • मी नोकर बोलत आहे
  • नोकराचे मनोगत
  • Mi nokar bolat aahe
  • Nokarache manogat
  • Ek vrudha nokarahe manogat
  • Eka nokarachi aatmakatha
  • Nokarachi aatmakatha.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


धन्यवाद

E3



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.