समुद्र आटला तर.. | Samudra aatala tar...

समुद्र आटला तर.. जर समुद्र आटला... समुद्राचे पाणी आटले तर... Samudra aatala tar Jar samudra aatala Samudra sukala tar Samudrache pani aatale tar
Admin

 

समुद्र आटला तर...


समुद्र आटला तर.. | Samudra aatala tar...

समुद्र आटला तर.. | Samudra aatala tar...


 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊


        रविवारी सुट्टी असल्याने मी माझ्या मित्रांसोबत समुद्रकिनार्यावर फिरायला गेलो. अथांग समुद्र आणि फेसाळणाऱ्या लता पाहून मनाला शांतता मिळत होती. समुद्राच्या त्या लता मी पायावर घेण्यासाठी  मी किणाऱ्यावर वाळूत काही वेळ उभा राहिले. फेसाळणाऱ्या लता माझ्या पायांना स्पर्श करून जात होत्या आणि पुन्हा जाताना माझ्या पायाखालची वाळू घेऊन जात होत्या. मी काही वेळ तेथेच उभा होतो थोड्या वेळानंतर असे लक्षात आले की लता माझ्या पासून दूर दूर जात होत्या. आत्ता त्यांचा माझ्या पायांना स्पर्श होत नव्हता समुद्राचे पाणीच जणू मागेमागे चालले होते. ही ओहोटीची वेळ होती. होय, होय ओहोटीच. पाण्याच्या लता आत्ता माझ्यापासून खूप दूर दूर थांबत होत्या आणि पुन्हा मागे जात होत्या. कमालच झाली!


        माझ्या मनात विचार आला की, हे पाणी असेच मागे मागे जात राहिले तर..? तर काय होईल? हा समुद्रच एक दिवस आटून गेला तर... पाणी अजिबातच उरणार नाही. आणि समुद्राच्या तळाची कधीही न  पाहिलेली जमीन आपल्याला पाहता येईल! अहाहा!


        समुद्र आटला तर समुद्राच्या तळाशी असणारे सौंदर्य सर्वाना पाहता येईल! शंख, शिंपले, मोती जमिनीवर विखुरलेले दिसतील! हिरे, मोती जमवता जमवता पार थकून जायला होईल. मला तर वाटते, की हे मोती, रत्ने मिळवायला हजारो लोकांची गर्दी होईल. आणि सारी माणसे एका क्षणातच श्रीमंत होऊन जातील.


        मी त्या कल्पनाविश्वात पार रमून गेलो. समुद्राखाली असणारी मोठी मोठी भुयारे, डोंगर, दऱ्या विविध रंगांचे खडक, वनस्पती आणि अगणित जलचर! केवढे ते अद्भुत जग! अवाढव्य असणाऱ्या देवमाशाला स्पर्श करून पाहता येईल! माणसाला शेतीसाठी, उद्योगधंद्या साठी, घरे रस्ते बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणवर जमीन उपलब्ध होईल आणि इतरही अगणित फायदे माणसाला होतील.


        अचानक माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. समुद्र आटला तर सारे जलचर मृत्युमुखी पडतील. त्यांच्या मृत अवशेषांचा सगळीकडे खच पडेल. ते कुजल्याने सगळीकडे मोठ्या प्रमाणवर दुर्गंधी पसरेल. त्यांच्या कुज्ण्याने वेगवेगळे सूक्ष्मजंतू निर्माण होतील आणि विविध आजारांची त्यांपासून निर्मिती होईल. आणि सगळीकडे मृत्यूचे तांडव सुरु होऊन हाहाकार माजेल.


        आणखीही खूप भीषण परिणाम दिसून येतील. सामाजिक उलथापालथ घडून येतील. मोठ मोठी जहाजे, होड्या, मासे पकडण्याची जाली तयार करणाऱ्या लोकांचे व्यवसाय नष्ट होतील आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. मासे नष्ट झाल्याने मांसाहारी लोकांचे हाल होतील सारे लोक शाकाहारा कडे वळतील मग एवढ्या साऱ्या लोकांना अन्नधान्य पुरवणे कठीण होऊ लागेल आणि अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ लागेल. पर्यायाने साऱ्यांवर उपासमारीची पाळी येईल. आपापसांत भांडणे, दंगली सुरु होतील आणि सगळीकडे विनाश सुरु होईल.


        समुद्रातील सारे पाणी आटून गेल्याने पाण्याची वाफ होऊन तिचे ढग तयार होणार नाहीत. सारे जलचक्र थांबेल नद्या सुकून जातील. नदीनाले आटातील. वनस्पती सुकून जातील प्राणी व माणसे अन्नासाठी आणि पाण्यासाठी तडफडून तडफडून मृत्युमुखी पडतील. सारी जीवसृष्टी धोक्यात येईल. सगळीकडे नुसता रखरखाट दिसेल. बाप रे !


        पाऊस नाही, पाणी नाही, नद्यानाले नाहीत. धबधबे नाहीत, म्हणून पाऊस पाण्याचे सुखसौंदर्य नष्ट झालेले असेल. एकही वनस्पती नसेल की पशु – पक्षी नसेल. खरे तर जीवनच नसेल. असेल फक्त रुक्ष, तप्त, रखरखीत जमीन आणि हवा! समुद्र आटला तर या वसुंधरेचे मनमोहक रूप नसेल. असेल फक्त आरिष्टांचे साम्राज्य!


  🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे: 

समुद्रावरील ओहोटीचे दर्शन

समुद्र आटण्याची कल्पना

दामुद्रखालील जमीन

मोती, हिरे, शंख, शिंपले

समुद्राखालचे आश्चर्यकारक विश्व डोळ्यांसमोर प्रकट

समुद्र आतला तर विपरीत परिणाम होण्याची कल्पना

जीवसृष्टीला धोका

शुष्क रखरखीत सृष्टी

समुद्र आटला तर फक्त विनाशच

समारोप]

 

  🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

  • समुद्र आटला तर..
  • जर समुद्र आटला...
  • समुद्राचे पाणी आटले तर...
  • Samudra aatala tar
  • Jar samudra aatala
  • Samudra sukala tar
  • Samudrache pani aatale tar  

 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

  🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊


धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.