एका जादुगाराची आत्मकथा | Eka jadugarachi aatmakatha

एका जादुगाराची आत्मकथा एका जादुगाराचे मनोगत एका जादुगाराची जीवन कहाणी Eka jadugarachi aatmakatha Eka jadugarache manogat Eka jadugarachi ji
Admin

 

एका जादुगाराची आत्मकथा


एका जादुगाराची आत्मकथा | Eka jadugarachi aatmakatha
एका जादुगाराची आत्मकथा | Eka jadugarachi aatmakatha 


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


        जादुगारीच्या क्षेत्रामध्ये मी खूप मोठे नाव कमावले आहे. या माझ्या जादुगारीच्या पेशाने मला खूप पैसेही मिळाले आज मी तुमच्यासमोर माझ्या जीवनाची जीवनकहाणी सांगतो.


        आपल्याकडे एक म्हण आहे की, ‘बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात.’ मला लहानपणापासूनच जादूचे खूप आकर्षण होते. रस्त्याने जात असताना एखाद्या जादुगाराचा खेळ चालू असेल तर माझे पाय चालता चालता आपोआप थांबायचे. पूर्ण खेळ बघून झाल्याशिवाय मी तिथून हलायचो नाही. या माझ्या छंदामुळे मला घरामध्ये खूप वेळा ओरडा खायला लागत असे. माझ्या छंदापायी मी सारे निमुटपणे ऐकून घेत असे.


        माझ्या वडिलांचे एक मित्र होते. त्यांना जादूचे काही छोटे- मोठे खेळ करता यायचे. मी त्यांच्याकडून पत्यांच्या पानाचे काही खेळ शिकून घेतले. त्यांनीच मला हातात असलेले अंडे कसे गायब करायचे हे सुद्धा शिकविले होते. शिकून घेतल्यानंतर मी खूप अगदी सहजपणे हे खेळ करून दाखवू लागलो. माझी कला पाहून लोक दंग होऊन जात असत. ते मला छोटा जादुगार म्हणू लागले. पण, मला तर एक महान जादुगार बनायचे होते.


        मोठेपणी मी अनेक उस्तादांकडून जादूचे खेळ शिकून घेतले. हळू हळू मोठ मोठ्या शहरांमध्ये माझे जादूचे कार्यक्रम होऊ लागले. बघायला येणारे लोक माझे खेळ बघून ‘वाह वाह’ करत असत. मी एका पोत्यामध्ये बंद असलेल्या मुलाला गायब करायचो. रिकाम्या डब्यामधून लोकांना कबुतर काढून दाखवायचो. हॉल मध्ये बसलेल्या लोकांच्या मनगटावर असलेल्या घडाळ्यातील काटे थांबवून दाखवत असे. दहा रुपयाच्या नोटीला मी शंभर रुपयामध्ये बदलून दाखत असे. प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी हे एवढे जादूचे चमत्कारच बस होत असत. काहीच वर्षांमध्ये माझ्या नावाची देश – विदेशात प्रसिद्धी होऊ लागली. आणि मी खूप प्रसिद्ध झालो.


        मी ३५ ते ३६ वर्षे देशात तसेच विदेशांत जाऊन जादूचे खेळ दाखवले. जादुगारीच्या दुनियेवर जणू मी एकछत्री राज्य केले होते. आत्ता मी म्हातारा झालो आहे. आत्ता माझे हात थरथरू लागले आहेत. यामुळे मी लोकांना जादुचे खेळ दाखवणे बंद केले आहे. आत्ता माझा लहान मुलगा जादूचे खेळ करतो. तो एक प्रसिद्ध जादुगार बनला आहे. आत्ता मी एक जादूचे खेळ शिकवणारे विद्यालय सुरु केले आहे. तेथे अनेक विद्यार्थी जादूचे खेळ शिकायला येतात आणि त्यामध्ये तरबेज होऊनच जातात.


        मला पक्की खात्री आहे की माझ्याकडे यापुढे सुद्धा येणारे विद्यार्थी एक दिवस महान जादुगार नक्कीच बनतील. बस, एवढीच माझ्या जीवनाची जीवनकहाणी आहे! तुम्ही माझ्या जीवनाची जीवनकहाणी ऐकून घेतलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

 

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇


[मुद्दे:

स्वतःची जीवन कहाणी सांगण्याची इच्छा

लहानपणापासूनच जादुगार बनण्याचे स्वप्न

जादूचे खेळ शिकून घेणे

जादुगारीच्या दुनियेत स्वतःचे नाव कमावणे त्याचबरोबर पैसा कमावणे

जीवनाच्या उतरत्या वयात जादूचे शिक्षण देणे

शेवटची इच्छा

समारोप.]


 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

  •  एका जादुगाराची आत्मकथा 
  • एका जादुगाराचे मनोगत 
  • एका जादुगाराची जीवन कहाणी 
  • Eka jadugarachi aatmakatha 
  • Eka jadugarache manogat 
  • Eka jadugarachi jivan kahani 
  • Marathi nibandh 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

 

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.