BUY PROJECT PDF Click Here!

मला आवडलेले पुस्तक | Mala aavadalele pustak

माझा छंद – वाचन मला आवडलेले पुस्तक माझे आवडते पुस्तक मला आवडलेले पुस्तक निबंध मराठी मराठी निबंध Mala aavadalele pustak Maze aavadate pustak Mala aavad
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

मला आवडलेले पुस्तक


मला आवडलेले पुस्तक | Mala aavadalele pustak

मला आवडलेले पुस्तक | Mala aavadalele pustak 


📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙


        खरे पाहता मला पुस्तके वाचनाचा छंद अगदी लहानपणापासूनच आहे. त्यामुळे अगदी अकरावी-बारावीत असतानाही मी अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तकेही वाचत असतो. मला अभ्यासाचा कंटाळा आला की हमखास इतर पुस्तकेच वाचत बसतो. असे वाचन करता करता एखादे पुस्तक असे मिळते की, ते हातात आल्यावर पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवताच येत नाही. असे एक पुस्तक वाचता वाचता माझ्या हाती आले. ते पुस्तक वाचायला लागल्यावर मी झपाटून गेलो आणि पुसत वाचून संपल्यावरही मी भारावलेल्या स्थितीतच राहिलो.


        मी पुस्तके वाचताना भेदभाव करत नाही. सर्व प्रकारची पुस्तके वाचतो; पण त्यातील मला विशेष वाचायला आवडतात ती आत्मवृत्ते आणि चरित्रे. मला आवडलेले पुस्तक हे लेखक, संपादक उत्तम कांबळे याचे आत्मचरित्रच होते. त्याचे नाव आहे ‘वत तुडवताना.’ ही वाट आहे त्यांच्या खडतर जीवनाची. किती अवघड, वळणे, किती अडचणी, किती विपरीत संकटे पार करीत लेखक आजच्या स्थानावर येऊन पोहचला, हे आपल्याला या पुस्तकातून समजते.


        पुस्तक उघडल्यावर पहिले लक्ष वेधून घेतले ते पुस्तकाच्या ‘अर्पण – पत्रिकेने’ लेखकाने हे पुस्तक अर्पण केले आहे ‘असंख्य ग्रंथाना’. कारण ग्रंथ माणसांना घडवतातच, असा लेखकाचा ठाम विश्वास आहे. मला हे पुस्तक आवडले, त्याचे आणखी एक कारण आहे की, हा लेखकही लहानपणापासूनच पुस्तकवेडा आहे. लहानपणापासूनच त्याल पुस्तकाच्या दुकानाचे आकर्षण वाटत आले आहे. चार आण्यांचे पुस्तक मिळावे, म्हणून तो वाट्टेल ते कष्ट करायला तयार आहे.


        कष्ट हे तर त्याच्या पाचवीलाच पुजले होते, शिक्षण घेण्यासाठी उत्तम कांबळे यांनी घेतलेल्या कष्टांची गणतीच करता येणार नाही. या शिक्षणाच्या वाटेवर त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहिली ती त्यांची आईच. अविचारी वडिलांमुळे त्यांना बहुतेक कल आपल्या आजोळीच काढावा लागला होता. तेथे मात्र आजोबा आणि त्यांच्या मावश्या यांच्याकडून त्यांना सतत प्रेरणा आणि प्रेमच मिळाले. या त्यांच्या अध्ययनाच्या वाटेवर त्यांची जातही अनेकदा आडवी आली. जातीयतेच्या अन्याय्य प्रथांमुळे त्यांना शिक्षकांकडून मारही खावा लागला होता आणि अनेकदा ण सुटणारे प्रश्नही त्यांच्यासमोर उभे राहिले.


        वाचन आणि अविरत कष्ट यांच्या मदतीनेच उत्तम कांबळे संपादक झाले. त्यांच्याविषयीच्या आईच्या अपेक्षा, त्यासाठी ती घेत असलेले कष्ट त्यांना दीपस्तंभासारखे होते. म्हणूनच ते अनेक मोहांच्या क्षणी वाचले. लेखकाच्या या आत्मचरित्राला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्याच; शिवाय अनेक वाचकांनी लेखकाकडे अपेक्षा व्यक्त केली की, ‘तुमची आई आम्हांला अधिक जाणून घ्यायची आहे. ‘मग लेखकाने दुसरे पुस्तक लिहिले – ‘आई समजून घेताना!’ हे दुसरे पुस्तकही लोकप्रिय झाले आहे.


        आपल्या या पुस्तकात लेखक कांबळे म्हणतात, माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो, तर गावगाड्यातच राहिलो असतो. मला चार्वाक, बुद्ध, गांधी, आंबेडकर यांपैकी कोणीही दिसलं नसत.

 

📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

वाचनाचे भयंकर वेड

सर्व प्रकारची पुस्तके वाचतो

विशेष आवडतात ती चरित्रे, आत्मचरित्रे

उत्तम कांबळे यांच्या पुस्तकाने झपाटून टाकले

वाचनाच्या वेडाचा लेखकाला फायदा

अनंत अडचणींत आईने केलेली पाठराखण

पुस्तक वाचानाविषयीचे लेखकाचे मनोगत

समारोप.]


 📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

  • माझा छंद – वाचन
  • मला आवडलेले पुस्तक
  • माझे आवडते पुस्तक
  • मला आवडलेले पुस्तक निबंध मराठी
  • मराठी निबंध
  • Mala aavadalele pustak
  • Maze aavadate pustak
  • Mala aavadalele pustak nibandh Marathi
  • Marathi nibandh
  • Essay on my favourite book in marathi.
  • My favourite book essay


📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙


धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.