माझी महत्त्वाकांक्षा / मी कोण होणार? | Mazi mahatwakansksha.

माझी महत्त्वाकांक्षा / मी कोण होणार? माझी इच्छा डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न,Mi doctr honar Mazi echha, Doctor honyache maze swapn, Maze swapn
Admin

 

माझी महत्त्वाकांक्षा / मी कोण होणार?


माझी महत्त्वाकांक्षा / मी कोण होणार? | Mazi mahatwakansksha.

माझी महत्त्वाकांक्षा / मी कोण होणार? | Mazi mahatwakansksha.


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


        भविष्यात कोण होणार हे प्रत्येकानं लहान असतानाच ठरवणे गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे आपली वाटचाल करणे महत्वाचे आहे. भविष्याबाबत आताच विचार केला नाही तर तुमचे भविष्य अधिक चांगले होऊ शकणार नाही. भविष्यात मोठेपणी मी कोण होणार याचा विचार मी आत्ताच करून ठेवला आहे. हो खरच, मी मोठेपणी कोणत्या क्षेत्रामध्ये माझे करिअर करणार अथवा काम करणार हे मी निश्चित केले आहे. मोठेपणी डॉक्टरकीचे शिक्षण प्राप्त करून एक कुशल डॉक्टर बनण्याची माझी महत्वाकांक्षा आहे. डॉक्टर हा समाजाचा सर्वात मोठा सेवक असतो. एक डॉक्टर आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांना बरे करून एक नवीन जीवन देतो. माझी पण माझी महत्त्वाकांक्षा आहे, की मी डॉक्टर बनून माझ्या समाजाची आणि देशाची सेवा करावी. म्हणून मी डॉक्टर होण्याची महत्वकांक्षा उराशी बाळगली आहे

.

        आज आपल्या देशामध्ये मलेरिया, पोलिओ यांसारख्या रोगांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु दुसरे अनेक रोग उत्पन्न झाले आहेत. खोकला, ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या रोगांमुळे अनेक लोक अस्वस्थ आहेत. टायफॉईड, डायबेटीस आणि ब्लडप्रेशर यांसारख्या माणसाचे जीवन संपवून टाकणाऱ्या रोगांचा प्रसार वाढत चालला आहे. माझी इच्छा आहे की या रोगांमध्ये सापडलेल्या रोग्यांचा योग्य तो इलाज करून त्यांना बरे करून त्यांना रोगमुक्त करावे. असे करून मी डॉक्टर बनून जनसेवा करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त करेन.


        आज आमच्या गावामध्ये डॉक्टरांची खूप आवश्यकता आहे. आजचे नवीन डॉक्टर शक्यतो शहरामध्ये राहणे पसंत करतात, परंतु मला गावात राहून गरीब लोकांची सेवा करायची आहे. गावातला डॉक्टर बनण्यासाठी मला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. मी माझ्या उपचारांनी गावातल्या लोकांचे दुखः दूर करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या हॉस्पिटल मध्ये रडत, विव्हळत येणारे लोक हॉस्पिटल मधून परत घरी जात असताना हसत,खिदळत जातील. त्यांच्या त्या आनंदातच मला माझा आनंद सापडेल. दुसऱ्यांच्या आनंदातच आपला आनंद दडलेला असतो.


        आर्थिक दृष्टीने जर विचार केला तर डॉक्टर चा व्यवसाय हा फार लाभदायक आहे. पण फक्त पैसे कमावणे हे माझे ध्येय नाही तर डॉक्टर होऊन या समाजाचा आणि देशाचे ऋण फेडणे हे ध्येय आहे.  गावातल्या गरीब लोकांना ज्यांची उपचार घेण्याची परिस्थिती नाही अशा लोकांचे उपचार काही संथांच्या माध्यमातून वा सरकारच्या मदतीने मोफत अथवा कमी खर्चामध्ये उपचार मिळवून देण्याचा मी एक प्रयत्न करेन. मी हे कधीही नाही विसरणार की या डॉक्टर च्या व्यवसायामध्ये ज्यामध्ये धनलाभ तर होतोच पण त्याचबरोबर जनसेवा करण्याचा एक आनंद सुद्धा भेटतो. म्हणून मी एक आदर्श डॉक्टर बनून गावातल्या लोकांची सेवा करणे हे माझे प्रथम कर्तव्य समजेन.


        खरंच, डॉक्टर बनणे ही माझ्यासाठी एक गौरवाची व आनंदाची गोष्ट असेल.आणि त्यासाठी मी आतापासूनच तयारी देखील सुरु केली आहे. माझे प्रयत्न मी प्रामाणिक पणाने करीत आहे. काय माहिती जनसेवेद्वारा प्रभूसेवा करण्याची माझी ही आकांक्षा पूर्ण होईल?

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

व्यवसाय क्षेत्राची निवड

क्षेत्राच्या निवडीचे कारण

मी डॉक्टर होऊन काय करेन?

इतर कामे

आदर्श डॉक्टर

समारोप.]

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

  • माझी महत्वकांक्षा
  • मी मोठेपणी कोण होणार?
  • मी डॉक्टर होणार
  • माझी इच्छा
  • डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न
  • Maze swapn
  • Mazi mahatwakansksha.
  • Mi mothepani kon honar?
  • Mi doctr honar
  • Mazi echha
  • Doctor honyache maze swapn
  • Maze swapn

 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


धन्यवाद

1 comment

  1. Unknown
    Unknown
    Nice
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.