BUY PROJECT PDF Click Here!

ताणताणावांचे दुष्परिणाम | Taantanavanche dushparinam

ताणताणावांचे दुष्परिणाम ताणताणावांचे वाईट परिणाम ताणताणाव आणि आजची पिढी ताणताणाव आणि विद्यार्थी Taantanavanche dushparinam Tantanavache vait pari
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

ताणतणावांचे दुष्परिणाम


ताणताणावांचे दुष्परिणाम | Taantanavanche dushparinam

ताणताणावांचे दुष्परिणाम | Taantanavanche dushparinam


✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉

        ताणतणावांचे होणारे दुष्परिणाम मानवी जीवनाला कीती घातक असतात, हे मला त्या दिवशी कळले. मीच काय सारा गाव या घटनेने हादरून गेला होता. घटना अशी घडली की आमच्याच गावातल्या एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली होती! तीही गावाच्या मुख्य चौकात! आम्ही आमची शाळा सुताल्यान्न्त्र घरी निघालो होतो. रस्त्याच्या चौकाशेजारी आम्हांला लोकांची प्रचंड गर्दी दिसली. पोलिसांच्या तर ३-४ गाड्या आल्या होत्या. न्यूज चानेल वाल्यांच्या गाड्या येऊ लागल्या होत्या. कॅमेऱ्यांचे फ्लशिंग पडत होते. छायाचित्रे घेतली जात होती. लोकांच्या प्रतिक्रिया चित्रित केल्या जात होत्या. आम्हीसुद्धा त्या गर्दीत वाट काढत काढत घुसलो आणि आमच्या काळजाचा थरकाप उडाला. एका विद्यार्थ्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले होते त्याने आत्महत्या केली होती. तेथे जमेलेला प्रत्येकजण हळहळत होता. आत्महत्या करण्यामागील कारण काय? तर, वार्षिक परीक्षेत मिळालेले अपयश! त्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये ७०% गुणांची अपेक्षा होती, पण य्ताला मिळाले होते ४०%!


        किती भयानक घटना होती ती! केवळ एका परीक्षेमध्ये मिळालेल्या अपयशाने इतके खचून जावे? आपले जीवनच संपवावे? अगदी अलीकडेच बातमी आली होती की आयआयटी मधल्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातच आत्महत्या केली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या केलेल्या बातम्या आपण टेलीव्हिजन व वृत्तपत्रांमध्ये ऐकतच असतो. कधी विचार केलाय का, काय कारण असू शकेल या आत्महत्यांमागे? कोणते विचार येत असतील त्यांच्या मनात? माझे डोके अक्षरशः विचार करून दुखू लागले होते. मी जो विचार करत होतो तोच विचार माझ्या आजूबाजूला असणारे अनेक जण करत होते. आमच्या आजूबाजूला ही एकच चर्चा आम्हांला ऐकायला मिळत होती. वर्तमानपत्रे, टेलिव्हिजनवर, तसेच रेडीओ च्या माध्यमातून सुद्धा ही एकच चर्चा चालू होती. मानसोपचारतज्ज्ञ परोपरीने मार्गदर्शन करीत होते. सर्वांनी शेवटी एकच निष्कर्ष काढला तो म्हणजे- ताणताणाव!


        ताणताणाव हा आधुनिक जीवनाला मिळालेला एक शापच म्हणावा लागेल. पुराणकथांमध्ये असे सांगत की, एखाद्याने पाप केले किंवा एखादे कुकर्म केले तर देवाचा त्याला शाप लागतो.. मग मानवाने असे कोणते वाईट काम केले आहे, म्हणून त्याला हा ताणतणावासारखा शाप मिळाला आहे. माणसाचे कुकर्म हे की, त्याने निसर्गाची काळजी घेण्याचा मार्ग सोडला. त्याची सुखाची हाव इतकी वाढत गेली. त्याच्या गरजा वाढल्या. अधिकाधिक पैसा मिळवण्यासाठी तो धडपड करू लागला. कामाच्या तासांमध्ये वाढ झाली. रात्रीचा दिवस होऊ लागला. झोपही अपुरी होऊ लागली, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, स्वास्थ्य नाही त्यामुळे मन कायम अस्वस्थ. कशातही लक्ष लागेना. आनंदही घेता येईना. यामुळे मनावरचे ताण वाढू लागले. कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या गाठीभेटी कमी होत गेल्या. यामुळे ताणताणावांत भर पडू लागली. त्यातच मोबाईल इंटरनेट यांच्यामुळे प्रत्यक्ष भेटीची गरज संपली. आभासी जगात राहायची सवय माणसाला लागली. या सगल्याम्युले आताच्या माणसाचे मानसिक स्वास्थ बिघडले आणि खेळण्याची जागा ताणतणावाने घेतली.


        आमच्या विद्यार्थांच्या बाबतीमध्ये हेच घडत आहे. माझ्या स्वतःच्या अनुभावरून मी तुम्हांला सांगू शकतो. कॉलेज त्यानंतर क्लास घरी आल्यावर गृहपाठ, प्रकल्प या रामरगाड्यात माझा सारा दिवस कधी संपत असे काही कळायचे नाही. या बारावीच्या वर्षात तर मला एकही तास आनंदाने व शांतपणे घालवायला मिळाला नाही. माझ्या अनेक मित्रांवर याचे खूप वाईट परिणाम झाले आहेत. माझा मित्र अक्षय हा सतत राग, चिडचिड करीत असतो. त्याचे अभ्यासामध्ये कधीच लक्ष लागत नाही. कोणत्याही विषयाच्या अभ्यासात त्याला रस वाटत नाही. त्यामुळे त्याचा अभ्यासदेखील नीट झालेला नाही. राज नेहमी गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो. त्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर निट सापडत नाही. कायम कशाची ना कशाची काळजी करत असतो. त्यातूनच चूक होत असतात. या अपयशामुळे तो कधी कधी रडू देखील लागतो. थकवा येतो. छातीत धडधड वाढते. तो रसायनशास्त्राचा अभ्यास सुरु करतो. मध्येच तो बंद करून जीवशास्त्राचे पुस्तक घेऊन वाचायला लागतो. तेवढ्यात भौतिकशास्त्राचा अभ्यास अपुरा राहिलेला त्याला आठवते आणि मग तो सारे विषय बाजूला सारून भौतिकशास्त्राचा अभ्यास सुरु करतो. हे असे सर्वांचेच होते. ही सर्व ताणतणावाचीच लक्षणे आहेत.


        ताणतणावांचा दैनदिन जीवनावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम घडून येत असतो. डोकेदुखी, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे असे अनेक परिणाम दिसून येतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन अलर्जीक आजार किंवा संसर्गजन्य आजर यांना काहीजण बळी पडतात. मला जडलेला डोकेदुखी चा आजार हा डॉक्टरांच्या मते ताणताणावाचाच परिमाण आहे. या अस्वास्थ्यामुळे घरातल्या व्यक्तींवर चिडत राहणे व भ्न्दाने सुरु होते. माझे काही मित्र तर दारू व सिगारेट यांच्या आहारी कधी गेले त्याचं त्यांनाही कळले नाही. हे ताणताणाव केव्हातरी आपली सीमा पार करतात. काहीजण आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवून टाकतात. काहीजण हिंस्त्र बनून उद्वेगाने बारीकसारीक कारणांवरून दादागिरी करू लागतात.


        ताणतणावांचे हे भीषण परिणाम टाळायचे असतील , तर मोठ्या माणसांमध्ये प्रथम सुधारणा झाली पाहिजे. आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, असेच काहीतर होऊन मोठ्या प्रमाणवर पैसा ओढला पाहिजे, ही इच्छा सर्व पालकांनी सोडून दिली पाहिजे. जे काही करायचे आहे ते आमचे आम्हांला ठरवू द्या. आमच्या आवडीप्रमाणे आम्हांला अभ्यासक्रम निवडायला मिळाला पाहिजे. आईवडिलांच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर असताकामा नये. जर असे सार्वजन वागले तर विद्यार्थी आनंदाने अभ्यास करतील. आनंदाने स्वतःचे भविष्य घडवतील.


✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉

 

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

ताणतणावांचे परिणाम घडलेला प्रसंग

सर्वत्र ताणताणाव असल्याचे चित्र

ताणताणाव हा एक शापसुखाच्या मागे वेड्यागत धावणे

प्रत्यक्ष जगण्यापासून दूर

ताणताणाव निर्माण करणारी परिस्थिती

मोठ्यांप्रमाणे लहानांवरही परिणाम

जीवघेण्या स्पर्धेत मुलांना ढकलणे

दैनंदिन जीवनावर घातक परिणाम

ताणताणाव टाळण्यासाठी मुलांना त्यांच्या कलाने जीवन घडवण्याची संधी दिली पाहिजे.]


 ✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • ताणताणावांचे दुष्परिणाम
  • ताणताणावांचे वाईट परिणाम
  • ताणताणाव आणि आजची पिढी
  • ताणताणाव आणि विद्यार्थी
  • Taantanavanche dushparinam
  • Tantanavache vait parinam
  • Taantanav aani aajchi pidhi
  • Taantanav aani vidhyarthi

 ✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉

 

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.