BUY PROJECT PDF Click Here!

माझा आवडता छंद – वाचन | Maza aavadata chhand - vachan

माझा आवडता छंद माझा आवडता छंद वाचन माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी. वाचन एक उत्कृष्ट छंद Maza aavadata chhand vachan Maza aavadata chhand Maza aavadat
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

माझा आवडता छंद – वाचन




माझा आवडता छंद – वाचन | Maza aavadata chhand - vachan

माझा आवडता छंद – वाचन 




        आपल्या जीवनात आपण कोणता न कोणता छंद जोपासायला हवा. छंद आपल्याला या धकाधकीच्या जीवनात आपला क्षीण कमी करण्यास फार उपयुक्त ठरत असतात. कोणाला जुनी नाणी जमवण्याचा छंद असतो , कोणी सुंदर चित्रे रेखाटण्याच्या छंद उराशी बाळगतो तर कोणी विणकाम, शिवणकाम त्याचबरोबर नृत्य करणे, रांगोळी काढणे यांसारखे विविध छंद जोपासतात प्रत्येकाला त्याने जोपासलेल्या छंदातून त्याच्या मनाला उत्साह , आनंद मिळत असतो. त्याचा सगळा क्षीण, थकवा निघून जावून तो प्रफुल्लित होऊन जातो.


        प्रत्येकाचा छंद वेगवेगळा असतो. माझा आवडता छंद वाचन हा आहे. हा एक उपयुक्त आणि उत्तम प्रकारचा छंद आहे. आपण वाचनाचा छंद जोपासल्याने त्या छंदामुळे इतर कोणालाही कोणताच त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एवढेच नाही तर हा छंद जोपासायचा म्हटला तर त्यासासाठी येणारा खर्च सुद्धा फार काही नसतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिवाळी अंकांची छपाई केली जाते प्रत्येकाच्या घरोघरी आपल्याला हा दिवाळी अंक पहायला मिळतो. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळामध्ये तसेच काही विशेष दिवसांत पुस्तकांची मोठ – मोठी प्रदर्शने आयोजित केली जातात. या प्रदर्शनांना आजही या ऑनलाईन च्या जमान्यात खूप मोठ्या प्रमाणवर प्रतिसाद मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो.


        केवळ ज्ञान अर्जित करण्यासाठी वाचनाचा छंद उपयोगी ठरत नाही तर, वाचनामुळे मन प्रसन्न होऊन जाते तर काही पुस्तकांमुळे वाचकाची मनोरंजन देखील होते. लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये वाया जाणारा व कंटाळवाणा रिकामा वेळ वाचनाच्या छंदामुळे सार्थकी लागतो. आपण आपला इतिहास वाचला तर त्यामध्ये असे आढळून येते की, जेव्हा आपल्या थोर नेत्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या कारकिर्दीत तुरुंगात जावे लागले. त्या त्या वेळी त्यांनी तत्कालीन ब्रिटीश सरकार कडे पुस्तके वाचायला मिळवीत यासाठी विनंती केली जायची. वाचनाच्या वेडापायी त्यांच्या ज्ञानाची पातळी तर  वाढलीच, पण त्याचबरोबर त्या पुस्तकांनी स्वातंत्र्य लढ्यात त्यांची शेवटपर्यंत साथ दिली. याचप्रकारे आपण दुःखात असताना, एकटे असताना, निराश असताना तसेच, प्रवासाठी पुस्तके आपली साथ देतात. आपली सोबत करता करत कदाचित आपले मित्र कंटाळतील, कधी आई – वडील सुद्धा थकतील , पण आपण वाचलेली पुस्तके आपली साथ कधीच सोडत नाहीत, त्यांना कधीही कंटाळा येत नाही त्याच बरोबर ती थकत सुद्धा नाहीत. आपल्याला आपल्या अडचणीच्या वेळी केव्हाही, कधीही, गरजेच्या ठिकाणी आपली मदत कार्याला ती सदैव तयार असतात.


        एका चांगल्या पुस्तकाचे वाचन केल्याने आपण आपल्या चिंता आपला क्षीण एकही थोड्या वेळासाठी का होईन  आपण विसरून जातो. एखाद्या चांगल्या पुस्तकाचे वाचन करून मिळणारा उत्साह हा पराकोटीचा असतो. जर एखाद्याने सतत उत्तमोत्तम पुस्तकांचे वाचन केले तर या व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडून आल्याशिवाय रहाणार नाही.


        जर आपल्याला वाचनाचे वेद असेल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांमधून बाहेर पडण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. उदाहरण सांगायचे झाले तर ‘वीणा गवाणकर’ यांनी अनुवाद केले ‘एक होता कार्व्हर’ ; विठ्ठल कामात याचे लेखन असलेले  ‘इडली ऑर्कीड आणि मी’ ही आणि यांसारखी इतर अनेक पुस्तके आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्यांवर मत करून आपल्याला आपले आयुष्य अगदी उत्साहाने जगायला मदत करतात.


        पुस्तकांच्या वाचनातून आपल्याला प्राचीन संस्कृतीचे ज्ञान मिळते. पुस्तके वाचताना आपण जणू त्या काळात जागून आलो आहोत असा अनुभव मिळतो. त्या कालखंडातील राहानिमान्म सन-उत्सव, परंपरा चांगल्या व वाईट प्रथा यच्न्हे ज्ञान प्राप्त होते. याप्रकारे पुस्तके वाचनाच्या छंदातून फक्त ज्ञानार्जन होत नाही तर आपण वाचत असलेल्या कालखंडात जणू काही आपण भ्रमंती करून आलो आहोत असा अनुभव आपल्याला वाचनातून मिळतो.


        थोर विचारवंत, तसेच ज्ञानी महापुरुष आजवर या जगात होऊन गेले त्यांनी लिहीलेल्या ग्रंथांतून त्यंनी वाचनाचे महता वेळोवेळी समजावून सांगितले आहे. ‘माझा छंद माझा आनंद  या लेखामध्ये जयंत नारळीकरांनी आपल्या वाचनाच्या छंदाबद्दल सविस्तर महिती सांगितली आहे. त्यांनी आपला वाचनाचा छंद जोपासण्यासाठी कसे प्रयत्न केले. त्यांना हवी असलेली पुस्तके जेव्हा त्यांना मिळाली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हे त्यांनी त्या लेखामध्ये आवर्जून नमूद केले आहे. सतत तासनतास ग्रंथालयात बसून आपली वाचनाची भूक भागवणारे थोर पुरुष म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.


        आज आपल्या मराठी भाषेमध्ये उत्कृष्ट दर्जाची साहित्य संपदा मोठ्या प्रमाणवर उपलब्ध झालेली आहे. आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाने मनाला उभारी मिळते, ललित साहित्याच्या वाचामुळे आपल्याला अनुभवांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळविता येतो. चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने माणसाची कल्पनाशक्ती, विचारशक्ती, संवेदनशक्ती यांचा विकास होतो. म्हणूनच वाचकाच्या मनावर संस्काररुपी अलंकार चढवणारा वाचनाचा हा छंद खरंच एक उत्कृष्ट आणि उत्तम छंद आहे.

 


मित्रांनो निबंध लिहिताना खाली दिलेल्या मुद्यांचा अवश्य वापर करा.


[मुद्दे:

विविध प्रकारचे छंद

वाचन हा एक उत्तम छंद

वाचनामुळे होणारे फायदे

ज्ञान, मनोरंजन,

चांगले वाचन सतत सोबत करण्यास तयार

व्यक्तिमत्वाचा विकास

जीवनाला प्रेरणादायक ठरणारा छंद

थोर व्यक्तीची वाचनाबाबत मते

वाचनाचा छंद हा एक उत्तम छंद.]

 



मित्रांनो हा निबंध तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता.

माझा आवडता छंद
माझा आवडता छंद वाचन
माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी.
वाचन एक उत्कृष्ट छंद
Maza aavadata chhand vachan
Maza aavadata chhand
Maza aavadata chhand vachan nibandh Marathi
Vachan ek utkrusht chhand
Maza aavadata chhand vachan essay in Marathi
My favourite hobby reading essay in Marathi

 

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.