विनोदाचे महत्व | मानवी जीवनातील विनोदाचे स्थान | Vinodache mahtwa, manavi jivnatil vinodache sthaan

विनोदाचे महत्व मानवी जीवनातील विनोदाचे स्थान विनोद आणि मानवी जीवन १० वी ११वी निबंध मराठी. Vinodache mahatwa Manavi jivnatil vinodache sthan Vinod aani
Admin

 

विनोदाचे महत्व 

मानवी जीवनातील विनोदाचे स्थान


विनोदाचे महत्व | मानवी जीवनातील विनोदाचे स्थान | Vinodache mahtwa, manavi jivnatil vinodache sthaan

विनोदाचे महत्व




    संत तुकाराम महाराज म्हणतात: 

                ‘सुख पाहता जिवापाडे | दुखः पर्वताएवढे’


        जीवनात वाटचाल करीत असताना प्रत्येकाच्या जीवनात दुःखाचे मोठ-मोठे डोंगर आडवे येतात. आणि हे डोंगर प्रत्येकजण सर करून पुढे वाटचाल करीत असतो. जेव्हा कुठे आपण दुःखाचे डोंगर सर करून पुढे जाऊ लागतो तेव्हा आपल्या जीवनात चिमुटभर सुख वाट्याला येते. मानवी जीवनात दुःखाचे पर्वत सर करत असताना. विनोदाची साथ ही सर्वात मोलाची ठरते. विनोद आपल्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करतो आणि ‘हास्य’ ही तर मानवाची एक सहजप्रवृत्ती आहे. यामुळेच तर मानवी जीवनामध्ये विनोदाचे स्थान अनन्यसाधारण असलेले आपल्याला पाहायला मिळते.


        पूर्वीच्या काळी राजे – महाराजांच्या राज दरबारात नित्याच्या कामकाजातून बाहेर पडून थोडी करमणूक व्हावी म्हणून राजदरबारी विदुषकाची नेमणूक करण्यात येत असे. विनोदामुळे क्षणभर का होई न, पण दुःखाचा विसर पडतो आणि त्या दुःखाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग काही प्रमाणात सोपा होऊन जातो.


        जेव्हा शब्दांचा, अर्थांचा, प्रसंगांचा किंवा कल्पनेचा वापर चमत्कृतीपूर्ण केला जातो तेव्हा मानवी जीवनामध्ये विनोदाची निर्मिती होते. मानवाकडून जीवन जगत असताना होणाऱ्या अनेक प्रकारच्या विसंगती हे मुख्य विनोदाचे उगमस्थान आहे.


        आज मराठी भाषेतील विनोदी लेखनाचे साहित्य हे अनेक विनोदवीर लेखकांनी आपल्या विनोदी  विचारांच्या जोरावर समृद्ध केले आहे. यामध्ये राम गणेश गडकरी यांचे ‘संपूर्ण बाळकराम’, पु.ल. देशपांडे यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘दुदाम्याचे पोहे’ यांचे लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर अशी अनेक लेखकांची यादी आपल्याला पाहायला मिळते या सर्व लेखकांच्या लेखनातून विविध प्रकरचा विनोद व्यक्त होतो. मात्र त्यामागील हेतू हाच की माणसाला त्याच्या आयुष्यातील चार क्षण का होईना पण ते विरंगुळ्याचे मिळावेत. खूप वेळा लॉक आपल्या दैनंदिन आयुष्यातील धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडावे तसेच जीवनात असणाऱ्या दुःखाचा काही क्षण का होईना पण विसर पडावा यासाठी विनोदी साहित्य अगदी आवडीने वाचतात. यामुळे आपला सगळा क्षीण नाहीसा होऊन आपण थोडे अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्यासाठी प्रवृत्त होतो.


        आपल्या इतिहासात आपण डोकावून पहिले तर, त्या काळातील संत महात्म्यांच्या लेखनामध्ये सुद्धा विनोदाला अनन्यसाधारण साधारण महत्व दिलेले आपल्याला दिसते. ‘मला दादला नको ग बाई....’ हे संत एकनाथ लिखित एक उत्तम उदाहरण आहे. ही एक समाज प्रबोधनपर विनोदी ‘भारुड’ ही ही काव्यरचना आहे. या काव्यरचनेमध्ये एकनाथांचा फक्त हसवणे व मनोरंजन करणे इतकाच उद्धेश मर्यादित नाही तर त्यातून लोकांमध्ये जनजागृती देखील घडताना दिसते.


        आज समाजामध्ये स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात जगत असताना विविध प्रकारच्या ताण – तानावांतून प्रत्येकाला जावे लागते. या सर्वांपासून थोडा वेळ विसावा मिळावा, विरंगुळा मिळावा म्हणून दूरदर्शन तसेच खाजगी टीव्ही वाहिन्यांवर विविध कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते. जेव्हा टीव्ही वाहिन्यांवर विनोदी कार्यक्रम लागतात तेव्हा लहान-थोर व्यक्ती एकत्र जमा होऊन मनमोकळेपणाने हसतात, आनंद घेतात, तेव्हा कुटुंबातील असणारे ताणतणाव काही क्षणांसाठी दूर झाल्यासारखे वाटतात आणि सर्वांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य अनुभवायला मिळते. हास्यामुळे नेहमी निरोगी राहता येते. हास्य हे एक सर्व आजारांवरचे रामबाण औषध आहे. विनोदांमुळे जीवनात एक प्रवाहीपणा येतो आणि जीवन खऱ्या अर्थाने खेळकरपणाने उपभोगण्याची लज्जत आणखीनच वाढते. म्हणूनच विनोद हे माणसाच्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे, तर ‘हसा आणि निरोगी आयुष्य जागा’ हा माणसाच्या सुखी जीवनाचा मंत्र आहे.


 

निबंध लिहित असताना खाली दिलेल्या मुद्यांचा अवश्य वापर करा.


[मुद्दे :

सुख दुःखाने व्यापून गेलेले मानवी जीवन

धकाधकीच्या जीवनात करमणुकीची गरज

दुःख आणि निराशमय जीवनातून बाहेर पडण्याचा एक मार्ग

विनोदाचे प्रमुख महत्वाचे कार्य

आनंदाची निर्मिती

हास्य आणि विनोदाच्या माध्यमातून जनजागृती

उत्तम विनोद निर्मिती ही जीवनाकडे खेळकर दृष्टीने बघावयास लावते

विनोदाशिवाय मानवी जीवन निरस

आनंदी जीवन जगण्यासाठी विनोद हा हवाच. ]

 


मित्रांनो हा निबंध तुम्ही खालील प्रमाणे देखील शोधू शकता.


विनोदाचे महत्व
मानवी जीवनातील विनोदाचे स्थान
विनोद आणि मानवी जीवन
१० वी ११वी निबंध मराठी.
Vinodache mahatwa
Manavi jivnatil vinodache sthan
Vinod aani manavi jivan
Marathi nibadh
10 vi 11vi Marathi nibandh

 

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.