BUY PROJECT PDF Click Here!

वीज नसती तर.... | Vij nsti tar.... Marathi nibandha

वीज नसती तर.... वीज नसती तर मराठी निबंध वीज नसती तर कल्पनात्मक निबंध Vij nasti tar… Vij nasti tar Marathi nibandh Vij nasti tar kalpanatmak nibadnh E
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

वीज नसती तर....


वीज नसती तर.... | Vij nsti tar.... Marathi nibandha

वीज नसती तर.... | Vij nsti tar.... Marathi nibandha



        सोमवारी शाळा सुटल्यानंतर मी थेट घरीच आलो. घरी येईपर्यंत सायंकाळचे ६ वाजून गेले होते. घरी आल्यावर हातपाय धुवून, चहा नास्ता केला आणि थोडा वेळ विश्रांती घेईन मम्हटले तोपर्यंत बाबांनी अभ्यासासाठी मिळालेला थोडाही वेळ वाया नाही घालवायचा यावरून बोलायला सुरुवात केलेई. तसे पाहायला गेले तर बाबांचं हे रोजचेच वागण. माझ्यामागे अभ्यासाला बस म्हणून तगादा लावल्याशिवाय जणू काही त्यांचा दिवसच पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. या गोष्टीवर आत्ता माझा ठाम विश्वास बसलाय. थोडावेळ त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मग मात्र बाबांचा आवाज हळू हळू कठोर होत चालल्याचे ध्यानात येताच. बाबा अजून रुद्रावतार धारण करू नयेत म्हणून अभ्यास करायला बसावे म्हणून मी जीवाच्या आकांताने पुस्तक उघडले, बाहेर पुरता काळोख झाला होता. या वेळी जर वीज गेली तर आजच्या अभ्यासाला सुट्टी मिळेल हा विचार माझ्या मनात येताच अचानक घरात सगळीकडे मिट्ट अंधार पसरला. खिडकीतून बाहेर डोकावून पहिले तर. सगळीकडचीच वीज गेली होती. क्षणभर माझा या गोष्टीवर विश्वास बसेना, पण वीज गायब झाली हे सत्य होते.


        वीज जाताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. लगेचच अभ्यास बाजूला सारून साऱ्या घरभर मेणबत्त्या लावल्या. मनात झालेला आनंद, जहरी चेहऱ्यावर उमटू न देता. शांतपणे खिडकीत बसून चांदण्यांनी भरलेले आकाश न्याहाळत राहिलो. बाहेर चंद्राचा शीतल प्रकाश पडला होता. घराजवळच असणाऱ्या मैदानात काही मुल चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात खेळ खेळत होती. त्याचा खेळ बघण्यात मी इतका गुंग झालो की, तासभर कधी झरकर निघून गेला मला काही कळलेच नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थोड्या वेळाने घाम येऊन उकाडा जाणवू लगला. आमच्या घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. सगळेजण अस्वस्थ झाले होते.


        आजी देवघराच्या कोपऱ्यात बसून उगाच जपमाळ ओढत होती . आजोबा घामाने चिंब भिजून गेले होते ते इकडे तिकडे फेऱ्या मारत होते. आईचा स्वयंपाक तर अर्धवटच राहिला होता. बाबांनी वीज वितरण कार्यालयात फोन केल्यानंतर असे संगल्यात आले की, काही मोठ्या तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज रात्रभर वीज येणार नाही. हे शब्द ऐकताच सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला.


        माझ्या डोक्यात विचारांची चक्रे जोरदार फिरू लागली. आणि माझ्या मनात विचार आला की ही वीज नसती तर...? हा विचार मनात येताच सारे चित्र डोळ्यांसमोर तरळू लागले. रात्रीच्या अंधारात माणसाला प्रकाश देणारे दिवे पेटलेच नसते, रस्त्यांवर, घराघरांत सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले असते. कंदील, समई, मेणबत्ती यांच्या वापरावर बंधने लादली गेली असती. रस्त्यांवर तसेच महागड्या होटेल्स मध्ये, जत्रेमध्ये दिसणारी विविधरंगी दिव्यांची रोषणाई दिसलीच नसती. वाढदिवस, मोठ मोठ्या जत्र, सन , उत्सव, दिवाळी, लग्नसमारंभ यांसारखे आनंदाचे प्रसंग कंदिलाच्या उजेडातच साजरे करावे लागले असते.


        माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये वीजेच अनन्यसाधारण महत्व आहे. आज कोणतेही काम हे विजेशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. प्रत्यक काम पूर्ण होण्यासाठी विजेचीजोड अत्यावश्यक झाली आहे. घरातल्या गृहिणीला आजच्या या आधुनिक जगात स्वयंपाक करण्यापासून ते घरातला सारा पसारा आवरेपर्यंत विजेची आवश्यकता लागते. घर स्वच्छ करणारे  मशीन असो वा अन्न टिकवून ठेवणारे शीतकपाट (रेफ्रिजरेटर) असो. विजेशिवाय कोणीच कार्य करू शकत नाही. मिक्सर, ग्राईडर , वॉशिंग मशीन अशा प्रकारच्या सगळ्याच गोष्टी चालण्यासाठी विजेची आवश्यकता लागते. वीज नसेल तर या सर्व साधनाची किंमत शून्य होते. जगभरातल्या बातम्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणारा टीव्ही, ज्ञानाची उधळण करणारा संगणक हा विजेशिवाय अपूर्णच आहे. दैनंदिन जीवनात आज काळाची गरज बनलेला मोबाईल फोन हा देखील चार्जिंग होण्यासाठी विजेचीच आवश्यकता भासते. थोडक्यात काय तर विजेशिवाय मानवाचे जीवन अपूर्णच आहे.


        औद्योगिक क्षेत्रामध्ये घडणाऱ्या क्रांतीचे सगळे श्रेय हे विजेकडेच जाते. आजच्या या आधुनिक जगात विविध यंत्रे आज देशाला प्रगतीपथावर घेऊन जात आहेत. या यंत्रांना विजेची जोड नसेल तर यांना काहीच मूल्य उरत नाही. सर्वत्र पसर्लेलेली रेल्वे  व्यवस्था ही उच्च दाबाच्या विजेच्या तारांच्या सहाय्याने चालवली जाते. याच नव्या रेल्वेमुळे राज्याला अधिक महासून प्राप्त होऊ लागला आहे.


        दवाखाने, हॉस्पिटल यांना तर दिवसाचे २४ तास विजेचा पुरवठा हवा असतो. आज वैद्यकीय क्षेत्रांनी खूप मोठी प्रगती साधली आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी विजेची गरज भासते. विजेद्वारे कार्यकरणाऱ्या आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचतात. शिक्षण क्षेत्रातही वीज ही अत्यावश्यक आहे. फक्त दिवे , पंखेच नाहीत तर याशिवाय ई- लर्निंग, स्मार्ट बोर्ड अशा आधुनिक शिक्षण पद्धतींचा ही अवलंब करण्यासाठी वीज अत्यावश्यक ठरत आहे. आज देशाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मोठी झेप घेतलेली आपल्याला पाहायला मिळते हे सर्व काही शक्य झाले ते विजेमुलेच पण ही वीज नसेल तर माणसाला पिण्यासाठी पणी मिळवण्यासाठी सुद्धा नामुष्की येतील. पाण्याचा उपसा करणारे पंपच न चालल्याने पाण्यासाठी लांबच लांब रंग लागतील. एकंदरीतच विचार केला तर सर्वत्र भयानक परिस्थीती निर्माण होईल.


        थोडक्यात काय तर विजेशिवाय माणूस अपूर्ण आहे. असे म्हटले तर ते काही चुकीचे तःरणार नाही. मानवाला पदोपदी मदत करणारी वीज जेवढी उपयोई आहे तेवढीच ती प्राणघातक सुद्धा आहे.  विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा अयोग्य वापर, चुकीची जोडणी यांमुळे विजेचा धक्का लागून मृत्यू ही ओढवू शकतो. विजेमुळे लागणाऱ्या आगीद्वारे होणारी हानी पाहता ‘वीज’ धोकादायक वाटू लागते. म्हणूनच प्रत्येकाने विजेचे महत्व लक्षात घेऊन तिचा योग्य तो वापर करणे गरजेचे आहे.

 


मित्रांनो हा निबंध लिहिताना खाली दिलेल्या मुद्य्यांचा आवश्य वापर करा.


[मुद्दे:

अभ्यासाला बस म्हणून बाबांचा तगादा

वीज जाऊदे असा मनात आलेला विचार

योगायोगाने वीज जाणे

मन आनंदाने भरून जाणे

काही वेळाने उकाड्याने अस्वस्थता

घरात सर्वाचीही अशीच परिस्थिती

रात्रभर वीज येणार नसल्याची वीज कंपनीकडून माहिती

वीज नसती तर...? डोक्यात विचार

सर्वत्र काळोखाचे साम्राज्य

औद्योगिक क्षेत्रे, रेल्वे, वैद्यकीय क्षेत्रे, शिक्षणिक क्षेत्रे यांमध्ये सगळीकडेच विजेची गरज

विजेशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण

वीज जेवढी उपयोगी तेवढीच धोकादायक.]

 

मित्रांनो हा निबंध तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता.



वीज नसती तर....
वीज नसती तर मराठी निबंध
वीज  नसती तर कल्पनात्मक निबंध
Vij nasti tar…
Vij nasti tar Marathi nibandh
Vij nasti tar kalpanatmak nibadnh
Essay on vij nasti tar in Marathi.

 


धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.