माझा आवडता सण : गणेशोत्सव | Maza aavadata saan: Ganeshotsav .

माझा आवडता सण गणेशोत्सव गणेशोत्सव माझा आवडता सण माझा आवडता सण निबंध मराठी माझा आवडता सण गणपती उत्सव निबंध My favourite festival Ganeshotsav Ganeshots
Admin

 

माझा आवडता सण : गणेशोत्सव


माझा आवडता सण : गणेशोत्सव | Maza aavadata saan: Ganeshotsav .

माझा आवडता सण : गणेशोत्सव | Maza aavadata saan: Ganeshotsav .



            पावसाला ऋतुमध्ये येणारा गणेशोत्सव हा एक प्रमुख सन आहे. हा सण मराठी महिन्यानुसार भाद्रपद महिन्यामध्ये साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी ला गणपतीच्या मूर्तीची घराघरांत तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते. आदी त्या दिवसापासून ते चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जाते. या उत्सवाचे एक विशेष असे वैशिट्य आहे. परंपरागत चालत आलेय या सणाला लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक रूप दिले.


            गणेशोत्सवा ची तयारी ही खूप दिवस आधी चालू होते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी च्या दिवशी लॉक मोठ्या उत्साहात वाजत गाजत गणपतीची मूर्ती आपल्या घरी घेऊन येतात. सुंदर सजवलेल्या गणपतीच्या मुर्त्या लोक डोक्यावरून तर काही लोक गाडीतून अगदी श्रद्धापूर्वक घरी आणतात. सारे जण आपापल्या घरी सजावट केलेल्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात. आणि अगदी मोठ्या तालासुरांत ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजात सारा परिसर दुमदुमून जातो. सारे वातावरण प्रसन्न होऊन जाते. सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार होते.


            सार्वजनिक गणेशोत्सव मांडले मोठ मोठे भव्य मंडप तयार करतात. या ठिकाणी सुंदर अशी विद्युत रोषणाई  केली जाते. सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मोठ्या आणि भव्य मूर्तीची स्थापना केली जाते. मूर्तीच्या आजूबाजूच्या जागेमध्ये. पौराणिक गोष्टींचे देखावे तयार केले जातात. तर खी गणेशोत्सव मंडळे सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करतात. काही ठिकाणी तर फुलांची भव्य आरास केली जाते. या दिवसांत लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सार्वजनिक ठिकाणी गमतीदार खेळ आयोजित केले जातात. लोकांच्या मनोरंजनासाठी पौराणिक कथांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन देखील गणेशोत्सव मंडळे करतात.


            गणेशोत्सवातील दिवसांमध्ये सायंकाळच्या वेळेचे सौंदर्य पाहताच रहावेसे वाटते. घराघरांत तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी श्रद्धेने आणि भक्तिभावाने गणपतीची आरती केली जाते.गणपतीच्या आरती पूर्ण झाल्यानंतर सर्वांना गोडधोड प्रसाद वाटला जातो. रात्री काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतात तर काही ठिकाणी भजन कीर्तनांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 


घराघरांमध्ये स्थापन केलेल्या गणपतीच्या मुर्त्यांचे खूप जण हे दीड दिवसांनी तर काहीजण पाचव्या किंवा सातव्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे मोठ्या जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढून नदीवर, तलावात किंवा समुद्रामध्ये विसर्जन करतात . सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या मिरवणुका काढून सरोवर किंवा समुद्रामध्ये विसर्जित केल्या जातात ; त्या वेळचे दृश्य अगदी मनमोहक असते. गणपतीच्या मुर्त्या या ट्रक मधून किंवा चारचाकी गाडीवरून सजावट करून विसर्जन करायला घेऊन जातात. या प्रसंगी संगीत तसेच ढोल-ताशांच्या गजरात मोठ मोठ्या मिरवणुका काढल्या जातात . सगळे लोक 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' या  जयघोषात गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येऊन दर्शन देण्याची प्रार्थना करतात त्यावेळी सगळे जण आनंदाने नाचतात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यावर या सणाची सांगता होते.


            गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण तर आहेच पण त्याचबरोबर हा एक सामाजिक तसेच सांस्कृतिक उत्सव सुद्धा आहे . हा उत्सव लोकांना एकतेच्या सूत्रात बांधतो. गणपती विघ्नहर्ता आणि रिद्धी सिद्धीचो देवता आहे.  हा उत्सव साजरा करुन जीवनाला सुख आणि समृद्धी लाभावी असे सर्वजण प्रार्थना करतात.

 

 

मित्रांनो निबंध लिहिताना खालील दिलेल्या मुद्द्यांच्या अवश्य वापर करा


[मुद्दे :

प्रस्तावना गणपती उत्सवाची तयारी

गणपती मूर्तींची स्थापना

गणेश उत्सवाचे वर्णन

सामाजिक संदेश देणारे देखावे

गणपतीचे विसर्जन

संदेश.]



   निबंध   pdf फाईल downlod करण्यासाठी  GO TO DOWNLOD PAGE बटन वर  क्लिक करा.👇




मित्रांनो हा निबंध तुम्ही अशाप्रकारे देखील शोधू शकता


माझा आवडता सण गणेशोत्सव
गणेशोत्सव माझा आवडता सण
माझा आवडता सण निबंध मराठी
माझा आवडता सण
गणपती उत्सव निबंध
My favourite festival Ganeshotsav
 Ganeshotsav My favourite festival
My favourite festival Essay in Marathi
My favourite festival
मराठी निबंध फ्री pdf फाईल डाउनलोड
Free pdf download

 


धन्यवाद.


E5

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.