उद्यानातील फेरफटका | Udyanatil ferfataka marathi nibadh

उद्यानातील फेरफटका बागेतील फेरफटका उद्यानातील एक तास बागेतील एक तास मराठी निबंध ११ वी १२वी मराठी निबंध उद्यानातील फेरफटका वर्णनात्मक निबंध Udyanatil f
Admin

 

उद्यानातील फेरफटका


        रविवारी सुट्टीच्या दिवशी सायंकाळी आम्ही सार्वजन फिरायला बाहेर गेलो. जवळच नव्याने सुरु झालेल्या उद्यानात आम्ही प्रवेश केला, अगदी पाहताक्षणीच मी त्या नव्या उद्यानाचे सौंदर्य पाहून प्रेमात पडलो. एखादे उद्यान म्हटल्यावर सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यांसमोर जे उद्यानाचे रूप उभे राहते त्यापेक्षाही विलक्षण सुंदर रूप या उद्यानाला प्राप्त झाले होते.


उद्यानातील फेरफटका | Udyanatil ferfataka marathi nibadh

उद्यानातील फेरफटका | Udyanatil ferfataka 


        उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच रंगीबेरंगी फुलझाडे मना डोलवून आमचे स्वागत करीत होती. गुलाबी, लाल, पांढरी अशा विविध रंगांनी रंगून गेलेल्या बोगनवेलींनी आम्हां सर्वांवर फुलांची उधळण केली. हे सर्व पाहून मन प्रसन्न होऊन गेले. मुख्य उद्यानापर्यंतचा रस्ता कधी संपला काही कळलेच नाही. परवाच आम्ही या नव्याने सुरु झालेल्या उद्यानाला भेट दिली होती. त्यावेळी आलेला अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही.


        खरे तर मला फिरण्याची खूप आवड आहे. माझ्या फिरण्याच्या आवडीपायी वर्षातून एकदा तरी दूरचे पर्यटन आणि मधल्या काळात छोट्या-छोट्या ठिकाणांना भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवणे हा आमच्या कुटुंबाचा सुट्टीच्या दिवसाचा ठरलेला दिनक्रम असतो. कुठे दूरवर पर्यटनाला जायला नाही जमले तर आमच्या परिसरात असणाऱ्या उद्यानात किंवा माळरानावर फेरफटका मारणे हे माझे आणि माझ्या बहिणीचे निश्चित असते. जेव्हापासून मला कळले की, आमच्या परिसरात एका नवीन उद्यानाची निर्मिती होतेय, तेव्हा ते उद्यान पूर्ण झाल्यावर पाहण्याची मला खूपच आतुरता लागून राहिली होती. आणि त्या उद्यानातील प्रवेश चालू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वांनी त्या उद्यानाला भेट दिली होती. उद्यानाच्या प्रवेशद्वारापासूनच त्या उद्यानाच्या नाविन्याचे दर्शन घडत होते.


        या उद्यानात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे या नव्याने उभ्या राहिलेल्या उद्यानात ‘या शुद्ध हवा घ्या!’ , ‘या निरोगी रहा!’ यांसारखे सुंदर अक्षरांतले फलक सर्वत्र लावले गेले होते. त्या फलकांचे एक वेगळेच आकर्षण वाटत होते. ‘दुर्मिळ होत चालेल्या वनस्पतींच्या दिशेने’, ‘सुगंधित फुलझाडांच्या दिशेने’ अशा प्रकारचे बाण रेखाटलेले फलक उद्यानाच्या प्रत्येक वाटेवर लावण्यात आले होते. घरात आजीकडून औषधी वनस्पतींची नावे मी ऐकली होती, पण प्रत्यक्षात मी औषधी वनस्पती पहिल्या नव्हत्या. ‘औषधी वनस्पतींच्या दिशेने’ हा बाण पहिला आणि मी त्या दिशेने गेलो. पहिले तर समोर कोरफड, अश्वगंधा, दुर्वा, शमी, गुळवेल, अगस्ती, या आणि याशिवाय अनेक औषधी वनस्पती आपल्या गळ्यात पाटी अडकवून स्वतः बद्दल माहिती देत होत्या. या माहिती मध्ये त्या वनस्पतीचे नाव, त्या वनस्पतीचे औषधी उपयोग याबाबत माहिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तेथील औषधी वनस्पतींची माहिती वाचून झाल्यानंतर आत्ता पुढे कुठे जावे हाच विचार मी करत होतो. तेवढ्यात माझ्या बहिणीने हात धरून ओढत मला दुसरीकडे नेले.


        तिने उद्यानाच्या ज्या भागात मला नेले तिथे, चाफा, बकुल, चाफा यांसारख्या सुगंधी फुलझाडांचा समूह होता. तेथील आकर्षक सुगंधी फुले पाहून माझे मन मोहून गेले. कागडा, नेवाळी, मोगरा, जाई , जुई यांची पांढरीशुभ्र फुले सायंकाळच्या वाऱ्याच्या तालावर डोलत उभी होती. वाफ्यामध्ये लावलेल्या लिली आणि गुलछडीच्या फुलांनी तर माझे मन मोहूनच टाकले.


        हे सारे पाहता पाहता माझे लक्ष गुलाबी , निळ्या आणि पांढऱ्या कमळांनी भरलेल्या तलावाकडे गेले. डोळ्यांचे पारणे फेडणारे तलावाचे दृश्य पाहताच माझे पाय आपोआप तलावाच्या दिशेने चालू लागले. विविध रंगी कमळे पाहून माझे मन मोहून गेले. उद्यानातील मऊ मऊ गवतावर काही पालक आपल्या नुकत्याच चालू लागलेल्या बाळांना चालवत होते. एका बाजूला आजी- आजोबा फेरफटका मारत होते. एका कोपऱ्यातील भागात लहान मुळे विविध खेळ खेळत होती. किती मनाला प्रसन्न करणारे वातावरण होते ते!


        आत्ता काळोख पडू लागला होता. सूर्य मावळतीला गेला होता. आत्ता घरी परतण्याची वेळ झाली होती ! पण, मन मात्र या उद्यानातच अडकून पडले होते. पुन्हा वेळ मिळेल तेव्हा या उद्यानात येऊन अजून काही वेळ घालवेन असे मनाला सांगून मी घरी परतलो.

 



मित्रांनो हा निबंध लिहिताना खाली दिलेल्या मुद्यांचा अवश्य वापर करा.


[मुद्दे:

उद्यानाचे प्रथमदर्शन

प्रवासाची आवड

उद्यानातील आकर्षक फलक

औषधी वनस्पतींची ओळख

फुलझाडे

कमळांनी भरलेला तलाव

उद्यानातील हिरवळ

उद्यानाच्या आठवणी घेऊन घरी.]



   निबंध   pdf फाईल downlod करण्यासाठी  GO TO DOWNLOD PAGE बटन वर  क्लिक करा.👇




हा निबंध खालील प्रकारे देखील शोधू शकता.



उद्यानातील फेरफटका
बागेतील फेरफटका
उद्यानातील एक तास
बागेतील एक तास
मराठी निबंध
११ वी १२वी मराठी निबंध
उद्यानातील फेरफटका वर्णनात्मक निबंध
Udyanatil ferfataka
Bagetil ferfataka
Udyanatil ek tas
Bagetil ek taas
Marathi nibadh
11th 12th marathi nibandh


धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.