BUY PROJECT PDF Click Here!

वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान मराठी निंबध | vrukshanche manvi jivnatil sthan

वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान मराठी निबंध वृक्ष आणि मानवी जीवन मराठी निबंध ११वी १२ वी मराठी निबंध Vrukshanche manvi ji
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान


वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान मराठी निंबध | vrukshanche manvi jivnatil sthan

वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान  | vrukshanche manvi jivnatil sthan 



        आजकाल मी महिना संपून जून महिना सुरु झाला तरी पावसचा काही पत्ता नसतो. प्रचंड उन्हामुळे हैराण झालेले लोक चातक पक्षासारखे पावसाच्या वाटेकडे  डोळे लावून बसलेले असतात. दिवसेंदिवस पावसाचा लहरीपणा वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल. ज्या निसर्गाने, वृक्षांनी मानवाला सर्व गोष्टी भरभरून दिलेय आहेतं, देत आहेत. मानवाचे ज्या निसर्गासोबत प्राचीन असे नाते आहे त्याचाच नाश करण्यासाठी आज माणूस अग्रेसर आहे. मानवाचा इतिहास पडताळून पहिला तर हेच लक्षात येते की वृक्षांच्या सोबतीनेच मानवाचा व त्याच्या संस्कृतीचा विकास झाला आहे.


        आज प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली आहे. आज जगासमोर जी विविध आव्हाने उभी आहेत त्यामध्ये लोकसंखेच्या वाढत्या प्रमाणवर नियंत्रण मिळविणे हे के आव्हान आहे. या वाढत्या लोकसंख्येला निवार्यासाठी जागा उपलब्ध व्हावी लागते, या समस्येवर एक मार्ग शोधाल जातो तो म्हणजे वृक्षतोड. निवारा तयार करण्यासाठी लाकूड हवे त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीसारख्या समस्या कमी करण्यासाठी रस्त्यांची रुंदी वाढवणे आवश्यक असते; त्यासाठी रस्ते रुंदीकरण करताना रस्त्यालगतची शेकडोवर्षे जुनी असलेली झाडे तोडायला आपण मागेपुढे बघत नाही. आपण आपला विकास घडवण्याच्या नादामध्ये नकळत निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत याकडे लक्षच देत नाही.


        माणसाला त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या वृक्षाच पुरवतात. अन्नाच्या प्राथमिक गरजेपासून ते घर सजावट व चैनीच्या वस्तू ही वृक्षांचीच देण आहे. निसर्गातून मिळणाऱ्या औषधी वनस्पती, सौंदर्यप्रसाधनांची उपलब्धता वृक्षांमुळेच होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी उसंत मिळावी म्हणून निसर्ग पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत केलेले ते क्षण मनाला उल्हासित करणारे असतात. निसर्गाचे हिरवेगार रूप नेत्रसुखाचा आनंद देऊन जाते.


        वृक्षांच्या सानिध्यामध्ये अनेक साहित्यिकांची प्रतिभा स्फुरण पावलेली आहे. बोधिवृक्षाखाली केलेल्या ज्ञानाच्या साधनेतून जीवनाचे तत्वज्ञान ज्यांनी प्राप्त केले ते ‘गौतम बुद्ध’, तसेच वनस्पतींना हृदय आहे हे सांगणारे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ ‘जगदीश बोस’. ‘शेले’ या महान कवीनि देवनार वृक्षांच्या सान्निध्यात काव्य रचना केली. याप्रकारे कितीतरी नावे उदाहरण म्हणून देता येतील .


        वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुद्धा माणसाला वृक्षांची मदत होते. झाडे प्रकाशसंश्लेषण क्रियेसाठी हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायू बाहेर सोडतात. यामुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांमुळे थकल्या भागल्या वाटसरूंना आणि पशु – पक्ष्यांना झाडाच्या सावलीत आराम मिळतो.


        वूक्षांचे महत्व पटवून देताना आपल्या अभंगात संत तुकाराम वृक्षांना ‘सोयरे’ म्हणतात म्हणजे ‘सगे – सोयरे’, नातेवाईक म्हटले आहे. कारण आपल्याला ज्याप्रमाणे आपली माणसे सुख देतात त्याचप्रमाणे वृक्षसुद्धा सुख देतात.


        आज दुर्दैवाने होणारी प्रचंड प्रमाणातील वृक्षतोड धासलेले पर्यावरणाचे संतुलन, संकटांच्या भोवऱ्यात सापडले वन्यजीवसृष्टी हे सारे लक्षात घेता. विद्यार्थी व सामाजिक संस्थांकडून जनजागृती करणारे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. ‘एक माणूस, एक झाड’ या प्रमाणे देखील आपण वागलो तरीही ही धरती पुन्हा नव्याने, हिरव्यागार शालूने नटेल आणि आपल्याला समृध्द करेल. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याला मोठेकेले पाहिजे.

 


निबंध लिहिताना खालील मुद्यांचा अवश्य वापर करा.


[मुद्दे:

वृक्ष आणि मानव यांच्यात प्राची नाते

झाडांची आवश्यकता

भरमसाठ वाढणारी लोकसंख्या

वाहतुकीच्या समस्या

वृक्षांमुळे होणारे फायदे

वृक्षांच्या सहवासामध्ये साहित्यिकाच्या प्रतिभेला स्फुरण

प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत

वृक्ष हेच आपले सोयरे

शाळे, सामाजिक व शासकीय पातळीवर कार्यात येणारे वृक्षसंवर्धन.]

 


निबंध या प्रकारे देखील शोधू शकता.


वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान
वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान मराठी निबंध
वृक्ष आणि मानवी जीवन
मराठी निबंध
११वी १२ वी मराठी निबंध
Vrukshanche manvi jivnatil sthan
Vrukshanche manavi jivnatil sthan Marathi nibandh
Vruksha aani manvi jivan
Marathi nibandh
Zadanche manvi jivnatil sthan
Best Marathi nibandh 

 

धन्यवाद

E2

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.