मोबाईल शाप की वरदान निबंध | Mobail shaap ki vardan essay

mobail shaap kee vardan essay 12th essay in marahi 12वी निबंध १० वी निबंधमोबाईल शाप की वरदान मराठी निबंध मोबाईल शाप की वरदान
Admin

 

मोबाईल शाप की वरदान


मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध 
मोबाईल शाप की वरदान 
Mobail shaap kee vardan essay in marathi 
mobail shaap kee mardan marhi nibandh 



        स्वतःचे जीवन सुखमय बनवण्यासाठी मानवाने अनेक शोध लावले.  या सर्व शोधांमधील सर्वात महान शोध म्हणजे मोबाईल चा शोध. पुराण कथेमधील वामनाने तीन पावलांमध्ये सारे विश्व व्यापून टाकल्याचे सांगितले गेले आहे. परंतु मोबाईल या छोट्याश्या उपकरणाने तर अक्षरशः संपूर्ण जागाच पादाक्रांत केले. आहे . आज समाजातील श्रीमंत लोकांपासून ते अगदी गरीबापर्यंत सर्वांच्याच खिशात हा मोबाईल आढळतो. या मोबाईल शिवाय आजकाल कोणाचे पानही हलत नाही.


मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध  मोबाईल शाप की वरदान  Mobail shaap kee vardan essay in marathi  mobail shaap kee mardan marhi nibandh

मोबाईल शाप की वरदान निबंध | Mobail shaap ki vardan essay



        या मोबाईलने अगदी कमी कालावधीतच आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. सर्वजण या भ्रमणध्वनीच्या आहारी गेले आहेत. तुम्ही कोठेही गेलात तरी लॉक मोबाईलवरून कोणा न कोणाशी सतत बोलताना दिसतात. परंतु सतत मोबैल्वर बोलत बसल्याने आपले आजूबाजूला लक्षच नसते आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. मोबाईल च्या अतिरेकामुळे आपली मित्रमंडळी, नातेवाईक घरातील माणसे. यांच्याजवळ जिवाभावाच्या दोन गोष्टी बोलणे हे दुरापास्त झाले आहे. यामुळे माणूस भावनिक दृष्ट्या इतर व्यक्तींपासून दूर होत चालला आहे. एक प्रकारचा तुटकपणा नात्यांत निर्माण झाला आहे. व्यक्तीला निवांतपणे स्वतःकडे ही पाहायला वेळ मिळत नाही.


        मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक दुष्परिणाम सुद्धा होतात. मोबाईल सतत कानाला लावून बोलत बसल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनिक लहरी शरीरावर प्रामुख्याने मेंदूवर वाईट परिणाम करतात. त्याचबरोबर मोबाईलमुळे माणसाच्या वाईट गुणांना वाव मिळू लागला आहे. इतरांना वाईट साईट मेसेज पाठवणे, त्याचबरोबर एखाद्याची बदनामी करणे या गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत. भीषण बॉम्बस्फोट असो व इतर कुठेही झालेला घटक हल्ला असो तो घडवून आणण्यासाठी अतिर्की याच उपकरणाचा मोठ्या प्रमाणवर उपयोग करतात. या गोष्टी पाहिल्या की मन विचार करायला लागते की हा मोबाईल शाप तर नाही ना?


        मोबाईल ला जर आपण शाप म्हटले तर ती त्याची एक बाजू झाली आहे. खरे पाहता, मोबाईल हे एक संपर्काचे सर्वोत्तम मध्यम आहे. आपण घरात बसून कोणाजवळही, कधीही आणि जगाच्या पाठीवर कठेही असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. राकेश शर्मा भारताचा पहिला अंतराळवीर याने तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भारत देशाचे वर्णन करताना, तो ‘सारे जहा से अच्छा’ आहे असे या मोबाईलमुळेच सांगू शकला.मोबाईलमुळे आपण काही क्षणातच दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधता येत असल्याने आपली कामे जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना पडणाऱ्या लहान सहान प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीही हा मोबाईल खूप उपयोगी आहे. आपल्याला ज्या व्यक्तीशी संपर्क साधायचा आहे ती जर कामांत व्यस्त असेल तर आपण तिला मेसेज पाठवू शकतो. आधुनिक जगातील वेगवान जीवनाशी हा मोबाईल सुसंवादी आहे.


        बाहेर नोकरी करणाऱ्या माणसांना आपल्या घरातील माणसांशी त्वरित संपर्क साधता येतो. घरातील वृद्ध एकाकी असलेल्या व्यक्तींना मोबाईल फार मोठा आधार बनला आहे. आज मोबाईल आणि इंतार्नेताच्या माध्यमातून आपल्याला विविध बिलांची माहिती मिळते. रेल्वे, चित्रपट, विमाने, नाटक, यांची तिकिटे तसेच आंतरजालावर खरेदी करणे, जेवण मागवणे यांसारखी कामेही हा मोबाईल चुटकीसरशी करतो. आजकाल घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांचा तपास हा मोबाईल मुळे लावणे शक्य होतो.


        मोबाईल चे फायदे किती सांगावेत! त्याचे तोटे सुद्धा आहेत. पण तो त्या उपकरणाचा दोष नाही. तर दोष आहे तो अतिप्रमाणात वापर करणाऱ्या माणसाचा तेव्हा या मोबाईलला शाप असे म्हणणार ? तो तर वरदानच आहे.

 


निबंधामधील समाविष्ट मुद्दे


[मुद्दे:

मोबाईल चा शोध एक महान शोध

मोबाईल चे दुष्परिणाम

मोबाईल वर सतत बोलत राहणे

नात्यांमध्ये दुरावामेसेज चे खूळ

वाईट कामांसाठी वापर

परीक्षांतील गैरव्यवहार वाढले

खूप फायदेशीर

कोणाशीही, कधीही, कुठेही संपर्क साधणे  शक्य

कामाचा वेग वाढला

वेळेचा अपव्यय कमी

विद्यार्थी व वयस्कर व्यक्तींना उपयोगी

गुन्हेगारांचा शोध घेण्यामध्ये मोलाचा वाटा

चांगले-वाईट पण वापरणाऱ्यावर अवलंबून

शेवट.]


〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

mobail shaap kee vardan essay 
12th essay in marahi 
12वी निबंध 
१० वी निबंध 


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.