धरणग्रस्त नदीचा पुकार
सुट्टीच्या दिवशी मी आणि माझा मित्र आमच्या गावाजवळील असणाऱ्या धरणावर फिरायला गेलो. नदीच्या किनारी झाडाखाली बसून धरणातील त्या अथांग पाण्याकडे पाहत होतो. तेवढ्यात कोणीतरी हाक मारल्याचा आवाज आला. आजूबाजूला पहिले तर कोणीच नव्हते. तेवढ्यात पुन्हा आवाज आला ‘मुला ए मुला’ अरे मी नदी बोलतेय, तेव्हा मला समजले की दुसरे कोणी नाही तर नदीच माझ्याशी बोलत आहे. ती पुढे बोलू लागली.
शेकडो वर्षांपासून
मी माणसाची अविरत सेवा करीत आले आहे. नदी या नात्याने शेकडो वर्षांपासून तुमचे
जीवन फुलवण्याचे कार्य करीत आले आहे. माझा उगम आज पासून शेकडो वर्षे आधी डोंगराच्या
पायथ्याशी झाला. माझ्या उगमापासून मी या सृष्टीची तहान भागवण्यासाठी दूरवर वाहत
आले. माझ्या काठावर अनेक घाट आहेत, प्रसिद्ध देवालये माझ्या काठावर वसलेली आहेत,
तुमच्या वसाहती देखील माझ्या काठावर वसल्या आहेत. आजूबाजूचे हे सौंदर्य पहिले की
मन तृप्त होऊन जाते.
पाण्याची
गरज भागवण्यापासून ते अगदी तुमचा धार्मिक कर्यापर्यंत च्या कामामध्ये माझा
तुम्हाला उपयोग होतो. घरात पिण्यासाठी , अन्न शिजवण्यासाठी, शेतीसाठी, स्वच्छतेसाठी,
आणि तुम्ही करत असलेल्या इतर कामांसाठी माझे निर्मळ पाणी मी तुम्हाला दान करत आले
आहे.
पण
जशी जशी काही वर्षे सरत चालली तसे सारे चित्र बदलत चालले. माझ्या काठावर मोठ मोठी
नगरे वसू लागली. माणूस घरात तयार होणारा कचरा, घरातील सांडपाणी माझ्या पात्रात
टाकू लागला. नगरांतून भरून वाहणारी गटारे, आणि कारखान्यांतून बाहेर पडणारे
सांडपाणी त्यावर प्रक्रिया न करता जसेच्या तसे माझ्या स्वच्छ पाण्यात सोडले गेले
त्यामुळे माझे पाणी दुषित झाले. पूर्वी पिण्यायोग्य असणारे पाणी आता फार दुषित
झाले आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. माझ्या पाण्यातील
जलचर मृत्युमुखी पडत आहेत. माझाही जीव गुदमरू लागला आहे.
शहरांची
पाण्याची गरज भागवता यावी आणि वीज मिळावी यासाठी माझ्यावर मोठ मोठी धरणे बांधली
गेली. त्यांचा भार मला आत्ता असह्य होऊ लागला आहे. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर
पाणी साठवून ठेवल्याने धरणाच्या खालच्या बाजूला असलेले माझे पात्र दिवसेंदिवस
कोरडे पडत चालले आहे. एवढेच नाही तर या मोठ्या धरणांमुळे धरणीकंपाचा धोका वाढत
चालला आहे. धरण बांधत असताना धारण क्षेत्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन
केले गेले. त्यांना स्वतःची जागा, घरे, शेती सोडून दुसरीकडे स्थलांतरीत व्हावे
लागले. त्या स्थलांतरीत ठिकाणी त्यांना शेती करण्यासाठी स्वतःची जमीन नाही की
कोणत्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत. त्यांचे जीवन दुःखमय झाले आहे. त्यांना रोज नव्या
समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे पहिले की मला खूप वाईट वाटते.
संपूर्ण
सृष्टीची तहान भागवण्याच्या उद्देशाने मी एवढ्या दूरवर वाहत आले आहे. सर्वांचे
जीवन सुखी करणे हे माझे ध्येय आहे. पण हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो. माझ्या
तीरावर असणाऱ्या सजीव सृष्टीचा तो कधीही विचार करत नाही. मानवाने स्वतः बरोबर या
सजीवसृष्टीचा देखील विचार करायला हवा. स्वतःच्या सुखबरोबर इतरांचे सुख देखील
तितकेच महत्वाचे आहे.
मुला
तुम्ही या देशाचे भविष्य आहात. त्यामुळे तुला ही परिस्थिती निदर्शनास आणून देणे
मला योग्य वाटले. आशा करते की तुम्ही यापुढे योग्य तेच निर्णय घ्याल. आत्ता मी
तुझा निरोप घेते.
निबंधात
खालील मुद्द्यांचा समावेश आवश्य करा.
[मुद्दे:
नदी
या नात्याने शेकडो वर्षे तुंचे जीवन फुलवण्याचे कार्य
माझ्या
काठावर मंदिरे, घाट, तुमची वस्ती यांमुळे मी तृप्त
विविध
कामांसाठी माझा उपयोग
माझ्या
काठावर दिवसेंदिवस तुमची वाढती नगरे
घरातील
कचरा, कारखान्यांतील दुषित पाणी, सांडपाणी यांनी माझे पाणी दुषित
तुम्हाला
पाणी मिळावे, वीज मिळावी म्हणून माझ्यावर धरणाचा भार
धरणीकंपाच
धोका
विस्थापित
लोकांची दुःखे
संपूर्ण
मानवी जीवन सुखी करण्याचा विचार महत्वाचा.
शेवट.]