पिंजऱ्यातील बिबळ्याचे मनोगत निबंध | Pinjaryatil bibalyache mnogat

पिंजऱ्यातील बिबट्याचे मनोगत बिबळ्या ची आत्मकथा बिबळ्याचे मनोगत पिंजऱ्यातील प्राण्यांची आत्मकथा मराठी निबंध दहावी बारावी मराठी निबंध आत्मकथनात्मक निब
Admin

पिंजऱ्यातील बिबळ्याचे मनोगत


पिंजऱ्यातील प्राण्यांची आत्मकथा मराठी निबंध 
दहावी बारावी मराठी निबंध 
आत्मकथनात्मक निबंध  

बिबळ्याचे मनोगत 



               दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या शाळेची सहल निघणार असल्याचे आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितले.  या वर्षीच्या सहलीचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे पक्षी आणि  प्राणी संग्रहालये पाहणे.  ठरल्याप्रमाणे सहलीच्या दिवशी आम्ही इतर ठिकाणे पाहून प्राणिसंग्रहालयात पोहोचलो आत मध्ये प्रवेश करताच प्राण्यांचे मोठ - मोठाले पिंजरे समोर येत होते . आम्ही कोल्हा पहिला,  सिंह पहिला आणि पुढे बिबळ्याचा पिंजरा समोर जाऊन थांबलो.  त्या पिंजऱ्यामधील बिबळ्याचे निरीक्षण करून पुढे निघताच माझ्या कानावर त्रासलेल्या  आवाजात कोणीतरी हाक मारण्याचा आवाज आला मी  मागे वळून पाहिले तर त्या बंदिस्त पिंजऱ्यातील बिबळ्या माझ्याशी बोलत होता.  


पिंजऱ्यातील बिबट्याचे मनोगत  बिबळ्या ची आत्मकथा  बिबळ्याचे मनोगत  पिंजऱ्यातील प्राण्यांची आत्मकथा मराठी निबंध  दहावी बारावी मराठी निबंध  आत्मकथनात्मक निबंध   Bibalyachi aatmahatya marathi nibandh Bibalyachi aatmakatha  Pinjaryatil biblyachi aatmakatha  Marathi nibandh 10 वी 12वी मराठी निबंध

पिंजऱ्यातील बिबळ्याचे मनोगत निबंध | Pinjaryatil bibalyache mnogat



               अरे मित्रा आज तुम्ही सर्वजण आम्हाला बघायला आला आहात ना . रोज अशी कितीतरी माणसे येथे येतात आमचे फोटो काढतात, थोडा वेळ आमच्या पिंजरा समोर रेंगाळतात आणि पुन्हा निघून  जातात पण कोणीही आमची मनोवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही माझा जन्म होऊन काही वर्षे लोटली. माझा जन्म या बंदिस्त पिंजऱ्यात झाला लहानपणी मी खेळलो बागडलो आणि यातच माझे बालपण व्यथित  झाले.  


               तुम्हाला आम्हांला पाहून  खूप आनंद होतो.  तुम्हाला इकडे तिकडे फिरण्याचे  स्वातंत्र्य आहे.  पण आम्हाला येथे कसलेच . स्वातंत्र्य नाही;  एखाद्या कैद्याला ज्याप्रमाणे तुरुंगात बंद करून ठेवले जाते , त्याचप्रमाणे आम्हाला  या ठिकाणी ठेवले आहे ना काही मनाप्रमाणे आवडीचे खाद्य खाण्याचे स्वतंत्र ना मनाप्रमाणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य.  माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या मित्रांना सुद्धा दुसऱ्या प्राणिसंग्रहालयात नेण्यात आले.  त्यांना जाताना बघून माझे अश्रू अनावर झाले होते. आता मी इथे  एटाच. आता मी येथे एक एकटाच अडकून पडलो आहे.


               जंगलात  हिरवागार निसर्ग त्या ठिकाणी शुद्ध आणि स्वच्छ वातावरण असते असे मी माझी आई सांगताना ऐकले होते. ती तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना मला सांगत असे जंगलात कोणतेच बंधन नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे हवे तिकडे फिरता येते, निसर्गाच्या कुशीत जगता येते पण हे सर्व माझ्यासाठी एखाद्या गोष्टीप्रमाणे आहे मला त्या जंगलातील स्वच्छंदी वातावरणाचा अनुभव नाही . पण या पिंजऱ्या बाहेरील जग खूपच सुंदर असेल याची मला खात्री आहे. या पिंजऱ्यात खायला पुरेसे अन्न मिळत नाही की मनाप्रमाणे फिरता येत नाही.  येथील लोक जे अन्न देतील तेच खायचे आणि या संग्रहालयात येणाऱ्या लोकांना फोटो काढता यावे त्यांनी आम्हाला पाहत पहावे म्हणून इकडून तिकडे फिरत राहायचे. असे गुलामगिरीचे जीवन चालू आहे.


               आता आहे असंही गुलामगिरीची जगणे नकोसे वाटू लागले आहे. आता मनमोकळेपणाने जगावेसे वाटू लागले आहे. माझा उतरत्या वयात तरी मला स्वच्छंदी जीवन जगायला मिळेल का? हाच मोठा प्रश्न आहे.  अरे मित्रा तू अजून लहान आहेस पण या देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे. असे प्राण्यांना बंद करून त्यांच्या जीवाशी खेळणे,  त्यांचा आनंद हिरावून घेणे बरे नाही. हे या माणसांना कधी कळणार कोण जाणे .  मी काय माझे गाऱ्हाणे सांगत बसलो आहे तुम्हालाही तुमच्या घरी जायला उशीर होईल . आता फक्त मला एकच आस  लागून राहिली आहे , ती म्हणजे स्वातंत्र्याची . होईन का मी स्वतंत्र ? स्वतंत्र जीवन मला पण जगता येईल का?



हा निबंध लिहीत असताना खालील दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.


[मुद्दे : 

प्राणिसंग्रहालयात बिबट्याचे दर्शन 

त्याच्या मनातील भावना

बालपण तुरुंगात 

कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य नाही 

जंगलातील स्वच्छंद वातावरणाचा अनुभव नाही 

गुलामगिरीचे जीवन 

स्वच्छंद जीवनाची ओढ 

स्वातंत्र्याची आस 

शेवट.]


हा निबंध खालील प्रमाणे देखील शोधू शकतात


पिंजऱ्यातील बिबट्याचे मनोगत 
बिबळ्या ची आत्मकथा 
बिबळ्याचे मनोगत 
पिंजऱ्यातील प्राण्यांची आत्मकथा मराठी निबंध 
दहावी बारावी मराठी निबंध 
आत्मकथनात्मक निबंध  
Bibalyachi aatmahatya marathi nibandh
Bibalyachi aatmakatha 
Pinjaryatil biblyachi aatmakatha 
Marathi nibandh
10 वी 12वी मराठी निबंध.
 



Thank you...



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.