पडक्या किल्ल्याची आत्मकथा
एका पडक्या किल्ल्याची आत्मकथा / पडक्या किल्ल्याचे मनोगत / पडक्या किल्ल्याचे मनोगत मराठी निबंध / किल्ल्याचे मनोगत निबंध / 10 वी निबंध pdf / 12 वी निबंध
छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! मराठी मनाचा मानबिंदू म्हणजेच रायगड! या रायगडाला भेट देण्याची इच्छा माझ्या मनात खूप वर्षांपासून होती. आणि योगायोग म्हणावा लागेल आमच्या शाळचीे वार्षिक सहल या वर्षी राजधानी रायगड किल्ल्यावर घेऊन जाण्याचे निश्चित झाले. रायगडाला भेटण्यासाठी माझे मन आतुर झाले होते. ठरल्याप्रमाणे आम्ही सहलीच्या दिवशी ताईकडे च्या भेटी साठी निघालो . काहीच तासात आम्ही राजधानीच्या पायथ्याशी पोचलो. पहिल्या पायरीचे दर्शन घेतले आणि गड चढू लागलो; तोच माझा कानावर धीरगंभीर आवाजात शब्द ऐकू आले.
![]() |
पडक्या किल्ल्याची आत्मकथा |
"अरे मित्रा, तू एवढ्या आतुरतेने मला भेटण्यासाठी आला आहेस. तुझे या राजधानीत स्वागतच आहे . हे दुसरे तिसरे कोणी नाही तर चक्क रायगडच माझ्याशी बोलत होता . रायगडाचे ते धीरगंभीर शब्द माझ्या कानावर पडत होते . अरे मित्रा, तुला सांगावेसे वाटते की तुझ्या सारखी माझ्यावर नितांत प्रेम करणारी माणसे खूपच कमी आहेत. बहुतांश लोक हे सहलीच्या निमित्ताने फिरायला येतात आणि या ठिकाणी धुमाकूळ घालतात. त्यामुळे या स्वराज्याच्या राजधानीत ते आले तरी त्यांचे माझ्याकडे जरासुद्धा लक्ष नसते. मी आता थकलो आहे. पण कित्येक क्षण या थकलेल्या हृदयात साठवून ठेवल्या आहेत. ज्या पर्वतावर माझी बांधणी करण्यात आली. ज्यावर मी कित्येक वर्षे मानाने उभा आहे. तो सह्याद्री पर्वत स्वातंत्र्याचा रखवालदार आहे. कित्येक गड-किल्ले आज सुद्धा त्याच्या अंगाखांद्यावर डौलाने उभे आहेत. आजवर झालेल्या कित्तेक हल्ल्यांना आणि आक्रमणांना या सह्याद्रीने थोपवून धरले आहे. या सह्याद्रीची भक्कम खांद्यावर उभे राहून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाचा प्रत्येक क्षण मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. प्रत्येक क्षण जपून ठेवला आहे.
"छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यावर जेव्हा स्वराज्याची राजधानी म्हणून माझ्या नावाची घोषणा केली, तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता छत्रपतींचा सहवास आपल्याला लाभणार या कल्पनेने मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते . पण त्या शूरवीराला कधी थोडावेळ उसंतच मिळाली नाही. छत्रपती कायमच अनेकविध कामांत गुंतलेले असायचे .
एक दिवस महाराजांनी या स्वराज्याचा, या जगाचा निरोप घेतला; आणि माझी सारी रयाच गेली. महाराज असताना युद्धाच्या वेळच्या तोफगोळ्यांची भीती मला कधीच वाटली नव्हती. पण नंतर घरभेदी माणसांची कटकारस्थाने डोळ्यांदेखत पाहून माझे मन विदीर्ण होत होते . महाराज देवा घरी गेल्यानंतर ते याठिकाणी यायचे आणि माझ्या शरीरावर हत्यारांनी घाव करून माझे शहरी खणुन काढायचे. त्यांना वाटायचे की महाराजांच्या वेळेचे धन आपल्याला या ठिकाणी सापडेल. पण त्या मुर्खांना कोठे माहित होते की, खरे धन महाराजांनी रयतेकडे सुपुर्द केले होते. ते अक्षय धन होते. ज्वलंत राष्ट्रभक्तीचे. पण ही गोष्ट अगदी फारच थोड्या लोकांना समजली.
शिवरामपंत परांजपे यांच्या दृष्टीने ते राष्ट्रभक्तीचे धन ओळखले होते . आणि त्याच्या प्रखर तेजाने ते दिपून गेले होते. गो. नी . दांडेकर यांना ते राष्ट्रभक्तीचे धन भावले होते . ब. मो. पुरंदरे हे या धनसंपत्ती ने तृप्त झाले होते . आज लोक त्यांनी बांधलेल्या आलिशान बंगल्यांना माझे नाव देतात पण , माझे नाव देऊन काय होणार? त्यासाठी राजांसारखी स्वराज्यनिष्ठा हवी, त्याच्यासारखे उज्वल चारित्र्य पण आज त्याचीच कमतरता आहे. आणि हीच माझी खंत आहे . व्यथा आहे . रायगडाचे मनोगत ऐकता ऐकता महाराजांच्या समाधीसमोर कधी आलो ते कळलेच नाही . तोच रायगडाचा मंदिर गंभीर आवाज ऐकायला येणे बंद झाला. आसवांच्या फुलांची ओंजळ महाराजांच्या चरणाशी वाहून मी त्या शूरविराच्या समाधीला वंदन केले.
मित्रांनो निबंध लिहीत असताना खालील दिलेल्या मुद्द्यांच्या अवश्य वापर करा.
[मुद्दे :
अतोनात प्रेम करणारी माणसे कमी
सहलीला येऊन मौजमजा करतात
स्वातंत्र्याचा रखवालदार
कित्येक आक्रमणांपासून स्वराज्याचे रक्षण
राजधानी म्हणून माझी निवड
जीवनाचे सार्थक झाले
अनेक माणसे भेटली प्रसंग पाहिले
युद्धाचे कधीही भय नव्हते
घरभेदयांच्या कारवायांनी हृदय विदीर्ण
राष्ट्रभक्तीचा ज्वलंत विचारांचा मी साक्षीदार
हेच राष्ट्रभक्तीचे विचार सर्वांपर्यंत पोहचले पाहीजेत
शेवट]