पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध | Pavsalyatil ek divas marahi nibandh

पावसाळ्यातील एक दिवस प्रसंग लेखन १०वी निबंध २०२१ Pavsalyatil ek divas Marathi nibandh Pavsalyatil ek divas prasng lekhn पावसाळ्यातील एक दिवस निबंध
Admin

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध 

 

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध / पावसाळ्यातील एक दिवस वर्णनात्मक निबंध / पावसाळ्यातील एक दिवस प्रसंग लेखन
१०वी निबंध २०२१ / Pavsalyatil ek divas Marathi nibandh / Pavsalyatil ek divas prasng lekhn

विद्यार्थी मित्रांनो १० वी च्या बोर्ड परीक्षेमध्ये खालील प्रमाणे प्रश्न विचारला जातो.

प्रश्न : खालील मुद्द्यांच्या आधारे  पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध पावसाळ्यातील एक दिवस वर्णनात्मक निबंध पावसाळ्यातील एक दिवस प्रसंग लेखन १०वी निबंध २०२१ Pavsalyatil ek divas Marathi nibandh Pavsalyatil ek divas prasng lekhn 10th standard essay in Marathi language
 

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध पावसाळ्यातील एक दिवस वर्णनात्मक निबंध पावसाळ्यातील एक दिवस प्रसंग लेखन १०वी निबंध २०२१ Pavsalyatil ek divas Marathi nibandh Pavsalyatil ek divas prasng lekhn 10th standard essay in Marathi language

चला तर निबंध पाहूया :..........



                    आजवर मी अनेकदा पावसाळी सहलींचा आनंद घेतलं आहे. दरवर्षी आम्ही पावसातून कुठे ना कुठेतरी फिरायला जातो. मात्र इतक्या आत्तापर्यंतच्या सहलींपैकी गेल्यावर्षीच्या पावसाळ्यातील एका दिवसाचा अनुभव मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.


                    शनिवार रविवार  लागोपाठ शाळेला सुट्टी आल्याने आम्ही कोंकणात राहणाऱ्या माझ्या मामाकडे जाण्याचा बेत आखला. मामाकडे गेल्याने मामा-मामी ही आनंदात होते. दुसऱ्या दिवशी मामाने आम्हांला गावाचे   दर्शन घडवले. पावसाचे दिवस असल्याने रिमझिम पावसाच्या सरी कोसळतच होत्या. परंतु डोंगरमाथ्यावर वसलेल्या मामाच्या गावाचे निसर्गसौंदर्य पाहायला मिळणार, पावसात भिजायला मिळणार याचा मला खूप आनंद झाला होता.


                    माझ्या मामाच्या गावाला जणू निसर्गाचे वरदानच लाभले आहे. जिकडे नजर जाईल तिकडे हिर्वालाच हिरवळ पसरलेली होती. डोंगरावरून खली जाणारी वळणावळणाची नागमोडी वाट उतरत आम्ही डोंगराच्या पायथ्याशी गेलो. गावाजवळ असलेल्या धबधब्याला अनेक पर्यटक वर्षभर भेट देतात, पण खासकरून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील निसर्गसौंदर्य पाहून मन अगदी तृत्प होऊन जाते. निसर्गराजा अगदी प्रसन्न होऊन आपले जलवैभव या ठिकाणी ओतत असतो. अनेक पर्यटक शहरातून येथे येतात आणि पाण्यात भिजून आपला थकवा दूर करतात. मी ही डोंगरावरून कोसळणाऱ्या त्या फेसाळळेल्या पाण्यात डुंबायचा मनमुराद आनंद  लुटला.


                    निसर्गरम्य कोकणच्या कुशीत वसलेल्या या गावाला आंबा, काऊ यांचे वरदान लाभलेले आहेच पण त्याव्यतिरिक्त, हिरडा, जांभूळ, अंजनी यांसारख्या औषधी झाडांनीही हा भाग समृद्ध आहे. पावसाचे दिवस असल्याने या ठिकाणी कोणत्या फळाचा आनंद लुटता नाही आला परंतु डोंगरावर पावसातून हिंडताना इतकी रंगीबेरंगी पाने , फुले , पक्षी,झाडे दिसतात की काय पाहू आणि काय नको असे होते. मी यावेळी अनेक निसर्गदृश्ये माझ्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात टिपली.


                    पावसात फिरण्याचा मनमुराद अंड लुटून घरी येत असताना एका घटनेमुळे हा दिवस आतावार्पन्ताच्या आठवणीतील एक अविस्मरणीय दिवस बनला. मामाच्या घरी परतत असताना हिरव्यागार माळरानावर आपला राष्ट्रीय पक्षाचे म्हणजेच मोरांचे दर्शन झाले. दोन मोर थुईथुई नाचत होते. त्यावेळच्या त्या दृश्याने माझ्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यांचा तो नाच मी माझ्या मोबाईलद्वारे चित्रित करून आठवण म्हणून जपून ठवल अआहे असा हा पावसाळ्यातील एक दिवस माझ्यासाठी एक कधी न विसरत येणारा असा अविस्मरणीय दिवस बनला.

 

निबंध  लिहित असताना समाविष्ट करायचे मुद्दे:

[मुद्दे:

पावसात भिजण्याचा आनंद

ठिकाणाचे वर्णन

हिरवीगार वनराई

प्रवासातील गमती जमती

आनंदाचे क्षण

पावसाळ्यातील तो दिवस अविस्मरणीय ठरण्याचे कारण

शेवट.]

 

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध
पावसाळ्यातील एक दिवस वर्णनात्मक निबंध
पावसाळ्यातील एक दिवस प्रसंग लेखन
१०वी निबंध २०२१
Pavsalyatil ek divas Marathi nibandh
Pavsalyatil ek divas prasng lekhn
10th standard essay in Marathi language

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.