प्रश्न समाजातील वृद्धांचा
बदलत्या जीवन पद्धतीनुसार समाजाला रोज नवनव्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. आज समाजाला वृद्धांचा प्रश्न भेडसावत आहे. आज वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाल्याने तसेच विविध संशोधनांमुळे मानवाने विविध प्रकारच्या आजारांवर योग्य ती औषधे शोधून काढली आहेत. त्यामुळे आज माणसाची आयुमर्यादा वाढत चालली आहे; परिणामी समाजामध्ये वृद्धांच्या संख्येमध्ये देखील वाढ झाली आहे. प्राचीन काळापासून आपल्या समाजात चालत आलेली संयुक्त कुटुंबव्यवस्था लोप पावत चालली आहे. आज सर्वत्र चौकोनी कुटुंब पाहायला मिळते. त्यामुळे वृद्धांचा प्रश्न समाजापुढे प्रकर्षाने उभा राहतो. या व्यतिरिक्त अजून एक कारण म्हणजे आपल्या देशातील उच्चशिक्षण घेतलेले तरुण हे परदेशात स्थायिक होतात आणि त्यामुळे त्यांच्या वृद्ध मातापित्यांचा प्रश्न निर्माण होतो.
पूर्वी संयुक्त कुटुंबव्यवस्थेमध्ये एका घरामध्ये खूप माणसे असत. त्यामुळे घरातील वृद्ध, आजारी माणसांची काळजी घेत असत. आपलेपानाची भावना कुटुंबात असे, त्यामुळे या सर्व गोष्टी जिव्हाळ्याने केल्या जात असत. आज समाजात पहिले तर प्रत्येक कुटुंबामध्ये मोजकीच माणसे असलेली पाहायला मिळतात. घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया सुद्धा नोकरीसाठी घराबाहेर पडतात. आज इतकी धावपळ पाहायला मिळते की, घरामध्ये असणाऱ्या लोकांनाच एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही, एवढेच काय तर साधी चौकशी करायला देखील वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये छोट्या घरामध्ये माणसाची ‘अडगळ’ होते. या धकाधकीच्या जीवनात घरातील वयस्कर माणसांना साधा वेळही देता येत नाही. मग या वृद्धांना वृद्धाश्रमामध्ये भरती केले जाते.
आज साऱ्या समाजाने वृद्धाश्रम
मान्य केला आहे. पण समाजापुढे आज एक नवा प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे या
वृद्धाश्रमांची जबाबदारी कोणी घ्यायची?आज समाजामध्ये वृद्धाश्रमांची संख्या ही
झपाट्याने वाढत चालली आहे. वृद्धाश्रमातील लोकांची काळजी घेण्याचे काम हे जर पगारी
नोकरांवर सोडले तर त्यांच्या त्या कामामध्ये जिव्हाळा, आपलेपणा उरत नाही. खर पहिले
तर बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व हा निसर्गनियमच आहे. आपल्या कुटुंबातील वृद्धांकडे दुर्लक्ष करत असताना आजची तरुण पिढी
एक गोष्ट विसरते ती म्हणजे काही कालांतराने त्यांनाही या अवस्थेतून जावे लागणार
आहे. काही वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांची नीटनेटकी काजळी घेतली जाते परंतु त्या
काळजीमध्ये मायेच्या , जिव्हाळ्याच्या माणसांचा अभाव असतो. वृद्धाश्रमातील ही
माणसे मायेच्या एका शब्दासाठी आसुसलेली असतात.
माणसाच्या मनाची ही स्थिती ओळखूनच बाबा आमटे यांनी आनंदवनामध्ये ‘उत्तरायण’बांधले
आणि त्याच्या सावलीतच निराधार आणि अंध मुलांसाठी ‘मुक्तांगण’ उभे केले. थकलेल्या,
सूरकुतलेल्या पण अनुभवी अशा हातांमध्ये कोवळे हात सोपवून दिले.
आज शहराशहरांतून ‘जेष्ठ नागरिक
संघ’ स्थापन करण्यात आले आहेत. ते वेळोवेळी एकत्र जमतात, आनंदसोहळे साजरे करतात
आणि ‘एकमेकां साह्य करू | अवघे धरू सुपंथ |’ अशी त्यांची वृत्ती असते. अशा या
निकोप प्रयत्नांतून समाजातील वृद्धांचे प्रश्न सुलभ होत आहेत, हेही नसे थोडके!
खाली दिलेल्या मुद्द्यांचा
निबंध लिहिताना उपयोग करा.
[मुद्दे:
वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाच्या
आयुर्मानात वाढ
वृद्धांच्या संख्येत वाढ
संयुक्त कुटुंबामध्ये वृद्ध,
आजारी, अपंग यांची काळजी घेतली जाई
चौकोनी कुटुंब
स्त्री-पुरुष दोघेही नोकरीसाठी
घराबाहेर
अपुरा वेळ
वृद्धांकडे लक्ष देणे अशक्य
अडगळ
वृद्धाश्रमांची कल्पना
वृद्धांना भावनिक सहवासाची गरज
बाबा आमटे यांनी सुरु केलेले वृद्धांसाठी
‘उत्तरायण’ आणि बालकांसाठी ‘मुक्तांगण’
जेष्ठ नागरिक संघ
वृद्धांचे प्रश्न थोडे सुलभ
शेवट]