BUY PROJECT PDF Click Here!

परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास पर्यावरण प्रकल्प | Parisaratil pinyachya panyacha puravtha karnarya pranalaicha abhyas evs project

पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी प्रकल्प कार्यपद्धती प्रकल्प प्रस्तावना 11th 12th paryavarn prakalp Marathi पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास पर्यावरण प्रकल्प 


परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प
परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास प्रकल्प ११वी १२वी
पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी प्रकल्प कार्यपद्धती प्रकल्प प्रस्तावना 
11th 12th paryavarn prakalp Marathi 
Parisaratil pinyachya panyacha puravtha karnarya pranalicha abhyas prakalp
Paryavaran prakalp pdf hava pradushan



प्रश्न:

तुमच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास करा. पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत कोणता आहे, पाणी कोठे शुद्ध केले जाते, तसेच सांडपाण्याचा निचरा कसा होतो या मुद्द्यांचा समावेश करा.


प्रस्तावना


          आपल्या घरापर्यंत तसेच आपल्या परिसरामध्ये रोज नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो.  जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा पाण्याचा तुटवडा जाणवतो तेव्हा परिसारत तसेच आपल्या घरापर्यंत पाणी पोहचवणाऱ्या  नळांद्वारे पाणी पुरवठा बंद होतो आणि पाण्याच्या ट्रकने पाणी पुरवठा केला जातो. आपल्या घरापर्यंत पाणी येण्यासाठी कोण कोणत्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. कशा प्रकारे पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहचवले जाते याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणे महत्वाचे आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरात येणाऱ्या पाणी हे कोणत्या स्त्रोतापासून येते. पाणी स्त्रोतापासून मिळाल्यावर त्यावर कोण कोणत्या जलशुद्धीकरणाच्या प्रक्रिया केल्या जातात. आणि पाण्याचा वापर करून झाल्यावर तयार झालेल्या सांडपाण्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते याबाबत सविस्तर माहिती आपण या ‘परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास’ प्रकल्पाच्या माध्यमातून घेणार आहोत.

परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी प्रकल्प कार्यपद्धती प्रकल्प प्रस्तावना  11th 12th paryavarn prakalp Marathi  Parisaratil pinyachya panyacha puravtha karnarya pranalicha abhyas prakalp Paryavaran prakalp pdf hava pradushan



अनुक्रमणिका



अ.क्र.

घटक

१)

प्रकल्प विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

पाण्याचे स्त्रोत

४)

जलशुद्धीकरण प्रक्रिया   

५)

सांडपाण्याचा निचरा

६)

प्रकल्प विश्लेषण

७)

प्रकल्प निष्कर्ष

८)

संदर्भ




विषयाचे महत्व


आपल्या परिसरात आपल्या घरात येणारे पाणी हे कोणत्या स्त्रोतापासून येते. जलस्त्रोतापासून मिळणाऱ्या पाण्यावर कोण कोणत्या प्रक्रिया केल्या जातात. या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना केल्या जातात यांची सविस्तर माहिती आपण करून घेणे महत्वाचे आहे. पाण्याचे सुद्धीकरण केल्यावर हे पाणी सर्व घरांपर्यंत पोहचवले जाते. परंतु हे पाणी वापरून झाल्यावर त्या सांडपाण्याचा निचरा  योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे जर सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे केला गेला नाही तर आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरते. परिणामी विविध प्रकारच्या आजारांचा फैलाव होतो. म्हणून परिसरातील सांडपाण्याचा निचरा कशा प्रकारे केला जातो याबाबत सविस्तर माहिती मिळविणे गरजेचे आहे. जर उपाय योजनांची कमतरता असेल तर त्याची योग्य प्रकारे पूर्तता करणे महत्वाचे आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर असे लक्षात येते की परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास करणे हा विषय अधिक महत्वाचा आहे.


प्रकल्प उद्दिष्टे 

 

       परिसरातील पाण्याचे स्त्रोत कोणते आहेत याची माहिती मिळविणे ..

       परिसरात येणाऱ्या पाण्यावर कोणत्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया केल्या जातात याबाबत माहिती मिळविणे.

       जलशुद्धीकरणाची संकल्पना जाणून घेणे.

       परीसरातील सांडपाण्याचा निचरा कसा केला जातो याबाबत सविस्तर माहिती मिळविणे.

परीसातील पाण्याचा प्रणालीचा सविस्तर अभ्यास करणे.



प्रकल्प कार्यपद्धती


परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यासहा प्रकल्प करीत असताना मी प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा उपयोग केला तसेच इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून प्रकल्पाची माहिती संकलित केली. प्रकल्पाच्या विषयानुसार परीसात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रणालीचा अभ्यास करत असताना. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कोणते आहेत त्याचप्रमाणे जलशुद्धीकरणाच्या पद्धती याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी   मी मुलाखत, प्रश्नावली व क्षेत्रभेट या कार्यपद्धतीचा अवलंब केला.

या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्यासाठी मी परिसरातील काही व्यक्तींना प्रश्नावली द्वारे परिसरातील पाण्याच्या प्रणालीबाबत प्रश्न विचारण्यात आले. आणि त्या माहितीचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर जवळच्या पाणी शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तेथे काम करणाऱ्या लोकांची मुलाखत घेऊन प्रकल्पासाठी आवश्यक ती माहिती मिळविली. अधिक माहिती मिळविण्यासाठी जलसुरक्षा   विषयक पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्नावलीतून तयार झालेल्या  मुद्यांबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले.

तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.




पाण्याचे स्त्रोत

 

पृथ्वीच्या भूपृष्ठावर पाण्याचे अनेक स्त्रोत आहेत. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी हे प्रत्येक ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार डोंगर माथा – ओहोळ – झरे,  ओढे, नाले –नदी, समुद्र-महासागर, या पद्धतीने प्रवास करीत असते.

 

धरणे, बंधारे , तलाव


आमच्या भागात येणाऱ्या पाण्याचे धरणे, तलाव, बंधारे हे प्रमुख स्त्रोत आहेत. पावसाचे नद्यांमधून वाहून  जाणारे पाणी हे धरणे, तलाव तसेच बंधाऱ्यात अडवले जाते. हे सर्व तलाव, धरणे आणि बंधारे हे मानवनिर्मित आहेत. पावसाळा संपल्यानंतर सर्वांना पाण्याचा पुरवठा नियमित करता यावा म्हणून यांची निर्मिती करण्यात आली आहे.

 

योग्य पाणलोट क्षेत्राची निवड करून, धरण बांधणीसाठी योग्य जागा निश्चित करून या धरणाची निर्मिती केली गेली आहे. धरणाची निर्मिती करत असताना पाण्याची एकूण गरज, पर्जन्यमान, पाणलोटाची क्षमता यांसारख्या गोष्टी विचारात घेऊन या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. आमच्या परिसराला पुरेल इतका पाणीसाठी या धरणामध्ये दरवर्षी असतो. या धरणातील पाणी पाईप लाईन द्वारे आमच्या विभागाला पोहोचवण्यात येते. त्यामुळे पाण्याचा प्रमुख स्त्रतो धरण हा आहे.

 

 

जलशुद्धीकरण प्रक्रिया.



जलशुद्धीकरण संकल्पना:



पाणी किती मर्यादेपर्यंत शुद्ध करावे हे त्या पाण्याच्या वापरावर अवलंबून असते. जसे: घरात वापरासाठी पाणी ही रंगहीन, वासहीन, चांगल्या चवीचे आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असणे गरजेचे आहे. तसेच उद्योगांमध्ये वापरले जाणारे पाणी हे उत्पादन यंत्रणेवर अनिष्ट परिणाम करणारे आणि तयार केल्या जाणाऱ्या मालाचा दर्जा बिघडवणारे असता कामा नये. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये पिकांना हानिकारक असणारे घटक असता कामा नयेत.  जलाशयातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यामध्ये अनेक प्रकारची खनिज द्रव्ये, कार्बनी संयुगे, अळ्या आणि सूक्ष्मजंतू  आढळतात. यामुळे पाणी दुषित होऊन अनेक रोगांचा फैलाव होण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे कारखान्यात वापरले जाणारे पाणी हे विशिष्ट दर्जाचे असावे लागते यासाठी पाण्याच्या शुद्धीकरणाची गरज भासते. ज्या पाण्यामध्ये फ्लोराईड चे प्रमाण जास्त असते ते पाणी लहान मुलांच्या दातांवर अनिष्ट परिणाम घडवून आणते. या सर्व कारणांमुळे पाणी शक्य तितके स्वच्छ, आरोग्यासाठी लाभदायक आणी पिण्यासाठी योग्य अशा हेतूने शुद्ध करण्यात येते.

 

जलशुद्धीकरण प्रक्रिया.


पाण्याचे वितरण करण्यापूर्वी पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये त्यात विविध प्रकारची रसायने टाकून घुसळले जाते. त्यानंतर हे पाणी गाळून घेतले जाते. पाण्यात असलेले कार्बनडायओक्साईड, HS , पाण्याला दुर्गंधी व पाण्याची चव बदलणारे पदार्थ, त्याचप्रमाणे पाण्यातील बाष्पनशील पदार्थ जसे: क्लोरोफोर्म, लोह यांसारखी संयुगे पाण्यातून काढून टाकण्यासाठी पाण्यात वायू मिश्रण केले जाते. या प्रक्रियेचा वापर भूगर्भातील पाणी शुध्द करून त्यात जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिसळण्यासाठी केला जातो. पाण्यातील कार्बन डाय ओक्साईड चे प्रमाण कमी केल्याने त्याचा संपर्कात येऊन गांजणाऱ्या वस्तूंचे प्रमाण कमी होते. यानंतर त्या पाण्यामध्ये जंतुनाशके टाकून शुद्ध केले जाते. शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विविध चाचण्या घेऊन त्याची गुणवत्ता तपासली जाते. पूर्णपणे शुद्ध झालेले हे पाणी उंचावरील टाक्यांत साठवले जाते. या टाक्यांतून मुख्य जलवाहिनी, उप्वाहिनी आणि नळजोडणी या प्रकारे पाणी प्रत्येक घरामध्ये पोहचवले जाते.

 

सांडपाण्याच्या निचरा.



सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी परिसरामध्ये पुढील उपाययोजना केल्या जातात.

१)परसबागेकडे पाणी वळवणे:

घरात तयार होणाऱ्या सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे असते.  परिसरातील घरांत निर्माण होणारे सांडपाणी हे परसबागेला सोडले जाते. परिसरातील बहुतांश घरामागे एक परसबाग तयार केली गेली आहे. त्या ठिकाणी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते आणि या भाज्यांचा वापर घरात खाण्यासाठी केला जातो.

 

२) शोषखड्डे तयार करणे:

परिसरातील ज्या घरांच्या परिसरात परसबाग नाही त्या ठिकाणी घरात निर्माण होणारे सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शोषखड्डे खणले जातात. आणि त्यामध्ये घरातील सांडपाणी सोडले जाते. या खड्ड्यांत सोडलेले पाणी हे जमिनीत मुरते. अशा प्रकारे पाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका टळतो.

 

३) पाणी गटारांत सोडणे:

परिसरात असणाऱ्या मोठ्या इमारतींचे पाणी हे उघड्यावर न सोडता ते रस्त्याच्या गटारांत सोडण्याची व्यवस्था केली गेली आहे. इमारतींच्या सांडपाण्याचे पाईप हे गटारांना जोडले गेले आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो.



निष्कर्ष



ü परिसरातील पाण्याचे स्त्रोत कोणते आहेत याची माहिती मिळवली.  

ü परिसरात येणाऱ्या पाण्यावर कोणत्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया केल्या जातात याबाबत माहिती मिळवून तिचे संकलन केले.

ü जलशुद्धीकरणाची संकल्पना जाणून घेतली  

ü परीसरातील सांडपाण्याचा निचरा कसा केला जातो याबाबत सविस्तर माहिती मिळवून तिचे संकलन केले.

ü परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा सविस्तर अभ्यास करणे.

 

संदर्भ

 

v Educationalमराठी (www.educationalmarathi.com)

v माझा अभ्यास (www.mazaabhyas.com)

v पर्यावरण पुस्तिका

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

प्रकल्पाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा 

अजून पर्यावरण विषयाचे प्रकल्प पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

पर्यावरण जल सुरक्षा प्रकल्प ११वी १२ वी 
Paryavarn jalsuraksha parakalp 11th 12th marathi 

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.