हिमालयाची आत्माकथा
हिमालयाची आत्मकता / आत्मकथनात्मक निबंध / हिमालयाचे मनोगत मराठी निबंध / Himalayachi aatmakatha Marathi nibandh / Himalayache manogat Marathi nibandh
हो, मी हिमालय बोलतोय – जगातील सर्वात उंच पर्वत, भूलोकाचा स्वर्ग आणि देवी देवतांचे निवासस्थान जेथे आहे तो हिमालय. भारतीय संस्कृतीचा उगम माझ्यापासूनच झाला. भारताचा इतिहास हा माझा इतिहास आहे, भारताचा गौरव हाच माझा देखील गौरव आहे.
भारताच्या उत्तरेला २२०० मैल
इतक्या मोठ्या प्रदेशावर मी पसरलो आहे. कित्येक वर्षांपासून मी भारताचे रक्षण करत
आलो आहे. एकदा चीन ने भारतावर आक्रम केले होते. परंतु या महान देशाने चीनला जशाच
तसे उत्तर दिले होते. उत्तर दिशेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांना भारतात
येण्यापासून मी थांबवतो. मी नसतो तर भारताची स्थिती आज काही वेगळीच पाहायला मिळाली
असती! खरंच, मी भारताचा पहारेदार आहे, रक्षक आहे.
माझ्या डोक्यावर बर्फाचा सुंदर
मुकुट आहे. एव्हरेस्ट, कंचनजंघा , नंदादेवी इत्यादी शिखरे ही माझी मुख्य शिखरे
आहेत. यामध्ये एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे. शेरपा तेनसिंह नोर्के आणि एडमंड
हिलेरी यांनी या सर्वात उंच शिखरावर सर्वप्रथम सर करून एक विक्रम स्वतःच्या नावावर
करून घेतला होता. त्यांच्या धैर्याचा मला अभिमान वाटतो. माझ्या वनांमध्ये हजारो प्रकारच्या
औषधी वनस्पती आणि इतरप्रकारची वनसंपत्त्ती आढळते. माझ्याच सावलीत सिमला, मसुरी,
नैनिताल, दार्जीलिंग इत्यादी थंडअसणारी शहरे वसली आहेत. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा
यांसारख्या नद्यांचा उगम माझ्यापासूनच होतो.
मीच या भारतीय संस्कृतीचा पिता
आहे. आर्यांचे आदिस्थान सुद्धा मीच आहे. हृषी मुनींनी या ठिकाणीच साधना केली होती.
रघुकुळातील अनेक राजांनी माझ्याच अंगणात तपश्चर्या केली होती. वाल्मिकी ऋषींनी
लिहिलेले रामायण असो वा महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेले महाभारत असो हे दोन्हीही ग्रंथ माझ्याच कुशीत
लिहिले गेले होते.
मी इतका थंड आहे की या जगातील सारी
सुख दुखः माझ्यामध्ये सामावू शकतात. मी इतका शीतल आहे की सर्व प्रकारच्या चिंतेचा
अग्नी मी शांत करू शकतो.
हजारोवर्षांपासून भारतीयांशी माझा
अतूट संबंध आहे. अख्ख्या जगाला ओरडून सांगा की हा हिमालय आमचा आहे. ‘घाबरू नका, मी
तुमच्या सेवेसाठी, रक्षणासाठी सदैव उभा आहे.
निबंधामध्ये खालील मुद्दे
सुद्धा समाविष्ट करा.
[मुद्दे:
प्रस्तावना
भारताच्या उत्तरेकडील सीमेचा
रक्षक
समृद्धीचा खजिना
भारतीय संस्कृतीचा पिता
हिमालयाचे महत्व
आणि महानता
इच्छा
शेवट]
✏✏✏✏✏✏✏✏✏✏