रात्र झाली नसती तर......
रात्र झाली नसती तर मराठी निबंध / रात्र झाली नसती तर निबंध / कल्पनात्मक निबंध / रात्र झालीच नाही तर मराठी निबंध / Ratra zalich nahi tar Marathi nibandh / Ratra zalich nahi tar..
एक
दिवस मी घराच्या खिडकीत बसून रात्रीचे आकाश न्याहाळत असताना अचानक माझ्या मनात
विचार आला की, रात्र झालीच नसती तर........ तर काय झाले असते? दिवस किती मोठा झाला
असता ? माणसाने आराम कधी केला असता? या सारखे अनेक प्रश्न माझ्या मनात येऊ लागले
आणि माझे मन याच कल्पनाविश्वात रमून गेलो.
रात्रीचा
प्रहर हा विश्रांतीचा प्रहर आहे. सारी सजीवसृष्टी या वेळी गाढ झोपेत असते.
दिवसभरातील थकावट, चिंता, संघर्ष आणि साऱ्या गोंधळापासून काही तास तरी माणसाला
विश्रांती मिळते. झोपेत आपल्याला असे वाटते की आपण कोणत्या तरी दुसऱ्याच लोकात आलो
आहोत. रात्रीचे शांत रस्ते सुद्धा मनाला एक विशेष प्रकारचा आनंद देत असतात. रात्र
झालीच नसती तर माणसाला विसावा कधी मिळाला असता? रात्र येते आणि साऱ्या सृष्टी
काळ्याकुट्ट अंधारात न्हाऊन जाते. त्यामुळे प्रकाशाअभावी माणूस विश्रांती घेत
असतो.
भर
दुपारी असणारी सूर्याची उष्णता म्हणजे आकाशातून जणू आगीचे लोळच धरतीवर येत आहेत
असे वाटते. अशातच जर रात्र झालीच नसती तर सूर्याच्या या दाहकतेचे साऱ्या सृष्टीवर
काय परिणाम झाले असते? साऱ्या सजीवसृष्टीला कोण कोणत्या समस्यांचा सामना करावा
लागला असता? सारे चित्र काही वेगळेच असते.
रात्र
झालीच नसती तर आपल्याला लुकलुकणारे तारे कसे काय दिसले असते? शुक्रताऱ्याचे उज्वल
सौंदर्य आपण कसे पहिले असते. आणि आपल्या चंदोबाबाचे दर्शन कसे काय झाले असते? रात्र
नसती तर लोकांना चांदण्यांची नावे देखील माहित पडली नसती. कवींची लेखणी थांबली
असती. चंद्राविना चाकोराची काय हालत झाली असती? रात्र नसतीच तर दिव्यांची रोषणाई
असणारा सण दिवाळी कोणी साजरा केला असता.
रात्र
झालीच नसती तर चोरांना चोरी करण्याची संधीच मिळाली नसती. आज थंडीच्या दिवसांत
रात्री गरीब लोक थंडीने कुडकुडत असतात रात्र नसतीच तर त्यांच्यावर ही वेळ आलीच
नसती. पहारा देणाऱ्या लोकांना रात्रीची जागरण करावी लागली नसती. रात्र नसती तर
सरकार ला सर्व रस्त्यांवर विद्युत दिव्यांवर खर्च करावा लागला नसता आणि हा सगळा
विजेचा खर्च दुसऱ्या कोणत्यातरी कामावर करता आला असता. बिचाऱ्या विद्यार्थ्यांना भूगोल शिकत असताना
दिवस आणि रात्र का होतात? दिवस कधी मोठा असतो आणि कधी लहान असतो , कोणत्या ठिकाणी
सहा महिन्याची रात्र आणि सहा महिन्याचा दिवस असतो हे समजून घेण्यासाठी डोक्याला
ताण द्यावा लागला नसता.
परंतु
या सर्व फायद्यांपुढे रात्रीची किंमत काही कमी झाली नसती. रात्र नसती तर आपले जीवन
अपूर्ण राहिले असते. रात्रीचा मिळणारा आनंद, रात्रीची शांतता आपले जीवन अधिक सुखकर
बनवते. म्हणून आपल्या जीवनात रात्रीचे महत्व खूप जास्त आहे.
निबंध
लिहित असताना खालील मुद्द्यांचा अवश्य वापर करा.
[मुद्दे:
रात्र
न होण्याची कल्पना
विश्राम
करण्याची वेळ म्हणजे रात्र
सूर्याचे
साम्राज्य नसते.
रात्रीची
सुंदरता पाहायला मिळाली नसती
रात्र
न होण्याचे काही फायदे
शेवट
]