BUY PROJECT PDF Click Here!

मिश्र पिकशेती प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | Mishra piksheti prakalp 11th 12th envionmental project pdf

मिश्र पिकशेती प्रकल्प / मिश्रपिकशेती प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प / पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी pdf / Mishrapiksheti prakalp 11th 12th / Paryavar
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 मिश्र पिकशेती प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी 


मिश्र पिकशेती प्रकल्प / मिश्रपिकशेती प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प / पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी pdf / Mishrapiksheti prakalp 11th 12th / Paryavarn prakalp 11vi 12vi prakalp pdf 


मिश्र पिकशेती प्रकल्प / मिश्रपिकशेती प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प / पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी pdf / Mishrapiksheti prakalp 11th 12th / Paryavarn prakalp 11vi 12vi prakalp pdf


मिश्र पिकशेती प्रकल्प प्रस्तावना


एकाच वेळी एकाच शेतीक्षेत्रामध्ये दोन  किंवा जास्त पिके घेणे या शेती पद्धतीला मिश्र पिक पद्धती  असे म्हटले जाते. पूर्वी या पद्धतीचा अवलंब जगात सर्वत्र केला जात असे. या पद्धतीचा फायदा म्हणजे या पिक पद्धतीमधील जर एखादे जरी पिक काही करणारे चांगल्या प्रकारे येऊ शकले नाही तरीही सर्वच शेतीचे नुकसान होत नाही. त्या पिकाव्यतिरिक्त शेतात असणारी इतर पिके शेतकऱ्याला काही प्रमाणात उत्पन्न मिळवून देतात. केवळ पिकांचा सर्वनाश होण्याचा धोका टाळणे इतकाच मिश्रपिक पद्धतीचा उद्देश नसून योग्य नसून, जमीन, पाणी आणी सूर्यप्रकाश यांचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे करून शेतकऱ्याला अधिक चांगले उत्पन्न देखील मिळवता येते.

आज मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत चालली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणवर शेतीतून अन्नधान्याचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. परंतु वाढते शहरीकरण , औद्योगीकीरण यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या शेतजमिनीचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे कमी शेतीच्या क्षेत्रामध्ये मिश्र पिक पद्धतीने शेती केल्यामुळे कमी क्षेत्रात विविध प्रकारचे उत्पादन कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात घेता येते. त्यामुळे मिश्रपिक पद्धत अतिशय फायद्याची ठरते.

आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून  ‘मिश्रपीक शेती प्रकल्प’ याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. 

 


अनुक्रमणिका

अ.क्र.

घटक

पान नं.

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

 

४)

मिश्रपिकशेती संकल्पना

 

५)

मिश्रपिक पद्धतीचे प्रमुख उद्देश

 

६)

मिश्रपद्धतीचे स्वरूप व प्रकार:

 

७)

मिश्रपिक पद्धतीचे फायदे:

 

८)

मिश्र पीक पद्धतीचे तोटे

 

९)

निरीक्षणे

 

१०)

निष्कर्ष

 

११)

संदर्भ

 

हा प्रकल्प सुद्धा पहा: हवा प्रदूषण प्रकल्प  


                       
मिश्र पिकशेती प्रकल्प विषयाचे महत्व       

मिश्र पिकशेती म्हणजे काय  ? त्याची संकल्पना काय आहे हे जाणून घेणे आजच्या काळात खूप महत्वाचे आहे. आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केले आहे. या युगात आपल्या समोर अनेक संकटे ठाण मांडून बसलेली आहे. मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित अशा संकटांचा सामना करणे गरजेचे आहेत. वाढत्या लोकसंखेच्या काळात शेतीसाठी शेतकऱ्याला जमीन अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे कमी शेती क्षेत्रामध्ये मिश्रपिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्याला तुलनेने अधिक उत्पन्न मिळते.

कमी कमी जागेत जास्त उत्पादन घेणे हा मिश्रपिक पद्धती अवलंबण्याचा मुख्य उद्देश असतो.मिश्रपद्धतीचे विविध प्रकार पडतात.मिश्रपिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकऱ्याला मुख्य पिकाबरोबरच इतर लागवड केलेल्या पिकांच्या माध्यमातून अधून मधुन दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी पैसे मिळत राहतात. तसेच मिश्र पिक पद्धतीने शेती केल्याने शेत जमिनीची सुपीकता वाढून जमीन कसदार बनते. रोगांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो. अशा प्रकारचे मिश्र पिक पद्धतीने शेती करण्याचे अनेक फायदे आहेत.

मिश्रपिक पद्धतीने प्राचीन काळापासून शेती केली जात असली तरीही आज काही प्रमाणत याचे प्रमाण कमी दिसते. यामागचे कारण म्हणजे या प्रकारच्या शेतीबाबत पूर्ण माहिती नसणे. म्हणून मी मिश्रपिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीबाबत अधिक माहिती सर्वाना व्हावी म्हणून ‘मिश्रपिक शेती’ या प्रकल्पाची निवड केली आहे.

 


     मिश्र पिकशेती प्रकल्प प्रकल्पाची उद्दिष्टे


Ø मिश्रपीक शेती पद्धतीची  संकल्पना समजून घेणे.

Ø मिश्रपिक पद्धतीची शेती करण्यामागील  प्रमुख उद्देश काय आहे त्याबाबत माहिती मिळविणे.

Ø मिश्रपद्धतीचे स्वरूप व प्रकार जाणून घेणे.

Ø मिश्रपिक पद्धतीणे शेती केल्यावर शेतकऱ्याला आणि पर्यावरणाला कोण कोणते फायदे होतात याबबत अधिक माहिती जाणून घेणे.

Ø मिश्र पिक पद्धतीच्या फायद्यांबरोबरच मिश्र पीक पद्धतीचे तोटे कोणते आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेणे.

Ø मिश्रपीक शेती पद्धतीची  माहीती लोकांना करून देणे.



     मिश्र पिकशेती प्रकल्प प्रकल्प कार्यपद्धती


‘मिश्र पिकशेती प्रकल्प’ हा प्रकल्प करीत असताना प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखाचा उपयोग केला. तसेच परिसरातील शेतकऱ्यांची प्रश्नावलीद्वारे मुलाखत घेवून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे संकल करण्यात आले.  शेतकऱ्यांच्या मुलाखतींतून मिळालेल्या माहितीवर आधारित आणि शेतीविषयक पुस्तकांच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी करता यावी यासाठी मुद्दे तयार करण्यात आले.

तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.



मिश्रपिकशेती संकल्पना


मिश्रपीकपद्धत :     विविध प्रकारची पिके वेगवेगळ्या शेतांत घेण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात घेतली जातात या प्रकारे केल्या जाणाऱ्या शेती पद्धतीला मिश्र पीक पद्धत असे म्हटले जाते. या प्रकारच्या शेती पद्धतीत बहुतांशाने कडधान्याची पिके आणि तृणधान्याची पिके यांसारख्या पिकांचे मिश्रण असते. परंतु इतर प्रकारच्या पिकांची लागवड सुद्धा या प्रकारच्या पिक पद्धतीमध्ये केली जाते. सर्वसाधारणपणे या पद्धतीत एकावेळी दोन पिके लावतात पण काही वेळा तीन, चार अगर त्यापेक्षाही जास्त पिके घेतली जातात.मिश्र पिक पद्धतीचा जिरायती, बागायती, व कायम स्वरूपाच्या पीक-मळ्यांमध्ये अवलंब केला जातो. ही पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे.

हा प्रकल्प सुद्धा पहा:  भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प


मिश्रपिक पद्धतीचे प्रमुख उद्देश


(१) उपलब्ध शेतीच्या क्षेत्रातील जमीन, पाणी, खते आणि मजूर यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे.

(२) अवर्षण आणि रोग व किडीसारख्या प्रतिकूल परिस्थितीत होणारे संपूर्ण पिकांचे संभाव्य नुकसान वाचविणे .

(३) शेतजमिनीची सुपीकता वाढविणे.

(४) एकाच शेतामधून दैनंदिन जीवनात लागणारी पिके घेणे.

(५) रोजच्या खर्चासाठी लागणारे पैसे दुय्यम पिके विकून उभे करणे.

(६) रोग व किडींवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे.

 

मिश्र पिकशेती प्रकल्प / मिश्रपिकशेती प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प / पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी pdf / Mishrapiksheti prakalp 11th 12th / Paryavarn prakalp 11vi 12vi prakalp pdf 



मिश्रपद्धतीचे स्वरूप व प्रकार:


मिश्रपिक पद्धतीमध्ये एक प्रमुख पीक असते आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त दुय्यम पिके घेतली जातात. शेतीमध्ये दुय्यम पिके आणि मुख्य पिकांचे प्रमाण सारखेच नसते. काही शेतीमध्ये दुय्यम पिकांची मुख्य पिकांत अगदी तुरळक प्रमाणात लागवड केली जाते. तर काही ठिकाणी ते दुय्यम पिकाखालील क्षेत्र १५–२०% अगर त्याहून जास्त असते.

सर्वसाधारणपणे दुय्यम पिकांमध्ये पुढील पिकांचा समावेश केला जातो.  

(१) कुळीथ, मुग मटकी, हरभरा,तूर, उडीद यांसारखी कडधान्ये

(२) भुईमूग, एरंडी यांसारख्या तेलबियांपैकी

(३) कापूस, अंबाडी यांसारखी धाग्यांची पिके

(४) तसेच काही शेतीमध्ये भाजीपाल्याचा समावेश केला जातो.

 

मिश्र पीक पेरण्याच्या एका पद्धतीत मुख्य पिकाच्या बियांत दुय्यम एक अथवा जास्त पिकांचे बी विशिष्ट प्रमाणात मिसळून पाभरीने ओळीत अथवा फोकून पेरतात. या पद्धतीचा वापर मर्यादित प्रमाणात केला जातो. सर्वसाधारणपणे मुख्य पिकात दुय्यम पीक स्वतंत्र ओळीत पेरतात. या पद्धतीला ‘आंतर पीक पद्धत’ असेही नाव आहे. बागायती पिकांत मुख्य पिकाच्या पाण्याच्या पाटाच्या बाजूला अथवा वाफ्यात ठराविक अंतरावर दुय्यम पिकाची लागण करतात.

 

फळबागांतून मिश्र पीक पद्धत सर्वत्र आढळून येते. काही ठिकाणी नारळ, सुपारी, फणस, आंबा, पेरू व संत्रे यांची झाडे एकाच बागेत लावलेली आढळून येतात परंतु पुष्कळ ठिकाणी झाडे पद्धतशीरपणे लावलेली नसतात. काही बागांतून पद्धतशीरपणे केळी, सुपारी, पानवेली, वेलदोडे अशा तऱ्हेने लावतात की, बागेतील जागेचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. तसेच कॉफीच्या मळ्यात संत्रे अगर मिरवेलीची पद्धतशीरपणे लागवड केली जाते.

 हा प्रकल्प सुद्धा पहा: हवा प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी 


मिश्रपिक पद्धतीचे फायदे:

 

१)   कमी जागेत जास्त उत्पन्न:

ज्या ठिकाणी शेतीचे क्षेत्र लहान असते त्या ठिकाणी मिश्र पिक पद्धतीने शेती करणे फायद्याचे ठरते. स्वतःच्या दैनंदिन जीवनात शेतकऱ्याला लागणारी काही पिकांचे शेतकरी या शेतातून उत्पादन घेऊ शकतो.गुजरात प्रदेशात बाजरी या प्रमुख पिकासोबत अंबाडी,तूर, मूग, भेंडी, एरंडी अशा प्रकारच्या पिकांचे बीज मिसळून पेरले जाते. त्यामुळे त्या शेतातून शेतकऱ्याच्या गरजेपुरते उत्पन्न मिळते.  डोंगराळ भागामध्ये फिरत्या प्रकारची शेती करत असताना त्या ठिकाणी ही भात, मका, अळू, तीळ, घेवडे यांसारखी आवश्यक पिकांची लागवड करून मिश्रपिक पद्धतीने उत्पादन घेतले जाते.

२)   जमिनीची सुपीकता वाढते:

तृणधान्ये तसेच कडधान्ये यांचे मिश्रण करून शेती जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. दख्खन प्रदेशात बाजरीच्या तीन ओळींबरोबर तुरीच्या एका ओळीची लागवड केली जाते.विदर्भासारख्या प्रदेशात कापूस आणि तूर हे पिक मिश्र पिक पद्धतीने घेतले जाते.  कापूस व बाजरी ही पिके कमी कालावधीत तयार होत असल्यामुळे त्यांची तोडणी झाल्यावर तुरीच्या पिकला विस्तार करण्यास आवश्यक ती जागा मिळते. तुरीच्या झाडाच्या मुळांवर असणाऱ्या नायट्रोजनयुक्त गाठींमुळे जमिनीला नायट्रोजनचा पुरवठा होतो त्यामुळे जमिनीची पिक घेण्याची क्षमता सुधारते, जमीन सुपीक बनते.  बाजरी आणि तूर या मिश्र पिकांमध्ये पिकांसाठी लागणारा अन्नांश हा जमिनीच्या वेगवेगळ्या थरांतून घेतला जातो. बाजरीची मुळे जमिनीच्या वरच्या थरांतून अन्नांश घेतात तर तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे ती जमिनीच्या खालच्या थरातून अन्नांश घेतात. भाताच्या पिकामध्ये वालाचे पीक घेतात. भाताची कापणी केल्यावर वालाचे पीक जमिनीतील ओलीवर वाढते व ते कडधान्याच्या वर्गातील पीक असल्यामुळे जमीन कसदार बनते. ज्वारीच्या पिकात उडीद पेराल्याने, त्यात दोन उद्देश साध्य होतात. उडदाच्या पिकामुळे जमीन सुधारते व ज्वारीपेक्षा ते पीक लवकर तयार होत असल्यामुळे ते विकून खर्चासाठी पैसा मिळतो.

 

३)  आर्थिक नफा:

 

बागायती पिकात जी दुय्यम पिके शेतकरी लावतो त्यांपासून शेतकऱ्याला अधून मधून काही प्रमाणात पैसे मिळत राहतात. कोबी, नवलकोल, फुलवर, सालीट व बीट यांच्या मिश्र पिकात प्रथम नवलकोल, नंतर क्रमाने कोबी, बीट व फुलवर असे तोडे निघतात. यामुळे रिकामी पडली असती अशी जागा वापरली जाऊन पिकाच्या विक्रीमुळे अधूनमधून थोडी थोडी रक्कम शेतकऱ्याला मिळते.

 

 

 

४)पिकांवरील रोगांचे नियंत्रण:

पंजाब प्रदेशात कापसाच्या पिकावर पडणाऱ्या मूळकूज या रोगाचे अंशतः नियंत्रण करण्यासाठी कापसाबरोबर मटकीचे पीक घेण्याची शिफारस केली जाते. मटकीच्या पिकामुळे जमीन झाकली जावून त्यामुळे जमिनीचे तापमान कमी राहते आणि त्यामुळे मूळकूज रोगाचे अप्रत्यक्ष रीत्या नियंत्रण होते.

 


मिश्र पीक पद्धतीचे तोटे :


मिश्र पिक पद्धतीमध्ये यांत्रिक अवजारांचा वापर करणे शक्य होत नाही. विविध पिके निरनिराळ्या वेळी कापणीसाठी येतात आणि त्यामुळे कापणीच्या मजुरीचा खर्च वाढतो. कोरडवाहू शेतीमध्ये पिकाच्या कापणीनंतर जमिनीतील ओलीचा फायदा घेऊन त्वरित जमिनीची  नांगरणी करणे आवश्यक असते. मिश्र पिक पद्धतीत सर्व पिके एकाच वेळी कापणीसाठी येत नसल्याने जमिनीची नांगरणी त्वरित करणे शक्य होत नाही. पिकांच्या उशिरा होणाऱ्या कापणीमुळे अगोदरच्या पिकाच्या कापणीमुळे रिकामी झालेली जमीन पार वाळून जाते आणि तडकते त्यामुळे  नांगरणीचे काम कष्टाचे होते. या पद्धतीतील पिकांची निवड काळजीपूर्वक न केल्यास रोग किडी यांच्या प्रमाणात वाढ होण्याचा संभव असतो.

 

ज्यांचे शेतीचे क्षेत्र मर्यादित आहे त्यांच्यासाठी मिश्र पीक पद्धत निश्चितच फायद्याची आहे.


 हासुद्द प्रकल्प सुद्धा पहा:  ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास प्रकल्प


मिश्र पिकशेती प्रकल्प निरीक्षणे


महाराष्ट्रातील मिश्र पीक पद्धतीचे प्रमुख प्रकार

(१) विदर्भ, मराठवाडा व खानदेश (जिरायत) : ज्वारी व उडीद बाजरी आणि मटकी अथवा मूग कापूस (१०–१५ ओळी) व तूर (१ ते २ ओळी) व अधून मधून अंबाडी वा तीळ कापूस (८ ओळी) व ज्वारी (२ ओळी).

(२) दख्खन भाग (जिरायत) : बाजरी (५–६ ओळी) व तूर (१ ओळ) व अधून मधून अंबाडी खरीप ज्वारी (३–४ ओळी) व तूर (१ ओळ) रबी जोंधळा (८ ओळी), करडई (४ ओळी) व हरभरा गहू व हरभरा ३:१ प्रमाणात व अधून मधून मोहरी.

(३) बागायती पिके : भेंडी व जोंधळा (एकाआड एक ओळ) वाफ्यात कोबी व फुलवर (दोन्ही एकाच ओळीत अथवा एकाआड एक ओळीत) व पाण्याच्या पाटाच्या कडेने कोबी, नवलकोल, मुळा, बीट व सालीट आले वाफ्यात ओळीत आणि गोराडू दर ३·५ मी. अंतरावर ओळीत उसाच्या मुख्य पिकात बरंब्याच्या बाजूला भेंडी, जोंधळा, टोमॅटो, काकडी, मिरची, कांदा व भात हळदीच्या मुख्य पिकात मका, भेंडी, ज्वारी व मिरची.

 

  

निष्कर्ष

 

Ø मिश्रपीक शेती पद्धतीची  संकल्पना समजून घेतली.

Ø मिश्रपिक पद्धतीची शेती करण्यामागील  प्रमुख उद्देश काय आहे त्याबाबत माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन केले.

Ø मिश्रपद्धतीचे स्वरूप व प्रकार जाणून घेतले.

Ø मिश्रपिक पद्धतीणे शेती केल्यावर शेतकऱ्याला आणि पर्यावरणाला कोण कोणते फायदे होतात याबबत अधिक माहिती जाणून घेणे शक्य झाले.

Ø मिश्र पिक पद्धतीच्या फायद्यांबरोबरच मिश्र पीक पद्धतीचे तोटे कोणते आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यात आली.

 

 

संदर्भ


Ø www.educationalmarathi.com

Ø www.mazaabhyas.com

Ø पर्यावरण पुस्तिका

आम्ही दिलेला प्रकल्प आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
११वी १२वी पर्यावरण विषयाचे अधिक प्रकल्प पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी 


1 comment

  1. Thank you
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.