BUY PROJECT PDF Click Here!

जल पुनर्भरण पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी | Jal punarbharan evs project 11th 12th in marathi.

पर्यावरण प्रकल कार्य पद्धती पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी जल पुनर्भरण प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये Jal punarbharan prakalp information in Marathi
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

जल पुनर्भरण प्रकल्प 

जल पुनर्भरण मराठी माहिती प्रकल्प pdf - मृदा प्रदूषण निष्कर्ष - जल पुनर्भरण प्रकल्प प्रस्तावना - जल पुनर्भरण प्रकल्प कार्य उद्दिष्टे - पर्यावरण प्रकल कार्य पद्धती - पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी - जल पुनर्भरण - प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये

पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी  पहाण्यासाठी खालील लिंक  वर क्लिक करा.

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .


चला तर मग प्रकल्पाला सुरुवात करूया...

जल पुनर्भरण मराठी माहिती प्रकल्प pdf  जल पुनर्भरण प्रकल्प प्रस्तावना जल पुनर्भरण प्रकल्प कार्य उद्दिष्टे पर्यावरण प्रकल कार्य पद्धती पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी जल पुनर्भरण  प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये Jal punarbharan prakalp information in Marathi Jal punarbharan prkalp 11vi 12vi Environmental project in Marathi project for college students Evs project topivs Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi


प्रकल्प प्रस्तावना


निसर्गामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरु असते. माणसाला आणि सजीवसृष्टीला जगण्यासाठी आवश्यक्त असणारे पाणी आपल्याला पावसाळा ऋतूत उपलब्ध होते. देशातील सार्वच भागांत पावसाचे वितरण हे एकसमान नाही. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतो. पावसाळ्यांत काही विशिष्ट भागांत पडणारे पाणी काही प्रमाणात नैसर्गिकरित्या जमिनीत मुरते, काही पृष्ठभागावरून वाहून जाते तर काही पाण्याचे बाष्पीभवन होऊन जाते.

आपल्या देशातील शेतकरी हा पिकांना पाणी देण्यासाठी परंपरागत पद्धतीने विहिरीमधून तसेच बोअरवेल मधून पाण्याचा उपसा करून संपूर्ण शेतजमिनीला ओळीत करतो. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले गेल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो आणि भूजलपातळी खालावते. आत्ता तर विंधन विहिरी ४००-५०० फुटापेक्षा खोल खणून भूगर्भातून अक्षरशः पाणी ओरबाडून काढले जात आहे. आपल्या देशामध्ये सिंचनासाठी ६५५ आणि घरगुती उदयोगाकरिता ०३% पाणी हे बुगार्भातून उपसला केले जाते. सिंचनाकरिता अशा बेसुमार पाण्याच्या उपशामुळे भूगर्भातील पाण्याचा साथह झपाट्याने कमी होत आहे.

आज भूजल पातळी चे पुनर्भरण करण्याची गरज आहे. आज या प्रकल्पाच्या माध्यामतून आपण भूजल म्हणजे काय?  भूजल पुनर्भरणाची गरज, भूजल पुनर्भरण करण्याच्या पद्धती, तसेच भूजल पुनर्भरण करत असताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. या बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.


अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

२)

विषयाचे महत्व

३)

भूजल संकल्पना

४)

जलपुनर्भरण करण्याच्या विविध पद्धती / प्रकार

६)

जल पुनर्भरण करताना घ्यायची काळजी .

७)

निरीक्षण

८)

निष्कर्ष

९)

संदर्भ

























Evs project topivs Marathi languages / Evs project prastavana in Marathi / Evs project 12th commers, science, format Marathi

प्रकल्प उद्दिष्टे


Ø भूजल संकल्पना जाणून घेणे.

Ø आज जल पुनर्भरणाची गरज का निर्माण झाली आहे याबाबत सविस्तर माहिती मिळविणे.

Ø जल पुनर्भरण करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती  मिळविणे.

Ø जलपुनर्भरण करण्याआधी त्याची गाळण प्रक्रिया कशी केली जाते हे जाणून घेणे.

Ø विविध प्रकारच्या गाळण्यांचा अभ्यास करणे.

Ø विहिरीचे, कूपनलिकेचे पुनर्भरण कसे केले जाते याबाबत अधिक माहिती मिळविणे.

Ø जल पुनर्भरणाबाबत सर्वांना माहिती उपलब्ध करून देणे.

 

  

प्रकल्प विषयाचे महत्व


आपल्या परिसरामध्ये अनेक पाणी नसलेल्या विहिरी आणि बोरअरवेल असलेल्या आपल्याला दिसून येतात. या विहिरी तसेच कूपनलिकांना पाणी नसल्याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीतील खालावलेली पाण्याची पातळी. जर भूजल पातळी वाढवायची असेल तर त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जलपुनर्भरण करावे लागते. ज्या भागात कालवे, नदी, यांच्या मार्फत पाणी उपलब्ध नसते अशा ठिकाणी विहिरी आणि बोअरवेल चा वापर केला जातो. शेतीसाठी, घरगुती उपयोगासाठी तसेच अन्य कारणांसाठी लागणारे पाणी सुद्धा कुपनलिकेच्या माध्यामतून मिळविले जाते. सध्या कुपनलिकेसारख्या पाण्याच्या स्त्रोतांची पाण्याची पातळी ही ४००-५०० फुट इतकी खोल गेलेली पाहायला मिळते. दिवसेंदिवस जमिनीतील भूजल पातळीमध्ये घट होत असल्याने विहिरी आणि कुपनलिका यांचे पुनर्भरण करणे आज अत्यावश्यक बनले आहे.

आज ज्या वेगाने भूजलाचा उपसा केला जात आहे त्या प्रमणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळेच पाण्याची पटली दिवसेंदिवस खूप खोल जाऊ लागली आहे. भू-जल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे जिरवायचे आहे त्या त्या ठिकाणी पाणी जीरवायचा  प्रयत्न आज करणे गरजेचे आहे. तसेच उपलब्ध असलेल्या पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.

 


भूजल संकल्पना


जमिनीत असणाऱ्या पाण्याला भूजल असे म्हटले जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाचे पाणी जमिनीच्या खालच्या थरांत मुरण्याची प्रक्रिया सुरु असते. मातीचा वरचा थर संपृक्त झाला की पाणी त्याच्या खालच्या थरांत झिरपते. हे पाणी जमिनीमध्ये असणारा मुरूम, खडकांतील भेगा यांच्या मार्फत जमिनीत झिरपत असते. जमिनीमध्ये पाणी मूरण्याचे प्रमाण हे जमिनीच्या उतारावर अवलंबून असते ज्या ठिकाणी जमिनीचा उतार जास्त असतो त्याठिकाणी पाणी कमी जिरते तर कमी उताराच्या जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण थोडे जास्त असते. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे जमिनीतील खडकांची सछिद्रता, ज्या ठिकाणी सच्छिद्र , भेगाळलेले खडक असतात अशा खडकांमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा ठिकाणी सहाजीकच जमिनीत भूजलसाठे निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असते.याच भूजलाचा वापर पवसानंतर शेतीसाठी आणि पिण्यासाठी केला जातो.

 

 

जलपुनर्भरण करण्याच्या विविध पद्धती / प्रकार


·       छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण :

पावसाच्या पाण्याकाध्ये पुनर्वापर आणि पुनर्भरण या दोन्ही माध्यमांतून पाहिजे जाते. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण म्हणजेच rain water हार्वेस्टिंग होऊ. त्याचे विविध प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये टाकीत पाणी साठवले जाते आणि ते साठविलेले पाणी काही कालावधीसाठी पिण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी वापरले जाते. दुसरा प्रकार म्हणजे जमिनीत पावसाचे पाणी शोषखड्ड्यांच्या माध्यमातून जमिनीत मुरवले जाते. 

 

   १. पावसाचे पाणी टाकीत साठविणे:

पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने ज्या भागात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही अशा ठिकाणी छतावर पडणारे पावसाचे पाणी बंद टाकीमध्ये साठवले जाते तर ते पिण्यासाठी उपयोगात येऊ शकते एक – दोन पावसाने छत स्वच्छ झाल्यानंतर पावसाचे पाणी हे पन्हाळीद्वारे टाकीमध्ये गाळून साठवावे. यासाठी विशिष्ट प्रकारचे गाळणी वापरली जाते. पाणी गाळणीतून गाळल्याशिवाय पाण्याचा वापर करू नये. पाणी पिण्यास वापरतेवेळी शिफारशीत प्रमाणात लिक्विड क्लोरीन किंवा गोळ्यांच्या योग्य  त्या प्रमाणात वापर करावा.

 

2. पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण :

जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे ही आज काळाची गरज आहे. यासाठी पावसाळ्याच्या चार महिन्यांत पडणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या दिवसांत घराच्या छतावर पडणारे पाणी एका गाळणीद्वारे गाळून एका शोषखड्ड्यात सोडले जाते. या शोषखड्ड्यातील पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे भूजल पातळी काही प्रमाणात वाढण्यास मदत होते.

 

जल पुनर्भरण  प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये Jal punarbharan prakalp information in Marathi Jal punarbharan prkalp 11vi 12vi Environmental project in Marathi proje

पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण
 

३.पावसाच्या पाण्याने कुपनलीकेचे पुनर्भरण:

गावातील किंवा मोठ्या घराच्या परिसरातील तसेच शेतातील कोरड्या कूपनालिकेचे पुनर्भरण करायचे असल्यास पुढील पद्धतींचा अवलंब केला जातो.

§  शेतातील कुपनलिकेचे पुनर्भरण:

शेतातील कूपनालीकेचे पुनर्भरण करायचे असल्यास, पाण्याचा स्त्रोत म्हणून जवळ असणाऱ्या नाल्याचे किंवा ओढ्याचे पाणी वळवले जाते.

§  गावातील किंवा मोठ्या घरातील कूपनालीकेचे पुनर्भरण:

कूपनालिकेचे पुनर्भरण करत असताना घराच्या छतावरील पाणी शोषखड्ड्याकडे वळविले जाते. कुपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोडला जातो किंवा पुरेशा आकारमनाचा खड्डा खणला जातो.  खड्ड्यातील कूपनलिकेच्या केसिंग पाईपच्या भागात एक दोन से.मी.मी. अंतरावर सर्व बाजूंनी एका ठराविक व्यासाची छिद्रे पडली जातात. या छीद्रांवर गाळणी म्हणून नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळली जाते किंवा प्लास्टिकची जाळी  बसवली जाते. खड्डा चार भागांत विभागून त्याच्या सर्वात खालच्या थरात दगडगोटे, त्यावरील भागात खडी, त्या वरच्या भागात जाड वाळू आणि सर्वात वरच्या भागात बारीक वाळूचा थर टाकला जातो. या थरावर पाणी सोडले जाते. आणि तयार केलेल्या गाळणप्रक्रियेतून खाली गेलेले पाणी हे भूजलाचा भाग बनते.

Evs project topivs Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi

कुपनलिकेचे पुनर्भरण 


४. पावसाच्या पाण्याने विहिरीचे पुनर्भरण:

विहीर आणि नदीच्या किंवा ओढ्याच्या अंतरामध्ये तीन मीटर व दोन मीटर इतक्या लांबीचे स्वतंत्र खड्डे खोदले जातात. पहिला खड्डा तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद आणि एक मीटर खोल खोदला जातो. तर दुसरा खड्डा दोन मीटर लांब, १.५ मीटर रुंद आणि दोन मीटर खोल खोदला जातो. पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हे दोन ग्खाद्डे सहा इंची पीव्हीसी पाईप द्वारे जोडले जातात. पहिला खड्डा भरत असताना त्याच्या तळाशी दगड गोटे टाकले जतात तर दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी ०.४५ मीटर जादिचा खडीचा   थर भरला जातो. त्यावर ०.४५ मीटर जाडीचा जाडीचा जाड खडी ओतली जाते आणि सर्वात वरच्या ठरत बारीक वाळूवर कोळशाचा थर दिला जातो. हा दुसरा खड्डा चार इंची पीव्हीसी पाईप वापरून विहिरीला जोडला जातो.  ओढ्यातील पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इत्यादी पहिल्या खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाईपद्वारे दुसऱ्या खड्ड्यात जाईल आणि त्या दुसऱ्या खड्ड्यातून गळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाईपद्वारे जाऊन त्या विहिरीचे पुनर्भरण होईल.

 

जल पुनर्भरण प्रकल्प प्रस्तावना जल पुनर्भरण प्रकल्प कार्य उद्दिष्टे पर्यावरण प्रकल कार्य पद्धती

विहिरीचे पुनर्भरण 

जल पुनर्भरण  प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये - Jal punarbharan prakalp information in Marathi - Jal punarbharan prkalp 11vi 12vi - Environmental project in Marathi project for college students

जल पुनर्भरण करताना घ्यायची काळजी .

 

१)  पुनर्भरणा साठी वापरण्यात येणारा पाण्याचा स्त्रोत हा क्षार आणि रसायनविरहित असावा.

२) विहिरींचे पुनर्भरण करत असताना पाणी पाईपद्वारे विहिरीच्या तळापर्यत पोहोचवावे.

३) पुनर्भरणापूर्वी विहिरीतल गाळ काढून टाकावा.

४) पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे.

५) ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरू नये.

६) वाळू , गोटे, कोळसा यांचा वापर कून तयार केलेली पाण्याची गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी.

७) पाण्याचे पुनर्भरण करीत असताना किमान दोन गाळणी खड्डे असावेत.

 

 

भूजल पुनर्भरण आणि पाऊस


भूजल पुनर्भरणाच्या विविध पद्धती अवलंबण्यापूर्वी आपल्याला त्या भागातील पावसाचे प्रमाण माहिती असणे आवश्यक आहे. पावसाच्या प्रमाणावरून त्या परिसरात किती पाणी जमा होऊ शकते याचे गणित मांडता येते.

पावसाच्या पाण्याचे गणित:

परिसराचे क्षेत्रफळ : ५०० चौ.मी.

इमारतीच्या छताचे क्षेत्रफळ: १००चौ.मी.

एकूण वार्षिक पाऊस : २.२.मी.

पाण्याचे एकूण प्रमाण = परिसराचे क्षेत्रफळ * एकून पाऊस

५०० चौ.मी साठी = ५००* २.२

= ११०० घ.मी ( ११,००,००० ली)

आपण असे गृहीत धरले की फक्त ६० % पाणी आपण घेणार आहोत,

पाण्याचे प्रमाण = ११,००,००० * ०.६

= ६,६०,००० लिटर

इमारतीच्या छ्तारावरील पाणी = १००*२.२

= २२०घ.मी ( २,२०,००० लिटर)

यापैकी ८०% पाणी घेतले तर,

पाण्याचे प्रमाण = २,२०,०००*०.८

= १,७६,००० लिटर.

साधारणपणे एका माणसाला एका दिवसाला १० लिटर पाणी पुरते, त्यामुळे, वरील गणिताप्रमाणे विचार केला तर ते पाणी साधारण ५० लोकांना वर्षभर फक्त पिण्यासाठी पुरेल.

भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाचे प्रमाण बदलते आणि त्यानुसार प्रत्येक ठिकाणी पाण्याचे प्रमाण बदलत राहील.



निरीक्षणे


पावसापासून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करत असताना किंवा साठविण्यासाठी वापरताना योग्य ती काळजी घेतली  पाहिजे. कोणत्याही ठिकाणी पाणी मुरवताना पावसाचे पाणी हे योग्य अशा गाळण प्रक्रियेद्वारे गाळणे अत्यंत आवश्यक आहे. कदाचित पावसाचे पाणी एखाद्या वेळेस आम्लयुक्त असू शकते किंवा घराच्या छताचा पृष्ठभाग अस्वच्छ देखील असू शकतो. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या एक दोन पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण  करणे टाळावे. आपल्याला अज्मिनिवार्ल प्रदूषित पाण्याचे शुद्धीकरण करता येते. पण भूजलस्त्रोत दुषित झाला तर तो शुद्ध पूर्णपणे शुद्ध करणे अशक्य असते.

फक्त भूगर्भात पाणी जिरवल्याने त्याचा पुरेसा उपयोग होतोच असे नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. विशेषतः जेव्हा आपण बोअरवेल करताना हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक बोअरवेलचे  पुनर्भरण केले गेलचे पाहिजे हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेल्या भूगार्भाच्या वैशिट्यपूर्ण रचनेमुळे जर आपण बोअरवेल चे पुनर्भरण केले नाही तर ती कधीही अचानक कोरडी पडू शकते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे तर, वर्षभर पाणी मिळावे म्हणून आपल्याला पावसाच्या दिवसांत प्रयत्न करून , विविध उपाय योजून पावसाच्या चार दिवसांत उपलब्ध होणारे पाणी साठवून ते पाणी पावसाळा संपला तरी वापरता याव्वे यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

 

पावसाचे पाणी गाळण्यासाठी आवश्यक गाळणयंत्रणा.

पावसच्या पाण्याच्या गाळण यंत्रणेतील महत्वाचा भाग म्हणजे शोषखड्डा, भूगर्भात किंवा विहिरी, बोअरवेल  अशा स्त्रोतांच्या पुनर्भरण करत असताना हा शोषखड्डा एक गाळणी म्हणून काम करीत असतो.

छतावर पडणारे पावसाचे पाणी आपण सरळपणे वापरू शकत नाही. त्या पाण्याचा वापर करण्यापूर्वी ते गाळून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गाळणी तयार कराव्या लगतात. या गाळण्या तयार करत असताना त्यांतील घटकांचे प्रमाण, हे किती प्रमाणत पाण्याचे पुनर्भरण करायचे आहे यावर ठरविले जाते.

 

जल पुनर्भरणासाठी वापरण्यात येणाऱ्या गाळण यंत्रणा.

१. वाळूची गाळणी:

या प्रकारच्या गाळणी मध्ये एका योग्य आकारच्या पात्रात बारीक वाळू आणि बारीक खाडी यांचे थर असतात. एका तळाच्या बाजूला सच्छिद्र पदार्थाचा थर असतो त्याच्यावर मध्यम आकाराच्या दगडांची खाडी असलेला तहर असतो. याच खाडीच्या ठरवर बारीक वाळू चा थर दिला जातो आणि सर्वात वरचा ठार खडीने बनवलेला असतो. या थरांतून पुनर्भरण करावयाचे पाणी सोडले जाते. पाणी गाळणे जाऊन सच्छिद्र थरामधून बाहेर पडते. 

जल पुनर्भरण पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी | Jal punarbharan evs project 11th 12th in marathi.

वाळूची गाळणी 

२.कोळशाची गाळणी:

या गळणीची रचना देखील वाळूच्या गाळणी प्रमाणे केलेली असते. मात्र सर्वात वरच्या थरात खडी ऐवजी बारीक केलेल्या कोळशाचा थर तयार केलेला असतो. सर्वात वरच्या थरामधून पुनर्भरण करायचे पाणी सोडले जाते. पाणी गाळले जानुन्ते वापरासाठी खालच्या घरातून घेता येते.

जल पुनर्भरण पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी | Jal punarbharan evs project 11th 12th in marathi.
कोळशाची गाळणी 


३.नळामध्ये बसवायची गाळणी:

ही गाळणी एका प्लास्टिकच्या पाईप मध्ये तयार करण्यात यते. हा पाईप साधारणतः १४० मिमी व्यासाचा आणी १.२.मीटर लांबीचा असतो. यामध्ये बारीक मोठ्या खाडीचे तीन थर असतात पहिला थर  २-६ मिमी आकाराच्या बारीक दगडांचा असतो आणि तिसरा ठार १२-२० मिमी जाडीच्या दगडांचा असतो. पुनर्भरण करायचे पाणी बारीक आकाराचे दगड असलेल्या बाजूकडून सोडले जाते आणि गाळलेले पाणी दुसर्या बाजूकडून बाहेर येते. असे पाणी जलस्त्रोतांचे पुनर्भरण करते. या गाळणीचा उपयोग विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठी केला जातो.

जल पुनर्भरण पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी | Jal punarbharan evs project 11th 12th in marathi.

नळामध्ये बसवायची गाळणी 



प्रकल्प निष्कर्ष

                                                

Ø    भूजल संकल्पना जाणून घेतली.

Ø    आज जल पुनर्भरणाची गरज का निर्माण झाली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे शक्य झाले.  

Ø    जल पुनर्भरण करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती मिळविली.

Ø    जलपुनर्भरण करण्याआधी त्याची गाळण प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळविली.

Ø    विहिरीचे, कूपनलिकेचे पुनर्भरण कसे केले जाते याबाबत अधिक माहिती जाणून घेऊन त्या माहितीचे संकलन केले. 

 

 

संदर्भ


Ø www.educationalmarathi.com

Ø www.mazaabhyas.com

Ø पर्यावरण पुस्तिका


प्रकल्प माहिती कशी वाटली आम्हांला कमेंट करून नक्की कळवा. 

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.