BUY PROJECT PDF Click Here!

अणुउर्जा तसेच मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम पर्यावरण प्रकल्प | rediation che paryavarnavar honare dushparinam environmental project 11th 12th

डिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प कार्य पद्धती / अभ्यास पद्धती ५) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प निरीक्षणे
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

अणुउर्जा तसेच मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम

project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय\ - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा - पर्यावरण प्रकल्प pdf - Evs pdf - Evs project for class 12 in Marathi


        Educationalमराठी या शैक्षणिक वेबसाईटवर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो आज या लेखाच्या माध्यमातून आपण ‘अणुउर्जा तसेच मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम’ या प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या प्रकल्पाची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे देण्यात आली आहे.

१)रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प प्रस्तावना
२)रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामप्रकल्प विषयाचे महत्व
३) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प उद्दिष्टे
४) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प कार्य पद्धती / अभ्यास पद्धती
५) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प निरीक्षणे
६) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प विश्लेषण
७) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प निष्कर्ष
८) प्रकल्प संदर्भ

चला तर मग रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम या प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

१)रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प प्रस्तावना २)रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामप्रकल्प विषयाचे महत्व ३) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प उद्दिष्टे ४) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प कार्य पद्धती / अभ्यास पद्धती ५) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प निरीक्षणे ६) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प विश्लेषण ७) रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प निष्कर्ष


प्रकल्प प्रस्तावना


संपर्क वाढल्याने, मोबाईल च्या टॉवर्सची संख्या दररोज वाढत आहे.  भारतात, सध्या जवळपास 3.75 लाख सेल फोन टॉवर्स आहेत आणि दळणवळणाची मागणी पूर्ण करण्यासाठी, 2010 पर्यंत ही संख्या 4.25 लाख टॉवर्सपर्यंत वाढेल. सेल टॉवर 869 - 894 MHz (CDMA), 935 - फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये प्रसारित करतो.  960 MHz (GSM900) आणि 1805 1880 MHz (GSM1800).  तसेच, 3G काही शहरांमध्ये तैनात केले गेले आहे, ज्यांचे टॉवर 2110-2170 MHz च्या फ्रिक्वेंसी रेंजमध्ये प्रसारित होते.  वापरकर्त्यांना चांगले मोबाईल फोन कव्हरेज देण्यासाठी यापैकी बहुतांश टॉवर निवासी आणि कार्यालयीन इमारतींजवळ बसवले आहेत.  मोबाईल फोन टॉवर आणि त्याची ट्रान्समिटिंग पॉवर अशा प्रकारे डिझाइन केली गेली आहे की ते कमीतकमी काही किलोमीटरचे अंतर व्यापेल, याचा अर्थ असा आहे की त्या अंतरावरील मोबाईल फोन पुरेसे सिग्नल प्रसारित करण्यास आणि प्राप्त करण्यास सक्षम असावे.टॉवरपासून 10 मीटर अंतरावर असलेल्या इमारतीला मोबाईल संप्रेषणासाठी आवश्यकतेपेक्षा 10,000 पट अधिक मजबूत सिग्नल प्राप्त होतो.  मुंबई, दिल्ली, बंगलोर इत्यादी शहरांमध्ये लाखो लोक या उच्च रेडिएशन झोनमध्ये राहतात.

परंतु या रेडिएशन चे पर्यावरणावर तसेच मानवी जीवनावर घातक परिणाम घडून येतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून अणुउर्जा तसेच मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर कोणते दुष्परिणाम होतात? हे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत. याबबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


अनुक्रमणिका

अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

प्रकल्प निरीक्षणे

५)

प्रकल्प विश्लेषण

६)

निष्कर्ष

७)

संदर्भ














विषयाचे महत्व


निसर्गातअनेक प्रकारचे किरणोत्सारी पदार्थ असतात. या पदार्थांमधून सतत किरणोत्सार होत असतो. हा किरणोत्सार आपल्या डोळ्यांना दिसत नाही परंतु या किरणोत्साराने अनेक सजीवांवर घातक परिणाम घडून येतात. मानवाने या घातक किरणोत्सारी पदार्थांपासून आण्विक उर्जेची निर्मिती केली. आणि या आण्विक उर्जेचा वापर अतिघातक शस्त्रास्त्रे निर्माण करण्यासाठी केला. आज संपूर्ण जगामध्ये आण्विक उर्जा मिळवण्याच्या विविध पद्धती आणि आण्विक उर्जांच्या विकासामुळे आण्विक धोके हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आण्विक उर्जा तयार करण्यासाठी कमी खर्च येत असला तरीही त्यापासून तयार होणाऱ्या टाकावू पदार्थांची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रश्न हा अजूनही बऱ्याचअंशी सुटलेला नाही. अणूचे विघटन होऊन त्यातून मोठ्या प्रमाणवर किरणोत्सर्ग होतो. हा किरणोत्सार अतिउर्जासंपन्न असतो यामध्ये सजीव व निर्जीव अशा दोनही घटकांना भेदण्याची शक्ती असते.

मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर कोणते दुष्परिणाम होतात? हे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत. तसेच अणुउर्जे मधून बाहेर पडणारे विविध प्रकारचे रेडीएशन पर्यावरणास किती घातक ठरतात याबाबत सविस्तर माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. म्हणून हा प्रकल्प विषय महत्वाचा आहे.

 

प्रकल्प उद्दिष्ट्ये

 ·       अणुउर्जा संकल्पना जाणून घेणे.

·       अनुउर्जेच्या माध्यमातून कशा  पर्यावणावर घातक परिणाम होतात याबाबत माहिती मिळविणे.

·       मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम जाणून घेणे.

·       रेडिएशनमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना करता येऊ शकतात याबाबत अधिक माहिती मिळविणे.

·       रेडिएशन निर्माण करणारे पदार्थ हाताळताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे.

·       या प्रकल्प विषयाबाबत अधिक माहिती सर्वांना मिळवून देणे.

 


प्रकल्प कार्यपद्धती


‘अणुउर्जा तसेच मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम’ या प्रकल्प विषयाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मी प्रश्नावली, आणि मुलाखत या कार्यपद्धती चा अवलंब केला. परिसरात राहणाऱ्या लोकांना प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले व त्यांच्याकडून मोबाईल टॉवर च्या निर्मितीनंतर तेथील परिसरात झालेले बदल आणि  पर्यावरण हानीबाबत माहिती मिळविण्यात आली. त्याच प्रमाणे पर्यावरणावर रेडीएशन चे होणारे परिणाम कशा प्रकारे कमी करू शकतो  याबाबत प्रत्येकाच्या कल्पना जाणून घेतल्या . त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये भर घालण्यासाठी वर्तमानपत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या माध्यमातून अधिक माहिती मिळविली.

प्रश्नावली , मुलाखत यांच्या माध्यमातून मुद्दे तयार करून प्रकल्पांच्या मुद्द्यांची मांडणी करण्यात आली आणि तयार झालेल्या मुद्यांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करण्यात आला. संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करून ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर उपलब्ध झालेल्या माहितीच या आधारे प्रकल्पाची निरीक्षणे नोंदवण्यात आली आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष नोंद केली.


प्रकल्प निरीक्षणे


जगभरातील मोबाईल वापर


रेडीएशन च्या त्रीव्रतेमुळे होणारे आजार






विश्लेषण


किरणोत्साराचे प्रकार


१)   अल्फा किरणोत्सार:

§  हेलीअम अनुच्या केंद्रकामधून अल्फा हा किरणोत्सार बाहेर पडतो. या किरणोत्साराचा प्रसार हा त्याच्या स्त्रोतापासून कमी अंतरापर्यंत होतो. याची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

§  अल्फा किरणोत्सर्ग हा मानवी त्वचेला भेदू शकत नाही.

§  हे किरणोत्सारी पदार्थ अन्नाच्या माध्यमातून, श्वसनावाटे तसेच जखमांमधून सजीवांच्या शरीतात आले तर ते सजीवांसाठी घातक ठरतात.

§  या प्रकारचा किरणोत्सर्ग हा हवेमध्ये काही इंचांपर्यंत प्रवास करू शकतो.

§  कपड्यांमधून अल्फा किरणोत्सर्ग प्रवेश करू शकत नाही.

उदा: रेडीअम , रेडॉन , थोरीअम.



२)बीटा किरणोत्सार  :


§  बीटा हा किरणोत्सार सुद्धा लघुपल्ल्याचा असतो. तसेच हा किरणोत्सार म्हणजे अनुमधून बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्स असतात.

§  याची वैशिष्टे खालील प्रमाणे आहेत.

§  बीटा किरणोत्सार हवेच्या माध्यमातून कित्येक फुट दूरपर्यंत प्रवास करू शकतो.

§  बीटा किरणोत्सार हा मानवी त्वचा तसेच नवनिर्मित पेशी यांना सहजरित्या भेदू शकतो. जर या प्रकारच्या किरणोत्साराच्या सान्निध्यात जर जास्त काल त्वचेचा संपर्क आला तर हा किरणोत्सर्ग त्वचेला हानी पोहोचवू शकतो.


 ३) गॅमा किरणोत्सार  :


§  गॅमा किरणोत्सार  अतिभेदक म्हणून ओळखला जातो. त्याची काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

§  गॅमा किरणोत्सार  हा हवेमध्ये कित्येक फुट अंतरापर्यंत पसरू शकतो. मानवी शरीरात देखील हा काही इंचांपर्यत पोहचू शकतो.

§  गॅमा किरणोत्सार  हा अतिनील किरणे, प्रकाश व रेडिओलहरी यांच्यासारखाच किरणोत्सार   असून फरक फक्त इतकाच आहे की यामध्ये सर्वात जास्त उर्जा सामावलेली असते.

§  गॅमा किरणोत्सार  फक्त जाड थर असलेले पदार्थ रोखू शकतात.

§  उदा: आयोडीन – १३१ , सिझिअम – १३७ , कोबाल्ट- ६० , रेडीअम – २२६ इत्यादी

 

 

आण्विक धोक्याची कारणे


१)    आण्विक चाचण्या या प्रामुख्याने जमिनीवर , जमिनीखाली तसेच हवेमध्ये घेतल्या जातात अशा चाचण्यांमुळे थोरीअम, सिझिअम – १३७, बेरीअं- १४१ आणि आयोडीन – १३१ हे किरणोत्सारी पदार्थ स्फोटकांमार्फत बाहेर फेकले जातात. असे पदार्थ पर्यावरणात अनेक वर्ष टिकून राहू शकतात व अन्नसाखालीतही प्रवेश करतात.

२)   अणुचाचणीनंतर किरणोत्सार धूळ पृथ्वीवर येते अशा धुळीत मुख्यत्वे किरणोत्सारी पदार्थ असतात आणि ते हवा. पाणी जमीन व वनस्पती यांच्याशी क्रियाशील होतात.

३)   आण्विक वीजनिर्मिती प्रकल्पांमधून कमी तीव्रतेचा, मध्यम तीव्रतेचा आणि जास्त तीव्रतेचा असे टाकाऊ पदार्थ तयार होतात. अशा कचर्यामध्ये धुलीकण आणि काही किरणोत्सारी पदार्थांचे उर्जानिर्मितीनंतरचे घटक असतात.

४) युद्धांमध्ये वापरल्या जाणार्या आण्विक शस्त्रांमुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर किरणोत्सार पसरविला जातो.

 

 

आण्विक धोके टाळण्यासाठी उपाययोजना.


किरणोत्सर्ग होणाऱ्या पदार्थांची काही खास पद्धतीनेच विल्हेवाट लावली जाते म्हणून त्यांना रॉयल वेस्ट असे देखील म्हटले जाते. किरणोत्सारी टाकावू पदार्थांमधून पर्यावरणास दुर्गंध अथवा सरळपणे पर्यावरण प्रदूषित न करता हजारो वर्षे पर्यावरणावर गंभीर परिणाम घडवून आणतात. म्हणून त्यांच्या विल्हेवाट लावताना खास दक्षता घेतली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे आण्विक चाचणी बंदी करार केला आहे . याद्वारे सर्व अटी मानणाऱ्या देशांना नागरी अथवा सैनिकी हेतूसाठी सर्व तऱ्हेच्या जैविक अजैविक पर्यावरणात आण्विक स्फोट करण्यात निर्बध घातले गेले आहेत.


१)    प्रत्येक देशाने आपल्या कायदेशीर भागात कोणत्याही ठिकाणी आण्विक स्फोटकांची चाचणी घेऊ नये तसेच इतरांना अशी चाचणी घेण्यास मज्जाव करावा.

२)   आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य नियोजन आणि अणुभट्ट्यांचे रहिवाशी स्थानापासून दूरवर स्थित्यंतर तसेच सुरक्षात्मक भिंत बांधल्यामुळे किरणोत्सारी पदार्थ्यांचे तसेच किर्नोत्साराचे घातक परीण टाळता येतात .

 

 

मोबाईलच्या रेडीएशन मुळे होणारे परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना.


§  टॉवरच्या समोर असलेल्या खिडकीजवळ हिरवी झाडे लावा कारण हिरवी झाडे रेडिएशन शोषून घेतात. 

§  'एनव्हायरो-स्ट्रीप्स' नावाची गॅझेट्स आहेत जी किरणोत्सर्ग कमी करण्यासाठी टॉवरभोवती ठेवता येतात.  तेथे रेडिएशन शील्ड पडदे आहेत आणि घरगुती वापरासाठी उपलब्ध आहेत.

§  तुमच्या हाताने फोनचे मोठे भाग झाकून, तुम्ही सिग्नल पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता कमी करता.  फोन नंतर त्याची शक्ती वाढवतो आणि त्याची भरपाई करण्यासाठी मजबूत रेडिएशन प्रसारित करतो.  त्यामुळे फोन शक्य तितक्या खाली धरा, जेणेकरून तो कमी पॉवरवर ऑपरेट करू शकेल. 

§  हँड्सफ्री सेट वापरा फोन तुमच्या शरीरापासून जितका जास्त दूर असेल तितके कमी रेडिएशन तुमच्या समोर येईल.  हँड्स-फ्री सेट वापरणे हा तुम्ही मोबाईल फोन वापरत असल्‍यास तुम्‍हाला होणार्‍या रेडिएशनचे प्रमाण मूलत: कमी करण्‍याचा सर्वात सोपा मार्ग आहे. 

§  मोबाईल कानाला लावून जास्त वेळ बोलू नका .

§  फोन तुमच्या शरीरापासून किमान एक फूट दूर ठेवा आणि स्पीकरफोन सेटिंग वापरा. 

§  कमी रेडिएशन असलेला फोन खरेदी करा. 

§  मोबाईल फोन उशीखाली ठेवून झोपू नका. 

§  कॉलपेक्षा एसएमएसला प्राधान्य द्या. 

 

प्रकल्प निष्कर्ष

 

  अणुउर्जा संकल्पना जाणून घेतली.

• अनुउर्जेचा पर्यावणावर घातक परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती मिळवून तिचे संकलन केले.

• मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम जाणून घेता आले.

• रेडिएशनमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना करता येऊ शकतात याबाबत अधिक माहिती मिळवली.

• रेडिएशन निर्माण करणारे पदार्थ हाताळताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले.

 

संदर्भ


§  www.educationalmarathi.com

(Educationalमराठी)

§  www.mazaabhyas.com 

(माझा अभ्यास)

§  पर्यावरण शिक्षण पुस्तिका


महत्वाचे :

या प्रकल्पाची फ्री pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील Subscribe to Unlock लिंक वर क्लिक करा. subcribe करा आणि back button press करा.

वरील pdf फाईल चा पासवर्ड मिळविण्यासाठी खालील   video लिंक वर क्लिक करा . video मध्ये तुम्हांला १० character आणि  number असेलेला पासवर्ड मिळेल.

 

किंवा 

खालील वेळ पूर्ण होई पर्यंत थांबा तुम्हांला पासवर्ड मिळेल 


Your download will begin in 150 seconds.


Click here if your download does not begin.
 


पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी  पहाण्यासाठी खालील लिंक  वर क्लिक करा.

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रकल्प कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा 


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.