सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
Educationalमराठी या शैक्षणिक वेबसाईटवर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो आज या लेखाच्या माध्यमातून आपण ‘सांडपाणी व्यवस्थापन’ या प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या प्रकल्पाची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे देण्यात आली आहे.
१)सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावना
२) सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
विषयाचे महत्व
३) सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
उद्दिष्टे
४) सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
कार्य पद्धती / अभ्यास पद्धती
५) सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प निरीक्षणे
६) सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
विश्लेषण
७) सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
निष्कर्ष
८) प्रकल्प संदर्भ
चला तर मग सांडपाणी व्यवस्थापन
या प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
प्रकल्प प्रस्तावना
सांडपाणी
म्हणजे असे पाणी कि ज्या पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म हे त्यामध्ये इतर टाकावू घटक मिसळले गेल्याने बदलले
गेलेले असतात. आणि हे पाणी पिण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या वापरासाठी अयोग्य ठरते.
माणसाची दैनंदिन ही सर्व पाण्यावरच अवलंबून असतात.
पाण्याचा
वापर केल्यानंतर त्यातून जवळ जवळ ७५% इतके पाणी हे सांडपाणी तयार होत असते. एकूण
पाण्यापैकी एकूण १५% पाणी हे वापरले जाते.
पाण्यामध्ये शरीरातील टाकावू पदार्थ (
विष्ठा आणि मुत्र) , केसांचे विविध प्रकारचे शाम्पू , केस, अन्नाचे तुकडे, चरबी, कपडे
धुण्याची पावडर, फॅब्रिक कंडिशनर, टॉयलेट
पेपर, रसायने, डिटर्जंट, घरगुती क्लीनर, घाण, सूक्ष्म
जीव (जंतू) यांसारख्या घातक कचरा पाण्यामध्ये मिसळल्याने सांडपाण्याची निर्मिती
होते.
या
प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्याचे स्त्रोत कोणते आहेत, सांडपाण्याचे
व्यवस्थापन करण्याची गरज का आहे? सांडपाण्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाऊ
शकते. घरगुती पातळीवर तसेच सर्वानिक पातळीवरील सांडपाण्याचे व्यवस्थापन कशा
प्रकारे केले जाऊ शकते याबाबत या प्रकल्पाच्या माध्यमातून माहिती देण्याचा मी
प्रयत्न केला आहे.
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
२) |
विषयाचे महत्व |
३) |
प्रकल्प कार्य पद्धती |
४) |
प्रकल्प निरीक्षणे |
६) |
प्रकल्प विश्लेषण |
७) |
प्रकल्प निष्कर्ष |
८) |
संदर्भ |
प्रकल्प उद्दिष्टे
Ø ग्रामीण तसेच शहरी भागांत राहणाऱ्या लोकांची आरोग्य गुणवत्ता टिकवणे.
Ø सांडपाण्यामुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण कमी करून आजूबाजूचा परिसर स्वच्छ व प्रसन्न करणे.
Ø सांडपाण्याच्या पुनर्चाक्रीकरण आणि पुनर्वापर कशा प्रकारे केला जावू शकतो याबाबत अधिक माहिती सर्वाना उपलब्ध करून देणे.
Ø घरगुती पातळीवर तसेच सार्वजनी पातळीवर सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कोण कोणत्या उपयायोजना केल्या जाऊ शकतात याबाबत अधिका माहिती जाणून घेणे.
Ø सांडपाणी व्यवस्थापन करण्याच्या विविध पद्धती जाणून घेणे.
प्रकल्प विषयाचे महत्व
रोज
कित्येक लिटर सांडपाण्याची निर्मिती होत असते या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन
करणे गरजेचे आहे. जर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली गेली
नाही तर या सांडपाण्यावर मलेरिया , डेंग्यू यांसारख्या आजारांचे डास तयार होऊन
परिसरात राहणारे लोक आजारी पडतात आणि पर्यावरणाचे देखील मोठ्या प्रमाणवर नुकसान
होते.
सांडपाण्यावर
योग्य प्रकारे प्रक्रिया केली गेली नाही तर हे पाणी उघड्यावर साचून राहिल्याने
त्यामध्ये अनेक प्रकारचे रोगजंतू तयार होऊन आजूबाजूच्या परिसरात पसरू शकतात. आणि
याचा परिणाम आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. आज आपल्या देशातील
खेड्यांमध्ये तसेच छोट्या शहरांमध्ये उघड्यावर साचलेले सांडपाणी ही एक महत्वाची
समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे सांडपाण्याची योग्य व्यवस्था लावणे हे ग्रामीण तसेच
शहरी परिसराच्या दृष्टीने महत्वाचे ठरते.
सांडपाण्याचे
व्यवस्थापन करताना त्यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, आणि या
सांडपाण्याच्या प्रक्रियेमध्ये सांडपाण्यात आढळणारे बहुतांश दुषित घटक काढून
टाकण्यात येतात. जेणेकरून या पाण्याच्या पर्यावरण तसेच सर्वानिक आरोग्य जीवनावर
कोणताही परिणाम होऊ नये. सांडपाण्याचे व्यवस्थापन म्हणजे सार्वजनिक आरोग्य, आर्थिक,
सामाजिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सांडपाणी
हाताळणे.
वरील
सर्व सांडपाण्यामुळे पर्यावरणावर तसेच मानवी जीवनावर होणारे घातक परिणाम पाहिले
असता सांडपाण्याचे व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे.
Sandpani vyavsthapan project in Marathi - Sandpani vyavsthapan Marathi - Sandpani vyavsthapn project
प्रकल्प कार्यपद्धती
सांडपाणी
व्यवस्थापन या प्रकल्प विषयाबाबत माहिती मिळविण्यासाठी मी प्रश्नावली, आणि मुलाखत या कार्यपद्धती चा अवलंब केला. परिसरात राहणाऱ्या लोकांना
प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले व त्यांच्याकडून परिसरात असणाऱ्या सांडपाणी
व्यवस्थापन सुविधांबाबत माहिती मिळविण्यात
आली. परिसरात असलेल्या परिसरात असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन सुविधा कशा प्रकारे
कार्य करतात हे जाणून घेण्यासठी घेण्यासाठी परिसरातील व्यक्तींची मदत घेतली.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये भर घालण्यासाठी वर्तमानपत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या माध्यमातून अधिक माहिती मिळविली.
प्रश्नावली
,
मुलाखत यांच्या माध्यमातून मुद्दे तयार करून प्रकल्पांच्या
मुद्द्यांची मांडणी करण्यात आली आणि तयार झालेल्या मुद्यांबाबत अधिक माहिती जाणून
घेण्यासाठी आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करण्यात आला. संकलित
केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करून ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट
करण्यात आली आहे. सदर उपलब्ध झालेल्या माहितीच या आधारे प्रकल्पाची निरीक्षणे
नोंदवण्यात आली आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष नोंद केली.
प्रकल्प निरीक्षणे
सांडपाण्यामुळे होणारे आजार
§ हगवण
§ कावीळ
§ टायफॉईड
§ कॉलरा
§ मलेरिया
§ डेंग्यू
§ चिकनगुण्या
§ हत्तीरोग
§ लेप्टोस्पायरोसिस
Sandpani vyavsthapn nishkarsh - Sandpani vyavsthapn pdf - Sandpani project information in Marathi - Sandpani project
प्रकल्प विश्लेषण
सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकार
सांडपाणी व्यवस्थापन करण्याचे दोन प्रकार
पडतात.
१) घरगुती सांडपाणी व्यवस्थापन :
घरगुती सांडपाणी व्यवस्थापन या प्रकारामध्ये घरात तयार होणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन हे घरातील लोकांनी करणे अपेक्षित आहे. जर प्रत्येक घराने स्वतःच्या घरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन स्वतः केले तर शून्य सार्वजनिक सांडपाणी निर्माण होईल.
२) सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन :
सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही त्या भागामध्ये असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असते.
१) घरगुती सांडपाणी व्यवस्थापन
शहरातील
किंवा गावातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे त्या भागात कार्यरत असणाऱ्या
स्वराज्य संस्थानसमोर एक मोठे आव्हान आहे. या व्यवस्थापन करण्याकरिता आवश्यक
असणारे मनुष्य बळ , आणि आर्थिक बळ हे छोट्या शहरांकडे तसेच गावातील ग्रामपंचायातींकडे
मर्यादित असते.
ग्रामीण
तसेच छोट्या शहरी भागांत सांडपाणी हे घरांतूनच तयार होते. जेवढे शक्य होईल तितक्या
पातळीवर सांडपाण्याचे व्यवस्थापन घरगुती पातळीवर झाले तर सार्वजनिक सांडपाणी
व्यवस्थापनावर येणारा ताण कमी होईल. त्यामुळे सांडपाणी ज्या ठिकाणी तयार होते
त्याच ठिकाणी त्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे आणि कमी खर्चात करणे शक्य होते.
घरात
तयार होणारे सांडपाणी कोणत्या प्रकारे बाहेर काढणे आणि सोडून देणे हे चित्र आज
सर्वत्र पहायाला मिळते. जर घरगुती पातळीवर सांडपाण्याचे काही प्रमाणत व्यवस्थापन
झाले तर सांडपाण्याचा हा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
घरगुती पातळीवर सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयायोजना
१) परसबाग :
या पद्धतीमध्ये घरातून बाहेर पडणारे पाणी हे गाळण प्रक्रियेतून बाहेर आल्यावर ते पाणी घराजवळ असणाऱ्या परसबागेला देता येऊ शकेल. त्यामुळे सांडपाण्याचा वापर परसबागेतील झाडांना होईल. घरांत उपलब्ध होणारे स्वच्छ पाणी तसेच आपल्या परसदाराच्या जागेचा उपयोग करून आपल्या स्वयंपाक घरातून बाहेर पडणारे पाणी तसेच न्हाणीघरातून बाहेर पडणारे सांडपाणी वापरून त्या पाण्याचा वापर हा आपल्याला आवश्यक असलेल्या भाज्यांची लागवड करण्यासाठी करू शकतो. ही या द्वारे सांडपाणी वाया न जाता त्याचा वापर भाजीसारखी पिके घेण्यासाठी करण्यात येतो.
२) शोष खड्डा:
शोषखड्डा
ही सांडपाणी व्यवस्थापनाची पद्धत देखील घरगुती पातळीवरील सांडपाण्याचे व्यवस्थापन
करण्या करिता उपयोगात आणली जाते. या पद्धतीमध्ये घराशेजारी असणाऱ्या जमिनीत योग्य
आकाराचा खड्डा खोदला जातो. हा खड्डा साधारण २ मी. लांब, २ मी रुंद आणि २ मीटर उंची
अशी असू शकतात. खड्ड्याचा आकार पाण्याच्या वापरावर अवलंबून असावा. या खड्ड्यात
सोडलेले पाणी ही उघड्यावर न राहता ते पाणी खड्ड्यातून जमिनीच्या पृष्ठभागात झिरपले
जाते. योग्य आकाराच्या खड्डा खोदल्या नंतर
त्यामध्ये सर्वात तळाला मोठे दगड आणि वरच्या थरांमध्ये मोठे लहान दगड गोट्यांचे थर
देऊन हा खड्डा पूर्णपणे भरला जातो. यावर वाळूचा थर पसरला जातो. घरातून येणारे
सांडपाणी हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप वर गाळणी लावून किंवा शोष खड्ड्यावर गाळण
जाळी लाऊन पाणी गाळले जाते जेणेकरून पाण्यामध्ये असलेला इतर कचरा वेगळा करता येऊ
शकेल. हे गाळलेले पाणी बारीक आणि मोठ्या दगडांच्या थरांतून गाळले जाऊन पुढे जमिनीत
झिरपले जाईल.
३) पाझर खड्डा:
ज्या
वेळी घरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण हे जास्त असेल त्या वेळी हे सांडपाणी शोषखड्डयाद्वारे
जमिनीमध्ये जलद गतीने जमिनीत झिरपले जाणार नाही. अशा वेळी जास्त पाणी पातळी असेल
तर त्या वेळी पाझर खड्डा या पद्धतीचा उपयोग केला जातो.
या
पद्धतीमध्ये जमिनीत योग्य आकाराचा खड्डा खोडला जातो. या खड्ड्याच्या चारही बाजूंनी
विटांचे जाळीदार बांधकाम केले जाते. या खड्ड्याच्या तळाशी कोणताही गिलावा केला जात
नाही. घरातून बाहेर पडणारे सांडपाणी हे या खड्ड्यामध्ये साचून राहते आणि खड्याला
केलेल्या जाळीदार विटांच्या बांधकामातून तसेच तळामधून हे पाणी हळूहळू जमिनीमध्ये झिरपते.
या पाण्याच्या खड्ड्यावर झाकण म्हणून फारशी किंवा आर.सी.सी. झाकण ठेऊन झाकला जातो.
Evs project in Marathi pdf download - Evs project in Marathi for 12th std - Evs project in Marathi information - Environmental project topics for college students pdf
२)सार्वजनिक
सांडपाणी व्यवस्थापन
एखाद्या
परिसरात जेवढा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो त्यापैकी सुमारे ७५ % ते ८०%
पाणी हे सांडपाण्याच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. हे सर्व पाणी सार्वजनिक सांडपाणी
व्यवस्थेमध्ये सोडले जाते. सांडपाणी व्यवस्थापन करताना सार्वजनीक पातळीवर किती
प्रमाणामध्ये सांडपाणी येईल याचा अंदाज घेऊन त्यानुसार सार्वजनिक व्यवस्थापनासाठी
करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते.
सार्वजनिक पातळीवर सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयायोजना
गावामध्ये
सार्वजनिक बोरवेल, विहरी तसेच पाण्याचे नळ असल्यास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर
चांगले पाणी वाया जाते. या पाण्याचे व्यवस्थापन केले गेले नाही तर त्या ठिकाणी
पाणी साचून राहून दलदल तयार होते व ते आरोग्यास घातक ठरते. त्यामुळे अशा पाण्याची योग्य
ती विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
· वृक्षारोपण :
सार्वजनिक
बोरवेल,
विहरी तसेच पाण्याचे नळ यांसारख्या ठिकाणी वाया जाणारे चांगले पाणी वापरून
त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण करून वाया गेलेले पाणी झाडांना
पुरवून पाण्याची विल्हेवाट लावता येऊ शकते.
· सार्वजनिक पाझरखड्डा:
ज्या
ठिकाणी झाडे लावण्यासाठी जागा उपलब्ध नसते अगदी कमी प्रमणात जागा उपलब्ध असते अशा
ठिकाणी सार्वजनिक पाझरखड्डा तयार करून त्यामध्ये सांडपाणी सोडले जाऊ शकते.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या एका पाझर खड्ड्याध्ये ८ ते १० घरांमधून बाहेर पडणाऱ्या
सांडपाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते.
· सांडपाणी वाहतूक पद्धती :
ज्या
वेळी सांडपाण्याचे जागेवरच व्यवस्थापन करणे शक्य नसल्यास ते पाणी अन्य ठिकाणी वाहून नेऊन त्या पाण्याचे
व्यवस्थापन करावे लागते. हे पाणी वाहून नेताना गटाराचा वापर करावा लागतो. त्यासाठी
गटारांची बांधणी योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. सांडपाणी वाहतूक पद्धती खालील
प्रकारची असू शकेल-
अ)उघडे गटार ब)
कमी व्यासाच्या नळाची बंद गटार पद्धत
सांडपाणी स्थिरीकरण तळे
नैसर्गिकरित्या
पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू असते. नैसर्गिक पाणी शुधीकरण प्रक्रियेचे
तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते. १) निर्वातीय पचन प्रक्रिया २) संमिश्र पचन
प्रक्रिया ३) अंतिम स्थिरीकरण . या नैसर्गिक पाणी शुद्धीकरण प्रक्रियेवर आधारित जल
शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे सांडपाणी
स्थिरीकरण तळे. या पद्धतीमध्ये मैला
विरहित पाणी अभिप्रेत आहे.
अ) निर्वातीय पाचन प्रक्रिया तळे :
या
तळ्यामध्ये सर्व सांडपाणी एकत्र येते. रोज एकत्रित होणाऱ्या सांडपाण्याच्या
प्रमाणानुसार आणि ते मैला विरहित सांडपाणी या तळ्यामध्ये दोन दिवस राहू शकेल या
प्रमाणात या तळ्याचे आकारमान असते. या तळ्यामध्ये सांडपाण्यातील सेंद्रिय
पदार्थांचे निर्वातीय परिस्थितीमध्ये निर्वातीय किटाणूच्या मार्गात विघटन होते.
अशा प्रकारे नैसर्गिक निर्वातीय पाचन झालेले पाणी तळ्याच्या वरच्या बाजूने संमिश्र
प्रक्रिया तळ्यात सोडले जाते.
ब) संमिश्र तळे :
या
तळ्यामध्ये मैला विरहित पाणी सुमारे पाच दिवसांपर्यंत साठवण्यात येते. या
तळ्यामध्ये सवातीय आणि निर्वातीय दोन्ही प्रकारच्या किटाणूच्या द्वारे सेंद्रिय
प्रदर्थांचे विघटन होते.
क) परिपक्वता तळे:
या तळ्यात सुद्धा पाणी पाच दिवसांपर्यत साठवले जाते. सांडपाण्यातील सेंद्रिय पदार्थांची पाचन प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होते. हवेतील ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश यांमुळे या पाण्यातील जवळजवळ सर्व रोगजंतू मारतात. या वरील तीन टप्प्यांमधून बाहेर आलेले पाणी हे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात सोडण्यास तसेच शेतीसाठी वापरण्यात येऊ शकते.
प्रकल्प निष्कर्ष
Ø ग्रामीण तसेच शहरी भागांत राहणाऱ्या लोकांची आरोग्य गुणवत्ता टिकवण्यासाठी सांडपाण्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक .
Ø सांडपाण्यामुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण कमी करून आजूबाजूचा परिसर स्वच्छ व प्रसन्न करणे हे सांडपाण्याच्या व्यवस्थापनाद्वारे शक्य आहे.
Ø सांडपाण्याच्या पुनर्चाक्रीकरण आणि पुनर्वापर कशा प्रकारे केला जावू शकतो याबाबत अधिक माहिती जाणून घेऊन तिचे संकलन करणे शक्य झाले.
Ø घरगुती पातळीवर तसेच सार्वजनी पातळीवर सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कोण कोणत्या उपयायोजना केल्या जाऊ शकतात याबाबत अधिका माहिती जाणून घेण्यास मदत झाली.
Ø सांडपाणी व्यवस्थापन करण्याच्या विविध पद्धती जाणून घेतल्या.
संदर्भ
Ø पर्यावरण
पुस्तिका
PROJECT PDF DOWNLOAD
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
pdf फाईल कशी डाउनलोड करायची याची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रकल्प कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा
pdf फाईल कशी डाउनलोड करायची याची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा