Bhartatil Durmil Vanaspati Paryavarn Prakalp | दुर्मिळ वनस्पती माहिती प्रकल्प
भारतातील दुर्मिळ वनस्पतींची नावे | भारतातील दुर्मिळ वनस्पती प्रकल्प | भारतातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती | पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | Educational marathi
प्रकल्प प्रस्तावना :
मानवाने
सर्वात जुने संसाधन म्हणून वनांचा उपयोग केला. अगदी प्राचीन काळापासून माणूस
स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी वनांवर अवलंबून आहे. वने ही जमिनीची धूप थांबवून,
अन्न , इंधन, चारा, विशेषतः तेथील स्थनिक गरीब लोकांना पुरवतात.
लाखो
लोकांचे रोजचे जीवन ही किरकोळ वनांमधून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून असते.
वनस्पतीच्या माध्यमातून मिळणारी ही उत्पादने वृक्षतोड न करता किंवा लाकडावर
प्रक्रिया न करता सहज उपलब्ध होऊ शकतात. औद्योगिक जगतामध्ये वने ही अजूनही
महत्वाची साधनसंपत्ती मानण्यात येते. जंगलामध्ये राहणाऱ्या भटक्या जमाती आणि लाखो
लोक जे वनांच्या जवळ वास्तव्याला असतात. त्याच्यासाठी वनस्पतीच्या माध्यमातून
मिळणारे उत्पादन हे उदारनिर्वाहाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एकमेव साधन आहे.
कारण, त्यांच्या मुलभूत गरजा ह्या वनस्पतीद्वारेच पूर्ण होतात.
आजच्या
या २१ व्या शतकात अनेक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत आणि काही
वनस्पतींच्या प्रजाती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या मागचे महत्वाची
कारणे म्हणजे वनांचे शेतीमध्ये रुपांतर, लाकूड मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर
केली जाणारी जंगलतोड, जलसिंचन, जलविद्युत प्रकट ही आहेत. या वनस्पतींच्या प्रजाती
कायमच्या नष्ट झाल्या तर पर्यावरणाचा सामोतल अधिकच बिघडेल.
लुप्त
होत जाणाऱ्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी आज ज्या ठिकाणी या लुप्त होत जाणारया वनस्पतींचे
अस्तित्व आहे, त्या ठिकाणची जंगले राखीव ठेवण्यात येत आहेत. परंतु आजही अनेक
ठिकाणी लोकांना दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजातींबाबत माहिती नसल्याने , गरजा
भागवण्यासाठी वृक्षतोड केली जाते, तर काही ठिकाणी त्या वनस्पतीपासून चांगले उत्पादन
मिळत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या जंगलातील वृक्षांची तोड केली जाते. त्यामुळे
काही वनस्पतींच्या प्रजातींची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
भारतातील दुर्मिळ वनस्पती या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण दुर्मिळ वनस्पतींच्या पाच प्रजातींची माहिती घेणार आहोत. या वनस्पतींची वैशिष्टे, अधिवास आणि या प्रजातींना असलेले धोके याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. पर्यावरणातील या महत्वाच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधावे, सर्वांमध्ये पर्यावरणातील या नष्ट होत चाललेल्या वनस्पतींच्या प्रजातींबाबत माहिती मिळवी म्हणून मी या प्रकल्प विषयाची निवड केली आहे.
प्रकल्प अनुक्रमणिका :
अ.क्र. |
घटक |
पान नं. |
१) |
प्रकल्पाची
उद्दिष्टे |
|
२) |
विषयाचे महत्व |
|
३) |
प्रकल्प
कार्यपद्धती / अभ्यासपद्धती |
|
४) |
निरीक्षणे |
|
६) |
विश्लेषण Ø
गोरखचिंच Ø
सफेद मुसळी Ø
चंदन Ø
शिसव Ø कांता/चेरिंगम
|
|
८) |
निष्कर्ष |
|
९) |
संदर्भ |
|
१०. |
अहवाल |
|
प्रकल्प उद्दिष्ट्ये :
- भारतातील दुर्मिळ वनस्पतींबाबत माहिती मिळविणे.
- देशातील वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्यामागील कारणांचा अभ्यास करणे.
- वनस्पतींच्या अधिवासाबाबत अधिक माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन कारणे.
- लुप्त होत जाणाऱ्या प्रत्येक वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण व नामकरण याबाबत अधिक माहिती संकलित करणे.
- पर्यावरणातील दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजातींकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे.
- भारतातील दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी उपाययोजना जाणून घेणे.
- नामशेष होत असलेल्या वनस्पतींबाबत अधिक माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.
प्रकल्प विषयाचे महत्व:
आज ज्या वेगाने जगभरामध्ये वनस्पतींच्या
प्रजातींची संख्या कमी होत आहे. याचा विचार करता सारी सजीवसृष्टी विनाशाच्या
दिशेने अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. आज लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींची संख्या
पहिली की, या जीवसृष्टीतील अन्नसाखळी विस्कळीत होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो की
काय ? अशी भीती निर्माण होते. आज वनस्पतींच्या विविध प्रजाती इतक्या वेगाने कमी
होत आहेत कि त्यांचा हा ऱ्हास एकाएकी थांबवणे शक्य नाही. आज ही समस्या उग्र रूप
धारण करत आहेत.
देशातील वनस्पतींची संख्या कमी होण्याचे
प्रमुख कारण म्हणजे भरमसाठ वाढलेली लोकसंख्या परिणामी वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजांची
पूर्तता करण्यासाठी मानवाने वनस्पतींचा अधिवास नष्ट करून त्या ठिकाणी स्वतःच्या
फायद्यासाठी सोईसुविधा उभ्या केल्या. मानवाने केलेला हा अतिरेक आज या वनस्पतींच्या
ऱ्हासाला कारणीभूत ठरताना दिसत आहे.
वेगाने वनस्पतींची घटत जाणारी संख्या काही
प्रमाणावर कमी करता येऊ शकते. परंतु हे सर्व होण्यासाठी देशातील प्रत्येक
नागरिकाने वनस्पतींच्या या समस्येबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या
होणाऱ्या बेसुमार तोडीवर कडक कायदे केले गेले गारच प्राण्यांच्या घटत्या संख्येवर
काही प्रमाणात अंकुश ठेवता येऊ शकेल. दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे राखीव जंगलांची
संख्या वाढवणे. जर हे उपाय केले नाही तर येत्या काही वर्षांत बहुतांश वनस्पतींच्या
प्रजाती या लुप्त होतील हे मात्र नक्की.
म्हणूनच आज सर्वांना भारतातील दुर्मिळ
वनस्पतींची माहिती या प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती करून घेणे गरजेचे आहे.
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती :
भारतील दुर्मिळ वनस्पतींची माहिती या विषयाचा
अभ्यास करता असताना मी सर्वेक्षण आणि संशोधन या कार्य पद्धतीचा उपयोग प्रकल्पाची
माहिती मिळविण्यासाठी केला. प्रकल्प विषयाची माहिती मिळवत असतना सदर विषयावरील
प्रकल्प करणे का गरजेचे आहे ? सदर विषयाचे पर्यावरणीय तसेच सामाजिक महत्व काय आहे
याबाबत माहिती जाणून घेतली . या विषयाबाबत अधिक माहिती मिळवत असताना भारतातील नामशेष
होण्याच्या मार्गावर असेलल्या वनस्पतीची पूर्वीची स्थिती काय होती , वर्तमानातील
स्थिती काय आहे आणि भविष्यातील या वनस्पतीची स्थिती काय असेल इत्यादी गोष्टींचा
विचार करून प्रकल्प लेखनासाठी मुद्दे तयार करण्यात आले.
या प्रकल्प विषयाबाबत माहिती संकलित करतना
मी IUCN या संस्थेच्या online वेबसाईट वर उपलब्ध असलेली लुप्त होत असणाऱ्या
वनस्पतींची नावे एकत्र केली. सदर वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्यामागे कोणती
कारणे आहेत ? या वनस्पती देशाच्या कोणत्या भागात आढळतात? इत्यादी मुद्दे तयार करून
त्यानुसार माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. नामशेष होत असलेल्या वनस्पतींच्या प्रजातींबाबत
माहिती मिळविण्यासाठी पर्यावरण विषयक पुस्तकांचा
संदर्भ घेतला.
तयार केलेल्या प्रकल्प
मुद्द्यांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर
केला. इंटरनेट च्या माध्यमातून या प्रकल्पाबाबत अधिक माहिती संकलित करणे शक्य
झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकाल्पाध्ये समाविष्ट
केली.या माहितीच्या आधारावरून प्रकल्प निष्कर्ष नमूद केला.
प्रकल्प निरीक्षणे :
भारतातील लुप्त होत असलेल्या वनस्पतींच्या प्रजाती:
अ.क्र. |
सामान्य नाव |
वैज्ञानिक नाव |
१. |
गोरखचिंच |
Adansonia
digitata (अदानसोनिया डिजिटेटा) |
२. |
सफेद मुसली |
Chlorophytum
borivilianum (क्लोरोफिटम बोरिव्हिलियनम) |
३. |
रक्त चंदन |
Pterocarpus
santalinus (टेरोकार्पस सॅंटलिनस) |
४. |
शिसव |
Diospyros
ebenum (डायओस्पायरोस इबेनम) |
५. |
बर्ड्स-फूट ट्रेफोइल |
Lotus
corniculatus(लोटस कॉर्निकुलेटस) |
6. |
पिग्मी वॉटर-लिली |
Nymphaea
tetragona |
7. |
हिमालयाची राणी |
Meconopsis
aculeate मेकोनोप्सिस एक्युलेटा |
8. |
उंबर |
Ficus
racemosa |
9. |
वेखंड |
Acorus
calamus(एकोरस कॅलॅमस) |
10. |
आंबट चेरी |
Prunus
cerasoides (प्रुनस सेरासॉइड्स) |
Ø भारतातील संकटग्रस्त वनस्पती प्रदेशानुसार
वनस्पती |
सामान्य नाव |
प्रदेश (स्थिती) |
Polygala
irregularis |
Milkwort |
गुजरात ( दुर्मिळ) |
Lotus
corniculatus |
Bird's
foot |
गुजरात ( दुर्मिळ) |
Amentotaxus
assamica |
Assam
catkin yew |
अरुणाचल प्रदेश (threatened) |
Psilotum
nudum |
Moa,
skeleton, fork fern, and whisk fern |
कर्नाटक ( दुर्मिळ) |
Diospyros
celibica |
Ebony
tree |
कर्नाटक ( दुर्मिळ) |
Actinodaphne
lawsonii |
|
कर्नाटक ( दुर्मिळ) |
Acacia
planifrons |
Umbrella
tree, kudai vel (Tamil) |
तमिळनाडू ( दुर्मिळ) |
Abutilon
indicum |
Indian
mallow, thuthi (Tamil) and athibalaa (Sanskrit) |
तमिळनाडू ( दुर्मिळ) |
Chlorophytum
tuberosum |
Musli |
Ta तमिळनाडू ( दुर्मिळ) |
Chlorophytum
malabaricum |
Malabar
lily |
तमिळनाडू ( दुर्मिळ) |
Nymphaea
tetragona |
|
जम्मू (दुर्मिळ ) काश्मीर (दुर्मिळ) |
Belosynapsis
vivipara |
Spider
wort |
मध्य प्रदेश ( दुर्मिळ) |
Colchicum
luteum |
|
हिमाचल प्रदेश (दुर्मिळ) |
Pterospermum
reticulatum |
Malayuram,
Malavuram |
केरळ , तामिळनाडू (दुर्मिळ) |
Ceropegia
odorata |
Jeemikanda
(Gujarat) |
गुजरात, मेळघाट, राजस्थान (दुर्मिळ) |
भारतातील दुर्मिळ वनस्पतींची नावे | भारतातील दुर्मिळ वनस्पती प्रकल्प | भारतातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती | पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी\ | Educational marathi
भारतातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती.
माहितीचे विश्लेषण :
भारतातील नामशेष होत असलेल्या वनस्पतींची माहिती .
१} गोरखचिंच
शास्त्रीय
वर्गीकरण |
|
सृष्टी(Kingdom) : |
वनस्पती
(Plantae) |
विभाग
(Division): |
ट्रेकिओफायटा
(Tracheophyta) |
गण(Order): |
मॅलवेल्स
(Malvales) |
कुल
(Family): |
बॉम्बेसी
(Bombacaceae) |
जाती
(Genus): |
आदान्सोनिया
(Adansonia) |
प्रजाती
(Species): |
डिजिटाटा
(Digitata) |
वैशिष्ट्ये
/ वर्णन :
गोरखचिंच हा वृक्ष ५० फुट उंचीपर्यंत वाढतो. पानगळी वृक्षांच्या
यादीमध्ये या वृक्षाचे नाव समाविष्ट केले आहे. या वृक्षाचा खोडाचा परीघ सुमारे १००
फुटांपर्यंत देखील असू शकतो. खोडाची साल ही राखाडी रंगाची असते. या वृक्षाची फुले
ही पाच पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. या वृक्षाची फुले रात्री
फुलतात. या फुलांना मंद सुवास असतो.याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास
असतो.
गोरखचिंच या वृक्षाला बाटलीच्या आकाराची साधारणतः १ फुट लांबीची
फळे येतात. या फळांचा रंग राखाडी असून ती कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यासारखी दिसतात.
आढळ /
अधिवास :
गोरखचिंच
ही मूलतः आफ्रिका खंडामध्ये आढळणारी वनस्पती आहे. हा वृक्ष उष्ण कटिबंधीय
प्रदेशांत देखील आढळतो. मायकेल ॲडनसन या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने गोरखचिंच या
वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ Adansonia digitata असे नाव या वृक्षाला देण्यात आले.
गोरख चिंच या वृक्षाच्या खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते, त्यामुळे ज्या प्रदेशात पाणी कमी आहे
अशा प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते.
उपयोग
:
· या फळाचे
वजन साधारण १.५ किलो असते. गोरखचिंचेच्या पानांत शर्करा, ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशिअम
व टार्टरेट असते.
· या
फळाच्या ताज्या बियांची भाजी केली जाते , तर
काही वेळा या बिया भाजून कॉफीऐवजी वापरल्या जातात.
· या
फळाच्या गराचा उपयोग शीत पेय बनवण्यासाठी केला जातो.
· दाह
कमी करण्यासाठी देहील या फळाच्या गराचा उपयोग होतो.
· अतिसार,
अजीर्ण, भोवळ, आव, यांवर या
पेयाचा उपयोग होतो.
· गोरखचिंचेच्या
खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात.
· या
वृक्षाचे लाकूड हलके असते. त्यामुळे गुजरातमध्ये या लाकडाचा वापर मासेमारीसाठी
होड्या तयार करण्यासाठी केला जातो.
· या वृक्षाची आंतरसाल उत्तम, टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी होतो.
सूचना: वरील औषधी उपयोग हे माहितीसाठी देण्यात आले आहेत. वरील वनस्पतीचा औषध म्हणून वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२}सफेद मुसळी
शास्त्रीय
वर्गीकरण |
|
सृष्टी(Kingdom) : |
वनस्पती
(Plantae) |
विभाग
(Division): |
ट्रेकिओफायटा
(Tracheophyta) |
गण(Order): |
शतावरी
(Asparagales) |
कुल
(Family): |
शतावरी
(Asparagaceae) |
जाती
(Genus): |
क्लोरोफिटम(Chlorophytum) |
प्रजाती
(Species):
|
C. बोरिव्हिलियनम (C.
borivilianum) |
वैशिष्ट्ये
/ वर्णन :
सफेद
मुसळी ही जंगलामध्ये वाढणारी पांढर्या रंगाची एक वनस्पती आहे. या वनस्पतीला
व्हाईट गोल्ड (White gold) किंवा दिव्य औषध म्हणून देखील ओळखले जाते. सफेद मुसळी ही भारतात आढळणारी
एक दुर्मिळ वनस्पती आहे. या वनस्पतीचा उपयोग अनेक प्रकारच्या उपचारांमध्ये केला
जातो.
सफेद मुसळी हे वर्षायू झुडूप आहे, याची उंची साधारणतः
३०–५० सेंमी. इतकी असते. या वनस्पतीच्या मुळांचा आकार लंबगोलाकार असून या
वनस्पतीची मुळे ही जमिनीखाली लांबवर पसरलेली असतात. या वनस्पतीची पाने ही लहान
देठाची असून ती मुळापासून निघालेली (मुलज) वाटतात. सफेद मुसळी वनस्पती ची पाने १५–४५
सेंमी. लांब व १·५–३·५ सेंमी. रुंद असतात. पानांची टोके
जमिनीला स्पर्श करू लागल्यावर त्यांना नवीन मुळे फुटायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी नवीन
रोप तयार होते. या वनस्पतीची फुले ही लहान, पांढरी व सवृंत असतात.
आढळ /
अधिवास :
सफेद
मुसळी ही उष्णकटिबंधीय आर्द्र जंगलात आढळणारी वनस्पती आहे. सफेद मुसळी हे वनस्पती
मूलतः भारतातील असून ती हिमालयातील उपोष्ण वनात आणि आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तराखंड व महाराष्ट्र या राज्यांतील वनांमध्ये आढळते. सफेद
मुसाळीच्या औषधी गुणधर्मांमुळे महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यांत सफेद मुसळीची
लागवड केली जाते.
उपयोग
:
· सफेद
मुसळी वजन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.
· सफेद
मुसळी खाल्ल्याने अनेक प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स शरीराला मिळतात.
· या
वनस्पतीचा उपयोग डिप्रेशन(Depression), डिमेंशिया (Dementia) यांसारख्या वेगवेगळ्या मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
· सफेद मुसळी
शरीरातील वात आणि पित्त दोष नियंत्रणात ठेवते.
· बेचैनी,
हातपाय थंड पडणे यांसारख्या त्रासांवर उपचारासाठी सफेद मुसळी उपयुक्त ठरते.
· रोगप्रतिकारक
शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरते.
· सफेद
मुसळी खाल्ल्याने आपले हृदय तंदुरुस्त तर राहतेच शिवाय पचनशक्ती देखील सुधारते.
· सफेद
मुसळीची पावडर दुधात किंवा मधामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो.
सूचना: वरील औषधी उपयोग हे माहितीसाठी देण्यात आले आहेत. वरील वनस्पतीचा औषध म्हणून वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Endangered plant species in india project in marathi | Endangerd plant species in india evs project
Endangered plant species in india project pdf class 12 | Endangered plant species in india project introduction
३} चंदन
शास्त्रीय
वर्गीकरण |
|
सृष्टी(Kingdom) : |
वनस्पती
(Plantae) |
विभाग
(Division): |
ट्रेकिओफायटा
(Tracheophyta) |
गण(Order): |
फॅबल्स
(Fabales) |
कुल
(Family): |
Fabaceae |
जाती
(Genus): |
टेरोकार्पस(Pterocarpus) |
प्रजाती
(Species): |
पी.
सॅंटलिनस (P. santalinus) |
वैशिष्ट्ये
/ वर्णन :
चंदनाचे
झाड हे सुमारे १५ ते २० मीटर उंच वाढते . चंदनाच्या झाडाची पाने समोरासमोर, लांबट, पातळ व टोकदार असतात. चंदनाच्या फांद्यांना
येणारे फुलांचे गुच्छे हे लहान आणि गंधहीन असतात. चंदनाचे खोड हे तेलयुक्त आणि
कठीण असते. चंदनाच्या झाडाच्या खोडाचा आतील गाभा पिवळसर ते अतिशय सुगंधी असतो. जस
जसी चंदनाच्या झाडाची वाढ होते तस तसा चंदनाच्या खोडात असणारा सुगंधी तेलाचा अंश देखील
वाढत जातो.
आढळ /
अधिवास :
चंदनाचे
वृक्ष भारतातील कर्नाटक, तामिळनाडू विपुल प्रमाणात आढळतात.
कर्नाटक राज्यामध्ये म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी चंदनाच्या लाकडावर आधारित अनेक
लघुउद्योगांचा विकसित झालेले आहेत.
चंदनाच्या
सुवासिक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार मोठ्या प्रमाणवर केला जात आहे. उद्योगांसाठी मोठ्या
प्रमाणावर झालेली चंदनाच्या झाडाची तोड
यामुळे चंदन वृक्षाचे आज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकाराची लाकडे
आता उपलब्ध होत नसल्यामुळे फर्निचर साठी चंदनाच्या लाकडाचा उपयोग होत नसला तर्हीही
सुवासिक तेले मिळविण्यासाठी चंदनाच्या झाडाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
उपयोग
:
· चंदनाचा
उपयोग औषध म्हणून केला जातो.
· चंदनाच्या
बियांपासून लवकर सुकणारे कोरडे तेल मिळवले जाते.
· ताप येऊन
डोके दुखत असल्यास चंदन, कापूर आणि केशर उगाळून कपाळावर लावल्यास डोके थंड होते
आणि ताप कमी होण्यास मदत होते.
· शरीराला
सूज आली असेल किंवा शरीराची आग होत असेल तर चंदन उगाळून सुजलेल्या भागावर लेप
लावल्यास सूज कमी होते आणि आग होणे देखील थांबते.
· चेहऱ्यावर
येणारी मुरुमे आणि पुटकुळ्या घालवण्यासाठी चंदन पावडर व दुध यांचा लेप चेहऱ्यावर
लावल्यास मुरुमे आणि पुटकुळ्या कमी होतात.
· डोळ्यांखाली
येणारी काळी वर्तुळे ( Dark circles) घालवण्यासाठी चंदनाचा लेप तयार करून
डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात.
· पाण्यात
चंदन पावडर मिसळून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.
· चटका
लागला असेल किंवा भाजले असेल तर त्या ठिकाणी चंदनाचा लेप लावल्यास शरीराचा दाह कमी
होण्यास मदत होते.
सूचना: वरील औषधी उपयोग हे माहितीसाठी देण्यात आले आहेत. वरील वनस्पतीचा औषध म्हणून वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
४} कांता (हिमालयाची राणी)
शास्त्रीय
वर्गीकरण |
|
सृष्टी(Kingdom) : |
वनस्पती
(Plantae) |
विभाग
(Division): |
ट्रेकिओफायटा
(Tracheophyta) |
गण(Order): |
( Ranunculales ) |
कुल
(Family): |
(Papaveraceae) |
जाती
(Genus): |
मेकोनोप्सिस
(Meconopsis) |
प्रजाती
(Species): |
मेकोनोप्सिस
एक्युलेटा (M. aculeata) |
वैशिष्ट्ये
/ वर्णन :
कांता (एम. एक्युलेटा) ही बारमाही औषधी वनस्पती आहे.
या वनस्पतीची उंची सुमारे ३० ते ६० सेमी इतकी असते. या वनस्पतीला येणारी फुले ही
शोभिवंत असतात. या फुलांना चार पाकळ्या क्वचित
सहा पाकळ्या असतात. ही फुले निळ्या – जांभळ्या रंगाची असतात. या फुलांचा बहर
जुलै ते ऑगस्ट दरम्यान येतो.
आढळ /
अधिवास :
ही
वनस्पती हिमालयाची राणी या स्थानिक नावाने प्रसिद्ध आहे. तसेच या वनस्पतीला अचत्सर्मम, ब्लू खसखस, कांता, वनिता,
लडक, गुल-ए-निलम, अचाक-स्रमम,
गुल-ए-नीलम, लँडरेमेंटोक, उत्-पाल स्नगोन-पो, चेरिंगम, अशी
विविध नावे आहेत.
M.
aculeata ही वनस्पती दुर्मिळ असलेल्या औषधी वनस्पतींपैकी एक वनस्पती
आहे. कांता ही वनस्पती फक्त हिमालय पर्वतरांगांमध्ये आढळते. हे वनस्पती मे ते
ऑक्टोबर या महिन्यांच्या कालावधीत वाढते. आन जुलै च्या मध्यापासून ते ऑगस्टपर्यंत या
वनस्पतीला फुले येतात. आणि ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत या वनस्पतीला
फळधारणा होते.
उपयोग
:
· M. aculeata (कांता) या वनस्पतीचा संपूर्ण भाग औषध म्हणून वापरला जातो.
· मलेरिया
आणि बॅक्टेरिया प्रतीरोधी गुणधर्म या वनस्पतीमध्ये असल्याने औषध उत्पादनात या वनस्पतीचा
वापर केला जातो.
· संधिवाताच्या
वेदना,
ज्वर, वेदनाशामक म्हणून या वनस्पतीचा वापर
केला जातो.
· तसेच बरगड्यांच्या
आसपासच्या हाडांवर उपचार करण्यासाठी हे कच्चे औषध म्हणून वापरले जाते.
· प्राण्यांची
रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी या वनस्पतीची जमिनीतील मुळे मिठासोबत खायला दिली
जातात.
·
या वनस्पती मध्ये आढळणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट
आणि अँटी-इंफ्लॅमेटरी गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या क्षयरोगाचा धोका कमी होतो.
सूचना: वरील औषधी उपयोग हे माहितीसाठी देण्यात आले आहेत. वरील वनस्पतीचा औषध म्हणून वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
५} शिसव / शिसवी
शास्त्रीय
वर्गीकरण |
|
सृष्टी(Kingdom) : |
वनस्पती
(Plantae) |
विभाग
(Division): |
ट्रेकिओफायटा
(Tracheophyta) |
गण(Order): |
एरिकलेस( Ericales ) |
कुल
(Family): |
एबेनेसी
(Ebenaceae) |
जाती
(Genus): |
डायओस्पायरॉस( Diospyros ) |
प्रजाती
(Species): |
डी.
इबेनम ( D. ebenum ) |
वैशिष्ट्ये
/ वर्णन :
शिसव
हा वृक्ष सुमारे २० ते २५ मी इतका उंच वाढतो. या वृक्षाचा खोडाचा व्यास २ ते ३
मीटर इतका असतो. मोकळ्या जागेमध्ये वाढलेली शिसवी ची झाडे हे वेडीवाकडी वाढलेली
असतात. शिसव वृक्षाची पाने मोठी, एकाआड एक व चकचकीत असतात. खोडाची साल गडद तपकिरी
रंगाची आणि भेगाळलेली असते. शिसव वृक्षाला येणारी फुले ही सुंगधी , लहान असून
फुलांचा गुच्छ ५ ते १० सेमी इतका लांब असतो. शिसव झाडाची पद्धतशीर लागवड केल्यास
साधारणपणे २० महिन्यांत शिसवीची झाडे ६–७ मी. उंच वाढतात
आढळ /
अधिवास :
शिसव
हा एक मोठा पानझडी वृक्ष. भारतात बहुतेक ठिकाणी शिसव हा वृक्ष आढळतो. या वृक्षाची मात्र
पंजाब, प. बंगाल, उत्तर प्रदेश, उपहिमालयी प्रदेश व आसाम या प्रदेशांत
मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आढळते.
खडे,
वाळू, आणि गोटे मिश्रित भुसभुशीत जमिनीत शिसव या वृक्षाची वाढ जोमाने होते. बंगालमधील
दुआबातील नदीकाठच्या भागात शिसव या वृक्षाची चांगली वाढ झालेली आढळते. चिकण माती असलेल्या प्रदेशांत या वृक्षाची वाढ
खुंटते. या वृक्षाची लागवड बिया तसेच रोपे लावून देखील करता येते.
उपयोग
:
·
शिसव या झाडाच्या लाकडाचा उपयोग उच्च
दर्जाचे सजावटीचे समान, पेट्या व कापाटे तयार करण्यासाठी केला जातो.
·
विविध प्रकारच्या लाकडी वस्तू, हातोड्यांचे दांडे, फर्निचर, बुटाचे
तळवे इत्यादींसाठी शिसव या झाडाच्या लाकडाचा उपयोग केला जातो.
·
शिसव या वृक्षापासून मिळणारे तेल हे न
सुकणारे व उच्च तापमानाने अपघटन न होणारे असल्यामुळे त्याचा उपयोग अवजड यंत्रात
वंगण म्हणून केला जातो.
·
या वृक्षाची पाने गोड्या तेलात चुरून
त्यांचा लेप जखमांवर लावला जातो.
·
शिसव या वृक्षाचा पाला जनावरे आवडीने
खातात.
सूचना: वरील औषधी उपयोग हे माहितीसाठी देण्यात आले आहेत. वरील वनस्पतीचा औषध म्हणून वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Endangered plant species in india project in marathi | Endangerd plant species in india evs project | Endangered plant species in india project pdf class 12 | Endangered plant species in india project introduction
निष्कर्ष :
संदर्भ :
· https://www.educationalmrathi.com (Educationalमराठी)
· https://www.mazaabhyas.com
· https://www.wikipedia.org
· https://www.researchgate.net
प्रकल्प अहवाल :
मी, [तुमचे नाव]. मी " भारतातील
दुर्मिळ वनस्पती " या विषयावरील प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हा
प्रकल्प माझ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून मी हाती घेतला होता. भारताच्या
विविध भागांत आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींबाबत माहिती मिळवून त्या माहितीच्या आधारावर माझे निष्कर्ष आणि विश्लेषण
मांडताना मला आनंद होत आहे.
भारतातील दुर्मिळ वनस्पती, या प्रकल्पामुळे मला देशातील वनस्पतींच्या प्रजाती नष्ट
होण्यामागील कारणे, दुर्मिळ वनस्पतींचा अधिवास याबाबत अधिक माहिती मिळवली. दुर्मिळ
होत जाणाऱ्या प्रत्येक वनस्पतीचे
शास्त्रीय वर्गीकरण व नामकरण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊन त्या माहितीचे
संकलन केले.
हा प्रकल्प करत असताना माझ्या निदर्शनास आलेल्या
बाबी पुढील पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने प्रकल्पामध्ये समाविष्ट केल्या. १) भारतातील
लुप्त होत असलेल्या वनस्पतींच्या प्रजाती . २)भारतातील नामशेष होण्याच्या मार्गावर
असलेल्या प्रजाती. ३) भारतातील संकटग्रस्त वनस्पती व त्यांचा अधिवास. इ.
या प्रकल्पाच्या माध्यमातून वनस्पतींची संख्या
कमी होण्यामागील कारणे, संवर्धनासाठी
आवश्यक उपाय योजना, दुर्मिळ वनस्पतींचे महत्व यांसारख्या
मुद्द्यांचा अभ्यास करण्यात आला.
या प्रकल्पात मला मार्गदर्शन केल्याबद्दल
केल्याबद्दल मी माझे शैक्षणिक मार्गदर्शक, [मार्गदर्शक नाव] यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
याव्यतिरिक्त,
मी माझ्या शैक्षणिक संस्थेचा आभारी आहे , की मला या महत्त्वपूर्ण विषयावर
प्रकल्प करण्याची आणि पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील ज्ञानाच्या वाढत्या भागामध्ये
योगदान देण्याची संधी दिली.
मला आशा आहे की माझा प्रकल्प भारतातील दुर्मिळ असलेल्या वनस्पतींच्या प्रजातींबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी एक उपयुक्त माहिती स्त्रोत म्हणून उपयुक्त ठरेल.
विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा
VIEWPDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.
PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा
DOWNLOADनवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.
भारतातील दुर्मिळ वनस्पतींची नावे ,| भारतातील दुर्मिळ वनस्पती प्रकल्प
भारतातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती | पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | Educational marathi