Rasayanik Shetichya tulnet Sendriy Shetimule kami Pradushn hote | Paryavaran Prakalp
रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय
शेतीमुळे कमी प्रदूषण होते. हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा पर्यावरण प्रकल्प
विषय आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे म्हणजे
मातीची सुपीकता वाढवणे. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर न केल्यामुळे माती प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होते आणि त्यामुळे शाश्वत शेती, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि आरोग्यदायी अन्न उत्पादन शक्य
होते. या पर्यावरण प्रकल्प माहितीच्या माध्यमातून सेंद्रिय
शेती विरुद्ध रासायनिक शेती यांचा अभ्यास करून, पर्यावरणावर होणारे परिणाम व पर्यावरणपूरक
शेती ची गरज याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून
देण्यात आली आहे.
1) प्रकल्प प्रस्तावना
आज
शेती ही केवळ अन्नधान्य उत्पादनाची एक प्रक्रिया राहिली नसून, शेतीचा थेट संबंध पर्यावरणाशी येतो. मानवी जीवन जस जसे अधिक विकसित होत
गेले तसतसे अन्नधान्याच्या वाढत्या गरजा
भागवण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, रासायनिक खते आणि
कीटकनाशके आणि रासायनिक कीडनाशकांचा वापर वाढला. यामुळे शेतीतील उत्पादनात वाढ
झाली खरी पण त्याचबोबर पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची भीती निर्माण झाली. विशेषतः रासायनिक
शेतीमध्ये पिकांचे उत्पादन अधिक घेण्यासाठी आणि मातीची सुपीकता टिकावी यासाठी मोठय
प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर केला जातो. तसेच कीटक व रोग नियंत्रणासाठी
कीडनाशकांचा अतिरेकी वापर केला जातो. या रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे माती
प्रदूषण , जलप्रदूषण, हवा प्रदूषण
मोठ्या प्रमाणवर होते. त्याचबरोबर अन्नधान्यातील विषारी अंश ही एक गंभीर समस्या
निर्माण झाली आहे.
याउलट
सेंद्रिय शेती हे निसर्गाशी अनुरूप आणि शाश्वत पद्धती आहे. यामध्ये रासायनिक
खतांचा व कीडनाशकांचा वापर टाळून शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत, जैवखते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर
केला जातो, ज्यामुळे पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी
राहते.
शेती
क्षेत्र हे अन्नधान्य उत्पादनाबरोबरच प्रदूषणाचा एक मोठा स्त्रोत बनत चालले
आहे. याचे कारण मध्ये रासायनिक खतांचा
दीर्घकालीन वापर यामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थांचे परमान घटते, मातीचा भुसभुशीतपणा व आर्द्रता धारण करण्याची क्षमता कमी होते. तसेच,
खतांचे व कीटकनाशकांचे अंश पावसाळ्यात भूजल आणि नद्यांमध्ये मिसळून
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढते आणि यामुळे गंभीर आजार उद्भवतात.
कीटकनाशके फवारल्यामुळे त्यांचे सूक्ष्मकण हवेत पसरतात, जे
शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतात, तसेच खतांचे अवशेष अन्नधान्यात साठल्याने मानवी आरोग्यास गंभीर धोके
निर्माण होतात.
जगभरात आज पर्यावरणपूरक शेतीच्या संकल्पना चर्चेत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार शेती क्षेत्रातून होणारे हरितगृह वायू उत्सर्जन हे एकूण जागतिक प्रदूषणाच्या जवळपास २५% इतके आहे. ज्यामध्ये सर्वाधिक योगदान रासायनिक खतांच्या वापराचे आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये रासायनिक शेतीचे प्रमाण कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्यावर भर दिला जात आहे.
Environmental project pdf | पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी
भारत
हा कृषिप्रधान देश असून सुमारे ५५% लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे. हरित
क्रांतीमुळे उत्पादनात वाढ झाली असली तरी त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम सर्वांसमोर
येऊ लागले आहेत. पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात भूजलातील
नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचल्यामुळे कर्करोगासारखे आजार वाढले आहेत.
यावर उपाय म्हणून भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना (PKVY), राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम (NPOP) आणि
कृषी जैवविविधता संवर्धन यांसारख्या योजना राबवल्या आहेत.
एकंदरीत, रासायनिक शेतीने अल्पावधीत अन्नधान्य उत्पादनात क्रांती घडवली, पण तिच्या अतिरेकामुळे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याउलट
सेंद्रिय शेती पद्धती मानवी आरोग्यास सुरक्षित ठरते आणि पर्यावरण संवर्धनास हातभार
लावते. म्हणूनच "रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेतीमुळे कमी प्रदूषण
होते" हे विधान अत्यंत सत्य व शाश्वत आहे. आगामी पिढ्यांसाठी सुरक्षित,
निरोगी व प्रदूषणमुक्त पर्यावरण टिकवण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे
ही काळाची गरज आहे.
2) प्रकल्प अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
पान नं. |
१) |
प्रकल्पाची
उद्दिष्टे |
|
२) |
विषयाचे महत्व |
|
३) |
प्रकल्प
कार्यपद्धती / अभ्यासपद्धती |
|
४) |
निरीक्षणे |
|
६) |
विश्लेषण |
|
८) |
निष्कर्ष |
|
९) |
संदर्भ |
|
१०) |
अहवाल |
|
3) प्रकल्प उद्दिष्ट्ये
1. रासायनिक शेतीचा माती, पाणी आणि हवेवर होणारा दुष्परिणाम समजून घेणे.
2. सेंद्रिय शेती प्रदूषण कमी करण्यात कशी मदत करते हे विश्लेषित करणे.
3. आरोग्यावर रासायनिक खतांचा अतिरेक काय परिणाम करतो हे जाणून घेणे.
4. हवामान बदलाशी सेंद्रिय आणि रासायनिक शेतीचा संबंध स्पष्ट करणे.
5. जैवविविधता जपण्यात सेंद्रिय शेतीची भूमिका अभ्यासणे.
6. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर दोन्ही प्रकारच्या शेतीचा परिणाम कसा होतो हे जाणून घेणे.
7. भूजल प्रदूषण आणि नायट्रेटच्या प्रमाणावर शेतीचा प्रभाव तपासणे.
8. रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीतील उत्पादनक्षमतेची तुलना करणे.
9. शाश्वत विकास साधण्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित करणे.
10. धोरणनिर्मिती व जनजागृतीसाठी वैज्ञानिक माहिती उपलब्ध करून देणे.
Related Posts
4) प्रकल्प विषयाचे महत्व
आजच्या युगात पर्यावरण संरक्षण ही केवळ तात्त्विक चर्चा नसून मानवी अस्तित्वाशी निगडित वास्तव समस्या ठरली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनात आणि उपभोगात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याचा थेट परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीवर व पर्यावरणीय संतुलनावर झाला. विशेषतः कृषी क्षेत्रात झालेल्या हरित क्रांतीने भारतासह अनेक विकसनशील देशांमध्ये अन्नधान्य टंचाई दूर केली, परंतु त्याचबरोबर रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा व तणनाशकांचा अतिरेक झाला. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर असे निदर्शनास येते की मातीची सुपीकता घटत चालली आहे, भूजलाचे प्रदूषण गंभीर झाले आहे, आणि हवामान बदल घडून येत आहे. यामुळे "रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेतीमुळे कमी प्रदूषण होते" हा विषय केवळ कृषीशास्त्रापुरता मर्यादित राहिलेला नसून आरोग्य, पर्यावरण, सामाजिक-आर्थिक प्रगती आणि भविष्यातील पिढ्यांचे अस्तित्व या सर्वांशी निगडित आहे.
आज जगभरात प्रदूषण ही
सर्वात मोठी समस्या मानली जाते. शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहन संख्येत वाढ आणि रासायनिक शेती यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीचे
तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल अहवालानुसार,
कृषी क्षेत्रामुळे सुमारे २५ % इतक्या हरितगृह वायूंमध्ये वाढ झाली
आहे. यातील महत्वाचा भाग हा रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर आहे.
Evs project class 11 and 12 | Evs project topic
आरोग्याच्या
दृष्टिकोनातून विचार केला तरी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. जागतिक आरोग्य
संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी लाखो लोक कीटकनाशकांच्या
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कामुळे
गंभीर आजारांना बळी पडतात. भारतात विशेषतः पंजाब, हरियाणा,
महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये भूजलात नायट्रेटचे प्रमाण धोकादायक
पातळीवर पोहोचले असून "ब्लू बेबी सिंड्रोम", कर्करोग,
आणि यकृतविकारासारखे आजार वाढताना दिसत आहेत.
सामाजिक-आर्थिक
दृष्टिकोनातून पाहिले तर आज सेंद्रिय उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. शहरी
भागात सेंद्रिय अन्नाचे विशेष स्टोअर्स उघडले गेले आहेत आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही
सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या उत्पादनांची विक्री वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना
त्यांच्या उत्पादनाला अधिक किंमत मिळते. हे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी
महत्त्वाचे आहे. याशिवाय, सेंद्रिय शेतीत स्थानिक व पारंपरिक
बियाण्यांचा वापर प्रोत्साहित होतो, ज्यामुळे जैवविविधतेचे
संवर्धन होते आणि स्थानिक कृषी ज्ञानाला चालना मिळते.
आजच्या काळात या विषयाचे महत्त्व सरकारी धोरणांतूनही स्पष्ट होते. भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना (PKVY), राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम (NPOP), आणि इतर योजनांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन दिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर युरोपियन युनियन, अमेरिका, जपान यांसारख्या देशांत सेंद्रिय उत्पादनांसाठी विशेष मानके व प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली आहे. हे सर्व उपक्रम प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आहेत.
हा विषय आजच्या काळात महत्त्वाचा ठरण्याची अनेक कारणे आहेत पर्यावरणीय संतुलन राखणे, माती-पाणी-हवा सुरक्षित ठेवणे, हवामान बदलाचा वेग कमी करणे, मानवी आरोग्याचे संरक्षण करणे, जैवविविधता संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे. जर आपण आज या विषयाचे महत्त्व ओळखून सेंद्रिय शेतीकडे वळलो नाही, तर भविष्यातील पिढ्यांना प्रदूषण, रोगराई आणि अन्नसंकट यांचा सामना करावा लागेल. म्हणूनच, आजच्या काळात या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे.
5) प्रकल्प कार्यपद्धती
१. संशोधनाचा प्रकार
या प्रकल्पाबाबत अधिक माहिती
जाणून घेण्यासाठी मी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक प्रकारचा अवलंब केला. यात रासायनिक व सेंद्रिय
शेतीची तुलना करून प्रदूषणावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास केला जाईल.
२. माहिती संकलन पद्धती
माहितीचा स्रोत |
पद्धत |
उद्देश |
प्राथमिक माहिती (Primary Data) |
शेतकरी मुलाखती, प्रश्नावली, प्रत्यक्ष निरीक्षण |
शेतकऱ्यांचा अनुभव, उत्पादन खर्च, आरोग्य परिणाम व
पर्यावरणीय स्थिती समजून घेणे |
दुय्यम माहिती (Secondary Data) |
संशोधन पेपर्स, शासकीय अहवाल, एनजीओ व
आंतरराष्ट्रीय संस्थांचे डेटा |
प्रदूषणाचे आकडे, हवामान बदल, भूजल स्थिती व
धोरणात्मक उपक्रम समजणे |
३. नमुना निवड
- नमुना प्रकार : स्तरीकृत
यादृच्छिक नमुना
- प्रदेश : दोन गट – (१) रासायनिक शेती
करणारे शेतकरी, (२) सेंद्रिय शेती करणारे शेतकरी
- नमुना आकार : प्रत्येकी
किमान ५ शेतकरी, म्हणजे एकूण १० नमुने
४. माहिती संकलन साधने
- प्रश्नावली
- मुलाखत पद्धत
- शेतातील माती व पाण्याचे नमुने
- शेतकऱ्यांच्या उत्पादन व विक्री नोंदी
५. माहितीचे विश्लेषण
- गुणात्मक विश्लेषण : शेतकऱ्यांचे अनुभव, आरोग्यावरील परिणाम
- मात्रात्मक विश्लेषण : माती व पाण्याचे रासायनिक घटक, उत्पादन खर्च व
नफा, प्रदूषणाचे प्रमाण
- सांख्यिकीय साधने : टक्केवारी, सरासरी
6) प्रकल्प निरीक्षणे
1) रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यांमध्ये तुलना
2) मातीची गुणवत्ता
3) रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती फरक ( Rasayanik Sheti VS Sendriy Sehti)
मुद्दा |
रासायनिक शेती |
सेंद्रिय शेती |
खतांचा वापर |
कृत्रिम, रासायनिक |
नैसर्गिक, सेंद्रिय |
उत्पादन |
जास्त पण प्रदूषणकारी |
थोडं कमी पण सुरक्षित |
मातीवर परिणाम |
सुपीकता कमी होते. |
सुपीकता टिकवते. |
आरोग्यावर परिणाम |
दुष्परिणाम होतात. |
फायदेशीर, विषमुक्त अन्न,
आरोग्यावर दुष्परिणाम होत नाहीत. |
पर्यावरण |
नाश करणारे |
पर्यावरणपूरक |
6) प्रकल्प विश्लेषण
१) रासायनिक शेती
1.1) रासायनिक शेती म्हणजे काय? (Rasayanik Sheti Mhanaje Kay)
आपल्या भारत
देशात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतीमध्ये
वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मोठा बदल म्हणजे रासायनिक शेती होय.
रासायनिक शेती हे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने उपयुक्त जरी असली तरी तिचे पर्यावरण,
आरोग्य व दीर्घकालीन शेती यांवर गंभीर परिणाम झालेले दिसून येतात.
१)
रासायनिक शेती: (Rasayanik Sheti)
रासायनिक खते (Chemical Fertilizers), कीटकनाशके (Pesticides), रोगनाशकके (Fungicides), आणि कृत्रिम
वाढवर्धक (Growth Regulators) वापरून जी शेती केली जाते त्या
शेतीला रासायनिक शेती म्हणतात.
रासायनिक शेतीची पद्धत हरित
क्रांतीनंतर (Green Revolution – 1960 च्या दशकानंतर) भारतात
विशेषतः लोकप्रिय झाली. शेतीतून मिळणारे उत्पादन वाढविणे हे या रासायनिक शेतीचे
प्रमुख उद्दिष्ट होते.
evs project for college in Marathi pdf | पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प pdf download
२)
रासायनिक शेतीची वैशिष्ट्ये: (Rasayanik Shetichi Vaishishtye)
1.
रासायनिक खतांचा वापर: नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम (NPK) इत्यादींचे प्रमाण वाढवून झपाट्याने
उत्पादन वाढवण्यात येते.
2.
कीटकनाशकांचा वापर: पिकांवरील कीटकांचा नाश
करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो.
3.
रोगनाशक आणि तणनाशके: पिकांवरील बुरशी, रोग व तण यांचे
नियंत्रण करण्यासाठी रोगनाशक आणि तणनाशकांचा वापर केला आजतो.
4.
उच्च उत्पादनक्षम बियाणे (HYV seeds): रासायनिक
खतांचा प्रभाव अधिक चांगला मिळण्यासाठी विशेष बियाण्यांचा वापर करण्यात येतो.
5.
जलसिंचनावर अवलंबून: उत्पादन वाढीसाठी अधिक पाण्याची
गरज भासते.
6.
मशिनरीचा वापर: ट्रॅक्टर, पंप, फवारणीची उपकरणं यांचा वापर वाढतो.
३)
रासायनिक शेतीचे फायदे: (Rasayanik Shetiche Fayade)
क्र. |
फायदा |
स्पष्टीकरण |
1. |
उत्पादनात झपाट्याने वाढ होते. |
रासायनिक खतं आणि HYV बियाण्यामुळे उत्पादन वाढते. |
2. |
अन्नधान्याचा तुटवडा दूर होतो. |
देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित होते. |
3. |
शेतीत यांत्रिकीकरण होते. |
ट्रॅक्टर, मशीन, पंप
वापरून शेती सोपी होते. |
4. |
वेळ आणि मजुरीची बचत. |
फवारणी व खतं कमी वेळात दिली जातात. |
5. |
जलद वाढणारी पिकं मिळतात. |
विशेष औषधांमुळे पिकांची वाढ लवकर होते. |
४) रासायनिक शेतीचे तोटे (दुष्परिणाम): (Rasayanik Shetiche Tote)
1. मातीचे प्रदूषण:
- सतत रासायनिक खतं वापरल्याने जमिनीतील सेंद्रिय
घटक कमी होतात.
- शेतजमिनीची सुपीकता आणि पोत बदलतो.
- मातीतील किडे, गांडुळे व
सूक्ष्मजीवांचा नाश होतो.
2. पाण्याचे प्रदूषण:
- पावसामुळे खते व कीटकनाशके भूगर्भातील पाण्यात
मिसळून त्यांना प्रदूषित करतात.
- नद्या, विहिरी व तलाव दूषित होतात.
- खते, कीटकनाशके पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात
मिसळल्याने ते पाणी प्राणी व माणसांसाठी घातक ठरते.
3. हवामान प्रदूषण:
- नायट्रोजनयुक्त खतांमुळे हवेमध्ये नायट्रस
ऑक्साइड वायू सोडला जातो. हा वायू हवामान बदलासाठी जबाबदार आहे.
4. शेतीतील रसायनांचे उरलेले अंश:
- शेतीत वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे फळे, भाज्या व अन्नधान्यात अंश राहतात. यामुळे कर्करोग, त्वचारोग, अपचन, हार्मोनल
त्रास होतो.
5. प्रतिकारशक्ती असलेले कीटक:
- किटकांमध्ये वेळोवेळी बदल होऊन ते अधिक मजबूत
बनतात त्यांचा नाश करण्यासाठी अधिक घातक कीटकनाशके वापरावी लागतात.
6.शेतकऱ्यांचे खर्च वाढतात:
·
खते, बियाणे, औषधे यांच्या दारात वाढ झाली आहे.
·
दीर्घकालीन रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे माती निकृष्ट
बनते आणि उत्पन्नाचा खर्च अधिक वाढतो.
५) रासायनिक शेतीचा पर्यावरणावर होणारा परिणाम: (Rasayanik Sheticha Paryavarnavar Honara Parinam)
दृष्टीकोन |
परिणाम |
माती |
सुपीकता कमी, जैवविविधता नष्ट |
पाणी |
भूगर्भजल व नद्यांचे रासायनिक प्रदूषण |
हवा |
हरितगृह वायूंमध्ये वाढ, प्रदूषणात भर |
अन्न साखळी |
रसायनांचे अंश मानव व प्राण्यांमध्ये पोहोचतात |
जैवविविधता |
मधमाशी, पक्षी, कीटक नष्ट होतात |
६) रासायनिक शेतीला पर्याय
1. सेंद्रिय
शेती (Organic
Farming)
2. शाश्वत
शेती (Sustainable
Farming)
3. जैविक
खतांचा वापर (Bio-fertilizers)
4. ICM - Integrated Crop Management
5. IPM - Integrated Pest Management
2) सेंद्रिय शेती (Sendriy Sheti)
आजच्या आधुनिक युगात प्रत्येक माणूस हा अधिक उत्पादनाच्या
मागे लागला आहे. शेती देखील याला अपवाद नाही. भारतात हरित क्रांतीनंतर जरी अन्नधान्याचे
उत्पादन वाढले, तरी रासायनिक शेतीमुळे माती, पाणी,
हवा आणि आरोग्यावर अनेक दुष्परिणाम झाले आहेत. रासायनिक शेतीचे घातक परिणाम बघता आता संपूर्ण जगाने "सेंद्रिय शेती" (Organic Farming) या नैसर्गिक
व प्रदूषणमुक्त शेती पद्धतीकडे पुन्हा वळण्याची गरज ओळखली गेली आहे.
१) सेंद्रिय
शेती म्हणजे काय? (Sendriy Sheti Mahanaje Kay ?)
ज्या शेतीमध्ये कोणत्याची रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा किंवा कृत्रिम घटकांचा वापर न करता पूर्णतः नैसर्गिक साधनांवर आधारित शेती केली जाते अशा शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात. या पद्धतीमध्ये शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत, हिरवळीची खते, जीवामृत, दशपर्णी अर्क यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवली जाते.
२) सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये: (Sendriy Shetichi Vaishishtye)
1. नैसर्गिक
खतांचा वापर: रासायनिक खतांच्या वापराऐवजी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्टखत
यांचा वापर करणे.
2. प्राकृतिक
कीड नियंत्रण: दशपर्णी अर्क, गोमूत्र अर्क, लसून-तिळाचं मिश्रण
वापरून कीटक नियंत्रण करता येते.
3. जैविक
बियाण्यांचा वापर: जैविक बियाण्यांचा वापर करणे.
4. जमिनीची
सुपीकता राखणे: पिकाचा फेरपालट (crop rotation), आंतरपीक पद्धती,
हिरवळीची खते यांचा वापर करून जमिनीची सुपीकता राखता येते.
5. पाण्याचा
योग्य वापर: सूक्ष्मसिंचन (drip), ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा वापर करणे.
३)सेंद्रिय शेतीचे घटक: (Sendriy Shetiche Ghatak)
घटक |
स्पष्टीकरण |
शेणखत |
गुरांच्या शेणापासून तयार केलेले, मातीसाठी
उपयुक्त. |
कंपोस्ट |
सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करून बनवलेले खत. |
गांडूळ खत |
गांडूळांद्वारे सेंद्रिय
कचऱ्याचे विघटन. |
हिरवळीचं खत |
जमिनीत पेरलेले विशेष पीक जसे की सनफ्लॉवर, शेवगा. |
गोमूत्र, दशपर्णी अर्क |
रासायनिक कीटकनाशकांऐवजी
नैसर्गिक उपाय. |
पीक फेरपालट व मिश्रपीक |
जमिनीचा संतुलित वापर व नैसर्गिक संरक्षण |
4) सेंद्रिय शेतीचे फायदे: (Sendriy Shetiche Fayade)
1. मातीची सुपीकता टिकवते:
सेंद्रिय घटकांचा वापर केल्याने जमिनीत ह्युमस (Humus) तयार होते,
जे मातीला पोषण देतात.
2. जलप्रदूषण टळते:
रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय खते भूजलात मिसळल्याने
पाणी दूषित होत नाही.
3. आरोग्यास
सुरक्षित:
सेंद्रिय उत्पादनांमध्ये रसायनांचे अंश नसतात, त्यामुळे सेंद्रिय
पद्धतीने घेतलेली उत्पादने आरोग्यदृष्ट्या सुरक्षित.
4. पर्यावरणपूरक पद्धत:
सेंद्रिय शेती हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करते, जैवविविधता जपली
जाते.
5. दीर्घकालीन फायदा:
सेंद्रिय शेती पद्धतीमुळे जमिनीचा ऱ्हास होत नाही.
6. बाजारभाव जास्त:
सेंद्रिय उत्पादनांना प्रमाणित दर्जा (Organic Certification) मिळाल्यास बाजारात जास्त किंमत मिळते.
५)सेंद्रिय शेती आणि पर्यावरण: (Sendriy Sheti Aani Paryavaran)
घटक |
सेंद्रिय शेतीचा परिणाम |
माती |
मातीची सुपीकता टिकून राहते, मातीचा पोत
सुधारतो |
पाणी |
पाण्याचे प्रदूषण होत नाही. |
हवा |
हरितगृह वायू कमी प्रमाणात उत्सर्जित होतात. |
जीवसृष्टी |
कीटक, पक्षी, गांडुळे
यांचे संरक्षण होते. |
कार्बन शोषण |
मातीद्वारे हवेतला CO₂ शोषला जातो |
६)सेंद्रिय शेतीचे तोटे (मर्यादा): ( Sendriy Shetiche Tote)
मुद्दा |
स्पष्टीकरण |
उत्पादन थोडं कमी |
सुरुवातीच्या काळात उत्पादनात घसरण दिसते. |
अधिक मेहनत व वेळ |
सेंद्रिय खते तयार करणे, तसेच पिकाची काळजी घेण्यासाठी अधिक वेळ व मेहनत करावी
लागते. |
प्रमाणपत्र घेणे महाग |
Organic Certification घेणे खर्चिक
आणि वेळखाऊ असते. |
बाजारपेठ कमी |
सर्वत्र ग्राहक व व्यापारी सेंद्रिय उत्पादनांबाबत
जागरूक नसल्याने उत्पादने विकण्यासाठी बाजारपेठांचा अभाव. |
गरज भासल्यास कीटक नियंत्रण जड |
काही वेळा शेतातील कीड नियंत्रणासाठी वेळ लागतो. |
७) भारतातील सेंद्रिय शेती: (Bhartatil Sendriy sheti)
- सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय
राज्य आहे (2016 पासून).
- उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये सेंद्रिय
शेती वाढते आहे.
- भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना (PKVY)
आणि राष्ट्रीय सेंद्रिय शेती योजना (NOFS) सुरु केल्या आहेत.
3) रासायनिक व सेंद्रिय शेतीची तुलना:
मुद्दा |
रासायनिक शेती |
सेंद्रिय शेती |
खतांचा वापर |
कृत्रिम, रासायनिक |
नैसर्गिक, सेंद्रिय |
उत्पादन |
जास्त पण प्रदूषणकारी |
थोडं कमी पण सुरक्षित |
मातीवर परिणाम |
सुपीकता कमी होते. |
सुपीकता टिकवते. |
आरोग्यावर परिणाम |
दुष्परिणाम होतात. |
फायदेशीर, विषमुक्त अन्न, आरोग्यावर दुष्परिणाम
होत नाहीत. |
पर्यावरण |
नाश करणारे |
पर्यावरणपूरक |
4) रासायनिक शेतीचे दुष्परिणाम
गेल्या काही वर्षांपासून शेती
उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशकंके आणि कृत्रिम वाढवर्धक
यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यांचा वापर तात्पुरत्या लाभांसाठी उपयुक्त
ठरत असला तरी, यामुळे
माती, पाणी, हवा, पर्यावरण आणि मानव आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. रासायनिक शेतीमुळे प्रदूषण,
संसर्ग, रोगप्रसार, आणि
नैसर्गिक चक्रांमध्ये बाधा निर्माण होते आणि त्यांचे संतुलन बिघडते.
1. मातीची सुपीकता घटते (Soil Degradation)
➤ कसा परिणाम होतो?
- रासायनिक खतांचा सातत्याने आणि अतिवापर
केल्यामुळे मातीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात.
- मातीतील जैविक क्रियाशीलता कमी होते – गांडुळे, बुरशी, सूक्ष्मजीव
नष्ट होतात.
- जमिनीचा पोत बदलून ती कठीण व निर्जीव होते.
➤ परिणाम:
- पिकांच्या मुळांना पोषण मिळत नाही.
- मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते.
- दीर्घकाळात उत्पादन क्षमतेत मोठी घट दिसून येते.
2. जलप्रदूषण (Water Pollution)
➤ कसा परिणाम होतो?
- खते आणि कीटकनाशके पावसाच्या पाण्यातून वाहून
जाऊन भूजलात किंवा नद्यांमध्ये मिसळतात आणि त्या प्रदूषित होतात.
- रसायने पाण्यात मिसळल्याने पाण्याचा pH बदलतो, आणि जलचर प्राण्यांना धोका निर्माण
होतो.
➤ परिणाम:
- विहिरी, बोअरवेल, नद्या
आणि तलावातील पाणी पिण्यास अयोग्य बनते.
- नायट्रेट प्रदूषणामुळे "ब्लू बेबी
सिंड्रोम" नावाचा रोग लहान मुलांमध्ये दिसून येतो.
- जलचर जीव जसे मासे, बेडुक, शिंपले नष्ट होतात.
3. हवामान व पर्यावरणावर परिणाम (Air Pollution & Climate Change)
➤ कसा परिणाम होतो?
- नायट्रोजनयुक्त खतं वापरल्याने नायट्रस ऑक्साईड
(N₂O) हा हरितगृह वायू हवेत सोडला जातो.
- रासायनिक फवारणीमुळे हवेत विषारी वायू व अणु मिसळतात.
➤ परिणाम:
- हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, दमा, त्वचारोग, कर्करोग होतात.
- हवामान बदलाला (Climate Change) गती मिळते.
- ओझोन थराला हानी पोहोचते.
4. कीटकांची प्रतिकारशक्ती वाढते (Pest Resistance)
➤ कसा परिणाम होतो?
- रासायनिक कीटकनाशकांचा सतत वापर केल्याने कीटक
त्याच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करतात आणि ते अधिक शक्तिशाली व
हानिकारक होतात.
➤ परिणाम:
- शेतकऱ्यांना जास्त विषारी औषधांचा वापर करावा लागतो.
- शेतकऱ्यांचा खर्च वाढतो, पर्यावरणाचे नुकसानही वाढते.
- काही कीटक पर्यावरणातून पूर्णपणे नष्ट होतात –
जैविक असंतुलन निर्माण होते.
5. आरोग्यावर दुष्परिणाम (Human Health Hazards)
➤ कसा परिणाम होतो?
- फळे, भाज्या, धान्य
यामध्ये रसायनांचे अंश राहतात ते अन्नाच्या माध्यमातून मानवाच्या शरीतात प्रवेश
करतात.
➤ परिणाम:
- कर्करोग, थायरॉईड, प्रजनन
समस्या, अपचन, त्वचारोग तसेच शरीरातील
हार्मोनल बिघाड दिसून येतो.
- लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास कमी होतो.
6. जैवविविधतेचा ऱ्हास (Loss of Biodiversity)
➤ कसा परिणाम होतो?
- रासायनिक औषधांमुळे मधमाशा, पक्षी, गांडुळे, कीटक यांचा
नाश होतो.
- हे प्राणी परागसिंचन, कीटक नियंत्रण व जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आवश्यक असतात.
➤ परिणाम:
- पीक उत्पादन कमी होते.
- नैसर्गिक संतुलन बिघडते.
- काही भागांमध्ये पक्ष्यांची प्रजाती नामशेष
होण्याच्या मार्गावर आहेत.
7. जमिनीचे क्षरण आणि खारटपणा (Soil Erosion & Salinity)
➤ कसा परिणाम होतो?
- रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो.
- सिंचनात वापरलेले रसायनयुक्त पाणी मातीतील क्षारांचे
प्रमाण वाढवते.
➤ परिणाम:
- जमीन पिकासाठी अयोग्य बनते.
- जमिनीचा काही भाग नापीक होतो.
8. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (Farmer’s Financial Burden)
➤ कसा परिणाम होतो?
- दरवर्षी खतं, कीटकनाशकं, HYV बियाण्यांचा खर्च वाढत जातो.
- उत्पादन खर्च जास्त पण नफा कमी होतो.
- मातीची गुणवत्ता कमी झाल्यामुळे उत्पादनात घट होते.
➤ परिणाम:
- शेतकरी कर्जबाजारी होतो.
- आत्महत्येच्या घटना वाढतात.
- परावलंबित्व वाढते – स्वतःचा शेतीवरचा विश्वास
कमी होतो.
9. अन्नसाखळीतील विषारी साखळी (Toxic Food Chain)
- रासायनिक अंश अन्नपदार्थातून माणसात, प्राण्यात, पाळीव जनावरांमध्ये पोहोचल्यामुळे शरीरातील
जैविक प्रक्रियांवर परिणाम होतो.
- शुद्ध अन्नाचा अभाव निर्माण होतो.
10. दीर्घकालीन परिणाम – भविष्यासाठी धोका
- मातीची उपजाऊ क्षमता पूर्णतः संपते.
- पाण्याचे स्रोत वापरासाठी अयोग्य ठरतात.
- अन्नसाखळी दूषित होते.
- पर्यावरणीय समतोल ढासळतो.
4) सेंद्रिय शेतीचे फायदे
1. मातीची गुणवत्ता टिकून राहते
- सेंद्रिय शेतीत शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत यांसारख्या खतांचा वापर
केला जातो ही खते मातीला सेंद्रिय पदार्थ पुरवतात.
- सेंद्रिय घटकांमुळे मातीची सुपीकता टिकून राहते,
मातीचा पोत सुधारतो आणि अन्नद्रव्ये
टिकून राहतात.
- मातीतील सूक्ष्मजीव, गांडुळे, जिवाणू यांचा नैसर्गिक समतोल राखला
जातो.
- मातीचा pH संतुलित राहतो, त्यामुळे उत्पादन दीर्घकाळ टिकून राहते.
2. नैसर्गिक जैवविविधता जपली जाते
- सेंद्रिय शेतीत कोणत्याही कृत्रिम कीटकनाशकाचा
किंवा तणनाशकाचा वापर केला जात नाही त्यामुळे शेतातील कीटक, पक्षी, मधमाशा, गांडुळे,
बेडूक यांचे संरक्षण होते.
- परागसिंचन करणाऱ्या कीटकांमुळे व मध्माश्यांमुळे
पीक उत्पादन सुधारते.
- शेताजवळील वन्य प्राणी, जलचर आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
- जैवविविधतेमुळे शेतीवर येणारे नैसर्गिक धोके कमी
होतात.
3. जलप्रदूषण टळते
- रासायनिक शेतीत वापरली जाणारी खते आणि कीटकनाशके पावसामुळे पाण्यात मिसळून भू-जलस्त्रोत प्रदूषित
करतात.
- सेंद्रिय शेतीत घातक रसायनांचा वापर नसल्यामुळे पाण्याचे
प्रदूषण होत नाही.
- भूजल, विहिरी, नद्या
आणि तलावातील पाणी स्वच्छ व वापरण्यास सुरक्षित राहते.
- पाण्याचे प्रदूषण होत नसल्याने जलचर प्राणी जसे
की मासे, बेडूक, आणि पाणवनस्पती सुरक्षित
राहतात.
- मानवासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारते.
4. अन्नपदार्थ आरोग्यास अधिक सुरक्षित
- सेंद्रिय शेतीत पिकवलेले अन्नपदार्थ रसायनमुक्त, विषमुक्त असतात.
- सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकवलेल्या अन्नात
कोणतेही कीटकनाशकांचे उरलेले अवशेष नसतात. त्यामुळे हे अन्न पचायला हलकं, पोषक तत्वांनी भरलेलं आणि सुरक्षित असते.
- रासायनिक अन्नाच्या सेवनाने होणारे कर्करोग, हार्मोनल बिघाड, त्वचारोग, अपचन यांसारखे त्रास टाळता येतात.
- सेंद्रिय अन्नाचे सेवन केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती
वाढते आणि आरोग्य सुधारते.
5. प्रदूषणविरहित शेती पद्धती
- सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कोणतेही प्रदूषक
रसायन वापरले जात नाही, त्यामुळे हवामान, माती आणि पाणी या तिन्ही
घटकांचे प्रदूषण होत नाही.
- सेंद्रिय शेतीपद्धतीमध्ये हरितगृह वायूंचे
उत्सर्जन कमी होते, त्यामुळे हवामान बदलाच्या
संकटावर आळा घालणे शक्य होते.
- सेंद्रिय खते वापरल्याने कोणतेही विषारी वायू
हवेत सोडले जात नाहीत.
- सेंद्रिय शेतीपद्धती निसर्गाशी सुसंगत, शाश्वत आणि पर्यावरणपूरक आहे.
५) सेंद्रिय शेतीला मिळणारे प्रोत्साहन
आजच्या यांत्रिकी आणि रासायनिक
शेतीवर आधारित कृषी व्यवस्थेमुळे पर्यावरणाचे नुकसान, जमिनीची धूप,
अन्नातील विषारी अंश, आणि शेतकऱ्यांचे आर्थिक
संकट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती ही शाश्वत, आरोग्यदायी
आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे आली आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन
देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवत आहेत. यासोबतच बाजारात
सेंद्रिय उत्पादनांना वाढती मागणी असल्याने त्यांचे मूल्य अधिक आहे.
1. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज का?
- आरोग्याच्या दृष्टीने: सेंद्रिय
अन्न हे रसायनमुक्त असल्यामुळे निरोगी असते.
- पर्यावरणासाठी: सेंद्रिय
शेती पद्धतीमुळे माती, पाणी आणि हवा प्रदूषित होत नाहीत.
- शाश्वत शेती: मातीची
सुपीकता टिकून राहते.
- शेतकऱ्यांसाठी: सेंद्रिय
शेतीचा अवलंब केल्याने कमी खर्चात अधिक नफा मिळू शकतो.
- बाजारपेठ: सेंद्रिय
पद्धतीने घेतलेल्या उत्पादनांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली
मागणी आणि किंमत मिळते.
2. सरकारी योजना व धोरणे
1. परंपरागत कृषी
विकास योजना (PKVY)
माहिती:
- सुरुवात वर्ष: 2015-16
- उद्देश: शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीपद्धतीकडे
वळवणे आणि त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
वैशिष्ट्ये:
- शेतकऱ्यांना आर्थिक मदत (₹50,000
प्रति हेक्टर 3 वर्षांसाठी).
- शेतकरी उत्पादक गट (FPG)
तयार करून सामूहिक शेतीला चालना.
- प्रशिक्षण, कंपोस्ट युनिट, बियाणे, प्रमाणीकरणासाठी निधी.
- “Participatory Guarantee System”
(PGS) द्वारे सेंद्रिय प्रमाणीकरण.
2. भारतीय सेंद्रिय
शेती प्रमाणीकरण संस्था (NCOF & PGS India)
- PGS प्रणाली: शेतकऱ्यांकडून
सामूहिक प्रमाणपत्र प्रणाली.
- स्वतंत्रपणे प्रमाणपत्र घेण्यासाठी खर्च टाळून
शासनाच्या देखरेखीखाली प्रक्रिया.
3. नमामि गंगे योजना
अंतर्गत सेंद्रिय शेती
- गंगा नदीच्या किनारी 5 किमी पट्ट्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन.
- नदी प्रदूषण टाळण्यासाठी रसायनमुक्त शेतीला
चालना.
4. मिशन ऑर्गॅनिक
व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट (MOVCDNER)
- प्रदेश: पूर्वोत्तर राज्ये.
- सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना बियाणे, बाजारपेठ, पायाभूत सुविधा, प्रक्रिया केंद्रे अशा सर्व बाबींसाठी मदत.
5. राष्ट्रीय कृषी
विकास योजना (RKVY)
- शेती आणि त्यास पूरक व्यवसायांना अनुदान.
- सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध
घटकांसाठी आर्थिक मदत.
6. एफपीओ (FPO)
सेंद्रिय क्लस्टर योजना
- शेतकरी उत्पादक संस्था (FPO)
मार्फत सेंद्रिय क्लस्टर तयार करून सामूहिक उत्पादन, प्रक्रिया, आणि विक्री.
3. सेंद्रिय उत्पादनांना अधिक बाजारमूल्य
Ø
देशांतर्गत मागणी:
- शहरांमध्ये सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकवलेल्या
अन्नाला वाढती मागणी आहे.
- आरोग्याबाबत जागरूकता, जीवनशैलीतील बदल, आणि नैसर्गिक जीवनपद्धतीकडे
वळलेली लोकसंख्या.
Ø
निर्यात:
- सेंद्रिय उत्पादनांची भारतातून अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया
इ. देशांत होणारी निर्यात.
- सेंद्रिय तांदूळ, डाळी,
मसाले, तेलबिया यांना आंतरराष्ट्रीय
बाजारपेठेत जास्त मागणी चांगले दर मिळतात.
Ø
ब्रँडिंग व ई-मार्केट:
- “Jaivik Bharat” लोगोचा वापर करून सेंद्रिय शेतीतून घेतलेल्या उत्पादनांना अधिक
विश्वासार्ह बनवता येते.
- Amazon, BigBasket, Organic India, 24 Mantra Organic यांसारख्या कंपन्यांकडून सेंद्रिय उत्पादनांची थेट खरेदी केली जाते.
७) प्रकल्प निष्कर्ष
1. मातीवरील परिणाम : रासायनिक
शेतीत मातीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी होते, तर सेंद्रिय
शेती मातीची सुपीकता व भुसभुशीतपणा वाढतो.
2. जलप्रदूषणाची तुलना : रासायनिक
शेतीत भूजल व नदीपात्रांमध्ये नायट्रेट्स व फॉस्फेट्सचे प्रमाण जास्त असते, तर सेंद्रिय शेतीत पाण्याची गुणवत्ता तुलनेने चांगली आढळली.
3. हवेच्या गुणवत्तेवर प्रभाव : रासायनिक
कीटकनाशकांमुळे हवेतील सूक्ष्मकण व विषारी वायूंचे प्रमाण वाढते , तर सेंद्रिय शेतीत हे प्रमाण अगदी कमी असते.
4. आरोग्यावर परिणाम : रासायनिक
शेतीतून तयार झालेले अन्न अंशतः विषारी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व ग्राहकांमध्ये
आरोग्य समस्या निर्माण झालेल्या दिसतात.
5. आर्थिक लाभ : सेंद्रिय
शेतीत सुरुवातीला उत्पादन थोडे कमी मिळते, पण बाजारात अधिक दर
मिळाल्याने शेतकऱ्यांना दीर्घकालीन शेतीत नफा होतो.
6. हवामान बदलाशी निगडीत परिणाम :
सेंद्रिय शेती मातीतील कार्बन साठवून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास मदत करते.
7. जैवविविधता संवर्धन :
सेंद्रिय शेतीमुळे स्थानिक बियाण्यांचा वापर अधिक होऊन परिसंस्थेतील जैवविविधता
जपली जाते.
8. ग्राहकांच्या आवडी : लोक
सेंद्रिय उत्पादनांना प्राधान्य देतात कारण सेंद्रिय उत्पादने अधिक सुरक्षित व
पौष्टिक असतात.
9. धोरणात्मक आधार : शासन व स्वयंसेवी
संस्थांच्या योजनांचा सेंद्रिय शेतीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे
दिसून आले.
10. शाश्वत विकासाची दिशा : एकूणच
सेंद्रिय शेती प्रदूषण कमी करून शाश्वत विकासाचा पाया मजबूत करते.
८) प्रकल्प संदर्भ
·
FAO
(Food and Agriculture Organization). (2023). Agriculture and Greenhouse Gas Emissions. Rome: United
Nations.
·
IFOAM
– International Federation of Organic Agriculture Movements. (2023). The World of Organic Agriculture: Statistics and
Emerging Trends. Bonn, Germany.
·
Centre
for Science and Environment (CSE). (2022). Groundwater Pollution in India: Nitrate and Pesticide Residues.
New Delhi: CSE Report.
·
World
Health Organization (WHO). (2017). Guidelines
for Drinking-water Quality: Fourth Edition. Geneva: WHO Press.
·
Indian
Council of Agricultural Research (ICAR). (2021). Impact of Chemical Fertilizers and Pesticides on Soil Health and
Environment. New Delhi: ICAR Publication.
·
Ministry
of Agriculture and Farmers’ Welfare, Government of India. (2022). Paramparagat Krishi Vikas Yojana (PKVY): Annual
Report. New Delhi.
·
National
Programme for Organic Production (NPOP). (2022). Standards for Organic Production and Processing. New Delhi:
APEDA.
·
United
Nations Environment Programme (UNEP). (2020). Sustainable Agriculture and Food Systems. Nairobi.
·
Pimentel,
D. et al. (2005). Environmental,
Energetic, and Economic Comparisons of Organic and Conventional Farming
Systems. BioScience, 55(7), 573–582.
·
Lal,
R. (2020). Soil Organic Matter and
Climate Change Mitigation. Nature Sustainability, 3(6), 367–377.
·
Shiva,
Vandana. (2016). Soil Not Oil:
Environmental Justice in an Age of Climate Crisis. New Delhi: Zed Books.
·
EPA
(Environmental Protection Agency). (2019). Health Effects of Pesticides. Washington, D.C.: U.S.
Government Publishing Office.
·
Government
of Maharashtra. (2021). Organic
Farming Policy for Sustainable Agriculture. Mumbai: Department of
Agriculture.
·
National
Green Tribunal (NGT), India. (2020). Case Reports on Groundwater Contamination from Chemical
Fertilizers. New Delhi.
***********