घराचे ऊर्जा लेखापरीक्षण व ऊर्जाबचत पर्यावरण प्रकल्प | Gharache Urja Lekhaparikshan v Urjabachat Prakalp

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय project पर्यावरण प्रकल्प pdf educational marathi
Admin

घराचे ऊर्जा लेखापरीक्षण व ऊर्जाबचत | Home energy audit and energy saving


पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय project पर्यावरण प्रकल्प pdf educational marathi आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प pdf


प्रकल्प प्रस्तावना 


            आजच्या आधुनिक जगात उर्जेचे अनन्यसाधारण महत्व आहे. विदयुत उर्जा ही आज दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. आज औद्योगिक, घरगुती, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.  फ्रीज, टीव्ही, मोबाईल, संगणक, पंखा, एसी , गिझर यांसारखी उपकरणे आपले रोजचे जीवन सुखकर बनवत असली तरीही त्यांच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणावर विजेची आवश्यकता भासते.

            उर्जेच्या अतिरिक्त वापराचा फक्त आपला खर्च वाढवत नाही तर आपल्या पर्यावरणावर नकारात्मक परिणाम घडवून आणतो. वीज निर्मितीसाठी तेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांचा वापर होत असल्याने त्यांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणवर डायऑक्साइड व इतर हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात. यामुळे हवामानात वेळोवेळी होणारे बदल, जागतिक तापमानवाढ, वायू प्रदूषण , पाणी टंचाई अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे उर्जेचा वापर मर्यादित ठेऊन उर्जा बचत करणे अत्यंत गरजेचे आहे.

 

ऊर्जाबचतीकडे लक्ष देण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऊर्जा वाचवली म्हणजे ऊर्जा निर्माण केली. उदाहरणार्थ, जर एखादे घर महिन्याला ५०  युनिट वीज वाचवत असेल, तर तेवढीच वीज वीजनिर्मिती केंद्रावर तयार करण्याची गरज भासत नाही. परिणामी कोळशाचा वापर कमी होतो आणि पर्यावरणीय हानी कमी होण्यास मदत होते.

ऊर्जा लेखापरीक्षण (Energy Audit) हा असा एक महत्वाचा मार्ग आहे कि ज्याद्वारे एखाद्या घरात किंवा संस्थेत किती प्रमाणात वीज खर्च होते, कुठे अपव्यय होतो आणि वीज बचत कुठे करता येईल हे समजते. त्यामुळे या प्रकल्पाद्वारे आपण घरगुती पातळीवर ऊर्जा लेखापरीक्षण करून बचतीचे उपाय शोधणार आहोत. या प्रकल्पामध्ये ऊर्जाबचतीचे सुचवलेल्या उपायांचे उपयोग केल्यास सर्वांना याचा फायदा होईल, उर्जा बचत करणे शक्य होईल

 

Related Posts

प्रकल्प विषयाचे महत्त्व


"घराचे ऊर्जा लेखापरीक्षण व ऊर्जेचा वापर कमी करण्याचे उपाय" हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे; कारण याचा परिणाम सरळ व्यक्तिगत, आर्थिक, पर्यावरणीय आणि राष्ट्रीय स्तरावर होतो.

व्यक्तिगत स्तरावर ऊर्जाबचतीमुळे घरातील खर्च कमी होतो. प्रत्येक महिन्याला विजेचे बिल हा कुटुंबाच्या बजेटमधील मोठा भाग असतो.  LED बल्ब वापरणे, वापरत नसलेली उपकरणे पूर्णपणे बंद ठेवणे, ५ स्टार असलेली उपकरणे वापरणे, गिझर/एसीचा वेळ नियंत्रित ठेवणे यांसारखे सोपे सोपे बदल जरी केले तरी देखील मासिक बिलात २०–३०% बचत साधता येते.

वीज निर्मिती  प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने कोळसा जाळला जातो. प्रत्येक युनिट वीजनिर्मिती मागे अंदाजे ०.८ किलो कार्बन डायऑक्साइड वातावरणात उत्सर्जित होतो. त्यामुळे जास्त वीज वापर म्हणजे जास्त प्रदूषण. जर घरगुती पातळीवर सर्वांनी थोडी थोडी बचत केली, तर एकत्रित पातळीवर कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते.

ऊर्जा बचत केल्यामुळे राष्ट्रालाही फायदा होतो. भारतासारख्या विकसनशील देशात ऊर्जेची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन वीज प्रकल्प उभारणे हे खर्चिक व वेळखाऊ ठरते. त्याऐवजी जर उपलब्ध ऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर केला, तर कमी संसाधनांत जास्त लोकांना वीज उपलब्ध करून देता येऊ शकते.

या विषयाचे आणखी एक महत्त्व म्हणजे शाश्वत विकास. आगामी पिढ्यांना पुरेल इतकी ऊर्जा राखून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जर आपण आजच ऊर्जाबचतीचे तत्त्व अंगीकारले, तर भविष्यातील ऊर्जेची टंचाई टाळता येईल.

म्हणूनच हा प्रकल्प केवळ शैक्षणिक, आणि पर्यावरणीय दृष्टीनेच नाही तर व्यावहारिक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे.

 घराचे ऊर्जा लेखापरीक्षण व ऊर्जाबचत पर्यावरण प्रकल्प | Gharache Urja Lekhaparikshan v Urjabachat Prakalp 


प्रकल्प कार्यपद्धती


या प्रकल्पासाठी खालील कार्यपद्धती वापरण्यात आली आहे:

1.    साहित्य संकलन:
ऊर्जा बचत, ऊर्जा लेखापरीक्षण, उपकरणांचा वापर व विजेचे बिल या विषयावरील प्राथमिक माहिती पुस्तके, इंटरनेट व शासकीय संकेतस्थळांवरून गोळा केली.

2.    घरगुती माहिती संकलन:
नमुना घर म्हणून चार खोल्यांचे घर गृहीत धरले. त्या घरात वापरली जाणारी उपकरणे जसे की बल्ब, पंखे, फ्रीज, टीव्ही, चार्जर यांची यादी तयार केली. प्रत्येक उपकरणाची वॅट क्षमता व दररोजचा वापर (तासांमध्ये) मोजला.

3.    ऊर्जा गणना:
(वीज क्षमते × दररोज वापर × दिवसांची संख्या) ÷ 1000 या सूत्राद्वारे प्रत्येक उपकरणाचा मासिक ऊर्जावापर (kWh किंवा युनिट) काढला.

4.    आधीचे निरीक्षण:
सर्व उपकरणांचा ऊर्जावापर एकत्र करून नमुना घराचा एकूण मासिक वीज वापर व अंदाजे लाईट बिल निश्चित केले.

5.    उपाय सुचवणे:
ऊर्जाबचतीसाठी व्यवहार्य उपाय सुचवले – उदा. LED बल्ब, ५ स्टार उपकरणे, स्मार्ट स्विचेस, गिझर व एसीचा नियंत्रित वापर, सौर ऊर्जा इ.

6.    नंतरचे निरीक्षण:
सुचविलेल्या उपायांनुसार सुधारित ऊर्जावापराची गणना केली. त्यामुळे मासिक युनिट व लाईट बिलामध्ये किती बचत होईल याचा अंदाज घेतला.

7.    तुलनात्मक अभ्यास:
उपायांपूर्वी व उपायांनंतरच्या ऊर्जावापराची तुलना तक्ते व ग्राफच्या स्वरूपात मांडली.

8.    निष्कर्ष काढणे:
मिळालेल्या आकडेवारीवरून ऊर्जाबचतीचे महत्त्व व फायदे स्पष्ट केले.


प्रकल्प उद्दिष्ट्ये


            हा प्रकल्प करण्या मागील उद्दिष्ट्य म्हणजे घरगुती पातळीवर ऊर्जेचा वापर समजून घेणे, अपव्यय टाळणे व ऊर्जाबचत साध्य करणे. मुख्य उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे:

1.    घरातील ऊर्जा वापराचा अभ्यास करणे

o    कोणत्या उपकरणात किती वीज खर्च होते हे ओळखणे.

o    जास्त वीज खर्च करणाऱ्या उपकरणांची नोंद करणे.

2.    ऊर्जेचा अपव्यय शोधणे

o    स्टँडबाय मोडवरील उपकरणे, दिवे-पंखे चालू ठेवण्याची सवय इ.मुळे होणारा अपव्यय समजून घेणे.

3.    ऊर्जाबचतीचे उपाय सुचवणे

o    LED बल्ब, ५ स्टार उपकरणे, स्मार्ट स्विचेस, सौर ऊर्जा यांसारख्या तांत्रिक उपायांचा अवलंब.

o    नैसर्गिक प्रकाश व हवेशीरतेचा वापर करून ऊर्जा वाचवणे.

4.    आधी व नंतर तुलना करणे

o    उपाय लागू करण्यापूर्वी व नंतर ऊर्जावापराची तुलना करून बचतीचा परिणाम दाखवणे.

o    लाईट बिलात झालेली बचत प्रत्यक्ष दाखवणे.

5.    आर्थिक व पर्यावरणीय लाभ अधोरेखित करणे

o    बचतीमुळे कुटुंबाच्या बजेटवर होणारा सकारात्मक परिणाम मांडणे.

o    वीज बचतीमुळे कार्बन उत्सर्जनात होणारी घट स्पष्ट करणे.

6.    जागरूकता निर्माण करणे

o    विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऊर्जाबचतीचे महत्त्व पटवून देणे.

o    "ऊर्जा वाचवा म्हणजेच ऊर्जा निर्माण करा" हा संदेश पोहोचवणे.

 

 

प्रकल्प कार्यपद्धती


निवडलेल्या घरातील ऊर्जा वापर – लेखापरीक्षण


ऊर्जा लेखापरीक्षण (Energy Audit) करण्यासाठी मी माझ्या घराची निवड केली. माझे घर हे घर चार खोल्यांचे आहे (हॉल, दोन बेडरूम, स्वयंपाकघर). आमच्या घरात आम्ही एकूण ५ जण राहतो . आमच्या घरात विविध घरगुती उपकरणे आहेत ज्यांचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो.

लेखापरीक्षण खालील पद्धतीने केले.

1.    सर्व उपकरणांची यादी तयार केली.

2.    प्रत्येक उपकरणाची वॅट क्षमता (Watt) लिहून काढली.

3.    दररोज किती तास वापर होतो हे मोजले.

4.    मासिक ऊर्जा वापर (युनिट = kWh) काढले.
सूत्र (वीज क्षमता × तास × दिवस) ÷ 1000

 

प्रकल्प निरीक्षणे

 

उर्जालेखापरीक्षणासाठी निवडलेल्या घरातील उपकरणांची यादी


 (तक्ता पूर्ण पाहण्यासाठी मोबाईल Tilt करा.)


अ.क्र.

उपकरण

क्षमता (Watt)

दररोज वापर (तास)

मासिक वापर (युनिट kWh)

1

CFL आणि LED बल्ब (१० नग)

90 W (9W × 10)

5 तास

13.5

2

पंखे (४ नग)

300 W (75W × 4)

10 तास

90

3

फ्रीज (200 L)

200 W

24 तास (50% load)

72

4

टीव्ही

100 W

4 तास

12

5

गिझर

1500 W

1 तास

45

7

मिक्सर/मिक्सर ग्राइंडर

500 W

0.5 तास

7.5

8

मोबाईल चार्जर (५ नग)

50 W (10W × 5)

3 तास

4.5

एकूण

244.5 युनिट

 



विजेचे मासिक बिल


स्थानिक वीज वितरण कंपनीनुसार १ युनिट विजेचा सरासरी दर = ₹14.55

एकूण मासिक वीज वापर = 245 युनिट × ₹10.29 = ₹2521.05/-

 

 

1.    सर्वाधिक वीज खर्च गिझर 45 युनिट आणि पंखे (90 युनिट) यावर आहे.

2.    फ्रीज व टीव्ही लक्षणीय प्रमाणात वीज खातात.

3.    मोबाईल चार्जर, टीव्ही यांचा वापर कमी असला तरी सतत जोडून ठेवल्याने वीज वाया जाते.

4.    LED बल्ब वापरल्यामुळे विजेचा वापर तुलनेने कमी झाला आहे, पण अजून सुधारणा होऊ शकते.

 

उर्जाबचतीचे उपाय लागू केल्यावर परिणाम

  (तक्ता पूर्ण पाहण्यासाठी मोबाईल Tilt करा.)


उपकरण

आधीचा वापर (युनिट)

नंतरचा वापर (युनिट)

बचत (युनिट)

LED बल्ब

13.5

10

3.5

पंखे

90

70

20

फ्रीज

72

55

17

टीव्ही

12

10

2

गिझर

45

41

4

मिक्सर/मिक्सर ग्राइंडर

7.5

6.5

1

मोबाईल चार्जर (५ नग)

4.5

4

0.5

एकूण

244.5

196.5

48



महत्त्वाची निरीक्षणे

 

1.    स्टँडबाय मोड बंद करणे

o      टीव्ही, चार्जर सारखी उपकरणे आधी नेहमी प्लगला जोडलेली राहायची.

o      स्टँडबाय मोडमुळे विजेचा अपव्यय होत असे. आता ती बंद केल्याने दरमहा ५–७ युनिट बचत झाली.

2.    नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर

o      घरातील खिडक्या व पडदे व्यवस्थित वापरल्याने दिवसा लाईट लावण्याची गरज कमी झाली.

3.    गिझर चा नियंत्रित वापर

o      पाणी गरम झाल्यानंतर गिझर लगेच बंद करण्याची सवय लावल्याने वीज बचत झाली.

4.    ऊर्जाबचतीची सवय

o      घरातील सर्व सदस्यांना जाणीव करून दिली की खोलीत नसताना लाईट-पंखे बंद करावेत.

o      छोट्या सवयींमुळे एकत्रित मोठी बचत झाली.

5.    उच्च कार्यक्षम उपकरणांचा वापर

o      जुन्या, जास्त वीज खाणाऱ्या उपकरणांऐवजी ४-५ स्टार रेटिंग असलेली उपकरणे वापरली गेली.

o      यामुळे दीर्घकालीन वीज बचत सुनिश्चित झाली.

 

 

प्रकल्प  विश्लेषण

 

घराचे ऊर्जा लेखापरीक्षण करण्याची गरज

            ऊर्जा ही आधुनिक जीवनशैलीतील सर्वात महत्त्वाची गरज आहे. आज प्रत्येक घरामध्ये वीजेवर चालणारी उपकरणे असतात – पंखे, दिवे, फ्रीज, टीव्ही, एसी, गिझर, संगणक इत्यादी. यामुळे घरगुती विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. विजेचा योग्य वापर आणि अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जा लेखापरीक्षण (Energy Audit) करणे आवश्यक ठरते.

 

१) वीज वापराचा हिशेब समजणे

  • घरात कोणत्या उपकरणामुळे जास्त वीज खर्च होते हे कळणे आवश्यक असते.
  • लेखापरीक्षण केल्यास उपकरणनिहाय वीज वापराचा अचूक हिशेब समोर येतो.

 

२) अपव्यय ओळखणे

  • खोली रिकामी असताना लाईट-पंखे चालू ठेवणे, स्टँडबाय मोडवरील उपकरणे, जुनी आणि कमी कार्यक्षम साधने यामुळे वीज वाया जाते.
  • ऊर्जा लेखापरीक्षण केल्यास अशा अपव्ययाच्या ठिकाणी लक्ष वेधले जाते.

 

३) विजेचे बिल कमी करणे

  • वीज अपव्यय टाळल्यास मासिक बिल २५–३०% पर्यंत कमी होते.
  • यामुळे कुटुंबाला थेट आर्थिक फायदा होतो.

 

४) पर्यावरण संरक्षण

  • वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर कोळसा, डिझेल, गॅस वापरला जातो.
  • जास्त वीज वापर = जास्त इंधन जळणे = जास्त प्रदूषण.
  • ऊर्जा लेखापरीक्षणामुळे वीज बचत होते आणि कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होते.

 

५) उपकरणांची कार्यक्षमता वाढवणे

  • लेखापरीक्षणाद्वारे समजते की जुनी उपकरणे जास्त वीज खर्च करतात.
  • नवीन ४–५ स्टार रेटिंग उपकरणे वापरल्यास विजेची बचत व उपकरणांचे आयुष्य वाढते.

 

६) ऊर्जा बचतीच्या सवयी निर्माण होणे

  • लेखापरीक्षणामुळे घरातील सदस्यांमध्ये ऊर्जाबचतीची जाणीव वाढते.
  • लाईट बंद करणे, पंखा कमी करणे, गिझर व एसी मर्यादित वापरणे यासारख्या चांगल्या सवयी लागतात.

 

७) शाश्वत विकासासाठी योगदान

  • विजेची मागणी सतत वाढत आहे पण संसाधने मर्यादित आहेत.
  • ऊर्जा लेखापरीक्षण करून बचत केल्यास वीज निर्मितीवरील दबाव कमी होतो.
  • यामुळे पुढील पिढ्यांसाठी ऊर्जेचा पुरवठा सुरळीत राहतो.

 

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी pdf project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय


घरातील वीज अपव्ययाची कारणे

            वीज ही आधुनिक जीवनशैलीसाठी अत्यावश्यक ऊर्जा आहे. मात्र घरगुती वापरामध्ये वीजेचा मोठा भाग अज्ञान, चुकीच्या सवयी आणि कमी कार्यक्षम उपकरणांमुळे वाया जातो. या अपव्ययामुळे मासिक बिल वाढते आणि पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होतो. खाली घरातील वीज अपव्ययाची प्रमुख कारणे दिली आहेत.

 

१) अनावश्यक लाईट व पंखे चालू ठेवणे

  • अनेक वेळा खोलीत कोणी नसताना दिवे, पंखे सुरू ठेवले जातात.
  • दिवसा पुरेसा नैसर्गिक प्रकाश असतानाही लाईट लावले जातात.
  • या सवयींमुळे महिन्याला १५–२०% वीज वाया जाते.

 

२) जुनी व कमी कार्यक्षम उपकरणे वापरणे

  • जुन्या ट्यूबलाईट, बल्ब, पंखे किंवा रेफ्रिजरेटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने ते जास्त वीज खर्च करतात.
  • स्टार रेटिंग नसलेली उपकरणे ३०–४०% जास्त वीज खातात.

 

३) स्टँडबाय मोडवरील वाया जाणारी वीज

  • टीव्ही, संगणक, चार्जर, मायक्रोवेव्ह यांसारखी उपकरणे बंद न करता प्लगला जोडून ठेवली जातात.
  • स्टँडबाय मोडमध्येही ही उपकरणे वीज वापरत राहतात.
  • याला व्हँपायर एनर्जी लॉस म्हणतात.

 

४) एसी व गिझरचा अतिवापर

  • एसी कमी तापमानावर (१८–२०°C) लावल्यास जास्त वीज खर्च होते.
  • गिझर दीर्घकाळ सुरू ठेवल्यास पाणी गरम राहते पण वीज वाया जाते.
  • योग्य तापमान नियंत्रण न ठेवल्याने महिन्याला शेकडो युनिट वीज वाया जाते.

 

५) फ्रीजचा अकार्यक्षम वापर

  • फ्रीज सतत उघडणे-बंद करणे.
  • गरम अन्न थेट फ्रीजमध्ये ठेवणे.
  • फ्रीजची सीलिंग (रबर) खराब झाल्यास थंडावा बाहेर जातो.
  • ही सर्व कारणे विजेचा अपव्यय करतात.

 

६) चार्जर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगला जोडून ठेवणे

  • मोबाईल चार्जर, लॅपटॉप चार्जर किंवा पॉवर बँक पूर्ण चार्ज झाल्यानंतरही प्लगमध्ये ठेवली जातात.
  • यामुळे सतत वीज खर्च होते.

 

७) नैसर्गिक प्रकाश व वायुविजनाकडे दुर्लक्ष

  • दिवसा खिडक्या न उघडता सतत ट्यूबलाईट/पंख्यांवर अवलंबून राहणे.
  • नैसर्गिक प्रकाशाचा वापर न केल्यामुळे वीज अपव्यय होतो.

 

८) पंपाचा चुकीचा वापर

  • पाणी पंप वेळेत बंद न करणे.
  • पंपाची गळती किंवा पाईपमध्ये दोष असल्यास सतत वीज खर्च होते.

 

९) जास्त क्षमतेची उपकरणे लहान कामासाठी वापरणे

  • छोट्या कामासाठी मोठे मिक्सर, मायक्रोवेव्ह किंवा वॉशिंग मशीन वापरणे.
  • त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त वीज खर्च होते.

 

१०) ऊर्जाबचतीच्या सवयींचा अभाव

  • घरातील सदस्यांना वीज बचतीची जाणीव नसल्यास अपव्यय वाढतो.
  • "लाईट बंद करा", "पंखा थांबवा" यासारख्या छोट्या सवयी न पाळल्यास मोठा अपव्यय होतो.

 

ऊर्जाबचतीचे उपाय


घरगुती पातळीवर ऊर्जेचा वापर कमी करणे हे आपल्या हातात आहे. थोडेसे तांत्रिक बदल केल्यास २०%–३०% वीज बचत सहज शक्य आहे. या प्रकल्पासाठी निवडलेल्या घरातील लेखापरीक्षणावरून दिसले की काही उपकरणे जास्त वीज खातात, तर काही अपव्ययामुळे खर्च वाढतो. त्यामुळे ऊर्जाबचतीसाठी पुढीलप्रमाणे सुचवले आहेत:

 

(अ) प्रकाश व्यवस्था

2.    LED बल्बचा वापर

o      आधी CFL बल्ब (१८W) वापरले जात होते. आता ९W LED बसवल्याने तितकाच प्रकाश मिळतो पण अर्धी वीज खर्च होते.

o      १० बल्बवर दरमहा २० युनिट वीज बचत.

3.    नैसर्गिक प्रकाशाचा वापर

o      खिडक्या, व्हेंटिलेशन, हलक्या रंगाचे पडदे यामुळे दिवसा दिवे लावण्याची गरज कमी होते.

(ब) पंखे व एसी

1.    स्टार रेटेड पंखे/एसी

o      ७५W पंख्याऐवजी ४५W ऊर्जा कार्यक्षम पंखे वापरले तर दरमहा २०–२५ युनिट बचत होईल.

2.    नैसर्गिक वायुवीजन

o      हॉल व बेडरूममध्ये क्रॉस व्हेंटिलेशन असल्यास एसीचा वापर कमी करता येतो.

 

(क) स्वयंपाकघरातील उपकरणे

1.    फ्रीज

o      २००W साध्या फ्रीजऐवजी ५ स्टार फ्रीज वापरल्यास दरमहा १५–२० युनिट बचत.

o      फ्रीज वारंवार उघडणे टाळावे.

o      फ्रीजला भिंतीपासून किमान ६ इंच अंतर ठेवावे जेणेकरून उष्णता बाहेर पडेल.

2.    मिक्सर/वॉशिंग मशीन

o      आठवड्यातून एकत्र कपडे धुणे, मिक्सर कमी वेळ वापरणे.

o      वॉशिंग मशीन इको मोड मध्ये चालवल्यास १०–१५% वीज बचत.

 

(ड) गिझर व पाण्याची व्यवस्था

1.    सौर जलतापी (Solar Water Heater)

o      १५००W गिझर दरमहा ४५ युनिट वीज खर्च करतो.

o      सौर जलतापी वापरल्यास हा खर्च जवळजवळ शून्य होतो.

2.    गिझर टाइमर

o      गिझर सतत चालू ठेवण्यापेक्षा फक्त १५ मिनिटे वापरणे अधिक उपयुक्त.

 

(ई) इलेक्ट्रॉनिक उपकरणे

1.    स्टँडबाय मोड टाळा

o      टीव्ही, मोबाईल चार्जर हे बंद न करता प्लगमध्ये ठेवले तर ५–१०% वीज वाया जाते.

o      स्मार्ट स्विच वापरल्यास हे टाळता येते.

2.    ऊर्जा कार्यक्षम उपकरणे

o      ५ स्टार रेटिंग असलेले टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन निवडावे.

 

(फ) पर्यायी ऊर्जा स्रोत

1.    सौर ऊर्जा (Solar Panel)

o      घराच्या छतावर २ kW सौर प्रणाली बसवल्यास दरमहा अंदाजे २५०–३०० युनिट मोफत वीज मिळू शकते.

o      दीर्घकालीन गुंतवणूक असून ५–६ वर्षांत खर्च परत मिळतो.

 

(ग) ऊर्जाबचतीच्या सवयी

1.    खोलीतून बाहेर पडताना दिवे/पंखे बंद करणे.

2.    दिवसाढवळ्या नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर.

3.    मोबाईल चार्ज झाल्यावर त्वरित काढणे.

4.    मुलांना व कुटुंबीयांना ऊर्जाबचतीबाबत जागरूक करणे.

  project पर्यावरण प्रकल्प pdf educational marathi आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प pdf

 

निष्कर्ष

वरील उपायांमुळे नमुना घराच्या मासिक वीज वापरात अंदाजे 48 युनिट (19%) बचत होते. विजेच्या दरानुसार दरमहा सुमारे ₹493 बचत होऊ शकते. म्हणजेच वर्षभरात जवळपास ₹5916बचत.

वरील बचत ही फक्त एका एका घरातील झाली. जर एका शहरात किंवा गावात सर्वांनी असे उपाय केले तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत साध्य होईल. त्यामुळे ऊर्जाबचत हा केवळ आर्थिक विषय नसून पर्यावरणपूरक आणि राष्ट्रीय हिताचा विषय आहे.



प्रकल्प संदर्भ 



1. ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार. (२०२३). ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) अहवाल. नवी दिल्ली: ऊर्जा मंत्रालय.
https://beeindia.gov.in

2.महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA). (२०२२). ऊर्जा बचत मार्गदर्शक. पुणे: MEDA प्रकाशन.
https://www.mahaurja.com

3.Bureau of Energy Efficiency. (2021). Energy Efficiency and Conservation in Household Sector. New Delhi: Government of India.

4.International Energy Agency (IEA). (2022). Energy Efficiency Report. Paris: IEA.
https://www.iea.org

5. Kulkarni, S. (2019). Home Energy Audit: A Practical Approach. Mumbai: TechKnowledge Publications.

6. भारत राज्य विद्युत मंडळ (MSEDCL). (२०२३). ग्राहक मार्गदर्शिका व विजेचे बिल गणना. मुंबई.
https://www.mahadiscom.in

7. U.S. Department of Energy. (2021). Guide to Energy Audits. Washington DC: DOE.
https://energy.gov

8.  Patil, A. & Joshi, R. (2020). Energy Management in Residential Buildings. Pune: Savitribai Phule Pune University.

9. The Energy and Resources Institute (TERI). (2022). Sustainable Energy Use in India. New Delhi: TERI.
https://www.teriin.org

10.  विश्व बँक. (२०२१). ऊर्जा कार्यक्षमतेवर जागतिक अहवाल. वॉशिंग्टन.



Info!
प्रकल्प PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील SUBSCRIBE बटणावर क्लिक करून Youtube channel सबस्क्राईब करा.

SUBSCRIBE (It's FREE)

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.